बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळ्यात मोठी गंमत बघा, मराठीचे ढीगभर लेक्चर देणारे हे कुटुम्ब.
बाबा भेटल्यावर आस्ताद काय म्हणतो -
"ममा, कशी आहे ? "
आणि मराठी न येणारी सई, रीलीज झाल्यावर जोरात ' आई......' अशी हाक मारून रडते.
पुणेरी मराठी माणुस , ज्याला आपल्या भाषेचा अभिमान आहे तो इतर काहीही शिकवायच्या आधी त्याच्या मुलांना 'आई' , 'बाबा' असेच म्हणायला शिकवेल .
रच्याकने, मराठीच्या अभिमानाचे असे येता जाता ढोल बडवून आपल्या पोराला (आस्तादला) मात्र ईंग्रजी मीडियम मधून शिक्षण दिले त्याचे काय.

आस्तादचा आणखी एक हुच्चभ्रूपणा:
बाबा आल्यावर तो फोकसबद्दल काही तरी बोलला आस्त्याशी. ते काही तरी नाटयविषयक एक्जरसाइज आहे म्हणे: फोकस किती वेळ राहतो वगैरे पाहण्यासाठी. तर बाबा गेल्यावर सगळ्यांपुढे तो म्हटला: 'ही या लेव्हलची चर्चा असते आमची'. थोडक्यात काय, तुमच्यासारखं मर्त्य मानवांप्रमाणे आम्ही नाही, आम्ही उच्च अश्या अभिरूचीचे लोक आहोत. असा अविर्भाव.

डेलिया चांगला मुद्दा.

इव्हन कन्नड स्मिता पण आई च म्हणाली, एरवी अम्मा किंवा मम्मी अजून काही म्हणत असेल पण तेव्हा आई आई म्हणत होती

डेलिया स्पॉट ऑन. सॉल्लिड!

बाबा आल्यावर तो फोकसबद्दल काही तरी बोलला आस्त्याशी. ते काही तरी नाटयविषयक एक्जरसाइज आहे म्हणे: फोकस किती वेळ राहतो वगैरे पाहण्यासाठी. तर बाबा गेल्यावर सगळ्यांपुढे तो म्हटली: 'ही या लेव्हलची चर्चा असते आमची'. >> Rofl अच्छा तो फोकस शब्द होता का? पुंबा या माहितीबद्दल धन्यवाद.

बापरे असे वर्षानुवर्ष आत्मप्रौढीच्या बुडबुड्यात कसे राहतात हे?

असो आस्ताद चं मराठी आवडतं मला पण attitude नाही, इंग्रजी शाळेत शिकला असला तरी मराठीवर प्रभुत्व चांगलं आहे पण तो एकटाच तिथे मराठी बोलतो हे चुकीचं बोलले त्याचे बाबा. आऊ आणि भूषण बोलतात की मराठी आणि अभिमान पण बाळगतात, प्रमाण मराठीच हवं असं कुठे.

<<आस्तादचा आणखी एक हुच्चभ्रूपणा:
बाबा आल्यावर तो फोकसबद्दल काही तरी बोलला आस्त्याशी. ते काही तरी नाटयविषयक एक्जरसाइज आहे म्हणे: फोकस किती वेळ राहतो वगैरे पाहण्यासाठी. तर बाबा गेल्यावर सगळ्यांपुढे तो म्हटली: 'ही या लेव्हलची चर्चा असते आमची'. थोडक्यात काय, तुमच्यासारखं मर्त्य मानवांप्रमाणे आम्ही नाही, आम्ही उच्च अश्या अभिरूचीचे लोक आहोत. असा अविर्भाव.<< Rofl Rofl

हा मेसेज फेसबुकच्या बिबॉ पेजवर द्या कुणितरी.

त्याचे वडील २० मिनिटे होते, पण गप्पा बिबॉ बाहेरच्या होत्या. नाटक प्रयोग, नातेवाईक वगैरे. त्यामुळे एडिट करून पाचच मिनिटे दाखवलं. पूर्ण विडिओ voot वर आहे.

बाकी मामीच्या सगळ्या पोस्ट्स भारी Happy

तर बाबा गेल्यावर सगळ्यांपुढे तो म्हटली: 'ही या लेव्हलची चर्चा असते आमची'. >> हे वाक्य वाचून मला एकदम 'वर्‍हाड निघालंय...' मधला एक प्रसंग आठवला. लंडनला जायला निघाल्यावर एअरपोर्टवरची प्रचंड लिफ्ट पाहून तो बबन्या म्हणतो की 'कॉम्प्युटर मधलं इलेक्ट्रॉनिक्स आहे ते, तुम्हाला कळणार नाही... आणि त्या नंतरचे त्याच्या चेहर्‍यावरचे भाव ( प्रो. देशपांडेंच्या चेहर्‍यावरचे भाव) हे अस्तादच्या चेहर्‍या वरच्या भावासारखे असावेत. Rofl

आस्ताद च्या बाबानी आस्ताद साठी सिगारेट्स पण आणल्या म्हणे..अनकट शॉट मधे पाहिलं आत्ता..असो..
आस्ताद आणी त्याचे बाबा "मी लई भारी " टाईप्स लोक आहेत..असे लोक खरच नको वाटतात..
काहीही बोर केलं राव.

लई भारीचा सिक्वेल काढायचा झाला तर रितेश देशमुख ऐवजी आस्ताद काळेलाच घ्या हिरो म्हणून.
एकदम छाती फुगवून अभिमानाने म्हणेल "आपली लाथ भारी (रेडेगिरी) , आपली बात भारी (हुच्च मराठी), तिच्या आईला ( हे असं अतिशुद्द मराठीत कसे म्हणेल ? ) आपलंच सगळेच लय (?) भारी"
Biggrin

क्लिप पाहिली कॅप्टनशिप टास्क ची. किशोर वर सगळे ओरडताना दिसले. काय झाले कळले नाही नीट, त्याच्या धक्काबुक्कीमधे शर्मिष्ठाला लागले वाटते. आस्त्या नुस्ता कांगावा करत होता एकावर तीन रे एकावर तीन रे. मग काय तर तिने झेंडे खिशात लपवले वगैरे रड्या कुठला. Lol
त्याच्या ब्रिलियन्ट स्ट्रॅटेजीनुसार आता ते पुष्कीला टारगेट करणार मग तो अज्जिबात टिकणार नाही नॉमिनेशन मधे अन तो एलिमिनेट होईल आणि मग सई पार खचेल... वगैरे वगैरे Happy

वूट वर आ च्या बाबा चा पूर्ण वीडियो आहे ।आ विचारतो बाबाला की namya कसाय तर उत्तर बाबाच: हो बरा आहे ।6000 लाईट बिल आल आहे एकटा राहतो तरि । ही यांची हाई लैवल चर्चा। Lol आउ ला ते थोबाड बद्दल बोलल्यावर आउ बोलल्या की मराठी चे प्रोफेसर आले। addition to that , आ विचारतो चहा घेणार का ?बाबा झालाय vanity त सिगारेट सोबत ।जणू काहि चहा बिस्किट खाल्या सारख normal ।

<त्याच्या ब्रिलियन्ट स्ट्रॅटेजीनुसार आता ते पुष्कीला टारगेट करणार मग तो अज्जिबात टिकणार नाही नॉमिनेशन मधे अन तो एलिमिनेट होईल आणि मग सई पार खचेल... वगैरे वगैरे Happy>
हे असलं सुचतंच कसं म्हणतो मी.. वेडपट आहेत का हे मूर्ख लोक!!! किती वेळा बोलायचं! जाऊ द्या.. पुन्हा एकदा बोलतोच.. रे ग्रुपचे लोक लूझर्स आहेत.

<आ विचारतो बाबाला की namya कसाय तर उत्तर बाबाच: हो बरा आहे ।6000 लाईट बिल आल आहे एकटा राहतो तरि । ही यांची हाई लैवल चर्चा।>
च्यामायला!! हे मजेशीर प्रकरण दिसून राह्यलं..

आस्तादला आता इन्धन वाचवा, अन्न वाचवा आठवतय. परवा फ्रिझ टास्क मध्ये सई जेव्हा फ्रिझ झाली होती किचनजवळ , ती Omelette करत होती, तिच Omelette करपल तेव्हा कुठे होता हा आस्ताद? तेव्हा का नाही आला gas बन्द करायला?

आस्तादचे बाबा जेव्हा ते 'स्पेशल ट्रीटमेन्ट' बद्दल बोलत होते तेव्हा मला वाटत सगळे स्पर्धक फ्रिझ झाले असणार, म्हणून कुणी बोलले नसणार. नक्की आठवत नाही. पण मेघा किव्वा कुणीतरी ते गेल्यानन्नतर आस्तादला सान्गायला हव होत की, "आम्हाला तुझ्या वडिलान्चा आदरच आहे. पण आम्ही कधीच स्पेशल ट्रीटमेन्ट मागितली नाही आमच्यासाठी. आम्ही कधीच म्हटल नाही कि आम्ही कुणी जगावेगळया आहोत. फक्त आम्हाला एवढेच सान्गायचे आहे कि आम्हाला एक स्त्री म्हणून आदर हवा. आमच्याशी निदान नीट वागा. एवढीच माफक अपेक्षा आहे आमची. काहीही कारण नसताना बायकान्च्या अन्गावर धावून येणे हा कुठला न्याय? "

फेलिशाला सुद्दा फ्रिज टास्क कळला होता कि काय? big boss ने फ्रिझ म्हटल्यावर ती सुद्दा statue झाली होती पुष्करच्या कडेवर. Lol

आस्ताद रडला नाही बाबान्ना बघून . मेबी त्याला दाखवायच असेल की मी इतरान्सारखा इमोशनल नाहीये. बाकी त्याच्या बाबान्च्चा आवाजसुद्दा छान आहे. पोरगा बापावर गेलाय. Happy

पुष्कर आणि सई मध्ये वाद झालाय कुठल्याशा तरी मस्करीवरुन. नक्की कळल नाही.

हल्ली सकाळची गाणी हिन्दी लागतायत. मराठी शो आहे ना हा?

काल गाण दमदार लागल होत, आ देखे जरा. टास्क मात्र फुसका होता.

आज पुन्हा राडा टास्क आहे. Angry

सुलू माबोवर येऊन काय घडलं आहे ते लिहिलं आहे.
अस्त्या बद्दल बदाम बिबॉ पहायला लगल्यावर झालंय.
तु म्हणजे माझा सावन का अंधा करून टाकलास... (सगळीकडे हिरवं अस्त्यामुळे Proud ) >>> ओ के , ओ के, जस्ट चिल! रागवायची काय गरज होती? Lol

Btw त्या रामतीर्थकर बाईला पाठवायला हवं होतं वाइल्ड कार्ड म्हणून , तुफान टी आर पी आणि शब्दिक हिंसा, भाकरी करता आ ली पा हि जे >>> कोण? ती शतदा प्रेम करावे ची ज्ञानदा रामतीर्थकर का? तर मग चान्गलच आहे की. छान दिसते. छान खेळेल सुद्दा. तिच्यामध्ये एक sharpness आहे.

आस्ताद रडला नाही बाबान्ना बघून . मेबी त्याला दाखवायच असेल की मी इतरान्सारखा इमोशनल नाहीये.>> ते सारे अश्रु इतरांचे आप्तेष्ट आले तेव्हाच आटून गेले असतील.. खरतर इतरांच बघुन माझेपन डोळे पाणावतात पण माझे आपले कुणि असे दोन चार महिन्यांनी भेटले म्हणुन वा त्यांना सोडून जाताना कधीच माझे डोळे आसवं गाळत नाही Lol .

पुष्कर आणि सई मध्ये वाद झालाय कुठल्याशा तरी मस्करीवरुन. नक्की कळल नाही.>> तो सईला सतत आस्ताद वरुन चिडवतोय. ती मिठी झाली ना ५ मिंटांची त्यानंतर..

बाकी भाववेगाच्या भरात मेघाच्या मुलीने दिलेला निरोप हा वीणा लोकुरचा होता आणि त्यावेळी तिचे भाव त्याच्याकडून धोका आहे असे सुचित करत होते हे या दोन बयांनी नोटीस केलं कि नाही कोण जाणे.. सई तर फुल माझा मित्र माझा मित्र यातच आहे.. मेघाला खरी गोम कळली पण ती खरी असु नये असं तिला मनात वाटत असावं आणि बघुया नेमक का असा निरोप आला या अर्थाचा तिचा चेहरा वाटला हे सर्व डिस्कसताना..

कोण? ती शतदा प्रेम करावे ची ज्ञानदा रामतीर्थकर का? तर मग चान्गलच आहे की. छान दिसते. छान खेळेल सुद्दा. तिच्यामध्ये एक sharpness आहे.>> नाही कोणतरी काकू टाईप आहे.. व्यासपिठ गाजवतेय आजकालच्या पोरी हा विषय घेऊन..

डेलिया चांगला मुद्दा.>>+१
पुष्करला रिलीज केल्यावर मेघा, उना रिलीज झाल्या. भुषण तर पळाला Happy

आस्ताद जॅस्मिन वर कित्ती तो इंप्रेस झाला, पुष्कर “यु आय वन लकी मॅन” एकटाच कॅमेराशी ज्या प्रकारे बोलत होता ते बघून हहपुवा Rofl>>>ते तरी ठिक आहे पण 'बच्चे को सीधा कर दिया तुने' असे बोलला Uhoh

Btw त्या रामतीर्थकर बाईला पाठवायला हवं होतं वाइल्ड कार्ड म्हणून , तुफान टी आर पी आणि शब्दिक हिंसा, भाकरी करता आ ली पा हि जे >>+१ Lol

सुलु ज्ञानदा नाही, अर्थात ती गेली bb मध्ये तरी चालेल. तिला काम दिलं की सिरीयल चालत नाही. तिसरी सिरीयल तिची, जी चार सहा महीन्याच्या आत बंद पडली Wink .

Pages