Submitted by Nikhil. on 12 June, 2018 - 12:20
त्याची पावसाला आर्जवे
नकोच पडु आता .
तिचीही पावसाला विनंती
चिंबच भिजव आता ...
त्याचा पाऊस म्हणजे
चिखलाने वैतागलेला
तिचा पाऊस म्हणजे
मृदगंधाने शहारलेला...
पाऊस त्याचा पाऊस तिचा
दरवेळी दोघांचा ठरलेला वाद
सैरावैरा पावसासारखे दोघेही
धुमसायचे मनातल्या मनात...
पाऊस थोडा ओसरला की
दोघेही शांत व्हायचे.
श्रावणसरींनी बरसल्यावर जसे
पुन्हा ऊन पडायचे...
पाऊस तुझा पाऊस माझा
वाद शेवटी मिटायचा
मिठीत सामावताच दोघे
पाऊस पुन्हा बरसायचा...
- १२-०६-२०१८ निखिल..
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह मस्तच खूप आवडली
वाह मस्तच
खूप आवडली
मस्तच की हो पंडीतजी...आवडलं
मस्तच की हो पंडीतजी...आवडलं बरं का...
मस्त!
मस्त!
छान !
छान !
छान लिहिलंय पंडितजी!
छान लिहिलंय पंडितजी!
@VB, सिद्धी,शालीसर
@VB, सिद्धी,शालीसर,दत्तात्रयजी,जुई
आपल्या सर्वांचे मनापासुन धन्यवाद
मस्तच !!
मस्तच !!
मस्तच....
मस्तच....
सुंदर
सुंदर
मस्त..
मस्त..
मस्तच पंडीतजी...
मस्तच पंडीतजी...
अंबज्ञ, शशांकजी,अन्नपुर्णा जी
अंबज्ञ, शशांकजी,अन्नपुर्णा जी,सायुरी,अज्जूबाबा
आपणा सर्वांचे खुप धन्यवाद