बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्मिताची आई आउंना किती कळकळीने सम्जावत आहे. आउंचा मुलगा पण येतोय.

सईची आई पण येतेय.
सई किती रडतेय, माझे पण डोळे वहायला लागले.

विणा लोकूर यांचा आवाज डिक्टो ऋतुजासारखा आहे. >> +११ आधी हे वाचून मग ती क्लिप पाहिल्यामुळे की काय माहित नाही पण खरंच वाटले तसे. वीणाताई एकदम डॉमिनेटिंग वाटल्या. मेघाला जवळपास ऑर्डर सोडली, सई ची काळजी घे म्हणून, एकदम एक बोट वर करून वगैरे Happy उलट स्मिताची आई खूपच सौम्य आणि प्रेमळ वाटल्या. आऊशी किती जेन्युइनली बोलल्या.

दक्षे तुझ्याच कमेंट्स वाच काळेवरच्या. म्हणून मला आपल वाटल की तुला वाइच ज्यादाच वैट वाटल >> छे! छे! आवडतो खूप पण फाजिल आवडणं नाहिये हे. तो नालायक आहे किती हे मला पण माहिती आहे.

काल स्मिताने हसं करून घेतलं. येडा बनके पेढा अशी स्ट्रॅटेजी आहे म्हणे. अजून तसे काही दिसत तरी नाहीये. बघू कळेलच. यावेळी भूषण उडावा अशी फार इच्छा आहे पण ...!
किंग मेकिंग चे भूत आस्ताद ने सिरियसली घेतलेले दिसते. सईला डोक्यावर चढवत होता काल. मधेच आऊशी बोलणी करत होता. मधेच स्मिताला उचकवले. शिवाय भूषण ला पण झोपताना पिन मारत होत, लोकांना तू सांगकाम्या वाटत आहेस वगैरे. कुच्छ चल रा उस्के दिमाग मे. स्वतःचा स्वतःसाठीचा गेम सुरु केला आहे.
मेघा आणि सई बोलत असताना सई म्हणाली आपण दोघी रॉकिंग आहोत, आपण लोकांना आवडतोय इ. ओवरकॉन्फिडन्स होऊ नये म्हणजे झाले.

मी आता पाहिलं व्हूटवर. स्मिता सईशी बोलताना पार गांगरून गेली. स्पाॅन्सर्सना काय वाटेल हा काय मुद्दा आहे का? Rofl तो स्पाॅन्सर्सचा मुद्दा अस्तादनं वेगळाच सांगितला होता. तो म्हणाला होता की जाऊन सांग की ' मला स्पाॅन्सर्स आहेत. माझे कपडे, दागिने सगळे स्पाॅन्सर्स आहेत ते काय उगीच? मी जर डंब असते तर हे सगळं कसं काय मिळवलं असतं?' या बाईनं सईसमोर ही फॅक्ट भलत्याच अँगलनी मांडली आणि सईचा आरोप शाबित केला. खरंच बिचारी गोड आहे पण फार छक्केपंजे नाही कळत तिला. खरंतर इतकी एकटी राहिलिये, अनेक अनुभवांतून गेलिये. पण शहाणपण नाही आलं.

मला एक गोष्ट समजली नाही की भूषण आणि अस्ताद ने सुशांत परत येणार नाही आहे किंवा त्याने खेळातून स्वत: होऊन माघार घेतली आहे हे बाकी घरच्यांना वेळच्या वेळी का सांगितलं नाही? Uhoh आणि त्यात लपवून ठेवण्याजोगं काय होतं?

सुशांत गेल्यावर मला अस्ताद मध्ये खूप बदल दिसले. बहुधा त्याला स्वत:ला सुशांत असताना प्रचंड असुरक्षित वाटत होते, आणि आपण जिंकण्याचे फारच कमी चान्सेस आहेत असे त्याला त्यावेळी वाटत होते (बहुधा) पण सुशांत गेला तसा अस्ताद एकदम फेअर खेळायला लागला. टास्क मध्ये १००% योगदान देऊ लागला आहे. आणि पुरूषांमध्ये तोच आता (दांडगा गडी) उरलाय असं त्याला वाटत असेल.

किंग मेकिंग चे भूत आस्ताद ने सिरियसली घेतलेले दिसते. सईला डोक्यावर चढवत होता काल. मधेच आऊशी बोलणी करत होता. मधेच स्मिताला उचकवले. शिवाय भूषण ला पण झोपताना पिन मारत होत, लोकांना तू सांगकाम्या वाटत आहेस वगैरे. कुच्छ चल रा उस्के दिमाग मे. स्वतःचा स्वतःसाठीचा गेम सुरु केला आहे.

>>> हो हो. Biggrin येडबंबू कुठला.

रेशमला सांगत होता डबल ढोलकीचा आणि रागिटपणाचा शिक्का जो त्याच्यावर लागला होता तो त्यानं प्रयत्नपूर्वक दूर केलाय.

एकदा ठरवलं की आपण भारी, आपण जे समजतो तेच भारी की मग काय इतरांना शिकवायलाहा मोकळा.

व्हूटवर एका क्लिपमधे रेशमटीम स्किटची तयारी करताना दाखवलेय. ते स्किट अस्तादच्या डोक्यातून आलेलं आणि स्किटचा फुल फोकस मेघावर होता.

तो मेघावर फारच डुख धरून आहे हे सतत अधोरेखित होतंय.

काल किशोरने एका दिवसात बाहेरच्या लोकान्बद्दल आपल मत बदलल. आधी म्हणत होता रे ग्रुपला की बाहेरच्या लोकान्ची मते ग्राहय धरु नका, त्याच्न काहिच नाही इथे, जे आहे ते आतमधल्या लोकान्च आहे इ. इ. पण Nominations झाल्यानन्तर तोच ग्रुपला म्हणत होता की बाहेरच्या लोकान्ची मते आपल्यासाठी खुपच महत्वाची आहेत. Lol

सईला फक्त तिच्याच ग्रुपमधले Top 3 मध्ये हवे आहेत फायनलला. सई , मेघा, पुष्की असे काचेवर लिहिले होते तिने. शरा आणि आऊला सुद्दा तिकडे स्थान नाहिये.

स्मिताविषयी रे ग्रुपही तिच्यामागे बोलतात. रेशम म्हणत होती कि देवाने तिला वेगळ बनवलय. आस्ताद तर तिच्याकडे सहानूभुतीने बघत होता.

तुम्ही मोलकरीण बोललात ते ऐकून माझ्या sponsors ना काय वाटेल ? हा स्मिताचा प्रश्न तर विचित्रच वाटला. Uhoh कुठल्या गोष्टीचा कुठे सम्बध लावतेय ही हेच कळत नाही.

एकदा ठरवलं की आपण भारी, आपण जे समजतो तेच भारी की मग काय इतरांना शिकवायलाहा मोकळा. >>>> +++++११११११ आउ सुद्दा काल म्हणत होत्या त्याला, मला सगळच कळत अश्या भ्रमात राहू नये कोणी. Biggrin

बादवे, काल आउ भुक लागण्याचा इशारा ज्यावेळी केला नेमक त्याचवेळी रेशम त्यान्च्या Action ची नक्कल करत होती. Scripted होत का हे? Uhoh

आज ABP माझावर सुशान्तची मुलाखत होती.

स्मिताची आई मस्तच आहे.>>> नी तू ओळखत असशील तर सांगना त्यांच्याबद्दल. खरंच फार साध्या, गोड वाटल्या स्वभावाने.

आदल्या दिवशीच मेसैने स्मिताची माफी मागितली असताना तिने मला मोलकरीण का म्हणता असे परत विचारणे हस्यास्पद वाटले.

नंकि किती उद्धटपणे सै ला 'ए चल्ल' म्हटला होता तरीही तिने त्याला नॉमिनेट नाही केले. किती उग्र वाटतो तो!! सु ने जसे सैच्या चेहर्‍याला ओली माती फासलेली तसेच याने मेचा चेहरा बरबटवला Angry अश्यांपासून ४ हात लांब असलेलेच बरे. पण आता जोर लावायचे कार्य आल्यावर काय करणार या बायका?

स्मिताला नाही समजत काही गोष्टी तर खरंच तिने गप्प रहावं, ती खूप चांगली आणि भाबडी वाटते. बिचारी उगाच ह्या गोष्टींमुळे फसते. उगाच गेली सईशी बोलायला.

बादवे, काल आउ भुक लागण्याचा इशारा ज्यावेळी केला नेमक त्याचवेळी रेशम त्यान्ची नक्कल करत होत्या. Scripted होत का हे? >>तिकडे सै आणि स्मिचे बोलणे--वाद चालू होते तेव्हा तिथे उना आल्या आणि त्यांनी जेवायला या असा इशारा केला पण त्या वादात दंग आहेत ते बघून त्या लगेच परत वळल्या. ते रे ने पाहिले अन यांचे मधेच काय असे वाटून तिला हसू आले. ती ते आस्ताद भू ला नक्कल करून दाखवत होती. तेव्हा सुद्धा मागे परतलेल्या उना ने पुन्हा जेवायला यायचा इशारा केला Lol

नाही. तिकडे सै आणि स्मिचे बोलणे--वाद चालू होते तेव्हा तिथे उना आल्या आणि त्यांनी जेवायला या असा इशारा केला पण त्या वादात दंग आहेत ते बघून त्या लगेच परत वळल्या. ते रे ने पाहिले अन यांचे मधेच काय असे वाटून तिला हसू आले. ती ते आस्ताद भू ला नक्कल करून दाखवत होती. तेव्हा सुद्धा मागे परतलेल्या उना ने पुन्हा जेवायला यायचा इशारा केला >>> हो का? अस होत का? पण परफेक्ट टायमिन्ग जुळल होत त्यावेळी. Happy

अन्जू, अगं लहानपणी आपल्या बिल्डींगमधे/ कॉलनीमधे एखादी काकू आपल्याला स्पेशली आवडत असते ना. तसला प्रकार आहे माझा तिच्याबाबत. बाकी सगळ्या काकवांना अहो काकू आणि तिला ए काकू म्हणले जायचे. कारण अहो काकू टाइप बोरिंग नव्हती ती. स्मिताचे अ‍ॅथलीट जीन्स तिच्याकडून आलेत. काकूही स्विमिंग चॅम्प आहे. आत्तात्तापर्यंत सप ला कोच होती. याहून काय सांगणार.

वाह नी, म्हणजे स्मिताला पण तू बघितलं आहेस लहानपणापासून. मस्तच गं आई तिची, स्विमिंग कोच वगैरे. स्मिता बरीचशी आईवर आहे, स्वभाव तिचाही मस्त वाटतो.

थँक यु गं.

स्मिताला पण तू बघितलं आहेस लहानपणापासून. << हो. अर्थातच ना.
मी मागेच म्हणलंय १-२ लोक ओळखीचे आहेत म्हणून सुरू केले बघायला.

स्मिताला पण तू बघितलं आहेस लहानपणापासून. << हो. अर्थातच ना.>> मग ती खरेच इतकी भोळी आहे का? कि तशी तिची खेळी आहे?

आऊंचा मुलगापण मस्त आहे.

मी मागेच म्हणलंय १-२ लोक ओळखीचे आहेत म्हणून सुरू केले बघायला. >>> हो बरोबर.

Smita's mother tongue is Kannada, right ?
She told Usha Nadkarni on upama breakfast drama episode .

स्मिता फारच गोड मुलगी आहे. फक्त ती जो विचार करते आणि जे बोलते ते एकसंध नसतं. आणि हे स्वाभाविक असू शकतं, सो मला तिचा राग वगैरे येत नाही, किंवा मला ती डंब पण नाही वाटत. ती जशी आहे तशीच आवडते मला.
सध्या मला घरातले सगळेच आवडतात.
मेघा आणि सईची मैत्री अक्षरश: शोलेतल्या जय-वीरू सारखी वाटतेय. एकदम घट्ट.

वर बिबॉच्या घरातल्या लोकांच्या ड्रेसिंग आणि कानातल्यावर बरीच चर्चा झाली आहे.
माझं तर लक्ष नाही जात अशा गोष्टींकडे, प्रेझेंटेबल आहेत लोक आणि टास्क व्यवस्थित खेळतायत हे महत्वाचं आहे . त्या हिंदी बिबॉ मुळे फार ग्लॅमर आले या रिअ‍ॅलिटि शो ला... ते ठिक आहे. पण चॉईस असू शकतो एखाद्याचा कमित कमी अ‍ॅक्सेसरिज वापरण्याचा किम्वा आहेत त्या रिपिट करण्याचा.
दॅटस फेअर आय गेस!

मग ती खरेच इतकी भोळी आहे का? कि तशी तिची खेळी आहे?<< ती मनाने एकदम चांगली आणि साधी मुलगी आहे. छक्केपंजे न कळणारी वगैरे. आता अनेक वर्षे आमचा रेग्युलर कॉन्टॅक्ट नाही त्यामुळे खेळी बिळी मला खरंच माहिती नाही.

गोंदकर फॅमिली आणि काकूही कर्नाटकातली आहे मूळची. आणि स्मिता इंग्लिश मिडीयममधे शिकलीये.

Pages