बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शरा ला मत द्यायला हवीत.... नक्कीच ती छान खेळते आहे..
ति हुशार आहे, समंजस आहे.. तिला कळत कुठ थांबायच, कुठे काय बोलयच..

मला अगोदर तिची एक वेगळीच ओळख झालेली , तो चि. सौ. का. पाहिल्या पासुन..
पण बि बॉ मध्ये तिचा वावर छान आहे..

नॉमिनेशन task मध्ये श रा आणि भूषण झाले nominate पण कॅप्टनला विशेष अधिकार दिला त्यात स्मिताला केलं सईने. मला जाम भीती वाटतेय स्मिता जाईल, भूषणला वाचवतील. श रा ला आरामात मतं मिळतील.

आमच्या स्मिताताई पण मूर्खपणा करतात, त्या आ रे चौ चं ऐकून भिडल्या सई ला. काय गरज होती. आता तर अजून मतं नाही मिळणार बाईसाहेबांना.

आऊ काय सारख्या किरकिर करत असतात. सगळे फक्त ऐकल्यासारखं करतात, कोणीच लक्ष देत नाही. रोज मरे त्याला कोण रडे. आऊंचा मुलगा येऊन सांगणार आहे की तिची एवढी मस्करी करू नका. ही काय ड्रामेबाजी आहे, त्यापेक्षा तो त्याच्या आईला घेऊनच का जात नाही, असंही आऊ नाॅमिनेट झाल्या तर फार त्रागा करतात. सईचे केस काय मस्त आहेत. मेघा, सै आणि स्मिताचा मी एकही ड्रेस मी रिपीट झालेला बघितला नाही. रेशम बरेच कपडे रिपीट करते आणि शनिवारचे कानातले ठरलेले. ज्याचं करावं भलं अशी आहे स्मिता. मोलकरीण म्हटलं तर त्यात एवढं काय चुकलं. घरातल्या बायका असं जनरली म्हणतातच ना की मी काय मोलकरीण आहे का राब राब राबायला. वरदहस्तचा अर्थ कोणाला कळला नाही, सैला का. शनायाची बहीण आहे Happy स्मिता किती चांगलं मराठी बोलते, व्याकरण थोडं चुकतं पण तिथे राहणा-या ब-याच लोकांपेक्षा चागलं बोलते, इंग्रजी शब्द नाही वापरत फारसे. आऊ आज म्हणाल्या की मला सगळं कळतं पण मला सगळं कळतं असं कोणी समजू नये Happy

नॉमिनेशन task मध्ये श रा आणि भूषण झाले nominate पण कॅप्टनला विशेष अधिकार दिला त्यात स्मिताला केलं सईने. मला जाम भीती वाटतेय स्मिता जाईल, भूषणला वाचवतील. श रा ला आरामात मतं मिळतील.

नवीन Submitted by अन्जू
>>>>>>>>>

एक नम्बर काम केल सई ने.. स्मिता गेली तरी चालेल..
एक तर तिने खलनायक टिम जवळ केली.. त्यात तिची अवस्था मग हेलन सारखी झालीय.
चांगली असुन काय उपयोग आहे तर खलनायक टोळी मध्येच न, मग एक दिवस ते तिचा योग्य वेळी बळी देनार...

सईचे केस काय मस्त आहेत.
नवीन Submitted by चंपा
>>>>>>>>>>>>

एकदम बरोबर... Happy

सईची पर्सनॅलीटी खुपच मस्त... उंच, लांब केस, एकदम हेल्दी, गोरी.. ती अशी लेदर जॅकेट, बाईक वगैरे वर कसली मस्त दिसेल ना..

ती nominate झाली त्यापेक्षा चौगुले झाला नाही, याचं मला वाईट वाटलं, चौगुले होऊन ती झाली असती तर चाललं असतं. त्याचा वावर फार negative वाटतोय मला अजूनतरी.

सईची पर्सनॅलीटी खुपच मस्त... उंच, लांब केस, एकदम हेल्दी, गोरी.. ती अशी लेदर जॅकेट, बाईक वगैरे वर कसली मस्त दिसेल ना..
Submitted by morpankhis on 12 June, 2018 - 02:36
>>>
बदाम नाहीत का आज?

^^^
पुंबा,
श.रा. ला द्या व्होट्स Happy

स्मिताला व्होट द्या.... >> हो मी ही तीलाच दिले. जरी दोघी चांगल्या असल्या तरी स्मिता पहील्या दिवसापासुन आहे घरात. अन खुप साधी भोळी वाटते ती मला. दिसते पण किती भारी. बिबॉच्या सध्याच्या घरात ती एकमेव आहे जी खुप सुंदर दिसते अन जे काही घालते ते खुप छान कॅरी करते

>>>>स्मिताला व्होट द्या.... >> हो मी ही तीलाच दिले. जरी दोघी चांगल्या असल्या तरी स्मिता पहील्या दिवसापासुन आहे घरात. अन खुप साधी भोळी वाटते ती मला. दिसते पण किती भारी. बिबॉच्या सध्याच्या घरात ती एकमेव आहे जी खुप सुंदर दिसते अन जे काही घालते ते खुप छान कॅरी करते>>>>++++1111

मी पण स्मितालाच वोट दिलं..

आपले वोट तर शरा लाच!
किती लवकर जेल झाली ती मेघा आणि सईच्या टीममध्ये!
तिच ते "पुष्क्या", "आस्त्या" वगैरे म्हणणे आवडते मला!
फुल्ल जिग्गी मैत्रीण कॅटेगरी वाटती ती मला!

मीपण स्मिताला देणार, मला श राची काळजी नाही. मे स सपोर्टर भरपूर मतं देतील. भुषण म मां चा लाडका आहे, स्मिता खुपते त्यांना. स्मिता मला आवडतेच, या सर्व कारणामुळे स्मिताला वोट देणार.

दिलं स्मिताला वोट. मला तिचीच काळजी वाटते. त्यात बाईसाहेब सैबाईला काहीबाही बोलून आल्यात. गप्प बसायचं ना, उगा काय रे आ चौ चं ऐकायचं.

स्मिताच जाऊदे... मांजर वाटते ती रे, आस्ताद यांच्या ताटाखालचं.. त्यांनी शिकवलं हि गेली सईबरोबर बोलायला.. अरे स्वताच्या डोक्याने विचार करुन जा न बोलायला. पण भुषण जाईल अशी शक्यता वाटते. श.रा जाता नये मात्र.

स्मिता स्वताच prove करतेय की ती किती confused आहे ।ग्रुप
ने शिकवणी घेतली तर चालल्या madam सै ला जाब विचारायला। सै ला काहिच यातल माहित नसताना कसल भारी गप्प केल । जियो । स्पोन्सर ,कपडे हे मुद्दे पण group चेच त्याचा तर काहिच संबंध नव्हता। लहांंन मूल कशी जातात जाब विचारायला की मला का मारल तशी गेली पण स्वताच डोक नसल्याने गप्प बसली 2 वाक्यात येडी ।

हो सर्व मान्य, स्मिताच्या काही गोष्टी अजिबात आवडत नाहीत. पण तरीही तुलना केली तर चांगले गुण जास्त आहेत तिच्यात, तिच्या वाईट गुणांपेक्षा. मला आवडते ती.

खलनायक ग्रुप मधे फक्त आ आणि रे च रहिलेत डोक वाले त्यातल्या त्यात,बाकी येडे। bdw स्मिता गेली तर ग्रुप मधे सर्व सिगारेट फुकणारे च राहतिल। पावसात त्यांच्या pco च्या वारया वाढतील । रेशम किती फुकत असते । काल सै भुषण ला शिक्षा करत होती तेव्हा त्याची एक फेरी पूर्ण व्ह्यायच्या आधी ती गेली कारण भुषण ला पण तल्लफ आलेली

भुषणला म मां चा वरदहस्त आहे, श रा ला प्रेक्षकांचा. त्यामुळे मला स्मिताचीच काळजी आहे. म मां ची पण ती सॉफ्ट टारगेट. असो. मी एक वोट देऊ शकते तिला ते दिलं. माझ्या मनाचं समाधान.

भुषणला म मां चा वरदहस्त आहे, श रा ला प्रेक्षकांचा. त्यामुळे मला स्मिताचीच काळजी आहे. म मां ची पण ती सॉफ्ट टारगेट. असो. मी एक वोट देऊ शकते तिला ते दिलं. माझ्या मनाचं समाधान. >>>> ++1111

स्मिताची चिंता करु नका, तिला भरपूर फॅन्स आहेत, ते वाचवतील तिला, शिवाय तिचे स्पॉन्सरर्स देतील ना तिला व्होट्स Wink
एकच मत ग्राह्य धरत असतील तर श.रा ला द्या .
स्मिता आता खरच डंब वागून स्वतःचं हसं करून घेतेय आणि सईने दिलेल टाय्टल प्रुव्ह करतेय !
अस्ताद-रेशम-नं.कि ने पढवून पाठवले आणि ही गेली, सईने तिच्या येड्या प्रश्नांना मस्तं उडवून लावलं Biggrin
बाकी म.मां जसे आऊ तलवार कधी काढतील वाट पहातात , तशी मी स्मिता तिची नक्की स्ट्रॅटजी आहे तरी काय , नक्की कधी स्ट्राँग चाल चलून वार करतेय याची वाट पहतेय पण ती काहीच स्ट्राँग भूमिका घेत नाहीये !
रेशम गृपमधे बाकी एक स्मिता सोडली तर सगळेच फुंकणारे म्हणून ते लोक बेंचवर आणि मेघा टिम नॉन स्मोकर्स म्हणून झोपाळ्यावर का Happy ?
बाकी सई मेघाचं बाँडींग बघून पुष्कर थोडा जेलस होतोय, लव्ह ट्रँगल असतो तसा इथे फ्रेंड्शिप ट्रँगल झालाय् , पण आय होप हे तात्पुरतं असेल!
सई मेघा दोघीही त्याच्याबद्दल कधीच वाईट बोलत नाहीत.
ओव्हरऑल सई मेघा मैत्री तुटावी म्हणून आस्ताद, रेशम, पुष्कर आणि खुद्द म.मां प्रयत्नं करून झालाय, पण अजुन तरी छान आहे त्यांचा बाँड !
अपकमिंग हिंदी बिग बॉस ‘जोडी स्पेशल’ मधे सई मेघा एकत्रं गेल्या तर मजा येइल !

मला पुष्कर, स्मिता, मेघा आवडतात. त्यामुळे वोटस या तिघांनाच देते. पण दुसरं वोट मी श रा ला देऊ शकते. चालत असेल.

मेघा आणि सईमधे वागणूक, वावर हा मेघाचा फार बेटर दॅन सई. त्यामुळे बिग बॉस स्पर्धा सईने जिंकली तर आवडणार नाही. मेघाने जिंकली तर आवडेल. पुष्कर जिंकला तर जास्तच आवडेल. स्मिता तिथपर्यंत पोचेल असं वाटत नाहीये.

स्मिताची चिंता करु नका, तिला भरपूर फॅन्स आहेत, ते वाचवतील तिला, शिवाय तिचे स्पॉन्सरर्स देतील ना तिला व्होट्स >>> मै भी फॅन ना उसकी Wink

पण तिला इतके फॅन्स, स्पॉन्सरर्स कसे. मला एक ते तिचं पारु साँग माहीतेय. बाकी काही माहीती नाहीये. मी आधी तिला बघितल्यावर, हिला काम नाही म्हणून आली इथे असंच म्हणाले होते. पण तिचं नेचर, इथला वावर, टास्कमधे झोकून देणं बघून ती फार आवडायला लागली.

स्मिता काय त्या रे टीमचे ऐकुन सैशी भांडायला गेली, स्वतःच्याच तोंडावर पडली. कधीतरी स्वतःच्या डोक्याने वागावे माणसाने. तिला प्यादा म्हणून वापरतात रे टीम वाले.
त्यामानाने शरा खुपच स्मार्ट आहे. ५० दिवसांनंतर येऊनही घरात एकदम सुरुवातीपासुनच राहतेय असा तिचा वावर आहे.
माझे मत तर शरालाच!

त्या छपरी किशोरला का नाही नोमिनेट केले यावेळी?

रेशम किती फुकत असते >> तिचे दात आणि तोंड यामुळेच खराब झालेय का ? वीकेन्ड च्या एपिसोड मधे बोलताना ती तोंडाचा कसा चंबू करून बोलत असते. तिला बोलताना बघितले की वर्षानुवर्षे तंबाखू खाऊन जबड्याची वाट लागलेल्या लोकांप्रमाणेच तिचेही तोंड झालेय असे वाटते.
स्मिता कीतीही आवडत असली तरी शरा लाच मत द्या. स्मिता सुंदर आहे, स्वभावाने चांगली असली तरी तिला 'समज' नाही. आणि धीटपणे स्वतःचे मत मांडणे , दुसर्यासाठी स्टँड घेणे तर तिला अजीबातच जमत नाही. किंबहुना ती ते करायलासुद्धा जात नाही. आठवा नंकी चा कीस्सा.
शरा स्वभावाने चांगली आहे + स्मार्ट आहे + धाडसी आहे. सो आपले मत शरा लाच.

Pages