बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अस्ताद अन रेशम शेवटपर्यंत रहावेत कारण जसा हिरा कोंदणात उठून दिसतो त्याप्रमाणे मेघा, सई हे हिरे व्हिलनमंडळींच्या कोंडाळ्यामुळे उठून दिसतात.

काल सकाळीच जेव्हा भूषण बिग बाॅसचा फ्रीझ अँड रिलीज टास्कचा निरोप वाचत होता तेव्हाच मेघाला नक्की काय होणार आहे याची कल्पना आली होती बहुतेक. तिच्यावर त्यावेळी मुद्दाम 2 वेळा कॅमेराही आला होता. पण मागची चूक तिनं पुन्हा केली नाही. कोणाला सांगितलं नाही बहुतेक.

स्मिता व्होटींगबद्दल बोलली नाही. दुसरंच काही तरी होतं ते.
स्मिताची आई, आऊचा मुलगा, रेशमची मुलगी मस्त. लोकुरमॅडम ऋतुजासारख्या बोलतात हे खरं. सगळ्यात जास्त त्याच आवडल्या.
त्यांनी स्मिताला सांगताना 'महेश मांजरेकर' असा एकेरी उल्लेख केला ते आवडलं.
स्मिताच्या आईचं बोलणं अघळपघळ पण खूप इंटेन्स होतं..

हो क्यूट होत्या त्या ! तरी पण ते बिकिनी घाल हे मुलीला सांगणे विचित्र वाटले खरे. तिने बिकिनी घातली तरी काहीच खटकणार नाही हे नक्की, आय मीन काही म्हणणेच नाही. पण तिच्या आईने तसे म्हणणे जरा ऑड वाटले खरे.
बाकी एपि. फार बोअर होता. उद्याही हेच आता Uhoh
उनाचा मुलगा दिसायला छान आहे Happy याउलट रेशम ची मुलगी तिच्या मानाने काहीच खास नाही दिसायला. नुस्ते केसाचे टोपले. पचापचा सगळ्यांच्या पाप्या घेत होती ते बघून कंटाळा आला.

काल सगळ्यांचीच नातेवाईक मंडळी काही ना काही अजेंडा घेऊन आली होती. इमेज बिल्डींगसाठी आल्यासारखी.

स्मिताची आई ज्यांच्या डोळ्यात पाणी नव्हतं त्यांचेही डोळे जबरदस्ती पुसत होती. Wink

स्मिताची आई ज्यांच्या डोळ्यात पाणी नव्हतं त्यांचेही डोळे जबरदस्ती पुसत होती.

>>> Lol हो बरोबर. आणि स्टॅच्यु असलेल्या लोकांना त्यांची पोझिशन बिघडवून हँडशेक करणे, पाप्या घेणे करत बसलेली. नंकिला किती लाडीक पणे हात द्या की म्हणाली. आणि मुलीला भेटल्यावर पहिले काय तर तू छान दिसतेस आणि तुझे ड्रेस छान दिसतात म्हणाली. ते जरा खटकलं.
अजून मी बिकिनीपर्यंत पोहोचले नाहीये.

कदाचित स्मिताच्या डिझायनरने तो निरोप आवर्जून द्यायला सांगितलं असेल तिच्या आईला. तिचे सगळे कपडे आणि लुक्स स्पॉन्सर्ड आहेत ना. बिकिनी दिलीय आणि हिने घातलीच नाही अजून. आता नॉमिनेट झालीय, न जाणो बाहेर पडली तर.. त्यामुळे त्या आधी ती बिकिनी एकदाची घालून टाक असा काहीतरी उद्देश असेल.

आऊचा मुलगा नंकिला विशेष काही बोलला नाही, खरंतर चांगलंच थोबडवायला पाहिजे होते त्याने.
मी तर एक वाजवूनच आलो असतो.

स्मिताची आई अगदी साधी वाटली मला, मनात येइल ते घडाघडा बोलत होत्या , मराठी येत नाही पण जमेल तस त्याना वाटत ते पोहचवत होत्या,<< ती तशीच आहे. एकदम दिलखुलास, बिनधास्त. उत्साहाच्या भरात गमती करते भरपूर. आणि मग स्वतःच केलेल्या गमतीवर हसतेही. पण प्रचंड स्ट्राँग आहे ती.

उ.नां चा मुलगा राजीव गांधीं सारखा दिसत होता Happy
आज आलेल्या फॅमिली मेंबर्स पैकी सर्वात जेन्युइन तोच वाटला, स्मिताची रिअ‍ॅक्शन तुफान विनोदी, तिच्याशी उ.ना चा मुलगा बोलला , तिला कोण समजल नाही आणि अजुन कनफ्युज झाली, कॅमेर्याला म्हणे अत्ता मला कोणी तरी फुल दिलस , तर ट्युबलाइट का प्रश्नं विचारून गेला Rofl
बाकी आज वातावरण वितळवूनच टाकलं फॅमिली मेंबर्स नी एंट्र्या मारून !
सई जरा इमोशनली हलली होती स्मिताच्या आईचे बोलणे ऐकून, बाथरुम मधे जाऊन रडत होती, मेघाला म्हणली यांच्या घरचे लोक किती नीट बोलले आपल्याशी, पण मेघा भारी हुष्षार, ती म्हणे उगीच विचार करु नको, फॅमिली मेंबर्स चांगले वागले असले तरी हे लोक (स्मिता -रेशम ) आपल्यामागे वाइटच बोलतात, तू गिल्टी फील करु नको वगैरे !
मला सईची आई सुध्दा आवडली, एकदम सई सारखी आहे.
सईची आई शर्मिष्ठा आणि मेघाशीही छान बोललीच पण स्मितालाही मस्तं फिगर आहे सांगितलं आणि म.मां ना स्पाँटेनियस उत्तरे देत सल्ला दिला.
सर्वात फनी, आस्ताद टॉयलेट मधे होता, तर टॉयलेटच्या बाहेरून बोलली आणि नं.कि शी स्मोकिंग रुम बाहेरून Biggrin
रेशमच्या मुलीला कुठेतरी वाटले कि रेशम आणि मेघा फ्रेंड्स बनाव्या :).
रेशमच्या मुलीचा पाप्या सोहळा आणि स्मिताच्या आईचा मुलीचा कौतुक सोहळा बाकी फार बोअर झाला !
स्मिताच्या आईला जास्तं फुटेज दिल का ? किंवा त्यांनी कन्टेन्ट इंटरेस्टींग दिल्याने जास्त दाखवल असेल पण फारच असंबध्द आणि तेच तेच बोलत होत्या.
बाकी त्यांचा अ‍ॅक्सेंट फार क्युट आणि प्रेमळ वाटल्या पण बोलण्याचा इतका कंटाळ आला कि बिग बॉसने त्यांनाच स्टॅच्यु करावे असे वाटत होते Happy
मलाही बिकिनी प्रकार मॅगीने लिहिलय तसं स्पॉन्सरर्स लुक म्हणून आठवण केली असेल असं वाटलं किंवा मग खरच ती एकटीच त्या घरात बिकिनी बॉडी मॉडेल आहे म्हणून सांगितलं असेल, काय माहित ती स्विमर आहे/ प्रोफेशनल मॉडेल आहे , त्यांना ते स्लिवलेस घाल जितके कॅज्युअली म्हणु तितके कॅज्युअल वाटतही असेल !
नक्की क्लिअर नाही कळले त्यांना काय सांगायचे होते !
आज पुष्कीची बायको आणि बेबी येणार म्हणे, त्याच्या बायकोचा व्हिडीओ पाहिला बिफोर एंटरींग बिग बॉस हाउस,
मस्तं आहे ती दिसायला !'
ती सईशी काय बोलते पहाणे इंटरेस्टींग असेल फक्त ती मराठी बोलत नाही असं वाटलं , बिग बॉसला चालणार का ते ?

स्मिताची आई आधी तिला सांगत होती की (तिची स्पाॅन्सर) विचारत होती की स्मितानं बिकिनी का नाही घातली? आणि मग जाताना पुन्हा आठवण करून दिली तिनं. कदाचित त्या स्पाॅन्सरबाईनं दटावून पाठवलं असेल. स्पाॅन्सर्स वाॅर्डरोब असल्यानं काही कंडिशन्स आणि ऑब्लिगेशन्स पण असणारच कारण स्मिताच्या फेबुवर तिच्या प्रत्येक लुकचे फोटो रेग्युलरली अपडेट होतात आणि तिच्या
ड्रेस डिझाईनरबरोबरच अॅक्सेसरीज ज्यांच्याकडून घेतल्या असतील त्यांचीही नावं असतात.

मला सर्वच आवडले. आऊचा मुलगा सर्वात जास्त आवडला. मी येता जाता बघत होते कालचा म्हणून स्मिताची आई मला बोअर नाही वाटली, तशी साधी, प्रेमळ वाटली. हा थोडं बोलणे अघळपघळ आहे एवढंच. तिला किती बोलू किती नको असं झालं होतं. बिकिनी मला कळले नव्हते, मी इथे विचारलं तेव्हा समजलं, ते मला खटकलं मात्र.

सईची आई पण तसं अघळपघळचं बोलत होती, ती पण आवडली. तशी वीणा लोकूर फेमस आहे. फक्त आस्तादशी अगदी तिथे जाऊन बोलणे फनी वाटलं पण ती त्याला ओळखते ना, तिच्या मुवीत हिरो होताना.

मला रेशमची मुलगी रेशमपेक्षा आवडली. ती पण खूप बोलत होती. अभिजीत नाडकर्णी सोडून सर्वच अतिउत्साहीपणा करत होते जरा. पण ओके. अगदी लक्ष ठेऊन बघितलं नाही म्हणून बोअर नाही झालं तितकं. अभिजीत कुल होता.

मला तर स्मिता ची आई आवडली...
मला उ ना च्या मुलाला पाहून पप्पू गांधी ची आठवण आली... पण तो खूप मस्त बोलला सर्वांशी....

स्मिता च्या आई सारख्या मॉम्स मी पाहिल्यात... बडबड करणे हा त्यांचा स्वभाव असावा... मला तरी त्यात कुठलीही चालुगिरी दिसली नाही... बिकिनी स्पॉन्सर वाली पोस्ट मॅगी ची पटली...

सई ला बहुतेक आज स्टेच्यु करून आई ला परत आत पाठवतील असं वाटतंय. बिचारी किती रडत होती...

पुष्की ची बेबी किती गोड आहे.. गुंडी नुसती.... ( मागे पुष्कर बिग बॉस ला बोलता बोलता बोललेला की," तुम्हाला पण बेबी असेल च , मला पण माझी बेबी दाखवा प्लिज "
सई आणि मेघा हसून लोळायच्या बाकी राहिलेल्या...

मला रेशम ची मुलगी आवडली... आई आणि तिच्यात बॉण्ड आहे, आणि 2 महिन्यांनी भेटल्यावर तिने तिच्या आई ला इतक्या पप्प्या घेणं साहजिक आहे...

मेघा च्या मुलीला पहायची उत्सुकता लागलीय मला.

अस्ताद ची पण आई च येईल बहुदा ..

भूषण ,"ए नाडकर्णी " बोलून कसला चिडवत होता... धमाल केली... उ ना पण एन्जॉय करत होत्या,...,त्याचा बाबू ही त्याच्यासारखा च आहे लहानसा....

स्मिता च्या आई सारख्या मॉम्स मी पाहिल्यात... बडबड करणे हा त्यांचा स्वभाव असावा... मला तरी त्यात कुठलीही चालुगिरी दिसली नाही... बिकिनी स्पॉन्सर वाली पोस्ट मॅगी ची पटली...>> +१..
मला काल सर्वात जास्त त्या आवडल्या.. एकदम आपल्यात काकवा जश्या असतात तश्या.. स्वच्छ.. काय बोलु काय नाही, किती बोलु काय नाही सगळं.. आपल्याला लेकिला लोक जे समजतात तो गैरसमज कसा दूर करु न कसा नको असं बोलण वाटलं त्यांच.. एवढ्या दिवसांनी भेटल्यावर नेमक काय बोलतोय अन किती वेळा बोलतोय याचे कॅलक्युलेशन्स राहत नाही डोक्यात हे हांगलच अनुभवलं आहे..
ते जाताना बिकिनी घाल असं म्हटल्यावर तर पप्पीच घ्यावीशी वाटली मला त्यांची.. काय सॉल्लीड्ड आई आहे यार..
इकडे स्मिता पन मस्त म्हनत होती रेशम जवळ.. अशीच बोलते ती घडाघडा.. छान दिसते, छान कपडे घालते वगैरे म्हणत होती तर मला वाटल अगं हे काय इथे बोलायची गोष्ट आहे का वगैरे.. हाहाहा.. टिपीकल आई लेकिच्या गोष्टी...

आऊ चा मुलगापन छाने..
वीणा लोकुर पन छान.. तिने स्मिताला ममांना उत्तर देताना फटॅकन बोलत जा अस म्हटल तेव्हा बाय माझी ती म्हणावस वाटल मला..हेहे..
रेशमची पोरगीपन छाने.. कसल्या पप्प्या घेत होती ती..
मला जाम हसु आलं बघताना आणि थोडे एमो पन हावी झाले.. एकटं राहत ना माणुस घरच्यांना सोडून म्हणुन असेल..

दिपंजली आधी त्याची वाईफ दाखवली मग त्याने बेबी?? असं विचारलं मग त्याला फ्रीझ केलं आणि मग बेबी ला घेऊन आली ती....

पुष्करची बायको छान आहे. पूर्वीच कधीतरी फोटो बघितलेले, दोघांचं लग्न झालं त्याचे. बाळ क्युट आहे.

सईची आई, पुष्कीची बायको आणि बेबी आजच्या भागात येणार ना ! की वूट वर आधीच दाखवलं ?? की मी काही मिसलं काल ??
कुछ तो झोल है !

https://go.voot.com/gwmpeZ81HN

आऊचा मुलगा struggle करतोय पण त्याला काम मिळत नाहीय अशी चर्चा सुरू आहे इथे.
मला तर आवडला तो.. उंची, looks, आवाज एकदम मालिका आणि सिनेमाला सूट होईल असंच आहे.. शिवाय वागणही एकदम calm and composed वाटलं काल तरी

कालचा भाग खुपच छान वाटला... अभिजित खुप छान दिसतो.. छान पर्सनॅलिटी... चहादेखिल पिऊ दिला नाहि त्याला पळवलं लवकर.
त्यादिवशी पुल मध्ये सगळे मजा करत असताना पोहण्यासाठी स्मिताने छान सुर मारला होता पाण्यामध्ये म्हणुनदेखिल आई म्हणाली असेल बिकीनी वापर म्हणुन.

दिपंजली आधी त्याची वाईफ दाखवली मग त्याने बेबी?? असं विचारलं मग त्याला फ्रीझ केलं आणि मग बेबी ला घेऊन आली ती....
<<
ओह, आम्हाला हा प्रोमो नाही दाखवला यु.एस कलर्स मराठी वर.
फक्त भुषण आणि त्याचा मुलगा दिसला प्रोमोत !

चहादेखिल पिऊ दिला नाहि त्याला पळवलं लवकर.
<<
सर्वात क्युट , आउंना रिलिज करताच त्यांनी मुलाचा अर्धवट प्यायलेल्या चहाचा कप विसळून ठेवला Happy

सगळ्यांनी घरचे आले त्याबद्दल भरभरून लिहिलं आहे. मला जे जे येऊन गेले, ते जे जे बोलले ते सर्व आवडलं.
स्मिताची आई खूपच भाबडी आणि सरळसोट वाटली. वीणा लोकुर भूषण सकट सर्वांना लव्ह यु म्हणाल्या पण नंचौ ला नाही म्हणाल्या. त्यांना पण तो आवडत नसावा बहुधा.

Pages