बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला ही स्मिता आवडायची पण आता नाही, स्मिता या वेळी जायला हवी.. व कदाचीत जाण्याची शक्यता आहे...
१. शरा व भुषण तिच्या पेक्षा नक्किच स्मार्ट खेळाडु आहेत..
२. शरा हि टास्क मध्ये स्मिता च्या तोडीस तोड आहे.
३. स्मिता स्वःताच्या विचाराने वागत व खेळत नाही हे तिने सईशी वाद करुन सिध्द केलय ( मी दुसर्‍याच्या सांगण्यावरुन वागते, अस तु का म्हणालीस, असा जाब दुसर्‍याच्या उचकवण्यावर सईला विचारायला जाणे, या पेक्षा मोठा विरोधाभास तो कोणता. ).
४. बोटचेपे धोरण ( सु शे. वाद झाल्यवर परत लगेच समेट, नकळत रुतुजाशी तुलना होते )
५. विचार व तर्का मध्ये सुसुत्रतेचा आभाव, यामुळे भाबडी पेक्षा बावळट वाटण्याची शक्यता जास्त..
६. सई मेघा समर्थक शरा ला मत देतीलच, रे. ग्रुप ची मत भुषण व स्मिता मध्ये विभागण्याची शक्यता आहे..

ती मनाने एकदम चांगली आणि साधी मुलगी आहे. छक्केपंजे न कळणारी वगैरे. >> हो तसे दिसून येते. पुढे या खेळासाठी घातक होईल ते. खरे तर ती ज्या टिम मधे आहे ते लोक याचाच फायदा घेतात. पण मेसैच्या टिम मधेही वेळ आल्यावर तिलाच आधी बाहेर काढले असते. आता ठामपणे खेळायची वेळ आली आहे.

आधीही एकदा व्हिलन पब्लिकने तिला उ.ना कडे निरोप पाठवला होता, उपमा आवडला नाही, आलं का घातलत, पिचपिचीत झालाय इ. पढवून.
तेंव्हाही गेली ती लग्गेच !

तेंव्हाही गेली ती लग्गेच !>> त्यावरुनही ममांने तिला झापले होते. तेव्हा तिला वाटले होते कि अश्या गोष्टीत पडायला नको. ती कॅमेरासमोर येऊन बोलली होती कि मला काय करु ते कळत नाही, यांच्याशी बोलूच नको कि कामापुरते काम ठेवू...... पण परत ये रे माझ्या मागल्या!!

स्मिता ची आई एवढं प्रेमाने हात मिळवत होती आणी नं.चौ...... काढला असता हात बाहेर तर काय बिघडलं असतं.
Freeze केलं होत माहित आहे. पण मला तरी नाही आवडले.

आऊचा मुलगा मस्त आहे ना soft spoken, स्मिताची आई खूप बडबडी पण निर्मळ.

शेवटी काय म्हणाली अगदी जाताना ते कळलं नाही.

स्मिताची आई खुप छान बोलली पण स्मिताला बिकिनी वापर असा सल्ला देऊन गेली. ते थोडे विचित्र वाटले. त्यामुळे व्होट मिळवण्यासाठी काय करावे लागेल हा सल्ला होता.

स्मिताची आई खुप छान बोलली पण स्मिताला बिकिनी वापर असा सल्ला देऊन गेली. ते थोडे विचित्र वाटले. त्यामुळे व्होट मिळवण्यासाठी काय करावे लागेल हा सल्ला होता.
<<
संदर्भ माहित नाही, एपिसोड पाहिला नाही अजुन पण या मुली स्विमिंग पुलमधे जाताना प्रॉपर स्विम वेअर का घालत नाहीत , हा प्रश्नं मला सुध्दा पडतो !
आजच्या युगात पण एवढा गजब होणार का खरच बिकिनी /स्विम सुट मधे मुली स्विमिंग पुलमधे गेल्या तर Uhoh
किंवा बॉडी शेमिंग ला घाबरतात ?

आजच्या युगात पण एवढा गजब होणार का खरच बिकिनी /स्विम सुट मधे मुली स्विमिंग पुलमधे गेल्या तर Uhoh
किंवा बॉडी शेमिंग ला घाबरतात ?

तो प्रश्न इथे नसावा. माझ्यामते असे त्यांना करायला काहीच वाटणार नाही असे वाटते. पण स्मिता आणि तिची आई यांच्यातील संभाषणात असे काहीतरी वोटींगसाठी कर सांगणे मला आवडले नाही. स्मिता तिला कुठे तरी नंबर लिहून ठेवलाय. त्याला व्होटींग साठी फोन कर असे काहीतरी सांगत होती. तो फोन कदाचित एखाद्या कॉल सेंटरचा असावा. काही कॉल सेंटर पैसे घेऊन लाखात व्होटींग करतात असे ऐकले आहे. आधीच मी स्मिताला व्होटींग केलेय पण पुढच्यावेळी करीनच असे नाही.

पण या मुली स्विमिंग पुलमधे जाताना प्रॉपर स्विम वेअर का घालत नाहीत , >>> १-२ टास्क मधे घातला होता परवा पावसात भिजताना स्मिता आणी शराने घातला होता फक्त.

काय माहिती वोटिंग साठी काय काय फ़ंडे वापरतात. नशीब एका आयडीला एक वोट द्यायची परवानगी आहे. हल्ली किती फेक आयडी वाटतायेत fb वर पण, काय काय करतात.

मला हा 'फ्रिझ' प्रकार कळला नाही.का करायचं?भेटु दे की सगळ्यांना आपापल्या घरच्यांना.
का 'ईमोशनल,टची मोमेंट्स' देण्यासाठी,टिआरपीसाठी काहीतरी वेगळं.रोज रोज भांडताना बघता आता थोडं यांचं रडणं बघा.

पण या मुली स्विमिंग पुलमधे जाताना प्रॉपर स्विम वेअर का घालत नाहीत , >>> १-२ टास्क मधे घातला होता परवा पावसात भिजताना स्मिता आणी शराने घातला होता फक्त.>>>> हो आणि त्यावेळेस स्मिता बोललेली तिच्याकडे बिकनी आहे पण over वाटेल म्हणून नाही घातली. कदाचित त्यामुळे तिच्या आईने तसे सांगितले असावे.

स्मिताला बिकिनी वापर असा सल्ला देऊन गेली >> Uhoh बघितल्यानंतरच कळेल हा काय प्रकार आहे ते.
काल आस्ताद रेशम ला मेघा -सई मधले बाथरूम जवळचे कॉन्वर्सेशन त्याने ऐकले ते सांगत होता. तो म्हणे "मी डबा टाकायला गेलो होतो" मी माइक बाहेर काढून ठेवला नसल्याने (ई!) त्यांना माहित नवह्ते मी आत आहे ते ... वगैरे वगैरे
मला हसायला आलं त्या शब्दप्रयोगाचं . डबा टाकायला काय Lol

मै, तो ट्रेकर्सचा लाडका शब्द आहे 'डबा टाकणे'.
स्मिताची आई नॅशनल लेव्हलची स्विमर आहे आणि आत्ताही स्पर्धांमध्ये भाग घेत असते असे तिने सांगितले होते. त्यामुळे तिने पूलमध्ये बिकिनी वापर असे स्पेसिफिक सांगितले असावे असे मला वाटते. तीन वेळा सांगणे गडबडून झाले असावे, शेवटी स्मिताची आई आहे Happy

आजचा भाग जरासा इमोशनल झाला. मलातरी आउंचा मुलगा, रेशमची मुलगी, स्मिताची आई आल्याचं तितकं खास वाटलं नाही (आतल्या माणसांना मात्र ते अप्राप्य असल्याने त्याची किंमत खूप असणारे). उद्या मात्र भूषणचा मुलगा आणि पुष्करची मुलगी आल्याचा ट्रेलर सुद्धा बघून डोळ्यात पाणी आलं. भूषणचा मुलगा आल्यावर तर त्याला सुचलं पण नाही त्याला घ्यायचं.

आउंचा मुलगा लय बोर.. स्मिताची आई त्याहून.. मेघाच्या वरताण बोलली. ते 'बिकिनी घाल' हा सल्ला मलाही विचित्र वाटला ऐकायला. रेशमची मुलगी मस्त. सईची आई फारच अजेंडा घेऊन आल्यासारखी वाटली मला फ्रँकली. आस्ताद टॉयलेट मध्ये असताना बाहेरून बोलली नसती तर चाललं नसतं का? Uhoh

बाकी आउंचा मुलगा आल्यावर त्याने स्मिताला जो प्रश्न विचारला त्यावरही स्मिता कॅमेरात बघून जे काही बोलली ते कन्फ्युजिंग होतं. सगळे आत गप्पा मारत असताना तिने ते फार मिस केलं. तिने कोणत्यातरी नंबर विषयी विचारणा केलेली पाहिली. पण ते वोटिंग विषयी असेल तर फार वाईट आहे.

उद्या मेघा, भूषण, आस्ताद, शमा, किशोर वगैरेच्या घरचे लोक आल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया बघायला आवडतील. माझं वैयक्तिक मत आहे की शमा आणि किशोर च्या घरच्यांना आणू नये. ते हल्लीच आल्याने त्यांना इतर सदस्यांनीतका विरह झालेला नाहीये घराचा. सो मावैम की ते इतक्यात घरच्यांची भेट डीझर्व करत नाहीत.

स्मिता आऊच्या मुलाला ट्युबलाईटचं सांगायला गेली, तर त्याला मात्र बरोबर समजलं, ती असं का म्हणाली. त्याचं काही ऑब्जेक्शन दिसलं नाही.

पी आर शी संबंधित काही अर्थाने, पण मला काहीच कळलं नाही स्मिताचं Lol , आऊच्या मुलाला ते समजलं, कौतुक त्याचं.

वोटिंग फक्त voot वरून करता येतं ना, एकाला एक मग स्मिता तिथेही गंडली का, तेवढी फेक accounts लागतील ना, किंवा कोणी manage करू शकत असेल तर ती आधीच असं झालं तर असं करा सांगून आली असेल ना. कारण तिला कुठे माहिती होतं आई येणार, मग आठवण करायला निरोप दिला असेल का.

जाऊदे माझ्या काहीच लक्षात येत नाहीये, माझीच confused स्मिता झालीय.

बरं बिकिनी घाल असं जाता जाता शेवटी म्हणाली ना, मला ते समजलं नव्हतं, इथे विचारल्यावर समजलं, ते जरा खटकलंच समजल्यावर.

मॅगीने लिहिलेलं वाचल्यावर त्या संदर्भात असेल तर, स्मिताला त्या दिवशी पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल असं वाटतंय पण मग आधी सांगायचं ना,जवळ असताना नीट, जाता जाता असं लांबून कशाला. त्यामुळे तेच हायलाईट होईल सोशल मीडियावर.

सगळेजण वोटिंग प्रकार manage करून गेले असतील आतमध्ये किंवा त्यांचे जवळचे करत असतील, स्मिताची आई आली नेमकी, ती नॉमिनेट झालीय म्हणून तिने ते सांगितलं आईला आणि आपल्याला कळलं, एवढंच.

चैताली ने फ्रीझ बद्दल लिहिलंय त्याला अनुमोदन, अति झालं ते. 2 मिनिटं ठीक, होप की सईला नीट भेटू देतील आईला आज, बिचारी किती रडत होती.

श रा आणि चौगुले बद्दल लिहिलंय पियु ने, घरच्यांच्या भेटीबद्दल त्याला अनुमोदन.

पण ते voting manage करणं वगैरे कळल्यावर प्रेक्षक म्हणून मीच भाबडी वाटायला लागले मला, आपण वोट देणं न देणं यावर काही अवलंबून नाहीये. उगाच आपल्या वोटला महत्व वगैरे वाटलं होतं.

आजचा एपिसोड लयच इमोशनल ! स्मिताची आई अगदी साधी वाटली मला, मनात येइल ते घडाघडा बोलत होत्या , मराठी येत नाही पण जमेल तस त्याना वाटत ते पोहचवत होत्या, तसच सैची आइ पण , रेशमची मुलगी मस्त आहे मॅच्युअर वाटत होती, नन्दकिशोर -आउ वैगरेना अगदी नमस्कार वैगरे म्हटली, मेघा आणि रेशमच जमु शकेल अस तिच मत आहे.आउच्या मुलाने अगदी परफेक्ट सल्ला दिला आउला होपफुली त्याना कळला असेल.
बाकी चॅनेलने बरोबर टिआपी गेम खेळला आणि सईला फ्रिज ठेवत तिच्या आइला आत बोलावुन घेतले...

रेशमची मुलगी मेघाला, मी तुमच्यासारखी आहे असं काही म्हणाली का, तसं ऐकल्यासारखं वाटतं. कामं करता करता bb बघितलं की मध्ये मध्ये हुकते.

काल मेघानं जो शर्ट, स्कर्ट आणि काफलेंग्थ बूट्स असा जामानिमा केला होता तो फार क्लासी दिसत होता. सईचा काळा ड्रेस पण मस्त होता.

मी कालचा संपूर्ण एपि अजून पाहिला नाही पण आऊच्या मुलाची पर्सनॅलिटी आवडली. स्मिताची आई जरा जास्त ड्रामाबाज वाटली.

Pages