युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या व्हिडिओत ती बाई भाजून झाल्यावर बटर लावते. पण समहाऊ दिसायला तेवढ्या काही आकर्षक नाही वाटल्या मला. मंजूताई सांगू शकतील, त्यांनी प्रयोग करून पाहिलाय.

रोट्या छान फुगतात टोस्टरमधे. लेक लहान होता तेव्हा अशा वाफलसाईजच्या रोट्या करायचे टोस्टरमधे. कोरड्या भाजायच्या आणि नंतर हवे तर तूप, बटर लावायचे.

राखी, Happy समझा करो! युट्युबवर दाखवल्याप्रमाणे तंदूरी रोटी टोस्टर मध्ये केली व त्यावर बटर लावले होते. ज्याप्रमाणे हॉटेलांत गरमागरम देतात ना तशीच आम्ही केल्यानंतर
लगेचच गरमागरमच खाल्ली. छान लागली. थंड चिवट लागेल असं वाटतं ..... प्रयोग करून सांगा Happy

मला काल आठवत नव्हते, मग माझी वही चाळल्यावर लक्षात आले मी प्रथम टोस्टर मधल्या तंदुरी रोटीची पाकृ 'शो मी द करी ' वर बघितली होती.
https://www.youtube.com/watch?v=p2VFZXacyAI

माझ्या कडे लिंबाचं गोड लोणचं खुप उरलं आहे ते कसं संपवाव ते कळत नाही कारण माझ्या कडे हे लोणचं फारसं कोणाला आवडत नाही. ते कशात वापरता येईल का?

सारेग
पराठे बनवताना पिठात ऍड करू शकता.
कणकेत मिक्स करून त्याच्या पुऱ्या. ( मस्त बनतात )

सध्या तरी इतकं च आठवतंय.

पनीर , बटाटा वगैरे भाजीत घालून बघा .
मॅरिनेशन साठी वापरून .
नाहीतर आवडत असेल तर हक्काच थालीपीठ आहेच .

Ghari kelele almond milk kiti divas fridge madhe tikel? Kiti badamana kiri pani, kay praman ahe?

लोक्स, लहान ९/१० महिन्यांच्या बाळाला पोटभरीचं काय काय देता येऊ शकेल?
सध्या दूधपाण्यात शिजवून + थोडी साखर घालून नाचणीचं सत्व दुपारी आणि नाश्त्याला, जेवणाच्या वेळी + संध्याकाळला डाळ-तांदूळ भाजून केलेल्या पावडरीची खिचडी टाईप लापशी, तूप घालून असं चाल्लंय.
ऑकेजनली फळं असतात तरी केळं फार देत नाही सर्दी चा त्रास होईल म्हणून.

अद्वैत च असं तसं काही दिलं तर पोट भरत नाही आणि मग रडतो. डाळीचं पाणी/पातळसर वरण वगैरे तो खात नाही... आतापासूनच नाकार्डेपणा करायला सुरुवात झालीय. Uhoh इनफॅक्ट त्याला आपण जे खातो ते हवं असतं पण सध्या देता येत नाही.
काय काय देता येऊ शकेल?

दहा महिन्यांना मऊसर गोडाचा शिरा, तिखट नसलेला मऊ उपमा द्यायला हरकत नसावी. नाचणीचं सत्व शिजवल्यावर त्यात ताक आणि मीठ-मिर्‍यं घालून निराळी चव येते. यात (आणि उपम्यात आणि भातातही) रोज वेगवेगळ्या भाज्या मऊ शिजवून्/वाफवून मॅश करून घालायच्या. निरनिराळ्या पिठांची धिरडी/घावन/आंबोळ्या हेही चालेल.

तुम्ही खाता ते त्याला हवं असेल तर ही चांगली गोष्ट आहे की! हाताने घास मॅश करून द्यावा आपल्यातला. फार तिखट/मसालेदार किंवा घशात अडकण्यासारखं काही नसलं की झालं.

दात यायला लागलेत का? दात येताना खाण्यावरून मन उडतं काही मुलांचं - माझ्या लेकीचं झालं होतं तसं. बाकी वाढ नीट असेल आणि जनरल हसरं/खेळकर असेल तर त्या वेळी खाण्याची विशेष चिंता करायची नाही असा सल्ला डॉक्टरने दिला होता. त्यावेळी एखादाच घास तोंडात ठेवून चघळत बसायलाही आवडतं त्यांना. तोंडात पटकन विरघळणारी लहान मुलांची बिस्किटं मिळतात का बघ तिथे - इथे होता एक प्रकार.

Pages