Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या व्हिडिओत ती बाई भाजून
त्या व्हिडिओत ती बाई भाजून झाल्यावर बटर लावते. पण समहाऊ दिसायला तेवढ्या काही आकर्षक नाही वाटल्या मला. मंजूताई सांगू शकतील, त्यांनी प्रयोग करून पाहिलाय.
रोट्या छान फुगतात टोस्टरमधे.
रोट्या छान फुगतात टोस्टरमधे. लेक लहान होता तेव्हा अशा वाफलसाईजच्या रोट्या करायचे टोस्टरमधे. कोरड्या भाजायच्या आणि नंतर हवे तर तूप, बटर लावायचे.
राखी
राखी
बाई भाजून झाल्यावर >>>
बाई भाजून झाल्यावर >>>
राखी, समझा करो! युट्युबवर
राखी, समझा करो! युट्युबवर दाखवल्याप्रमाणे तंदूरी रोटी टोस्टर मध्ये केली व त्यावर बटर लावले होते. ज्याप्रमाणे हॉटेलांत गरमागरम देतात ना तशीच आम्ही केल्यानंतर
लगेचच गरमागरमच खाल्ली. छान लागली. थंड चिवट लागेल असं वाटतं ..... प्रयोग करून सांगा
पण समहाऊ दिसायला तेवढ्या काही
पण समहाऊ दिसायला तेवढ्या काही आकर्षक नाही वाटल्या मला.>>>> बाई ??????
त्या व्हिडिओत ती बाई भाजून
त्या व्हिडिओत ती बाई भाजून झाल्यावर बटर लावते. >>>
ती बाई रोटी भाजून झाल्यावर ...असे म्हणायचे असेल.
ते च हो... फाको केलीय!
ते च हो... फाको केलीय!
फाको म्हणजे?
फाको म्हणजे?
फाको म्हणजे?..फालतू कोटी!
फाको म्हणजे?..फालतू कोटी!
(No subject)
मला काल आठवत नव्हते, मग माझी
मला काल आठवत नव्हते, मग माझी वही चाळल्यावर लक्षात आले मी प्रथम टोस्टर मधल्या तंदुरी रोटीची पाकृ 'शो मी द करी ' वर बघितली होती.
https://www.youtube.com/watch?v=p2VFZXacyAI
तंदुरी रोटी चर्चा एंटरटेनिंग
तंदुरी रोटी चर्चा एंटरटेनिंग झालीये फारच !!
(No subject)
माझ्या कडे लिंबाचं गोड लोणचं
माझ्या कडे लिंबाचं गोड लोणचं खुप उरलं आहे ते कसं संपवाव ते कळत नाही कारण माझ्या कडे हे लोणचं फारसं कोणाला आवडत नाही. ते कशात वापरता येईल का?
सारेग
सारेग
पराठे बनवताना पिठात ऍड करू शकता.
कणकेत मिक्स करून त्याच्या पुऱ्या. ( मस्त बनतात )
सध्या तरी इतकं च आठवतंय.
अर्रे हो मिक्सर मधून काढून
अर्रे हो मिक्सर मधून काढून फ्रेंच फ्राईज किंवा असच काही तळलेले खाताना डीप करायला पण होईल.
धन्यवाद अनिष्का!
धन्यवाद अनिष्का!
काल मेघा नॉमिनेशनच्या कठड्यात
चूकिचा बाफ...
गोड लोणच्याचा रस डाळ ढोकळी
गोड लोणच्याचा रस डाळ ढोकळी / चकोल्या / वरणफळं करताना डाळीत घालता येईल.
पनीर , बटाटा वगैरे भाजीत
पनीर , बटाटा वगैरे भाजीत घालून बघा .
मॅरिनेशन साठी वापरून .
नाहीतर आवडत असेल तर हक्काच थालीपीठ आहेच .
लोणच कडकडित उन्हात वाळवा आणी
लोणच कडकडित उन्हात वाळवा आणी बरणित भरुन ठेवा, तोन्डाला चव नसेल तेव्हा एखादी दुसरी फोड चाखली की झाल...
धन्यवाद सगळ्यांना खूप छान
धन्यवाद सगळ्यांना खूप छान ऑपशन्स आले आहेत. आता लोणचं कसं संपेल याची चिंता नाही.
सारे ग मला गोड लोणचं भयंकर
सारे ग मला गोड लोणचं भयंकर आवडतं, मला कुरियर करून टाका
अरे नक्की! पत्ता कळव नक्की
अरे नक्की! पत्ता कळव नक्की पाठवते. तू पण खुश मी पण
धन्यवाद सारेग, तु म्हणालीस
धन्यवाद सारेग, तु म्हणालीस मी भरून पावले
मज्जा करत होते मी
पण लोणचं खाताना माझी आठवण नक्की काढ.
आता येईलच आठवण.
आता येईलच आठवण.
Ghari kelele almond milk kiti
Ghari kelele almond milk kiti divas fridge madhe tikel? Kiti badamana kiri pani, kay praman ahe?
लोक्स, लहान ९/१०
लोक्स, लहान ९/१० महिन्यांच्या बाळाला पोटभरीचं काय काय देता येऊ शकेल?
सध्या दूधपाण्यात शिजवून + थोडी साखर घालून नाचणीचं सत्व दुपारी आणि नाश्त्याला, जेवणाच्या वेळी + संध्याकाळला डाळ-तांदूळ भाजून केलेल्या पावडरीची खिचडी टाईप लापशी, तूप घालून असं चाल्लंय.
ऑकेजनली फळं असतात तरी केळं फार देत नाही सर्दी चा त्रास होईल म्हणून.
अद्वैत च असं तसं काही दिलं तर पोट भरत नाही आणि मग रडतो. डाळीचं पाणी/पातळसर वरण वगैरे तो खात नाही... आतापासूनच नाकार्डेपणा करायला सुरुवात झालीय. इनफॅक्ट त्याला आपण जे खातो ते हवं असतं पण सध्या देता येत नाही.
काय काय देता येऊ शकेल?
मऊसर गोडाचा शिरा, तिखट नसलेला
दहा महिन्यांना मऊसर गोडाचा शिरा, तिखट नसलेला मऊ उपमा द्यायला हरकत नसावी. नाचणीचं सत्व शिजवल्यावर त्यात ताक आणि मीठ-मिर्यं घालून निराळी चव येते. यात (आणि उपम्यात आणि भातातही) रोज वेगवेगळ्या भाज्या मऊ शिजवून्/वाफवून मॅश करून घालायच्या. निरनिराळ्या पिठांची धिरडी/घावन/आंबोळ्या हेही चालेल.
तुम्ही खाता ते त्याला हवं असेल तर ही चांगली गोष्ट आहे की! हाताने घास मॅश करून द्यावा आपल्यातला. फार तिखट/मसालेदार किंवा घशात अडकण्यासारखं काही नसलं की झालं.
दात यायला लागलेत का? दात येताना खाण्यावरून मन उडतं काही मुलांचं - माझ्या लेकीचं झालं होतं तसं. बाकी वाढ नीट असेल आणि जनरल हसरं/खेळकर असेल तर त्या वेळी खाण्याची विशेष चिंता करायची नाही असा सल्ला डॉक्टरने दिला होता. त्यावेळी एखादाच घास तोंडात ठेवून चघळत बसायलाही आवडतं त्यांना. तोंडात पटकन विरघळणारी लहान मुलांची बिस्किटं मिळतात का बघ तिथे - इथे होता एक प्रकार.
Pages