युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्यात तांदूळ भरून ठेवले तर मॉईश्चर नक्की कमी होईल. तांदूळही पुन्हा वापरता येतील. दुधाचा सुवास (!) जाईल का ते पाहायला लागेल; पण खडखडीत कोरडी झाली तर नाही येणार.

वरील प्रतिसादात दिलेल्या लिंकेला माबो स्वतःचे नोड असे का चिकटवीत आहे?
https://www.maayboli.com/node/www.misalpav.com/node/36439
मला www.misalpav.com/node/36439 इतकेच येणे अपेक्षित आहे. एडिट करताना <एएचरेफ कोड बरोबर दिसते आहे?

फॅब्रिक सॉफ्ट्नर मिळतात का तिकडे? त्याने जाइल किवा दुसरा उपाय म्हणजे १ चम्चा व्हीनेगर अर्धी बादली गार पाण्यात घालुन भिजवुन बघ किवा कोरडा बेकिन्ग सोडा पसरवुन पण वास जाईल.

मी द्रायफ्रुत ,डिंक लाडू गुळाच्या पाकात बनवले आहेत.पण फारच अगोड zhalet. गोड होण्यासाठी काय करू? प्लीज हेल्प.

"आमच्यात" अस्सेच करतात असं सांगा. हाकानाका... Wink
सिरिअसली, लाडू वळून झाले असतील तर मुश्किल आहे. कारण ते आता खुटखुटीत झाले असतील. तोडायला पाहाल तर भुगा होईल त्यांचा.

लाडू मऊ आहेत.पण ते मोडून परत पाकात घालून बांधायला नको वाटतय. पाक करूँ त्यात लाडू घोळवले तर आतापर्यंत पाक मुरेल का? कसे करता येइल?

पाक करुन केल तर लाडु चिकट होतील त्यापेक्षा लाडु मोडुन त्यात प्रमाणात पिठिसाखर/किवा किसलेला गुळ् घालुन बान्धा!

आमच्यात" अस्सेच करतात असं सांगा. हाकानाका... >>>
Lol .मी खरेच बर्याचदा असे सांगते म्हणजे जर कुणाला द्यावे लागले तर नाहितर प्रश्नच नाही.
पणे असे.सांगीतल्याने पदार्थ बिघडला असला तरी चर्चा आमच्याकडे कशी.वेगळी पद्धत आहे त्याकडे वळते

वानोळा म्हणून खूप वांगी आली आहेत. (छोटी, भाजीची). त्याचं भरीत करता येईल का? चव चांगली लागेल का? कारण दुसर्या वांग्यांचं कधी भरीत केलं नाही. म्हणून विचारले. नाहीतर मग आवश्यक तेवढे वांगे ठेवून बाकीची वाटून देईन.

बीया आहेत का फार ? बीया नसतील तर काहीच हरकत नाही भरीत करायला. भाजायला फार अवघ्ड होत असेल तर तेलात परतत कुस्करून घ्या. अगदी मऊ लगदा होई पर्यंत. आणि मग त्याच भरीत करा किंवा थालीपीठ करा.

>>>>मी द्रायफ्रुत ,डिंक लाडू गुळाच्या पाकात बनवले आहेत.पण फारच अगोड zhalet. गोड होण्यासाठी काय करू? प्लीज हेल्प.<<<

डायट लाडू केलेत असं सांगून इथे रेसीपी टाका टेचात.. काहीतरी ईंग्लिश नाव द्या .. नाव (रेसीपी हं) काकू टाईप नको . इथे नावं ठेवतील म्हणजेच चर्चा होइल.. त्या रेसीपीची हो. ...

झंपि Lol
लाडू परत गुळाच्या पाकात घालून वळले.आता छान झालेत.
मागे एकदा खुप गोड झाले होते म्हणुन यावेळी थोडा कमी गुळ घातला तर फारच अगोड झाले. आत्ता मध्यम मार्ग Happy

सकाळी भरतासाठी वांगी भाजली होती पण जास्त होईल म्हणून एक भाजलेले वांग ठेवले आहे. आता त्याचे भरीत सोडून दुसरा कोणता पदार्थ बनेल?

भरत, संपदा प्रतिसादासाठी धन्यवाद.
थालिपीठ मी सोडून घरात कोणाला आवडत नाही. मी आधीच सांगायला हवे होते की आमच्याकडे सगळे चमचमित चटपटीत खाणारे आहेत त्यामुळे भजी, वडा तत्सम पदार्थ बनेल का? शक्य असेल तर पाकृ पण सांगा.
आगाऊ धन्यवाद.

जर थालीपीठ होत असेल तर आपण जसे भाजाणी चे वडे करतो तसे तळून वडेही होतील की.

फक्त पीठ्/भाजणी बरीच लागेल कारण भाजलेल्या वांग्याला ओलसरपणा फार असतो.
मी असं स्व्तः केलेलं नाही. नुसतीच आयडियेची कल्पना Happy

बी. एस. >>>मी छोट्या वांग्याचे काप शॅलो फ्राय करते, तव्यावर. थालीपीठ भाजणीमधे मीठ, बारीकचिरुन कोथींबीर घालायची. वांग्याचा गोल काप पाण्यात बुचकळून निथळून घ्यायचा. भाजणीमधे घोळवून तेलावर शॅलो फ्राय करायचा.
भाजणीऐवजी बेसन पीठ + मीठ + तिखट + धने-जीरे पूड , आवडीप्रमाणे इतर कुठला मसाला वगैरे हे सुद्धा वापरुन काप छान लागतात.

त्यामुळे भजी, वडा तत्सम पदार्थ बनेल का? शक्य असेल तर पाकृ पण सांगा.>> कटलेट? बटाटा ,मटार अ‍ॅड करा, कधी केले नाहित पण मिश्रण पातळ नाही झाले तर जमुन येतिल

वरती बी. एस. यांची जी पोस्ट आहे , त्याला मी उत्तर लिहीलं आहे. खुलासा करायचा राहून गेला. त्यांची वांगी भाजलेली नाहीयेत.

वरच्या प्रतिसादात उल्लेख करते. धन्यवाद!

१३ मोठी माणसे आणि २ लहान (११ वर्षाची) मुले एव्हढ्यांसाठी उंदियु बनवायचा आहे. प्लीज भाज्यांचे प्रमाण सांगा. कोण-कोणत्या भाज्या किती किती लागतील?

पावभाजीसाठी पाव होलसेल मध्ये खरपूस भाजण्याची काही आयडिया आहे का ? पाव भाजीचा बेत आहे पण एका एका पावला बटर लावून ते तव्यावर गरम करत राहणं कंटाळवाण वाटतं .काही युक्ती आहे का ?

Pages