युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे बरेच धणे शिल्लक आहेत. थोडे जुने आणि थोडे नविन. काय करू त्याचं? >>>> कोथिंबीर.
सध्या माझं तेच चाललयं

जीरे भाजुन धणे + जीरे पुड करुन थेवता येइल. भाजी, खिचडी, आमटी, कश्यातही टाकता येइल. काही अख्खे धणे मुथेया, चिवड्यात टाकता येतील.

धणेपूड घरी मिक्सरवर बाजारच्या पुडीएवढी बारीक मऊसूत नाही करता येत, पण तो पोत छानच असतो किंचित जाडाभरडा. उसळी, भाजी, आमटी, भुर्जी, मूडाखि, भाताचे विविध प्रकार यांत ध.पू. वापरता येते.

धणा-जिरापुड ताजी करुन वापरली तर साधी भाजी सुधा भाव खाउन जाते, पण दरवेळेस एक्ष्ट्रा कामाची तयारी ठेवावी लागते,

माझ्याकडे बरेच धणे शिल्लक आहेत. थोडे जुने आणि थोडे नविन. काय करू त्याचं? >>>> कोथिंबीर.
हा बेस्ट प्रतिसाद आहे. Happy

कोकम आगळची सोलकढी करता येईल, नारळाचं दुध मिक्स करुन किंवा ओलं खोबरं, मिरची, आलं, लसूण, जिरं एकत्र वाटून टाकलं तरी छान लागतं.

कोकम आगळाचं, सोडा घालून ड्रिंकही करता येईल.

कोकम आगळ, मीठ, जिरेपूड, हवी असेल तर साखर याचं कॉन्स्न्ट्रेट करून त्यात गार प्लेन सोडा मिसळायचा. Happy

नारळाच्या दूधाच्या जागी ताक वापरूनही सोलकढी करता येते, ताक फार आंबट नसावे.
आगळाच्या उपयोग फिश फ्राय करताना करतात. तसाच वांगी, सुरण वगैरे भाज्यांचे काप करतानाही करतात.
भाजी आमटीतही ते वापरता येते, तसे वापरल्यास मीठ कमी घालावे.

घरात एक बाटलीभरुन कोकम आगळ पडुन आहे. सरबताशिवाय दुसरे काही करता येईल का सुचवा प्लीज.>>> आगळाचे सरबत करत नाहीत Happy

ब्रेड क्रम्ब्जचे दोसे, दहीवडे, कटलेट - टिक्कीला लावायला, रस भाजी (किंवा सूप?) दाट करण्यासाठी - बरेच उपयोग मिळाले की! सगळ्यांना धन्यवाद! आता संपू शकतील ते असं वाटतंय Happy
आंबट गोड, ब्रेड भाजून (चांगला कोरडा करून) मिक्सरमधून काढून केलेत ब्रेड क्रम्ब्ज. विकत मिळतात, पण कुठे ते माहित नाही.

मायक्रो वेव्ह मधे भाजून का?
थँक्यू गौरी.... माझ्या आधीच्या प्रश्नाला लक्षात ठेऊन उत्तर दिल्याबद्दल... Happy
मी उन्हात वाळवून करतात असेही वाचले होते...पण ती कृती काही फारशी पटली नाही! अगदीच शिळे तुकडे वाळत टाकल्या सारखे वाटेल ते!

कोकम आगळात मीठ, साखर, जिरेपूड व पाणी घालून सरबताखेरीज,

उसळी, भाज्या, आमट्यांत आमसुलाऐवजी वापरता येते. प्रमाण बेतानेच ठेवावे.
तांदूऴ पिठीच्या उकडीत घालायला आंबट ताक नसेल तर थोडे कोकम आगळ घातल्याने चव वधारते. मूग डाळ खिचडीतही खिचडी शिजत आली की थोडे आगळ घालता येते. मी स्वैपाकात बरेच ठिकाणी आगळ वापरते.

मी कोकम सरबत करताना कॉन्स्ट्रेट बरोबर त्यात थोडे आगळ पण घालते, चव छान येते.
मी सुद्धा भाज्या, आमट्या, उसळी, मुगाची खिचडी, बेसनाचं पिठलं, कुळीथ पिठलं, कोळाच्या शेंगा, कोळाचे पोहे यांत कधीतरी आगळ आणि कधीतरी चिंच कोळ असं आलटुन-पालटुन वापरते. याशिवाय सोलकढी बर्‍याच वेळा असते, आमच्याकडे नारळाच्या दुधाचीचं करावी लागते.
आमच्याकडे नारळ आणि कोकमं दोन्ही घरचे असल्याने वापर भरपुर होतो.

कैरीचा छुनदा करताना खाली लागला आणि आता त्याला जळका वास येतोय.... त्याचं काही करता येईल का??? प्लिज सांगा....शक्यतो वाया जाऊ द्यायचा नाहीये....

तरी ही जर थोडा वास येत असेल तर थोडी लवंगेची आणि थोडी दालचिनीची भरड पूड घाला त्यात जळका वास त्याने मारला जाईल .

२५ माणसांसाठी रगडा पॅटीस आणि शिरा करायचा आहे. तर वाटाणे,बटाटे,रवा किती घ्यावा लागेल? थोडे जास्त झाले तरी चालेल.

Pages