युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आय नो! म्हणून मला एकदम क्यूट वाटलं तर धनि दात काढतोय Happy रट्टा घालावा अशी एक एक कार्टी असतात त्या गटात पाठवला पाहिजे धनिला.

Lol
दुधात ढोपरभर पाणी घालतं आणि विरजण लावलं तर डायरेक ताक होईल का?
म्हणजे आई लोकं म्हणतात की विरजण लागलं नाही, पण ते अक्चुअली लागून डायरेक ताक झालेल असतं असं असणार ना?
कृपया तुच करून बघ सारखे सल्ले देवू नये. Proud

दुधात ढोपरभर पाणी घालतं आणि विरजण लावलं तर डायरेक ताक होईल का?>> हे असे प्रश्न मला कधी का पडले नाहीत? मी आपली ट्रॅडिशनल पद्धतीनं सगळं करत गेले! श्या Proud

<हे असे प्रश्न मला कधी का पडले नाहीत? मी आपली ट्रॅडिशनल पद्धतीनं सगळं करत गेले! श्या फिदीफिदी
तुझा दोष नाही गं पूनम, दोष आपल्या सोशल कंडिशनिंग...का काय त्याचा Proud

अर्धा लिटर दुधत तीन कप चहा + एक कप दुध प्यायला+ बरंच दूध उरतं????

हायला, आमच्याकडे दीड लिटर दुध पुरत नाही.

>>सकाळी ताक झालेलं असेल का दही ?>> Happy मेड माय डे! असे काही निरागस वाचले -ऐकले नव्हते बर्‍याच दिवसात.

अर्धा लिटर दुधत तीन कप चहा + एक कप दुध प्यायला+ बरंच दूध उरतं???? >>> शक्य आहे... अमच्या कडे ही सेम परिस्थिती आहे ... बर्यापैकी दूध उरतं.. आम्ही गोकुळ च दूध वापरतो , जे बर्यापैकी घट्ट असतं

मेड माय डे! असे काही निरागस वाचले -ऐकले नव्हते बर्‍याच दिवसात.>>> + १०
अर्धा लिटर दुधत तीन कप चहा>>> हा चहा २ भाग पाणी + १ भाग दुध असा असेल.मग तर नक्कीच दुध उरेल.

कांदा भजी ३ ते ४ तासांसाठी कुरकुरीत राहावीत म्हणून काय करता येईल? भोंडल्यासाठी खिरापत म्हणून नेणार आहे, प्लीज लगेच मदत करा. २ ला करायला सुरुवात करणार आहे. धन्यवाद:)

लय भारी Lol

प्राजक्ता शिरिन, दही लावण्या अगोदर दुध पुर्ण निट गरम करून मग कोमट झालं की विरजण लाव त्याला.

Ha ha ha. You guys are witty. Get into a private chat room bara. (Aapaplya) lol.

Well its five o'clock somewhere and that is the time milk is supposed to be delivered vs stored forever. Labbad kuthle (food wyaysayik) Proud

राजसी, भजी पिठ घट्ट भिजवा, थोडे तान्दळाचे पिठ वापरता येइल पण भजी गार झाली की मउ पडतातच त्याला फार काही करता येत नाही , ३-४ तास कुरकुरित राहण कठिण आहे, मुग भजी चालत असतील तर बघा.ती राहतात कुरकुरित.

धन्यवाद प्राजक्ता. पब्लिक नी परत परत मागुन भजी खाल्ली. कांदा भजी बहुधा सगळ्यांना आवडतात. मेनू निवड योग्य होती Happy भजी मऊ पडली होती.

जवळजवळ एक लिटरचा डबा भरून घरी केलेले ब्राऊन ब्रेडचे ब्रेडक्रम्ब्ज आहेत. कटलेट वर्षातून एखाद्या वेळेला होतात - त्या वेगाने मला हे संपवायला आयुष्यभर लागेल! काय काय करता येईल त्यांचं? फार तेलकट नको.

दहीवडे, डोसे यांबरोबर रसभाजी दाटसर करायला ब्रेडक्रंब्ज वापरता येतात दाणेकूट किंवा तत्सम पदार्थांबरोबर. (मी चुकून मीठ जास्त पडले असेल तर वापरलेत). वांग्याचे काप घोळवायलाही रव्यासोबत वापरून बघता येतील.

माझ्याकडे बरेच धणे शिल्लक आहेत. थोडे जुने आणि थोडे नविन. काय करू त्याचं?
दोन्ही मिक्स करून भाजून पुड करू का? पण घरी पूड केली तर ती बाजारात मिळते तितकी फाईन होते का? आणि इतकी धणेपुड कशा कशात वापरू शकतो आपण्?:अओ:

Pages