युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंग, मोहरी, हिरवी मिरचीची फोडणी करून बारीक चिरलेली चवळी (शेंगा) आधणाचे पाणी ठेऊन शिजवायची.किंचितशी साखर,मीठ घालायच्चे वरून ओ.खो किंवा कांदा खोबरे वाटून घालणे.

या शेंगेचा आकार पहाता वालची शेंग नक्कीच नाही. >>>>> वाली म्हणून कोकणात छान चवीची भाजी मिळते.चवळीच्या शेंगा हिरव्या असतात तर वाली छान पोपटी असतात आणि लांबलचक असतात.

चवळीच्या शेंगांची भाजी करताना, शेंगा हातानेच निवडाव्या. सुरी/विळीने कापू नयेत.
जर शेंग कोवळी व हाताने सहज तुकडा होत असेल, तर सालासकट घ्यावी, नाहीतर सोलून दाणे वापरावेत >>>>> सगळ्या शेंगा या पद्धतीनं सोलल्या की शेंगांचे तुकडे + दाणे अशी एकत्रित या - https://www.maayboli.com/node/29262 पद्धतीनं रस्साभाजी करायची. ज्वारीची भाकरी आणि ही भाजी फार मस्त कॉम्बो आहे.

चवळीच्या शेंगेसारख्याच पण गडद हिरव्या रंगाच्या शेंगा असतात ह्या. काऊपी बीन्स (ऑरगॅनिकली ग्रोन) हे बिगबास्केटवर कळालं.
मी याची भाजी नेहेमीच्या शेंगांसारखीच केली होती; पण वर डॉ. म्हणालेत तसं सालं फारच निबर आणि जून वाटतील अशी होती. रसभाजी करून पाहायला हवी.
चवळीच्या (नेमीच्या फिकट पोपटी) शेंगांची भाजी, तेलावर परतून परतून खरपूस केलेली फार सुरेख लागते; हळद, तिखट आणि मीठ इतकाच मसाला वापरायचा याला. साधं वरण - भात - लोणकढं तूप वर आणि ही भाजी एकदम चविष्ट बेत.

मने तू हे असलं माहीत नसलेलं काही काही आणतेस आणि करुन खातेस पण या बद्दल मला तुझं फार कौतुक वाटतं. मला ते जमायला हवं, किती बरं होईल

चवळीच्या शेंगा, आरारानीं सांगितले तसेच करते मम्मा, पण आम्ही फक्त टोक हातांनी कुडतो, बाकी भाजी बारीक चिरून , तेलावर भाजून मग फोडणी करायची. शेंगदाण्याचा कूट फोडणीतच घालायचा . अगदी याच पद्धतीने मुळ्याच्या शेंगांची भाजी पण करतात

अन हो, शेंगा जर जून असतील तर फक्त दाणे घ्यायचे, साले नाहीत

फ्रिज मध्ये पाणी कसे साठवावे? काचेच्या बाटल्या फुटतात. प्लास्टिक बॅन आहे. पितळेच्या तांब्याच्या गिमीकी वाटतात. व साफ करायला अवघड

स्टीलचे दोन तीन तांबे भरावेत का व सील करून ठेवावेत. पाण्याला कसला कसला फ्रिजोत्पन्न वास येउ नये हीच अपेक्षा.

बाप रे ! चवळी आणि चवळी सदृश भाज्यांची केवढी माहिती मिळाली. केवढ्या वेगवेगळ्या रेसिपीज आल्या. Thank you all Happy

डॉक्टर, भाजी हाताने मोडण्याइतकी कोवळी आहे त्यामुळे स्कीनसकट घेतली. आतमध्ये कणभर आकाराच्या चवळ्या दिसताहेत. प्राची, भरीव दाणे नाहीत.

भरत आणि देवकी, वालीच्या शेंगा मोडल्यावर आत काय असतं? नेटवर अशा नावाने काही मिळालं नाही, वालच दिसताहेत.

मने तू हे असलं माहीत नसलेलं काही काही आणतेस आणि करुन खातेस पण या बद्दल मला तुझं फार कौतुक वाटतं. >>>>>>> जगात माहीत असलेल्या सगळ्या त्याच त्याच भाज्या लहानपणापासुन खाऊन कंटाळा येतो. मग प्रवासात कुठे अशी वेगळी भाजी दिसली की करण्याची उत्सुकता वाटते. Happy

डॉक्टर, इमेज शिक्षणासाठी आभारी आहे.

अमा, काचेच्या बॉटल्स बेस्ट कारण त्या स्वच्छ धुता येतात. त्या नकोच असतील तर स्टील आणि कॉपरच्या जार्स/ बॉटल मध्ये पाणी गार करणं बेस्ट. तांब्याने जागा जास्त अडकते आणि तुम्ही म्हणालात तसे अन्नाचे वास लागू शकतात ( जर प्रत्येक वेळेस झाकण ठेवायची शिस्त ठेवली तर नाही लागणार, पण मग घराला शिस्त लावत बसावं लागेल)

सॉरी, परत चर्चा त्याच चिकाच्या विषयावर आणते आहे. आणल्या आणल्या चीकाचं दूध खूप जास्त असल्याने काही पोर्शन एअर टाईट डब्यात डीप फ्रिजर मध्ये ठेवला होता, त्याला आज 10 दिवस झाले. आता वापरला तर चालतो की मोह सोडून देऊ?

वालीच्या शेंगा मोडल्यावर आत काय असतं?>>>>>>> मोठ्या चवळीचे दाणे असतात,त्यापेक्षा जरासे मोठे दाणे असतात.माझ्या माहितीनुसार ही भाजी फक्त कोकणातच मिळते.कोणी कोकणातून आले की त्याच्याबरोबर ही भाजी येते.मात्र लगेच दुसर्‍या दिवशी करावी लागते.

काही पोर्शन एअर टाईट डब्यात डीप फ्रिजर मध्ये ठेवला होता,>>>>> बिंदास्त करा.काही खराब होत नाही किंवा वास येत नाही.स्वानुभव आहे.

भरत आणि देवकी, वालीच्या शेंगा मोडल्यावर आत काय असतं? नेटवर अशा नावाने काही मिळालं नाही, वालच दिसताहेत.
<<
वालाच्या शेंगा आल्या की फोटो टाकतो. रूटीनली होते घरी.

प्लास्टिक बॅन आहे.
<<

एकदा वापरून फेकायचे कॅरीबॅग स्टाईल प्लास्टीक बॅन आहे हो. प्लॅस्टिकची भांडी, डबे अशा गोष्टी बॅन नाहीयेत.

देवकी आणि मी एकाच भाजीबद्दल बोलतोय.
वालीच्या शेंगा नाही. श़ेंंगेलाच वाली म्हणतात.
आम्हांला मुंबैत नियमित मिळते. पालघरकडून येणाऱ्या भाजीवालीकडून.

श़ेंंगेलाच वाली म्हणतात.>>>>>> +१.
आम्हांला मुंबैत नियमित मिळते.पालघरकडून येणाऱ्या भाजीवालीकडून.>>>>>>>> किती ते मस्त.

चवळीच्या शेंगा इथे खूपदा मिळतात डोंबिवलीत आणि बरेचदा कोवळ्या मिळतात, मी कोवळ्या असतील तर घेते. नुसत्या खायला पण मस्त लागतात. परतून पण भाजी छान होते, रस्सा पण छान होते दाण्याचं कूट, खोबरं, गोडा मसाला घालून. बटाटा बरेचदा घालते दोन्ही करताना, कधी कधी टोमॅटो पण घालते.

देवकीने टाकलेल्या फोटोतल्या शेंगा जास्त लांबसडक आहेत, त्या आमच्या गावी असतात आणि जास्त चविष्ट असतात. इथे मिळणाऱ्या इतक्या लांब नसतात. पण कोवळ्या शेंगा असतील तर पुलावात, मॅगी नूडल्स मध्ये पण आवडतात आम्हाला.

भाजी करताना मात्र टोके हाताने तोडून बारीक चिरते मी.

देवीकाने टाकलेल्या शेंगा प्रथमच इथे (ह्युस्टन) पाह्यल्या व केल्या अगदी साधी तेलावर नुस्ती परतली कास्ट आर्यनच्या कढईत. मस्त झाली!

- वाल, पापडी-वाल यांची भाजी गूळ, गोडामसाला अशी गोडसर - मसालेदार एकदम सुरेख होते; दोन्ही गोष्टी आणि तेलही जरा सढळ हातानं हवं.
- चवळी, बरबटी यांच्या शेंगभाजीला तेलावर परतून, कधी टोमॅटो वगैरे झकास. क्वचित कधी तरी शेंगदाण्याचं कूट लावून.
- गवारी, गूळ, शेंगदाण्याचं कूट आणि वर लिंबू पिळून; बेसनाचे लाडू वाली पण ही भाजी फर्मास होते
- फरसबी/श्राघे ची ओलं खोबरं वाली नाहीतर मटकीसोबत जरा झणझणीत भाजी सुरेख
- पोपट मिळाले तर पोह्यांत सद्गती नाहीतर त्याचा भात केला जातो
- तुरीचे दाणे मिळाले तर आधी लसणासोबत तेलावर भाजून कूटून नंतर आमटी
- मटार सगळीकडे खपतात; चहा सोडून Wink

तुरीचे दाणे मिळाले तर आधी लसणासोबत तेलावर भाजून कूटून नंतर आमटी >>>> प्लिज अजून डिटेलमध्ये कृती लिहा ना.

परवा मी चवळीच्या शेंगांबरोबर तुरीच्या शेंगा पण आणल्या होत्या आणि दाणे सोलून ठेवले आहेत. पण चवळीसाठी मी इतकं सगळ्यांच डोकं चावल की तुरीची रेसिपी विचारायला मी घाबरले. सगळ्यांना वाटेल की कसे बनवायचे माहीत नाहीत तर चीक, चवळी, तूर आणि काय काय न माहीत असणारे पदार्थ आणतेच कशाला?

मीरा.. वेगळी रेसीपी काही देत नाही. इथेच लिहितो - तुरीचे दाणे निवडून, धूवून पाणी टिपून घ्यायचं. चमचाभर तेलावर लसूण, हिरवी मिरची आणि हे दाणे बर्‍यापैकी परतून घ्यायचे. ही पायरी आवश्यक आहे. नंतर मिरची, लसणासोबतच जरा भरड करायचे मिक्सरमध्ये. नंतर तेलाची फोडणी करून कांदा; हवाच असेल तर जरासा खडा गरम मसाला आणि जराशीच हळद/तिखट इ वापरून आमटी करायची. हळद-तिखट फार वापरायचं नाही; हिरवा रंग येणार नाही आमटीला. यात साखर-गूळही नाही वापरायचा. गरम मसाला पावडरही नाही. लसूण-मिरची हवं तर वेगळं भाजून ठेचा टाईप करून ठेवता येईल; नंतर तिखटाचं प्रमाण अ‍ॅडजस्ट करायला; आणि हो; ठेचा म्हणूनही वापरता येईलच.
भाजक्या मिरच्या आणि लसूण यांच्या चवीवर आणि अंगच्या हिरव्या रंगावर जिंकेल ही आमटी. ज्वारी/बाजरी/कळण्याच्या भाकरी बरोबर चुरून खायला एकदम मस्त प्रकार.

Pages