बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मेघा जियो... एकेली लड रही.. आऊ ला नको नॉमीनेत करायला आणि जुई ला करा. पण मेजोरीटी मूळे जुई सेफ आणि आऊ नॉमीनेत. शेम ऑन यु पुष्की अँड सई.. सेविंग जुई.

ऋतुजा हुशार आहे. सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये आहे तोवर ती एक्झिट घेतेय. तिला माहितेय ह. खा शी पंगा घेतला तर कुठलाच संजय जाधव दिग्दर्शित चित्रपट मिळणार नाही. ममां नी पण कौतुक केलेय तोवर बाहेर जाउन ती पटापट कामे मिळवेल.

अशी कशी गेली ऋतुजा? नॉट अ‍ॅक्स्पेटेड Sad
कालचा एपिसोड हायलाइट , एकीक्डे मांजरेकर एकाच मुद्द्यावरून राजेशला शिव्या देताना , दुसरीकडे राजेशचा प्रवास दाखवतानाच्या व्हिडीओ क्ल्पि मधेही चॅनलने पुन्हा एकदा शेवटचे रोमॅन्स खुन्नस टीआरपी घेऊनच टाकला, ज्या प्रकारे राजेश क्लिप एंड झाली ती मोमेंट तर फुल्ल सईच स्टार्स्डम घेऊन गेली, राजेश स्वतःला स्ट्रॉगेस्ट समजत असेल तर मला त्यचह्याबरोबर नॉमिनेट होणे आवडेल म्हणत तिने त्याचा फोटो डिस्ट्रॉय केला आणि क्लिप संपली.
काय सॉल्लिड प्यादं बनवलं कलर्स ने राजेशला, आधी स्वतः खतपाणी घातल त्यांच्या रोमान्सला आणि दोष चॅनलकडे येतोय असं कळताच राजेशला व्हिलन बनवून घराबाहेर काढलं, एकदमच मास्टर्स्ट्रोक हाणला चॅनलने !
थोडक्यत जो सर्वांना सर्वात हुषार पॉवरफुल वाटत होता, तो क्षणात निर्बुद्ध बनला !

आज मेघाविरुद्ध बोलताना रेशमची भाषा आणि बॉडीलँग्वेज प्रचंड अ‍ॅग्रेसिव्ह होती. ती सतत मेघाला टच करून बोलत होती. आणि खूप पर्सनल मुद्दे काढले तिनं.

त्या मूर्खिणीला अजूनही वाटतं की आपण सेलेब्रिटी आहोत आणि त्यामुळे शेवटपर्यंत घरात राहू. वर ती मेघाला म्हणे एकदा नॉमिनेशनचा अनुभव घेऊन बघ. तुझ्या त्या चार बॅगा आहेत त्या भर आणि मग पुन्हा अनपॅक कर. मी तुला माझी कॉम्पिटिशन मानतच नाही. अयायायायायाया ... किती तो जळफळाट आणि इन्सेक्युरिटी. मेघाला मानलंच. रेशमच्या त्या थयथयाटातही मेघानं चेहर्‍यावरचं मंद हास्य अजिबात जाऊ दिलं नाही. या एका कृतीनं रेशमतर अक्षरशः केविलवाणी वाटली. "मी नागिण आहे, मी यंव आहे, मी त्यंव आहे. तुझं कानाचं आणि तोंडाचं कनेक्शनच तुटलंय .... " च्च च्च च्च च्च किती गटारगंगा वाहवली बेशर्म चीपनीसनं. आणि ती मंद हर्षदा आणि स्वतःविषयी गैरसमज असलेला आकांत शेलार कुत्सितपणे हसत होते. सई प्रचंड शॉक्ड होती रेशमच्या त्या भयाण विकृत रुपाकडे बघून.

मला तर वाटतं मेघा होऊच दे नॉमिनेट. मग रेशमला कळेल की नॉमिनेट झाल्यावर ती स्वतः डेंजरझोनमधे जाते पण मेघा मात्र सेफ होते.

नोमिनेशनच्या पेअर्स कोणी ठरवल्या होत्या?बी.बी. ने?
सगळ्यांची नोमिनेशन्स २ मिनिटात हसत खेळत ऊरकली.
रे ने हिच शेवटची संधी असल्यासारखं गरळ बोलून घेतली मेघाविरुद्ध.
नेहमीप्रमाऩेच तिने दाखवुन दिले की ती टास्क खेळत नाही,ती दुष्मनी काढते फक्त.
तू bag भर,तो अनुभव घेच एकदा.. अरे तू कोण हे सांगणारी?

हखाने रे ला टाळ्या वाजवुन,मिठी मारून मेघाला खिजवलं.
सई रागावल्यामुळे ती पण ऊद्या मेघाला सपोर्ट करणार नाही. ऊरला फक्त पुष्कर तिची बाजू घेणारा.

रे असं बोलून,असं वागुन प्रेक्षकांचा राग अजून ओढवुन घेतीये.

मामी +1
हर्षदा मंद आहे.. तू पंच आहे ना मग रेशम ला जाऊन हग काय देतेयस ? हर्षदा लवकर बाहेर जावी..

>>उच्चार काळा प्रमाणे बदलतात..<<
मराठीत म्हटलं हा योग्य शब्द आहे, पण त्याचा वापर कुठे/कसा करावा याचे नियम आहेत; यात उच्चाराचा काडिमात्र संबंध नाहि. म्हणाला/ली या शब्दाचं रुपांतर कालांतराने म्हटला/ली मध्ये झालेलं आहे असं म्हणताय कि काय? Lol

मागे या विषयावर चर्चा झाली असेल तर लिंक द्या...

Submitted by राज
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कुणाच काय तर कुणाच काय...
इथे शब्दांचे स्पष्ट उच्चार व भाषा याची चर्चा होत होती.

राहिला प्रश्न, उच्चार काळानुरुप बदलतात का ? तर हो ते बदलतात. त्या साठी थोडस वाचन व मराठी व प्राकृत ची निर्मीती पहा म्हणजे झाल..
आणि हो.. क्रियापदाचा वापर क्रियापदा सारखा व्हावा हा व्यकरणाचा नियम असतो. पण तो कुठे आणि कसा करावा असा नियम असतो ? बर..

या विषयावरील चर्चा खुप ठिकाणी विखुरल्या आहेत.. त्या साठी मायबोलीवरील शोध या सुविधेचा उपयोग करावा...

त्या मूर्खिणीला अजूनही वाटतं की आपण सेलेब्रिटी आहोत आणि त्यामुळे शेवटपर्यंत घरात राहू. वर ती मेघाला म्हणे एकदा नॉमिनेशनचा अनुभव घेऊन बघ. तुझ्या त्या चार बॅगा आहेत त्या भर आणि मग पुन्हा अनपॅक कर. मी तुला माझी कॉम्पिटिशन मानतच नाही.

अयायायायायाया ... किती तो जळफळाट आणि इन्सेक्युरिटी.
Submitted by मामी

>>>>>>>

हासुन लोळन... मस्तच..

पुष्की कधी कुणाला दगा देइल काही सांगता येत नाही
स्मिता विरूध्द आणि सईच्या बाजूने बोलण्यासाठी त्या दोघांना मुद्दे मिळू नयेत म्हणजे कमाल झाली..... स्मिता स्वताच्या डोक्याने खेळत नाही.... हा एकच किती जोरकस मुद्दा होता.... पण मेघा आणि पुष्कीने सहज हार पत्करली
वरुन मी आजपर्यंत कधीच खोटे बोललो नाही, नेहमी खऱ्यानेच खेळलोय वगैरे बडबड करुन स्वताची इमेज फक्त जपली.... त्याचा त्याला सुशांतविरुद्ध फायदा झाला!

सईचा विश्वास गमाउन बसणारेत हे दोघे!

त्या रेशमने काय त्रागा केला यार?
कमाल आयते फुटेज देतात हे लोक मेघाला Wink

आस्तादच्या वक्तृत्व कौशल्याबद्दल कॉमेंट केली काय आणि आज त्याने एकाच एपिसोडमध्ये एक सोडून दोनदोनदा डेमो दिला!

सई बालिशपणे मेघा आणि पुष्करवर रागवली आहे नॉमिनेट झाली म्हणून, अरे त्यांचा काय दोष? Uhoh तिच्या स्वतःत इतक्या गोष्टी कमी आहेत त्याचा विचार करायला हवा होता ना? बिग बॉस च्या घरात काहीही शेकू शकतं तुमच्यावर.

रेशम अचानक म्हातारी दिसू लागली आहे. परवा पिवळा ड्रेस घातला होता तेव्हा चांगली दिसत होती.

ह.खा. ताबडतोब बाहेर गेली पाहिजे. अती करतेय.

सई ला नाॅमिनेट केल ते बरंच झालं ...माझ्या जाम डोक्यात जाते ती...

पुष्कर आवडायला लागलाय...उगाच मैत्रिण आहे म्हणून काहीही ओढून ताणून मुद्दे नाही उचलले त्याने...

प्रामाणिकपणा आवडला त्याचा..

प्रामाणिकपणा आवडला त्याचा..>>>>
मला असं वाटतं की तो थोडासा कनफ्यूज झाला आहे.
राजेश/रेशमवर एवढा हल्ला झालेला बघितल्यावर आणि घरात सतत सईच्या 'पुष्की'बद्दल होणारी चेष्टा पाहिल्यावर तो जरा बिथरला आहे. सई प्रकरण शेकू नये असे वाटत असेल त्याला. त्यामुळे कदाचित तो जरा दूर राहिल सई आणि पर्यायाने मेघा पासून.
त्याची बॉडी लॅंग्वेज तशी वाटली मला काल.

पुष्कर पहिल्यापासूनच सेफ खेळतो आहे. सई ने फ्लर्ट करायचा भरपूर प्रयत्न केला पण तो बधला नाही. राजेश रेशम वर आलेली वेळ पाहून लगेच सई ने त्याला हेल्दी फ्लर्टिंग चे नाव दिले.

ऋतुजाबद्दल सॉलिड वाईट वाटतंय, badluck. तिची स्वतः ची ग्रोथ छान होत गेली आणि तिचा ग्राफ हळूहळू उंचावत गेला. स्वतंत्र विचारसरणी, सई, मेघा ची ही नोकर होणं नाकारणे त्यामुळे वेगळा स्पार्क दिसला तिच्यातला hats off. महिनाभरात बरं वाटूदे तिला मग wild card एन्ट्री द्यावी bb ने. ती डिझर्व करते.

पुष्कर, स्मिता सेफ झाले याचा आनंद झाला. रेशम सेफ होईल असं वाटतंय, ती एवढं तावातावाने बोलत होती पण मेघा nominate झाली तरी आरामात वाचेल votes ने public तिच्याबाजुने दिसतंय. हीचं मात्र सांगता येत नाही.

सईचा आळशीपणा नडला बहुतेक तिला, तेव्हा मेघा firmly सांगू शकली नाही आणि पुष्करही. स्वतःची वेळ आल्यावर मात्र मेघा सांगतेय सर्वांना तुम्ही ऐकूच नका firmed राहा.

मेघा, सई दोघी मला फारशा आवडत नाहीत पण रेशमशी तुलना करता त्या ठीक, रेशम अति डोक्यात जाते. टास्कसमध्ये उत्तम रेशमपेक्षा दोघी, कामात मेघा उत्तम.

सई जाम पुष्करच्या मागे मागे पहिल्यापासून, त्यानेच अंतर ठेवलं कायम. मला भरव etc त्याने नकार दिला. पुष्कर सर्वात आवडता स्पर्धक माझा अजूनही.

बाकी रेशमने काय फालतू भाषण केलं, तिला माहिती नाहीये मेघाच्या पाठीमागे किती पब्लिक आहे बाहेर. कीरकीर केली रेशमने जाम, डोक्यात गेली माझ्या अजूनही. तिला स्वतः ची ताकद कळून चुकली असेल की आता बाहेरचा रस्ता. एवढं काय उत्स्फूर्त भाषण की हर्षदाने येऊन मिठी मारली.

बिग बॉस ला माहितेय रेशम विरोधात पब्लिक आहे त्यामुळे ती सेफ होईल असा task दिलाय.

>>@योग - मला तुझी मागच्या पानावरची पोस्ट आवडली. राजेश ची मी पुरस्कर्ती नाही. मुळात जे झालं त्याबद्दल नक्की मत काय द्यावं याच संभ्रमात आहे मी त्यामुळे ते चूक की बरोबर या विचारात मी पडणार नाही. पण ज्या पद्धतीने ते तो व्यक्त केलं आहेस ते मला आवडलं.
@ दक्षिणा
धन्स! चूक वा बरोबर यात आपण पडू नये हेच बरं.. कारण बि बॉ हा शेवटी एक खेळच आहे. आणि तो जिंकण्यासाठी सर्वच स्पर्धक सर्व प्रकारचे प्रयत्न करणार, हे नक्की. पण एकंदर वोटींग वगैरे ही टास्क व्यतिरीक्त 'ईतर' बाबींना धरूनच जास्त होत आहेत हे स्प्ष्ट आहे. थोडक्यात टास्क हा एक बहाणा आहे. वैयक्तीक हेवेदावे, आपसी दुष्मनी, पर्सनल स्कोर्स, ईगोज, ई. सर्व गोष्टीच जास्त अधोरेखित होत आहेत. ईथल्या काही पोस्टींमध्ये स्पर्धकांबद्दल वापरलेली भाषा बघता एक नक्की आहे की एकूणात हा सर्व मामला पुन्हा एकदा पुरूष वि स्त्री, नैतीकता, ईत्यादी च्या मार्गाने जात आहे.. so it is not fair game to begin with..!
असो. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर मला म्हणूनच स्मिता, ॠतूजा, रेशम आवडतात. they are hardly seen bitching or gossiping or talking trash about others, behind their back. so they have maintained certain standards.
पुष्कर मात्र कात्रीत सापडला आहे असे मला वाटते. आपण वापरले जात आहोत हे त्याला अजून कळत नाहीये असे वाटते. त्याने कात्रीतून लवकर बाहेर यावे. तसे झाले तर या खेळात एक वेगळाच रंग येईल.. आणि खरी स्पर्धा तेव्हाच सुरू होईल. he has shown tremendous balance so far... but I hope he doesn't lose his bearing in attempt to keep fair play..
या खेळात प्रामणीकपणा, नैतीकता वगैरे ला विशेष किंमत नाही. ईथे एकतर प्रचंड अनुभव आणि किंवा मॅनिप्युलेटीव स्किल्स ज्यांचेकडे आहे त्याचा मार्ग सुकर आहे. या बुध्दीबळाच्या खेळात प्यादी, ऊंट, घोडे, हत्ती कोण आणि वेळेप्रसंगी आपल्याला वाचवणारा व आपल्यासाठी मरेल असा वजीर कोण हे ज्याला कळले तोच राजा होणार हे निश्चीत.
राजेश रेशम गँग होते/आहेत तोवर मेघा च्या अस्तित्वाला किंमत होती/आहे..once they are out, she will struggle to find agenda and reason to keep herself safe in the house.. because then she will have to compete with 'friends'..
on the contrary Bhushan, Pushkar, Aau are playing their own game and will likely emerge as top 3.
Rutuja would have been top 3.. but sadly she had to leave due to injury. lets hope Sushalyaa comes back in full form.

रच्याकने: सुशांत पंचायत सेशन मध्ये नॉमिनेट झाला असला तरी त्याने पुष्कर च्या डोक्यात 'कीडा' सोडला आहे.. असेही सुशांत ला घरी जायचे वेध लागलेत पण जाता जाता तो पुष्कर ला संभ्रमात टाकून स्वतःसाठी खेळायची दीशा देऊन जातोय असे वाटते आहे. चांगला डाव आहे. हा डाव ऊलटतो का यशस्वी ठरतो हे पुढील आठवड्यात पहायला मिळेल.

>>कुणाच काय तर कुणाच काय... इथे शब्दांचे स्पष्ट उच्चार व भाषा याची चर्चा होत होती.<<
हो अर्थात, पण इथेच कोणितरी ती बोलीभाषा (तो म्हंटला, तो म्हणला) आहे असं सांगुन सारवासारव केली; कारण आस्तादला प्रशस्तिपत्र द्यायचं होतं. Happy आणि त्यानंतर तुम्ही येऊन तिसराच मुद्दा घुसडवला - कालाप्रमाणे उच्चार बदलतात वगैरे...

>>क्रियापदाचा वापर क्रियापदा सारखा व्हावा हा व्यकरणाचा नियम असतो. पण तो कुठे आणि कसा करावा असा नियम असतो ? बर..<<
मोरपंखिस - साधारण समानार्थि क्रियापदं कुठेहि/कशीहि वापरली जाउ शकतात अशी तुमची धारणा असेल तर मी विनम्रपणे इथे थांबतो. कारण स्त्रीयांनी साडी गुंडाळण्याऐवजी नेसलेली सुंदर दिसते आणि एखादि आवडती ठुमरी बुवांनी म्हटल्यापेक्षा, गायलेली कानाला गोड वाटते.

आणि शेवटी - एखाद्या मुद्द्याचा प्रतिवाद करताना समोरच्याचं म्हणणं काय आहे, तो काय म्हणाला किंवा त्याच्या म्हणण्यात कितपत तथ्य आहे, त्याने तसं का म्हटलं असावं याचा विचार केला गेला तर चर्चेला अर्थ आहे. तुर्तास एव्हढंच म्हणेन... Happy

आजचा एपिसोड अजुन बघायचाय पण कालच्या घडामोडिंवरुन बांधलेला अंदाजः
राजेश घरातुन बाहेर पडल्यामुळे मास्टरमाइंड ची जागा रिकामी आहे. ती काबिज करायला कोण स्टेप अप होतं ते बघुया. माझ्यामते उमेदवार - हर्षदा, सुशांत आणि रेशम. उरलेले सदस्य चांगले खेळाडु आहेत पण लिडर नाहित...

Pages