Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हखा चा रे ला मस्का मारणे चालू
हखा चा रे ला मस्का मारणे चालू आहे पण का? ते समजत नाही...... पण रे चा रा जाउनही माज काही उतरला नाही ज्या लोकांन मुळे ती इथे आहे त्यांनाच फाट्यावर मारते.
बिग बॉस काही अनप्रिडिक्टबल
बिग बॉस काही अनप्रिडिक्टबल ठेवतच नाही. कोणीही प्रिडिक्ट केले असते की कोण नॉमिनेट होणार या जोड्यांमधे ते. आता रेशमला वाचवायचे प्रयत्न सुरू. कारण ती नॉमिनेशन्स मधे आली की जाणार नक्की जर जनमत बघत असतील तर. रेशम आणि तिची चिमणी पाखरं नक्कीच टिकणार.
रेशम ही या सिझन ची व्हिलन आहे
रेशम ही या सिझन ची व्हिलन आहे. ती शेवट पर्यंत राहील.
चांगला शो तेंव्हाच असतो जेंव्हा हिरो आणि व्हिलन शेवटपर्यंत टक्कर देतात.
मामी
मामी
ऋतुजा हात जायबंदी झाल्याने बाहेर पडली याचं वाईट वाटलं. प्रत्येक एलिमिनेट होणार्या सदस्याला साश्रू नयनांनी टाटा करायची अलिखित परंपरा, अचानक एका साध्या पत्राद्वारे सगळ्या सदस्यांना कळवून का मोडली हे समजलं नाही. आवडलं तर अजिबात नाही. ऋतुजा लढवय्यी आहे, १५-२० दिवस आराम करुन, बरी होऊन परत आली तर धमाल येईल.
सई अगदी लहान मुलासारखी वागत होती काल. एक गोष्ट मला समजली नाही.. कदाचित सदस्यांच्याही लक्षात आली नाही, किंवा राजकारणी आकांत आणि रेशम तारणहार अक्कासाहेब यांनी कोणाला लक्षात येऊ दिली नाही. पंचायत बसली आहे, सर्वानुमते निर्णय घ्यायचा आहे हे मान्य.. पण १-२ जणांना बाकीच्यांची मतं पटत नसतील, तरी त्यांच्या मतांवर ठाम राहणं शक्य नव्हतं का. म्हणजे ९ सदस्यांच्या पंचायतीमधे ७-२ असं बहुमताने कोणाला सेफ करायचं हे ठरवलं तरी चाललं असतं. सई-स्मिता च्या वेळी सुरुवातीला पुष्कर-मेघा ठामपणे सईच्या बाजूने होते, बाकी सगळे स्मिताच्या ! हे दोघं आपला निर्णय बदलत नाहीत, पाहिल्यावर आकांत ने गेम टाकली आणि तुम्ही दोघे परत एकदा विचार करुन या म्हणून सांगितलं आणि तिकडे दोघांचा निर्णय थोडाफार हलला. असं वाटलं. मेघा सर्वतोपरी सईला समजावत होती, पण ती काही ऐकायच्या परिस्थितीत नव्हती. पुष्करचा अॅटिट्यूड आवडला, दोन वाक्य बोलून समजवायचा प्रयत्न केला, तरी ती बधली नाही पाहता सरळ उठून निघून आला. कदाचित दोघांच्या समजावण्याच्या पद्धतीतला मोठ्ठा फरक म्हणजे, सईच्या नॉमिनेशन च्या आधीच पुष्कर सेफ झाला होता, आणि मेघाचा अजून नंबर आला नव्हता !
आता अतीभीषणमहाप्रचंड कॉन्फिडंट रेशम आणि मेघाच्या राउंड बद्दल ! राजेश गेल्यापासून रेशम कोणावर तरी खापर फोडायला चान्सच शोधत होती! तिच्या विरोधात असलेल्या आउ आणि सई दोघी आधीच नॉमिनेट झाल्या होत्या तर पुष्कर सेफ झाला होता. राहता राहिली मेघा ! मग घे बोलून. रेशम ची बडबड आणि एकंदर देहबोली अत्यंत उर्मट आणि उद्विग्न वाटली. राजेश गेल्या नंतर आता आपला नंबर वोटिंग मुळे निश्चित लागेल याची खात्री असल्याने, हखा च्या भाषेत बोलायचं तर सगळं बकाबका ओकली ! मेघाला पब्लिक सपोर्ट असल्याने, रेशम च्या बडबडीने काही फरक पडेल असं वाटत नाही, झालाच तर मेघाला त्याचा फायदाच होईल..
आउ, सुशांत, सई, मेघा (कदाचित आज होईल.. रे- हखा मिळून सगळ्यांना मेघाला नॉमिनेट करायला लावतीलच!) हे चौघे नॉमिनेट होऊन आउ बाहेर जातील असं वाटतंय.
रेशमची आजची प्रतिक्रिया अगदी
रेशमची आजची प्रतिक्रिया अगदी तिच्या नेचर धरुनच आली , विकेन्डला झालेल्या हजेरिच खापर तिला कुनावर तरी फोडायच होत त्यात तिला मेघा बरोबर सापडली , मेघाने जरी गॉसिपिन्ग केल तरी मुद्दे तर तुम्हीच पुरवले ना त्याना आणी तुला तर काही फरकच पडत नाही ना कोण काय म्हणतय ते
तुझ्या २० वर्श जुन्ञा मैत्रिणीने तुला हाउसब्रेकर म्हटल त्याच काय? मेघा जे बोलली ते मान्जरेकर काय आक्ख जग बोल्त होती की.
रारे एपिसोड मधे हखाची चाल मला जबरी वाटली, एन्त्रीलाच तिने राजेश च मोरॉल पुर्ण डाउन करुन टाकल, बिबॉने दिलेल्या सन्धिचा जरा जास्तच फायदा उचलुन व्यवस्थित हव ते बोलुन घेतल, रेशम ला हाउसब्रेकर वैगरे सबोधुन वर गळ्यात पडुन रडायची आणी फुल बिल द्यायची नाटक केली म्हणजे एवढ करुन स्वतः नामानिराळी.
बाकी नॉमिनेशन पासुन सग्ळे टास्क बीबॉच्याच गणितावर चालतायत.
पुष्की, आस्ताद, स्मिता
पुष्की, आस्ताद, स्मिता मच्युअर आहेत, आणि जंटल पर्सन आहेत. बाकी झाडून सगळे रडे आहेत. हल्ली आस्ताद छान खेळतोय. बोलला पण मस्त, स्क्रिप्ट शिवाय मुद्देसूद कम्पोज्ड बोलणारा हा एकच.
बाकी हात फ्रॅक्चर आहे कळायला एम आर आय कधी पासून करायला लागले!!
प्राजक्ता +१
प्राजक्ता +१
मेघाने नाॕमिनेशन टास्क झाल्यावर खरतरं हे सगळं सुनवायला पाहिजे रेला पण ती बावळट तिच्या मागून बोलताना दिसतेय आजच्या क्लिपमध्ये. जसे रेने तिला मध्येच सांगितले की मला नको समोर सांग तसे हिनेपण तिला मध्येच टोकायला हवे होते.
ऋतुजा हात जायबंदी झाल्याने बाहेर पडली याचं वाईट वाटलं. प्रत्येक एलिमिनेट होणार्या सदस्याला साश्रू नयनांनी टाटा करायची अलिखित परंपरा, अचानक एका साध्या पत्राद्वारे सगळ्या सदस्यांना कळवून का मोडली हे समजलं नाही. आवडलं तर अजिबात नाही. ऋतुजा लढवय्यी आहे, १५-२० दिवस आराम करुन, बरी होऊन परत आली तर धमाल येईल.>>>> ती येणार परत म्हणून टाटाबायबाय नाही झाले. हिंदी बिबाॕमध्ये झालयं फक्त तिथे कारण वेगळे होते.
रेशम जाम डोक्यात जायला लागली आहे.
सईच्या वेळेस जर पुमे अडून राहीले असते तर कोणताच निर्णय न झाल्यामुळे सैस्मि दोघीही नाॕमिनेट झाल्या असत्या (as per hindi bigg boss rule)
बाकी हात फ्रॅक्चर आहे कळायला
बाकी हात फ्रॅक्चर आहे कळायला एम आर आय कधी पासून करायला लागले!! Lol
मलाही असेच वाटले. एक्सरे करतात ना? पण काय माहित मेडीकल फिल्ड मध्ये एम आर आय ने ही कळत असेल असे वाटले.
रेशम चा अति कॉन्फिडन्स नडणार
रेशम चा अति कॉन्फिडन्स नडणार तिला.
काय फालतु बोलली काल..आणि तिला वाटतंय की खुप भारी बोलली असणार...तिने नॉमिनेशन ची सगळी कारणं देताना मेघा शी पर्सनल स्कोर सेटल केला जे की लोकांना अज्जिबात पटणार नाही..घरात तिचं काय चुकतय हे सांगायचं सोडुन भलतच..राजेश गेल्यामुळे ति फ्रस्ट्रेट झालेली स्पष्ट दिसतय. आणि या उलट मेघा खोटं का असेना पण रेशम ला प्रेमाने समजावत होती "रा गेला तरी तु एकटी नाहिस वाईट नको वाटुन घेउस " ई ई..मेघा खरच भारी आहे..प्रेक्षकांना काय हवय तिला बरोबर माहिती आहे. तिच्या प्रेमळ वागण्याचा रेशम वर काहीही फरक पडणार नाहिये हे तिला मनातुन माहिती आहे पण प्रेक्षकांवर नक्कीच पडु शकतो हे ही तिला बरोबर माहिती आहे.
रेशम ने तोडलेले तारे तिच्याच विरुद्ध जाणार..मेघा फॅन्स नाही सोडत तिला आता.
आणि हखा अजुनच महान...लगेच जाउन मिठी वगैरे...एकही मुद्दा मुद्देसुत न मांडता आगपखड केली नुसती रेशम ने...
मेघा हो ग तु नॉमिनेट..बघ तुल पण कळेल तुला किती सपोर्ट आहे ते...
मेघा हो ग तु एलिमिनेट>
मेघा हो ग तु एलिमिनेट>>nominate म्हणायचय का तुम्हाला?
मेघा हो ग तु एलिमिनेट>>>
मेघा हो ग तु एलिमिनेट>>> नॉमीनेट ग! एलिमिनेट काय होत नसते ती, बिग बॉस हा एक गेम असेल तर त्याची सुत्र मेघाला परफेक्ट समजलियेत.
सईला वाचवायला मेघा आणि पुष्करला मुद्दे सुचले नाहित?? कमाल आहे, स्मिताने एकही टास्क तिच्या डोक्याने केला नाही, जर पन्चिन्ग बॅग टास्कमधे तिच्याच ग्रुपच्या सदस्यानी सान्गकामी म्हणून तिचा फोटो लावला तर तो आता स्कोरिन्ग पॉइन्ट कसा असु शकतो? घरात काम करण महत्वाच आहे पण टास्क करण त्यापेक्षाही महत्वाच आहे.
एकदरित मराठी बिग बॉस हिन्दीपेक्षा लिनियन्ट आहे , सगळ लुटुपुटुच , हिन्दीत पब्लिकला खाण्यापिण्याचे इतके लाड नसायचे, किबहुना लिमिटेडच रेशन मिळायच , सगळ्या टास्क पण लक्झरी बजेट म्हणजे खायचे पदार्थ जादाचे मिळायचे , बाकि सगळ रेशन अगदी बेसिक असायच
इथे तर याना प्रमोटर ब्र्न्च अन काय पाठवतात..
रुतुजाची wild card entry
रुतुजाची wild card entry झालीच पाहिजे ......तिला घरातून बाहेर जाताना का नाही दाखवल???
रे नी सगळा राग काढला मेघा वर . अजुन मस्ती नाही उतरली तिची ,असच वाटत होत काल ..
एवढं काय उत्स्फूर्त भाषण की हर्षदाने येऊन मिठी मारली.
बिग बॉस ला माहितेय रेशम विरोधात पब्लिक आहे त्यामुळे ती सेफ होईल असा task दिलाय.
Submitted by अन्जू on 22 May, 2018 - 01:18 >>>>>>>>> पटतय तुमच
रे ह खा बद्दल बोलत होतीका आस्ताद ला ?? - "अस तर मी तुझ आयुष्य काढलना तर घरात तोन्ड लपवायला जागा मिळणार नाही ..."
४ चागल्या गोष्टी मेत्रिणिने जगासमोर सान्गितल्या तर तिला पण जगासमोर expose करायच ??
हिच का २० वर्षाची मेत्री ??
मित छान पोस्ट.
मित छान पोस्ट.
आज मेघाताईंचा बड्डे असल्याने, नॉमिनेट झाल्या तरी सेव्ह करतील हर्षदाताई त्यांना. असा एक अंदाज. त्यांना काल बिग बॉस ने सांगितलंना त्या नॉमिनेट किंवा सेव्ह करु शकतात कोणाला, ऐकल्यासारखं वाटतं.
असं केलं नाही तर हर्षदाचं काही खरं नाही, काल ती पार मेघा फॅन्सच्या गुडबुकातून उतरलीय.
रेशम आता हर्षदाचं प्रायव्हेट
रेशम आता हर्षदाचं प्रायव्हेट लाईफ बरळणार बहुतेक, पण अगं बाई त्यांचं वेगळं, तुमचं वेगळं. तुमचा प्लॅटफॉर्म चुकीचा होता, पब्लिक बघत होतं.
रेशम आधी सावध होती आणि राजेश बिनधास्त होता, आता मात्र ती जाम चवताळली आहे. तिला वाटतंय की हर्षदा वाटेल तसं बोलली म्हणून पब्लिकने राजेशला काढला. तो मागे पण बाहेर पडलेला तरी असं. तेव्हा पुष्करच्या डोक्यावर खापर टाकलेलं तिने. तिच्या डोक्यात अजूनही शिरलेलं नाहीये की पब्लिक आधीपासून या फेक किंवा ख-या लवस्टोरीच्या विरोधात आहे. आता तिला वाटत असेल आपण सईला मुर्ख ठरवलं पण ती ऑफर स्वीकारली असती तर राजेश असता आत, एकीकडे स्वतः त्याच्या नॉमिनेशनला जबाबदार आहे असं वाटत आहे. मागे इझिली पुष्करवर आळ टाकून मोकळी झाली. फार निगेटीव्ह आहे रेशम. लवकर बाहेर जायला हवी आहे. आज सेफ असेल.
वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे
वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉसच्या घरात शर्मिष्ठा राउत दाखल होणार अशी चर्चा सुरू आहे>>
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/marathi-bigg-boss/...
आधी मेघा डोक्यात जात होती,
आधी मेघा डोक्यात जात होती, पण ती ह खा समोर मला खूपच बरी वाटू लागली आहे.
तिला पण घराबाहेर जायचे वेध लागलेत बहुधा.
रेशम पण मुर्खासारखी वागतेय
आणखी एक बाई???
आणखी एक बाई???
का? का?
ती निवेदितासारखी दिसणारी एक डेली सोप मधली अॅक्ट्रेस येणार होती ना? तिचं काय झालं?
nominate म्हणायचय का तुम्हाला
nominate म्हणायचय का तुम्हाला? >> हो हो..केलं आता दुरुस्त
नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्रि पण
नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्रि पण बाईच? मराठीत पुरुष स्पर्धक नाही सापडत का यांना?
रुतुजाच बरी झाल्यावर परत घ्यायला पहिजे. तोपर्यंत गेम खुप वेगळ्या उंचीवर पोचला असेल, तेव्हा एक ट्विस्ट म्हणून रुतुजाला घ्यायला हरकत नाही.
आणखी एक बाई???>> मराठी
आणखी एक बाई???>> मराठी इन्डस्ट्रीमधे पुरुष तयार नाहित वाटत बिगबॉस मधे यायला.....सगळ्या बायकाच येताहेत....
रेरा गँगचे लोक किती सैरभैर
रेरा गँगचे लोक किती सैरभैर झालेत, बौद्धिकदृष्ट्या दिवाळखोर झालेत बघा! वाईल्ड कार्ड एंट्री कोण येणार याची चर्चा चालू असताना आस्ताद व भूषण म्हणतात राजेशच येईल परत. त्याच्याइतका स्ट्राँग प्लेयर दुसरा कोण आहे? अरे काय! ज्या माणसाला इतकी मानहानी करून हाकलून दिलं, चॅनेलनी, अँकरने इतकी इज्जत काढून बाहेर काढलं तो स्ट्राँग कंटेंडर? किती तो चाटूपणा! त्याच्यापेक्षा आरतीला घेतील परत.
भूषण तर असला रडत होता राजेश
भूषण तर असला रडत होता राजेश गेला तर.. अरे किती ब्राउन्नोसिंग करावं माणसानं..
श्या, देवदत्त नागे किंवा शिव
श्या, देवदत्त नागे किंवा शिव ठाकरे येणार होते ना.
नागे आले तर सतत फुकत असणा-यांना एक लेक्चर देतील, म्हणून आणलं नसेल त्यांना. बाहेर ते सांगत असतात त्यांच्या मुलाखतीत तरुणांनो व्यसनं करु नका, योग्य आहार घ्या आणि व्यायाम करा. पण ते चहा खूप पितात बहुतेक, मिन्स फक्त चहाचं व्यसन आहे.
येईल नागोबा पण बिबॉच्या बिळात
येईल नागोबा पण बिबॉच्या बिळात... एक गेला की एक आणतात का सध्या?
मेघा आज कदाचित(?) नॉमिनेट
मेघा आज कदाचित(?) नॉमिनेट होईल या नुसत्या कल्पनेने देखिल तीच्या बरोबर तीचे पंखे पण भिरभिरलेले दिसतात.


तसे झालेच तर- सई, मेघा, सुशांत, आस्ताद, आऊ नॉमिनेटेड असतील.
टी आर पी टिकवायला मेघा, सई, आऊ आवश्यक आहेत.. त्यामूळे सुशांत भाऊ आता बॅग भरा.
चुकून रेशम एलिमीनेट झालीच तर मला वाटते पुढील वाटचाली साठी तीने घराबाहेर पडलेले तीच्यासाठी जास्त चांगले ठरेल.. थोडक्यात Resham has nothing (left) to lose if she is eliminated but Megha has everything to lo lose. Obviously Megha's high insecurities and anxities are therefore understandable.
[खरे तर निव्वळ या एका मुद्द्यावर रेशम ऑल आऊट गेम खेळू शकते दर वेळी.. आणि कायम इन्सिक्युरिटी मध्ये असणार्या खास स्पर्धकांच्या नाकी नऊ आणू शकते. but she is not in control of her emotions, let alone manipulating others. ]
दक्ष हे खरे आहे का?https:/
http://marathicineyug.com
http://marathicineyug.com/television/news/5511-aastad-kale-gets-24-hours... >> जाणार का आस्ताद ???
अरेरे आस्ताद नको जायला,
अरेरे आस्ताद नको जायला, सुशांत बोअर करतो यार आणि जुई, पण ती नॉमिनेटेड नाहीये. आस्ताद जरा किंचित सुधारतोय असं वाटतंय.
पहिला सिझन आहे म्हणून कंटाळा
पहिला सिझन आहे म्हणून कंटाळा आला तरी बघेन म्हणा. हिंदी राहुल महाजनपर्यंत बघितले मग ते अति आरडाओरडा आणि भांडणे, बिंद्रा बाई वगैरे, नाहीच बघू शकले.
एकंदरीत रेशमला ठेवायचं असेल
एकंदरीत रेशमला ठेवायचं असेल bb ला तर नॉमिनेशन पासून वाचवत राहतील. नाहीतर ऐनवेळी दुसऱ्याचा बळी देतील.
Pages