बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नियमांच्या चौकटीत राहून जिकंण्याकरता किव्वा टिकून राहण्याकरता त्याने काही स्ट्रॅटेजी आखल्या. त्या चुकीच्या ठरल्या एवढच . त्याचा अंदाज चुकला >>>
घरून येतानाच तो हे ठरवून आला असेल की खोटे प्रेमाचे नाटक करायचे तर कदाचित बायकोला समजावून , तिची तयारी करवून आला असेल. त्यामुळे त्या फ्रंटवर तो निर्धास्त होता. पण प्रेक्षकांच्या अश्या प्रतिक्रिया येतील असे वाटले नसेल त्यामुळे गडबड झाली.

आज नोमिनेशन ग्रामसभा पद्धतीने होणार आहेत, म्हणजे मेजोरिटी ज्यांना नोमिनेट करेल, तो नोमिनेट होणार?
मग तर मेजोरिटी रे टीमकडेच जास्त आहे. मग पुन्हा मे टीमवर नोमिनेशनचे संकट की काय?

माजेश भंगारपुरे, बेशर्म चीपनीस, जुई रडकरी, आकांत शेलार Biggrin
अपेक्षेप्रमाणे राजेश बाहेर गेला...
कालच्या गुलाब-निवडुंग खेळात (!) मेघाने रेशमला निवडुंग देताना एकच मारा लेकीन सॉलीड मारा टाइपचं कारण सांगितलं. जाम आवडलं ते !
सई आजकाल आवडायला लागलीये. राजेश आणि सुशांत ने सई-मेघाचं बोलणं कानाला त्रास देतं. सई बोलताना सुशांत ने कान बंद करुन बसणं वगैरे फारच खटकलं. जुई या बाबतीत वेगळी नाही, तरी तिच्याबाबतीत मात्र सोयीस्कररित्या पास!

कंमेंट्स च्या 2 ते 3 लाईन वाचून कळत आहे कोणत्या कंमेंट्स सुजा आयडी च्या आहेत.☺️
किती ते कौतुक र रे ग्रुप च आणि किती पटवण्याचा प्रयत्न की मेघा गृप कसा चुकीचा आहे.. लगे रहो ..

राजेश मनातून उतरायची अनेक कारणं आहेत, रे रा हे त्यातलं फक्त एक आहे. मी bb फेसबुकवर पण लिहिलंय बरंच काही, तो कदाचित वाचेल.

एक रे रा चं नाही, दादागिरी, माज एकंदरीत. झोपडपट्टी mentality बोलूनही, मी बोललोच नाही. कायम गुर्मीत वावर, ही सर्वच कारणे आहेत तो मनातून उतरण्याची.

पर्सनल आयुष्याशी लोकांचं काही देणं घेणं नाही त्यांना अधिकार नाही बोलायचा हे कितीही खरं असलं तरी हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी योग्य नाही. प्रोफेशनल आयुष्यासाठी कलाकारांना प्रेक्षकांची गरज असते पदोपदी हे त्यांनी विसरू नये. त्यांचं काम कोणी बघितलं नाही, कोणी दाद दिली नाही तर success मिळणार नाही हेही खरंच.

Channel पण खूप जबाबदार आहे, अगदी उलटलं सर्व तेव्हा जागे झाले. ह्यातलं बरचसं चॅनेल स्वतः टाळू शकलं असतं, थांबवू शकलं असतं. आधी trp मिळतो का असल्याचा बघायचा प्रयत्न केला.

बाकी आता चॅनेल रेशमला नॉमिनेशन पासून वाचवण्याची शक्यता जास्त आहे.

जुई रडकरी हे मामीने म्हटलेलं खरंच अगदी अगदी, सारखी तक्रार आणि मेघा बडबडी आहे अति हे बरोबर पण हीसुद्धा कित्ती बोलते, अतिच.

त्या पुष्करकडून सर्व जेन्ट्सनी कसं वागावं शिकून घ्यावं. अतिशय आवडतो तो. स्मिता आवडते अजूनही, ती चुकत असली तरी. तिने काही गोष्टी सुधाराव्या निदान आतातरी.

रे रा कम्पू ला सपोर्ट करणारे लोक आहेत हे बघूनच आश्चर्य वाटले. असेल कदाचित रे रा चे चाहते असतील.
कालच्या एपिसोड मधे पण सगळ्या जास्त राग सुशांत चा आला. काय ते सारखे सारखे सई आणि मेघाच्या आवाजावरून त्यांना हिणवत होता. तो आउंना देखिल सतत हिणवत असतो. तो इतका शेफारलेला मुजोर आहे , सारखे स्वतःला सीनियर म्हणत असतो जसे काय अमिताभ बच्चन च्याच लेवल चा आहे की नाही. रडतो काय ओरडतो काय , पक्का शिवसेनेचा नाक्यावरचा गुंड शोभतो. व्यक्तिमत्व राजकीय गुंडाचेच आहे. हा आणि जुई गेलेच पाहिजेत लवकर.
पुढच्या एपिसोडची क्लिप बघून वाटले की हर्षदाताई लेडी राजेश व्ह्यायच्या प्रयत्नात दिसतायेत.

तुम्हाला कोणी दिला त्यांचा असा अपमान करण्याचा अधिकार ? >>>> तुम्हाला काही प्रॉब्लेम? >>अर्थातच नाही . पण हा अधिकार तुम्हाला पण नाही हेही तितकच खर
किती ते कौतुक र रे ग्रुप च आणि किती पटवण्याचा प्रयत्न की मेघा गृप कसा चुकीचा आहे.. लगे रहो . >> प्रत्येक जण आपल्याला जे वाटत ते मत व्यक्त करत असत. तुम्ही पण तुमच मत व्यक्त करत आहातच कि. लगे राहो

पुढच्या एपिसोडची क्लिप बघून वाटले की हर्षदाताई लेडी राजेश व्ह्यायच्या प्रयत्नात दिसतायेत.

>> जाईल बाहेर.. खूप व्हरकॉन्फिडेंट आहे ती बया.

त्या रडक्या सुशांतला शेलारमामा का म्हणतात!

कालही मॅच पाहत असता ब्रेक मध्ये मध्येच डोकावलो तिथे तर ते बुचडेवाल्या मांजरेकरांनी त्याला शेलारमामा म्हणून संबोधले! किती घोर अपमान त्या शेलारमामा संबोधनाचा!

गडाचे दोर कापून सैनिकांना लढण्यासाठी प्रवृत्त करणारे शेलारमामा कुठे आणि हा मिळमिळीत मुळुमुळु कुठे!
कृपया त्या सुशांतला शेलारमामा म्हणून संबोधू नका!

मी कोणत्याही ग्रुप ला सपोर्ट करत नाहिये मी हा प्रोग्राम entertainment म्हणून बघतेय पण सईने रेरा वर सर्वात जास्त प्रमाणात आरोप केले ते पटले नाही.
ती तरी कुठे धुतली तांदूळ ​आहे पुष्कीने माघार घेतली म्हणून तिची डाळ शिजली नाही.
मेघा वगैरे बाकी जण बोलले ते पटले. पण सईने सुरवातीला सेम मेथड युझ केली होती मग तिचं इतकं टाकून बोलायचं कामच नव्हतं
National television and all that ती जेव्हा पुष्की बरोबर होती तेंव्हा कुठे होते हे विचार

थत्ते म्हणतात की रे रा फक्त ग्रूप नसून गँग आहे . ते गँग वॉर खेळतायेत. ते सतत दादागिरी , तोडण्या फोडण्याची भाषा करतात. सई , मेघा रुतुजा वर दादागिरी, त्यांची मुस्कटदाबी करण्याचे सर्व प्रयत्न ही गँग सुरवातीपासून करते आहे.
हे खरे असेल तर सई , मेघा रुतुजा चे मला अजुनच खूप कौतूक वाटायला लागले आहे. सगळ्या बलवान सांडांना पुरून उरल्या आहेत तिघी!!!

चॅनेल ला काय सिरियलच चालवायची आहे..जास्त अंगावर येउ लागल प्रकरणं तेव्हा काढता पाय घेतला त्यानी..
राजेशची इमेज खराब होण्यात चॅनेल जबाबदार नाही होउ शकतं..
पुर्ण कल्पना आहेच ना त्याना की आपण जे करतो ते सगळ्याना दिसणार आहे.. अगदी कुज्बुजलं तरी ऐकायला
जाणार आहे..
रे रा टिमच बेकार आहे.. सो कॉल्ड सिनिअर पण खरतर लुजर्स.. त्यामानाने मेसै टिम फ्रेश
सई ने कुठल्या चित्रपटात काम केले .. किती फालतु केले त्याचा इथे काहिच संबंध नाही खरतर.. कारण
इथे तुम्ही एक व्यक्ती म्हणुन जजं होता आहात..
रारे टिमच्या चित्रपटातिल कमाबद्दल बोलल जातं कारण ते स्वतःला सिनिअर समज्तात.. किंवा फेमस.. मोठे समजतात..
तिच्या आईने चित्रपट प्रोड्युस केला असेल मग काय झालं .. सगळे आई बाबा करतातच आपल्या मुलांसाठी..
पुश्कर सई स्मिता रुतुजा यापैकी कोणीही जिंकावे..
बसं वाईल्ड कार्ड कोणी आले तर लिस्ट कॅन चेन्ज

या वेळचे विकांताचे दोन्ही एपिसोड्स फुल टि आर पीत गेले असणार.
* सोशल मिडियावरचा राजेश रेशम बद्दलचा प्रक्षोभ बघून चॅनल ने स्टँड घेऊन ममां ना असे बोलायला भाग पाडले असेल. शेवटी स्वतःची कातडी वाचवायचा प्रयत्न सगळेच करतात. दोन्ही दिवस ममांनी विषय ताजा ठेवल्याने सर्वांनी त्या दोघांवर तोंड सुख घेतले चांगलेच.
* मला त्यांना पाहून मेल्याहून मेल्यासारखं झालं. किती अपमानित ना Sad
* मेघा अती बोलते आणि तिचं ते बोलणं थोडं सुपरलेटिव्ह असतं त्यामुळे डोकं फिरतं, पण एकूण पाहता ती, सई आणि पुष्कर अत्यंत गुणी खेळाडू आहेत बिगबॉस चे. तसे वयाने लहान असले तरीही या सो कॉल्ड सिनियर्स पेक्षा कितीतरी प्रगल्भ वागतायत.
* जेव्हा रेशम मी फायनल जिंकायचा कॉन्फिडन्स घरून घेऊन आलेय असं म्हणाली एक तर तो ओव्हर कॉन्फिडन्स वाटला, आणि तेव्हा सई आणि मेघा खुदुखुदु हसल्या (कुत्सित) आणि मला ते पटलं जाम. मी पण हासले असते नक्कीच. आपल्यात कितिही आत्मविश्वास (फाजिल) असला तरिही तो नॅशनल टिव्हिवर असा उघडपणे बोलून दाखवून जनतेच्या हातात कोलित का द्यायचं? Uhoh उदया हारली तर प्रेक्षक तिला सळो की पळो करून सोडतील. आणि त्यात काहीही गैर नाही. सिनियर्स एकूण सगळे तसेच वागतायत. (उना सोडून) रेशम आणि हखा दोघी पण सतत ७ व्या आसमानात.
* हखा ची बॉडी लँग्वेज कायम आपण कुणितरी लय भारी आहोत आणि कुठे या कचर्‍यात येऊन पडलो आहोत अशी असते. शिवाय आतापर्यंत २ ते ३ वेळा ती रेशमला म्हणाली आपल्याला फायनल ला उभं रहायचं आहे Uhoh दोघी जायला पाहिजेत घरातून मग क्ळेल.
* जुई ममांना फारच टोकते बोलताना काल अचानक बोलताना मध्येच तिने 'पच्च' केले ते मला इतकं खटकलं की बास. मी उठून एक ठेवून दिली असती तिला थोतरीत.
समहाऊ रेशमला माहित होते राजेश जाईल असे, शेवटी शेवटी तिचा चेहरा फारच पडला होता.
राजेश ला घरातून बाहेर काढून चॅनल ने प्रेक्षकांचा जो रोष होता त्यावर थोडे पाणी टाकले आहे. तसे केले नसते तर चॅनल चे काही खरे नव्हते, कारण लोक खरंच पेटले होते.
अज्ञातवासातून बाहेर आल्यावर तर राजेश बहकल्यासारखाच वागत होता.
घरी गेल्यावर काय झालं असेल नक्की (त्याच्या)? Uhoh

मलाहि हाच प्रश्न पडला होता.. कसं स्वागत झालं असेल त्याच घरी.. असो.
रे तर नेहमी म्हणते मला लोकांच काहि पडलं नाहि.. मग लोकांना तरी तिचं काहि का पडाव? लोकं नसतील तर कुठे असतील हि?
जुई ची कारणं नेहमी स्वत: ती जशी आहे तशीच देते .

आरती, थत्ते यांचे बाहेर आल्यावरचे इंटर्व्यु लगेच आले होते. अजुन राजेश चा नाही आला का ? Wink
ममां नी काल-परवा २ दिवस सोशल मिडीया वर वाचलेलं सगळं बोलुन दाखवलं...
राजेश ला घालवलय पण हखा ला उगिच आनलय...रेशम तिची मैत्रिण आहेच...आस्ताद न जुई पण तिच्या बाजुने आहेतच, सुशांत पण तिचा चांगला मित्र आहे. भुषण काय असतोच रे ताई च्या मागे...एक स्मिता आता काय करते बघायचं...आउ शी तिने पॅचअप केलय फुल देउन...म्हणजे परत सेम ग्रुप फक्त त्यांचा म्होरक्या बदलला असं होणार..हखा त्या सगळ्याना लीड करेल असं वाटतय...
आज पण नॉमिनेशन मद्धे पंचायत म्हणजे बहुमताने निर्णय आहे....

रेशम वि. मेधा
सुशांत वि. पुष्कर
स्मिता वि. सई
जुई वि. आउ
आस्ताद वि. कडु
हखा वि. रुतुजा
असे आहेत.

म्हणजे भुषण सोडुन सगळे मेधा सई टीम चे लोक नॉमिनेट होणार की काय..कारण बहुमत कायम रे-हखा च्याच ग्रुप चे मत..त्यांची संख्या जास्त आहे.

घरी गेल्यावर काय झालं असेल नक्की (त्याच्या)?>>>>
काही झाले नसेल! ह्या लोकांना अश्या सगळ्याची सवय असावी.. आपण नेहमीच्या आपल्या सामान्यांच्या चष्म्यातून विचार करतो!

जुईला रे-रा चं जे काही चाललं होतं ते आवडत नव्हतं तर ते तिनी त्यांना न सांगता हखाला सांगित्लं, ह्याचं स्प्ष्टीकरण सईने जे दिलं ते खरच होतं,की त्यांच्या टिममधे असल्यामुळे तिला डाय्रेक्ट त्यांना हे सांगुन पंगा घ्यायचा नव्हता.

हे ऐकताना र्रे-रा-जुईला किती हसू येत होतं.पण खरच जुई त्यांना सांगायला गेली असती तर त्या दोघांनी तिला उडवुनच लावलं असतं,तू काल ईंडस्ट्रीत आलेली मुलगी,तू आम्हाला नैतीक-अनैतीकतेच्या गोष्टी काय शिकवते म्हणून.
ते जिथे ममांना उडवून लावत होते तिथे ह्या ज्युनियरच काय ऐकणार होते? जुईने पण हे ओळखलं होतच. म्हणून तर गेली नाही त्यांना काही सांगाय्ला.

रे तर नेहमी म्हणते मला लोकांच काहि पडलं नाहि.... इतका ओवरकाँफिडन्स की बाहेर असं काही बोलणार्या लोकांशी माझी मुलं संबध तोडून टाकतील म्हणतिये... (पण मी हे माझं महान कार्य चालुच ठेवणार!)

ममांनी विषय काढल्यावर काल सगळ्यांनीच हात धुवुन घेतले.. Lol

रे तर नेहमी म्हणते मला लोकांच काहि पडलं नाहि.... इतका ओवरकाँफिडन्स की बाहेर असं काही बोलणार्या लोकांशी माझी मुलं संबध तोडून टाकतील म्हणतिये... (पण मी हे माझं महान कार्य चालुच ठेवणार!) >> हो ना. पण काय करणार. एकदा बोलून फसली होती, स्वतःचे शब्द फिरवले असते तर लोक हसले असते. म्हणून शेवट पर्यंत मांजराच्या तावडीत सापडलेला उंदीर सुटकेसाठी धडपड करतो तसं तीने केलं.
बाकी राजेश ममां शेजारी उभा असताना सपशेल आडवा (पराजित) वाटला मला.

नोमिनेशन मध्ये एकतरी रे च्य टीमचा मेंबर असायला हवा. सगळेच मे च्या टीममधले नोमिनेट झाले, तर एक मग मे ची टीम अजुन विक होईल.
त्या ह.खा. उगाचच आणलेय. तिच्यापेक्षा तरुण मुलगा/मुलगी चालली असते.
आत आली आणि सिनियर लोकांच्या मांदियाळीत जाऊन बसली. Sad

>>>एकुणच निगेटिव्ह.. अ‍ॅरोगंट आहे तो..>>आनंदी तुमची
ही सगळी पोस्ट पटली.... अंजु आणि दक्षिणा... ++++
सहमत; मम सगळ्या पोस्ट साठी....

शेवटी राजेश एलिमीनेट झालच!
ये तो होना ही था.. after every other person and the channel going for his neck..!
But the way he accepted the huge criticism; personal comments; harsh words by Mama, and his exit with dignity, sober and restrained attitude was simply commendable. I liked the way he again motivated Resham for Big Boss victory. I really liked him and will continue to like him.
I believe that Rajesh was perhaps the toughest competitor (in all senses) in that house. With bit more smart strategy he could have easily ruled the space and the season. But he made the mistake of crossing the 'line' by sharing the bed with Resham and rest is history.
ममां साठी: ९०% शब्द, कॉमेंट्स वगैरे ईथूनच ऊचलायचे असतील तर ईथल्या हुषार लोकांना ऑफिशियली स्क्रिप्ट राईटर म्हणून तरी घ्या.. कमी पैशात एक्दम बेष्ट माल देतील. Wink

पण एक गोष्ट लक्षात आली... रेशमी कधीच चूक मान्य करत नाही... उलट तिच्या चुकांच समर्थन करते... माफी मागणे कमीपणाचे वाटते तिला.. ऋला sorry म्हणताना किती तुच्छतेने म्हणाली ती... यातून तिच्या मनाचा कोतेपणा दिसतो.. फक्त राजेश प्रकरणामुळेच नाही तर एक व्यक्ती म्हणून ही रे मला अजिबात आवडली नाही.. याउलट मे च्या गटातले सगळेच खिलाडूवृत्तीने खेळतात.... चूक झाली तर कॅमेरा समोर पण सॉरी बोलतात... त्यामुळे ते लोक आवडून जातात... लहान असून मनं मोठी आहेत त्यांची...

राजेश आवडणाऱ्यांची मला गंम्मत वाटते
फक्त आरडाओरडा, माज आणि शक्तीप्रदर्शन याच्या जीवावर कोणी toughest competitor कसे होवु शकते?
एकाही टास्कमध्ये किंवा इतरही त्याने काही युक्तीने वगैरे केलेले मला फारसे आठवत नाही.... त्याचे people skills ही फार काही भारी नव्हते.... ही बाकी मंडळी साइडहिरो कॅटेगरीतली असल्याने तो हिरो बनला!
बाकी ते क्वीझमधल्या प्रश्नांची उत्तरे दिली म्हणून तो कुणाला हुशार वगैरे वाटत असेल तर अवघड आहे (इथेच कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे ते इयत्ता चौथी लेव्हलचे प्रश्न होते)

चूक झाली तर कॅमेरा समोर पण सॉरी बोलतात... त्यामुळे ते लोक आवडून जातात... लहान असून मनं मोठी आहेत त्यांची...>>>> +१११
पंचिग बॅग टास्क मधे सई श्वास न घेता धडाधड बोलली आनि नंतर परत सॉरी पण म्हणाली.

पंचिग बॅग टास्क मधे सई श्वास न घेता धडाधड बोलली आनि नंतर परत सॉरी पण म्हणाली.>>>हो अणि काल पण राजेश म्हणाला की सई फार लाऊड and irritating tone मध्ये बोलते तेव्हाही ती गप्प बसली... अन नंतर कॅमेरा समोर जाऊन तिने चूक मान्य केली अन बदलण्याचा प्रयत्न करेल अस म्हणाली... हे कदाचित आज दाखवतीलच किंवा voot वर अन सीन अन देखा मध्ये बघा... रेशमी मात्र मोठया चुका करून सुद्धा dominate करायला बघते....ती नको वाटतेय या show मध्ये

>>बुचडेवाल्या मांजरेकरांनी त्याला शेलारमामा म्हणून संबोधले!<<

काल त्या नॉमिनेशनच्या पिंजर्‍यात आणि शेवटी-शेवटी त्याने घेतलेला पवित्रा तुम्ही मिस केल का? माझ्या घरच्यांना निरोप द्या कि मी २२ जुलैपर्यंत घरी येत नाहि - हा आवेश (शिवाय आडनांवहि शेलार) जवळ-जवळ गडाचे दोर कापण्या सारखाच होता... Proud

विकेंडच्या वारमधे रेशमने काँफिडंटली केलेलं जस्टिफिकेशन "मी नाहि त्यातली, कडी लावा आतली" कॅटगोरीतलं होतं... Happy

Pages