बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच बोलले मामां त्यांना, लिबिडो काय अन अजुन काय Uhoh

बनावट असेल तर आता त्यांना ते सावरायची संधी तरी द्यायला हवी. लगेच असे राजेशला बाहेर काढले तर लोकांच्या मनात त्याची तशीच इमेज राहील.

राजेशला संधी दिली की परत पण सांगितलं नाही की काय टीका होते, नाहीतर आधीच्या लोकांना काढलं की, सिक्रेट रूम मध्ये कुठे ठेवलं.

काय माहिती bb ने च परत प्रेम नाटक करायला सांगितलं का याने केलं. राजेश जास्त बिथरलाचं. प्रेम वगैरेचं नाही एकंदरीत, जास्त जोशात आला. फेकाफेकी (थापा या अर्थी) करायला लागला. लहान खोलीत एकटा राहिलेला मान्य, कठीण असेलचं पण जेवण खाण नीट देत होते, सेपरेट बाथरूम वगैरे सोय होती.

तो राजेश काल बोलत होता मी सगळ्यांना मिठ्या मारतो पप्या घेतो, मग तो रड्या सुशांत, आस्ताद, भूषण यांना पण चादरीत घेऊन झोप ना, वर बोलला एका चादरीत झोपून पण काही करत नाही याचा अभिमान आहे, बाहेर गेलाय आज तो, पुढ्च्या आठवड्यात रेशम.

राजेश बाहेर गेला असा म्हणत आहेत, पण आता वीकेंड्ला शाळा कोणाची घेणार मांजरेकर...दर वेळेस काहीतरी खेळ खेळावे लागतील अशाने.

काय माहिती bb ने च परत प्रेम नाटक करायला सांगितलं का याने केलं.>> बहुधा हे बीबी ने सन्गितल नसाव नाहितर एवढी शाळा ममा नी घेतल्यावर राजेश-रेशमने एकुन नसत घेतल. हे सगळ नाटक अ‍ॅटेशन मिळाव्,टिकुन राहाव यासाठीच दोघानी सुरु केल असाव त्यातही पुढाकार राजेशचाच वाटत होता पण राजेश मॅरिड असल्याने ते लोकाना जास्तच आक्षेपार्ह वाटल असाव. रेशमला बोलताना बघुन हर्शदाला जेन्युइन वाइट वाटत होत...
खरतर हर्शदाच्या झापाझापीनतर रेशम स्थिर होती पण हलला होता राजेशच... रेशम खरच पण हु केअर्स अ‍ॅटीट्युड ने वावरते पण राजेशने हे पब्लिसिटी मिळाव म्हणूनच केल असाव.ममानी अगदी स्प्ष्ट शब्दात कान-उघाडणी केली अ‍ॅप्रोच पण आव्डला फक्त टोन फार अ‍ॅग्र्सिव्ह वाटला.
हिन्दी बीबॉसवर चालणारी प्रकरण अनमॅरिड कपल मधे असतात हा फरक आहे. आणी अशी प्रकरण करणारे अजुन एकही विनर झालेले नाही एक्सेप्ट गौतम गुलाटी त्याने नाटक केले होते पण तेही एका बेड मधे झोपण्याइतके नव्हते नक्किच ..
रेशम मला आज कधि नव्हे ते आवडली, तिचे विचार जगाच्या दुष्टिने चुकिचे असले तरी ते माण्डण्याचे धाडस तिच्यात आहे, ती मान्जरेकर झापत असताना एक-दोन्दा राजेशला म्हटली तु स्प्श्ट बोल पण राजेश आपला गुळमुळीत धोरण धरुन होता.

रेशम राजेश कितीही आमचं बॉंडिंग आमचं बॉंडिंग म्हणत असले तरी त्यांचं इमोशनल बॉंडिंग कधीच दिसून येत नाही.. सई म्हणाली तसं ते कायम एकमेकांना चिकटलेलेच असतात.. राजेश अति करतो या बाबतीत..
खरंच प्रेम/emotional attachment असती त्यांच्यात तर कदाचित त्यांचं प्रेम आक्षेपार्ह वाटलं नसतं.

हिंदीतला बिग बॉसचा एकही सीझन पाहिलेला नाही. अरमान कोहली आणि तनीशा मुखर्जी ह्यांच्या बि बॉ घरातील अफेअरबद्दल उडत उडत पेपरात वाचल्याचे स्मरते तेवढेच.त्याबद्दल जनमत काय होते हेही माहीत नाही. मराठीतलं बि बॉ स्क्रिप्टेड आहे की नाही, असेल तर किती प्रमाणात हे आपल्याला नेमके कळणे अशक्यच आहे त्यामुळे चॅनलने रे रा ला ही स्ट्रॅटेजी सांगितली की आपल्याला दिसली तशी कॅमेर्‍यासमोर त्यांनी ती ठरवली हेही कळणे अशक्य. पण चित्र दिसले ते साधारण असे :
रे रा ने कॅमेर्‍यासमोर आपण खोटं खोटं प्रेमप्रकरण करु, लोकांना ते आवडतं असं म्हटलं ( सुरुवातीलाच ही भलीमोठी घोडचूक झाली. असं सांगून स्वतःला सेफ ठेवता येईल असा विचार कदाचित त्यामागे असावा पण लोकांना मूर्खात काढण्याचं ब्लंडर झालं त्यातून ! )
नंतरच्या दिवसांमध्ये आग बराबर लगी हुई थी पण तरी मागे फिरायला स्कोप होता जो त्यांनी त्यावेळी गमावला.
मग राजेशला सि रु मध्ये पाठवताना रेशमने जी काही रडारड केली ती खोटी वाटली तरी नाही, खरंच त्याच्यावर फार विसंबायला लागली आहे असे वाटत होते.
राजेश नसतानाच्या काळात घरातले वातावरण बरे झाले.
राजेशला सि रु मध्ये पाठवल्यावर त्याला चॅनलने बाहेरच्या प्रक्षोभाबद्दल काही सांगितले का ते माहीत नाही पण परत आल्यावर राजेश जास्तच चेकाळला.
ह्यावेळी रेशम थोडी संभ्रमात दिसली की चाललेय ते कंटिन्यू करायचे की नाही पण त्याच्या सो कॉल्ड आवेगाला तिने फारसा विरोध केला नाही. फक्त एकदाच जेव्हा राजेश रात्री तुझा हळूच स्पर्श झाला आणि मग.... वगैरे बोलायला लागला तेव्हा तिने त्याला साफ उडवून लावले. ते केले नसते तर बहुतेक दोघांना त्याच दिवशी घराबाहेर पडावे लागले असते Proud

चॅनलने किंवा रे रा ने, ज्यांनी कुणी हे ठरवले, त्यांनी नीट विचारच केला नाही की नक्की कशा प्रकारे हे दाखवायला हवे. रिअ‍ॅलिटी शो आहे तर सहवासाने एकमेकांच्या प्रेमात पडत गेले असे तरी भासायला हवे नाहीतर कुणाच्या तरी प्रेमात पडून दाखवा असे ऑफिशियली टास्क म्हणून बि बॉ ने सांगायला हवे पण हे सगळे काहीतरी विचित्रच झाले. बरे, स्ट्रॅटेजी म्हणून करताय तर मग राजेश नंतर जे काही बरळत होता ते पाहता खरंच बायकोला ह्युमिलिएट करणेच झाले कारण शेवटी तो राजेश म्हणून बोलत होता, फिक्शनल कॅरॅक्टर म्हणून नाही.

असे प्रेमप्रकरण घडणे नैतिक आहे की नाही हा मुद्दाच नाही इथे पण ते ज्या प्रकारे घडले ( किंवा घडवले ) त्याचे प्रिमाईस सॉलिड गंडले. वि बा सं असो नाहीतर नैतिकतेच्या चौकटीतले प्रेम, त्या त्या वेळी त्या भावनेशी प्रामाणिक असणे अपेक्षित आहे जे इथे दिसले नाही. त्यामुळे संस्कृतीरक्षकांनी तर चिखलफेक केलीच पण पुरोगामी विचारसरणी असलेल्यांनीही ह्यांना पाठिंबा दिलेला दिसत नाही.

स्क्रिप्टेड असो वा नसो, पुढच्यास ठेच, मागचा शहाणा... चॅनल आणि नंतर येणार्‍या स्पर्धकांना आपापल्या स्ट्रॅटेजीज ठरवायला खूपच मदत केली रे रा ने Happy

असे प्रेमप्रकरण घडणे नैतिक आहे की नाही हा मुद्दाच नाही इथे पण ते ज्या प्रकारे घडले ( किंवा घडवले ) त्याचे प्रिमाईस सॉलिड गंडले. वि बा सं असो नाहीतर नैतिकतेच्या चौकटीतले प्रेम, त्या त्या वेळी त्या भावनेशी प्रामाणिक असणे अपेक्षित आहे जे इथे दिसले नाही. त्यामुळे संस्कृतीरक्षकांनी तर चिखलफेक केलीच पण पुरोगामी विचारसरणी असलेल्यांनीही ह्यांना पाठिंबा दिलेला दिसत नाही.>>>>>
+१००

सोशल मीडियावर शिव्या घालणं हे एकाच टीम पुरत मर्यादित आहे . २००% शिव्या रे-रा च्या ग्रुप ला पडताहेत . मेघा ची टीम हिंदुस्थान आणि रे-रा ची टीम पाकिस्थान अशी परिस्तिथी आहे . फक्त १-२ % कॉमेंट्स फक्त रे-रा च्या बाजूने आहेत तेव्हा बिग बॉसने गेम बंद करून टाकावा . बेसिकली सगळ्यांनी मिळून मिसळून खेळायला पाहिजे आणि स्वतःपुरत खेळायला पाहिजे . पण दोन टीम्स पडल्याने सगळी गणितचं बदलली आहेत . सगळे जण गेम खेळताहेत पण सोशल मीडियावर तर नुसत्या त्यांच्या गेम खेळण्यावर कॉमेंट्स न होता एखाद्या माणसाला पकडून पकडून त्या माणसावर पर्सनल हिडीस कॉमेंट्स होत आहेत . जे अतिशय चुकीचं आहे . तेव्हा वाटायला लागलय बंद करावा गेम . नाहीतर पुढच्या सिझन जर त्यांना काढायचा असेल तर कोणी स्पर्धकच मिळणार नाहीत .

टोटल गंडलेत मांजरेकर. मोराल पुलिसिंग तर करायचं आहे, पण लिबरल आहोत असं दाखवायचं पण आहे. सोशल मीडिया यावं आणि त्याव.
हे असं होणार ते दिसतंय तर आधी थांबवता आलं असतं, पण आधी प्रसिद्धीची हाव होती आता सहन होत नाही आणि घराबाहेर काढायचं तर प्रेक्षकांनी मॅन्युप्युलेट केलं असंही नकोय व्हायला. पण संस्कृतीरक्षणाची धुरा ही वाहायची आहे. नाहीतर फॅमिली चॅनेल म्हणून लोकांनी काट मारली तर!
आधी करारपत्र करताना काही स्पायसी दिसलं तर मजा आणि टी आर पी म्हणून काही लिहून नाही घेतलं. कात्रीत सापडलेत, आणि स्मार्ट नाही सो तोंडावर आपटले तर मोराल ला हात घालून सगळी कडून ठोकून ठोकून खुंटा बळकट करतायत.
असो. नॅशनल टीव्ही वर गेले 6 आठवडे दिसतंय. इतके दिवस चालत होतं आता एकदम हखा ला आणून, इतर स्पर्धकांकडून वदवून घेतलं. विनोदी शो झालाय. मनातून उतरले हा एपिसोड बघून ममा.
रेशम चा फॅन झालो मी. एकदम क्लिअर विचार.
नोट: मी माबो सोडून कुठेही bb विषयी वाचत नाही, किंवा प्रतिक्रिया देत नाही. सो जनक्षोभ का गरळ काय असेल मला कल्पना नाही. पातळी सोडून कोणी गरळ ओकली तर ममानी त्याचं उदाहरण शो मध्ये द्यावं? इतकाच प्रॉब्लेम होता तर 24 तासतलं काय दाखवायचं यावर संयम ठेवता आला असता. बी बॉ ला वेळीच अनवूनसमेंट करता आली असती. तेव्हा टी आर पी घेतला आणि आता धमकी ला/ प्रेशरला घाबरून पळ काढला हे अगदीच बुळ धोरण झालं. Happy
बाकी हा शो 10 वर्षाच्या पोरा/री ला पालक का दाखवतील? मी तरी नाही दाखवणार. हा G शो करायचाय का? मग बरंच काय काय चुकलंय. मला तरी एकूण टास्क, हिंसा आणि संवाद ऐकून PG 13/16 वाटतो.

आज रा एलिमिनेट झाल्याचं कळतय फेबू वरून. खखोदेजा.
हिंदी बिग बॉसमधे 'caller of the week' प्रकार होता असं कोणीतरी इथे लिहिलं होतं.
तसं झालं का मराठी बिग बॉसमधे या आठवड्यात का अजुन व्हाय्चय? युट्युब वर त्याची एक झलक पाहिली.

अगोचे analysis आवडले, सुजाचे पण पटले आणि अमितव च्या ९९% पोस्टला मम.. आणि चैताली च्या वाक्याला +1
ह्या लोकांनी माझे मोठ्ठे पोस्ट लिहिण्याचे कष्ट वाचवले Happy

ममांचा स्टँड एकदम भ्याड आणि दुटप्पी.. ते नाही का, इंटेलिजन्स एजन्सीज सिक्रेट मिशनवर पाठवतात मात्र मिशन किंवा एजन्ट expose झाला तर हात वर करतात, तसा, मात्र त्याहून खालच्या दर्जाचा.. कारण त्यांना तशी निदान कल्पना तरी असते, यांना मात्र प्रोत्साहन देऊन नंतर स्वतःवर शेकल्यावर उपदेशाचे डोस पाजले गेले, आणि बॉडी लँग्वेज अजिबात तशी नव्हती! नुसते शब्दांचे फुलोरे.. रेशमचे एक्सप्रेशन्स 'फुल्ल टाईम व्हॉट द हेल' असेच होते. तुला स्वतःला तरी पटतंय का रे ए मांज्या असे Biggrin

सगळाच जोक करून टाकलाय शो चा..

हखा ची भाषा किती घाण आहे.. म्हणे जुईला कोणी काही सांगितले तर ती माझ्यासमोर ओकते!! मात्र बरं झालं ते जुईसाठी.. तिला गरज होती असल्या इन्सल्टची आणि ममां कडून एक्सपोझ केले जाण्याची..

मला आस्तादचे यावरचे मत ऐकायला आवडले असते, पण त्याला संधी दिली गेली नाही.. बहुतेक त्यांना खात्री असावी की तो मित्र/मैत्रिणीची बाजू सांभाळेल आणि त्याला अजून बदनामीत टाकायचे नसावे, आधी झाली तेवढी पुरे! आणि शिवाय रे रा च्या फेव्हर मध्ये एकही मत त्यांना त्यावेळी ऐकायला नको असणार..

थोडक्यात उगवत्या सूर्याला नमस्कार. पब्लिक म्हणेल, तसं आम्ही वागणार, नो इम्युनिटी टू कंटेस्टंटस!! हे बिबॉ धोरण वाटले.. टास्कस मध्ये पण कोणाच्या जीवाची काहीच पडलेली नाहीये बिबॉला. ऋतुजाच्या मनातून बिबॉ पार उतरलेत, असं जाणवलं, तिच्या हावभावातून. तिचं केलेलं कौतुक पण ती विशेष अपरिशिएट करतांना दिसली नाही ह्यावेळी. सगळेच जरा विझलेले दिसले.

सईचे मत मात्र दक्षि ने मागे लिहिलं तसं 'संधी' मिळाली नाही म्हणून 'साधू' असं वाटलं.. Proud (पुष्की आणि तिची हेल्दी फ्लर्टिंग आहे, हे ती म्हणाली.. ते केवळ पुष्करने तिला स्कोप दिला नसल्याने.. या अर्थी)

अगो +१००

बाकी हा शो 10 वर्षाच्या पोरा/री ला पालक का दाख वतील? मी तरी नाही दाखवणार. >>> शो ९:३० ला लागतो.
त्यावेळेला १ ली , २ रीतली पोरे देखिल झोपलेली नसतात. बहुतांश घरात १क्च टीवी असल्यावर मोठ्याबरोबर ही मुलेही हा शो बघणारच. दाखवायचा प्रश्नच येत नाही.

बाकी रे रा टीम वर माझा राग त्यांच्या मुजोर , उर्मट वागण्यामुळे आहे. त्यांचे फालतू चाळे तर फार्च बोर पकाऊ आहेत , पण त्या चाळ्यांमुळे त्यंच्यावर काही राग नाही.
रेशम राजेशच्या फाल्तू चाळ्याना चॅनेल नी नको तितके फूटेज दीले आहे. बिनडोक रेशम / राजेश एक वाक्य बोलून ममा ला गप्प बसवू शकले असते, ते म्हण्जे , ' फॅमिली प्रोग्रम आहे एव्हढे कळतेय तर सगळे अ‍ॅडल्ट शॉट कट का केले नाहीत? पब्लिक ला का दाखवले ? हे काय २४ तासाचे फूटेज दाखवतात का , एडिटींग करतातच ना. '
आधी स्वतःच वेचून वेचून असे प्रसंग दाखवायचे आणि मग ओरडायचे ,याला काय अर्थ

बाकी जुई, सुशांत , भूषण , स्मिता कीती भेकड आहेत ते उघड झाले. सगळे बोलायला लागल्याच्वर एकानेही रेशम राजेश ची बाजू घेउन मत मांडले नाही. आणि यांना जर पटत नव्हते तर आधी बोलायची हिम्मत देखिल कोणी दाखवली नाही. जुई तर अगदीच बेक्कार !! मी लहान पडते , म्हनून बोलले नाही अशी कारणे देत होती.
म्हणुन आपली मोस्ट फेवरेट 'रुतुजा' !! लहान आणि नवखी असली तरीही, कोणतीही भीती ना बाळगता कोणासमोरही तिचे मत ठाम पणे मांडते. आणि त्यामधे रेशम सारखा आगाऊपणा, उर्मटपणा मुजोरी नसते.

मला मेघाच पटल तुम्हाला जे काही करायचे ते तुमच्या घरी करा ही जागा त्यासाठी नाही. आणि हो भरपूर घरात मोठ्यांन सोबत लहानगी पण बघतायत

अगो आणि अमितव च्या पोस्टी पटल्या..
भारतात तरी मुलांनी काय बघावे टिव्हिवर अन काय बघु नये यावर पालकांच इतक नियंत्रण नाही अस मला वाटत..त्यामुळे पोरं खुशाल पाहतात असले शो.. फार कमी पालक स्वतःच्या पाल्याला याबाबत रेग्युलेट करत असतील वा करु शकत असतील..

हिंदी बिग बॉसमधे 'caller of the week' प्रकार होता असं कोणीतरी इथे लिहिलं होतं.
तसं झालं का मराठी बिग बॉसमधे या आठवड्यात का अजुन व्हाय्चय? युट्युब वर त्याची एक झलक पाहिली.>> बापरे..
हिंदी बिग बॉस मधे होता हा प्रकार.. पण काय फिल्टर लावावे लागणार यांना त्याकरता.. लोक इथली फार घाण बरळ ओकत आहे सोशल मिडियावर.. युट्युब, थोपूवरच्या कमेंट्सपन वाचवत नाही..

बाकी रे रा टीम वर माझा राग त्यांच्या मुजोर , उर्मट वागण्यामुळे आहे. त्यांचे फालतू चाळे तर फार्च बोर पकाऊ आहेत , पण त्या चाळ्यांमुळे त्यंच्यावर काही राग नाही.>>+१

रेशम निदान विचारांनी सोर्टेड तरी आहे.. राजेश मात्र ओव्हरकॉन्फिडन्स मधे मेल्यासारखा वाटला.. काय बेक्कार चेहरा झाला होता त्याचा..
आणि लिबिडो वगैरे फारच झाल.. इतक का बोलले ममां? पण अ‍ॅक्चुअल २४ तासांच्या फुटेजमधे असे काही ओव्हर द टॉप चाळे करत असतील का ते म्हणुन त्यांनी हा शब्द वापरला ?
काल ममांच्या बोलण्यामुळे सारेच वाईट धास्तावलेले दिसले..
हे बोलत असताना सई ज्याप्रकारे छद्मी हसली तेव्हा अशक्य भयंकर राग आला मला तिचा..

मला अगोचे मत मटले.
काल एकूण सगळाच दुटप्पीपणा सुरु होता. रे रा चा सुद्धा. मान्य आहे की प्रेमात पडले तर तो त्या दोन प्रौढांमधला प्रश्न आहे. योग्य अयोग्य , विवाहित असतील , त्यांच्या बायको मुलांना पटेल की नाही हा प्रश्न त्यांचा खाजगी आहे. पण त्या दोघांच्या गेल्या ४-५ आठवड्यातील वागण्या बोलण्याचा आणि काल-परवाच्या बोलण्याचा काही संबंधच नव्हता.
आमचे रिलेशन प्लॅटोनिक आहे, नुसती मैत्री आहे, आम्ची मने प्युअर आहेत?? व्हॉट द ** ? मग कशाला ते बेड वर झोपणे अन तुझा स्पर्श झाला की मला अमूक होतो अन तमूक? हे प्युअर प्लॅटोनिक आहे ? प्रेक्षकांना मूर्ख समजणे हीच चूक पुन्हा पुन्हा होत आहे. आणि काल हे दोघे पहिल्यांदाच उमगल्यासारखे "मुलांना काय वाटेल, त्यांना त्रास होईल का समाजात" असली चर्चा करत होते! अगेन व्हॉट द **??
या सगळ्यावरून हा चॅनल चा पेड ड्रामाच असण्याचीच शक्यता जास्त वाटत आहे, कारण नाहीतर सारखे ते आमची मने शुद्ध आहेत माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास आहे या बोलण्याला काही अर्थच नाही . पण मग ममां आणि हर्षदा ने इन्सल्ट करणे हेही स्टेज्ड? इन डॅट केस रेरा बेटर चार्ज देम मोर मनी दॅन द विनर.
चॅनल पुरस्कृत नसेल तर रे रा दोघीही फुल गंडलेले आहेत असे म्हणेन. २४ तास एकत्र राहून जवळीक होऊ शकते, प्रेमात पडू शकणे ही नैसर्गिक आहे, पण मग ते प्युअर मने आहेत , मैत्री आणी रॅपो च आहे वगैरे शुद्ध भंपकपणा. असे म्हणणे असल्यास ते स्वत:ला च फसवत आहेत.

आणि काल हे दोघे पहिल्यांदाच उमगल्यासारखे "मुलांना काय वाटेल, त्यांना त्रास होईल का समाजात" असली चर्चा करत होते! अगेन व्हॉट द **??>> याचा विचारपन फक्त राजेशच करताना दिसतोय अस वाटत्य.. आत्ता पर्यंत काही कस वाटल नाही..

>>मनातून उतरले हा एपिसोड बघून ममा.<<

नाहितर काय? फिल्म इंडस्ट्रीचा स्वतः एक भाग असुनहि, जिथे वावरणार्‍यांचे विचार्/वागणं सगळं कसं सॉर्टेड असतं त्यांनी असा कोता विचार करावा? दोन अडल्ट प्रेमींच्या भावना लक्षात न घेता, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर एक्दम घाला घालावा? मांजरेकर तुमचा तीव्र निषेध! अरे, कुठल्या विश्वात राहाता तुम्ही? प्लटॉनिक लवचा साधा अर्थ तुम्हाला माहित नाहि? रा-रेंच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांना "मौका और दस्तुर" असुनहि त्यांचं पाउल एकदाहि वाकडं पडलं नाहि - यापेक्षा चांगलं प्लटॉनिक लवचं उदाहरण कुठे सापडेल? दोन प्रेमींच्या संबंधात असलेली ट्रांस्परंसी एप्रीशियेट करण्या ऐवजी त्या नाजुक संबंधाला बोल लावता? तेहि नॅशनल टिवीवर, आमच्या मुलांबाळांसमोर? कसला घाणेरडा पायंडा पाडताय याची क्ल्पना आहे का तुम्हाला? संस्कृतीरक्षक कुठले?..

(इथले काहि प्रतिसाद वाचल्यावर आणि कालचा एपिसोड बघितल्यावर रा-रे यांच्या विचारांची खोली (डेप्थ, रुम नाहि उगाच गैरसमज नको) आणि सुस्पष्ट्ता बघुन माझंहि मत बदललं आहे... Proud )

अगो छान पोस्ट.

अमितव, सानी, टीना यांनीपण चांगले मुद्दे लिहिलेत.

कालचा (शनीवारचा) बि बॉ च्या एपिसोड चा सारांशः
ये कहां आ गये हम..! (सगळ्यांसाठीच)
आज( रविवारच्या) भागा नंतर जर राजाबाबू एलिमिनेट होणर असेल तर पुढील दिवसात 'मै और मेरी तनहाई..' (राजेश साठी)
बाकी, एकूणात सर्वच प्रकरणावर लिहीण्या बोलण्या सारखे आणखिन विशेष काही शिल्लक नाही. असे सर्व 'सिलसिले' आपल्याकडे सर्व प्रेक्षकांनी त्या त्या वेळी सडकून नाकारलेले आहेत, तेव्हा जे घडले त्यात नवल काहीच नाही. स्त्री ही पुरूषापेक्षा नेहेमीच अधिक कणखर व मॅचुअर असते अशी आपल्याकडे समजूत आहे- रेशम ने ते पुन्हा अधोरेखित केले. सलाम!

अवांतरः
मानबा ही अख्खी मालिका गेले काही महिने 'वल्गर' च्या पल्याड गेलेली आहे. ती रात्री ८ वाजता (?) दाखवतात.. त्याचे काही भाग बघितल्यावर लहान मुले जास्ती अधिक प्रश्ण विचारत असतील अशी एक आशा आहे! कारण त्यांची मूल्ये वा प्रश्ण हे कंटेंट शी निगडीत असतात. तो रियालिटी शो आहे का सिरीयल का चित्रपट याने त्यांच्या प्रश्णात फरक पडत नाही. पण नितीमूल्ये व त्याच्या फूट्पट्ट्या या सोयीनुसार वापरणार्‍या बर्‍याच सुजाण लोकांचा कल मात्र- कंटेट 'कुठल्या' लेबल खाली दाखवतात यावरून बदलताना दिसतो.
असो.
****************************************************************************
'एक बेड शेयर करणे' ही लक्षमण रेषा आपल्या मात्र आपल्या जागी कायम आहे.
***************************************************************************

स्मिता स्वतः विचार करत नाही, रे रा चं पटलं नाही तरी म मां विचारतात तेव्हा बोलू शकत नाही. पटत नाहीये काही गोष्टी तर वेळेला पुष्करला मदत करायला पण जात नाही.

अशामुळे एक उत्तम खेळाडू आणि स्वभावाने तशी चांगली असून ती वाया जातेय, हे पर्सनल मत कारण पुष्कर नंतर स्मिता आवडते मला.

सिरीयल आणि रियालिटी शो मध्ये फरक असतो, तिथे charactors असतात, अर्थात तिथलंही न पटण्यासारखं आहे पण रियालिटी शो मध्ये खरीखुरी माणसं आहेत.

सुशांतला आता जाणीव झाली की मला शिक्षा झाली हे मुलीला कोण काय बोलेल, कसं वाटेल तेव्हा परमपूज्य राजेश ला जाणीव झाली मुलींना काय वाटेल, कोण काय बोलेल. रेशम ने तेव्हा मस्त उत्तर दिले.

रेशम कम आउट व्हेरी क्लिन ऑन हर ओपिनियन , मला ती अ‍ॅज अ प्लेअर ,अ‍ॅक्टर आवडत नाही पण कदाचित राजेश नसता तर तिचा खेळ सुरवातिपासुन फार उत्तम झाला असता ती स्मार्ट आणी अनुभवी आहे त्याचा सै,पुश्कर सारख्या नवख्या लोकाना मॅनिप्युलेट करण्यत झाला असता...जे तिने देवदास मोड मधे अस्ताना करण्याचा प्रयत्न केलाही
आणी आता राजेश गेला असेल तर ति आणि हर्षदा मिळुन पारड जडच ठेवतिल, हर्षदा काय कमी पैलवान आहे का ? बोलण्यात ती रेशमच्या दुप्प्ट हुशार वाटली.

Pages