Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे, महागुरु पिळगावकर असतील
बापरे, महागुरु पिळगावकर असतील या कल्पनेनीच हॉरर स्वप्नं पडतील ऑडीयन्सला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
का इतके वाईट बोलता पिळगावकर
का इतके वाईट बोलता पिळगावकर बद्धल. चांगला डायरेक्टर आहे की..मस्त चित्रपट दिलेत.. आयत्या घरात घरोबा बेस्ट आहे
आहे ना सचिन चांगला फिल्म मेकर
आहे ना सचिन चांगला फिल्म मेकर , गायक, अॅक्टरही चांगलाच आहे, आम्ही रिअल लाइफ स्लेफ ऑब्सेस्ड ‘ महागुरु’ डान्स जज रोल बद्दल बोलतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण बिग बॉस फॅन
मी पण बिग बॉस फॅन
मला सलमान खूप आवडतो
मराठी बीबी बघेन काही दिवस, मग ठरवेन कि पुढे बघायचे कि नाही
पण म मा आणि महागुरू सहन नाही होणार असे वाटते
आहे ना सचिन चांगला फिल्म मेकर
आहे ना सचिन चांगला फिल्म मेकर , गायक, अॅक्टरही चांगलाच आहे, आम्ही रिअल लाइफ स्लेफ ऑब्सेस्ड ‘ महागुरु’ डान्स जज रोल बद्दल बोलतोय Happy
>>>>>
तो एक चतुरस्त्र कलाकार आहे हा त्याचा रिअल लाईफ गुणच झाला ना...
आणि डान्स जज म्हणून त्याची जी जजमेंट असायची बारीकसारीक गोष्टींबाबत, त्यातून त्याचे जे नृत्याबद्दल ज्ञान दिसायचे त्याला तोड नव्हती. मला आजवर कुठल्याही रिअलिटी शो मध्ये मग ते नृत्य असो वा डान्स वा कॉमेडी, ईतक्या बारकाव्यांसह सखोल जज करणारी व्यक्ती जज म्हणून दिसली नाही. काही ठिकाणी तर गाणारा दिसतो कसा, नाचतो कसा हे बघायला कोरीओग्राफर जज म्हणून बसवले जातात ज्यांना संगीतातील ओ की ठो कळत नाही.
आणि हो, सचिन सुप्रिया नाच बलिये पहिलाच सीजन विनर सुद्धा होते. त्या वयात तरुणांना मात देत. जिंदादिल एनर्जी.
..
बस्स झाला आता हा विषय.. स्वतंत्र धागाच उत्तम. सचिनवरचा लेख फार दिवसांपासून तसाही उधार आहे. माझ्या प्रोफाईलमधील वैयक्तिक आवडीनिवडीची माहिती पाहिली तरी हे लक्षात येईल.
सचिन डान्स शो चा जज्ज म्हणून
सचिन डान्स शो चा जज्ज म्हणून अती असेल कदाचित पण म्हणून त्याच्यावरून त्याच्या व्यक्ती असण्याला पण तेच मापदंड का वापरतोय आपण?
यु नेव्हर नो तो व्यक्ती म्हणून अतिशय चांगला असू शकतो, कुणाला अनुभव आहे का त्याच्या सोबत राहण्याचा? नसेल तर मग बोलू नये आपण.
बिग बॉस मध्ये भले भले लोक रंग दाखवतात. उषा नाडकर्णी सुद्धा असेल फटकळ पण मनाने पण तितकिच चांगली असेल, शेवटी माणसं ही चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची कॉम्बिनेशन्स असतात. टिव्हिवाले त्याचा फायदा घेऊन त्यांच्यात तमाशा घडवून आपली करमणूक घडवून आणतात (दुर्दैवाने आपण ते पाहतो) आणि टिव्हिवाले मधल्यामध्ये बक्क्ळ पैसे कमवतात.
एका कुटुंबात वाढलेले लोक ही कालांतराने एकमेकांत पटवून घेईनासे होतात कारण मतप्रणाली बदलते इथे तर ७-८ प्रौढ लोक वेगवेगळ्या पद्धतीने वाढवलेले (अपब्रिन्गिन्ग) एकत्र आले तर केयॉस हा ठरलेला आहे.
सगलेच रीयअॅलिटी शो
सगलेच रीयअॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात. नौटंकी .
खरी माणसं, माण्सांचे खरे स्वभाव, खरे रंग वैगेरे काही कळत नसतात ह्यात.
सगळंच ठरवलेलं असतं. तु असं वाग. तु असं बोल. तु अश्या शिव्या दे. तु अशी रड. तु अशी बोल्ड वाग. वैगेरे वैगेरे.
जे पब्लिकला आवडेल ते ते दाखवायच. टीआरपी वाढवायला.
म्हणुनच मला बाळ्बोधपणे बिग बॉस बघणार्यांचं आश्चर्य वाटतं.
दिपाली सईद असेल . तिच्याकडे
दिपाली सईद असेल . तिच्याकडे काम नाही आणि काँट्रॉव्हर्सीही आहेच नुकतच एका मराठी अॅवॉर्ड सेरेमनीच्या वेळेस तिच्यावर कपिल शर्माने हात टाकलेला.
अरे बापरे!..... पिळगांवकरांचे
अरे बापरे!..... पिळगांवकरांचे बरेच फॅन्स दिसतायत इथे!
दक्षिणा, तो असेलही चांगला माणूस पण त्या चांगूलपणाची, मोठेपणाची सतत टिमकी वाजवली की मग सगळ्यावर बोळा फिरतो!
नुसताच डान्स शो नाही तर झीच्या कुठल्याही कार्यक्रमातला त्याचा वावर "मला पहा फुले वाहा' टाईपचा असतो
असो.... इथे त्याला व्यक्तिगतरित्या कोणी वाईट म्हणत नाहीये ..... त्याच्या जिथे तिथे "मी"पणा करण्याच्या सवयीची थट्टा चालली आहे!
बाकी रिॲलिटी शोज खरे वगैरे असतात असा आपला अज्जिबात समज नाहीये पण डेलिसोपपेक्षा इंटरेस्टींग असतात इतके मात्र नक्की!
डेलिसोपपेक्षा इंटरेस्टींग
डेलिसोपपेक्षा इंटरेस्टींग असतात इतके मात्र नक्की!
>>>>
हे व्यक्तीसापेक्ष आहे.
सन्सकृती बालगुडे, जितेन्द्र
सन्सकृती बालगुडे, जितेन्द्र जोशी, सन्तोष जुवेकर (सध्या त्याच्याकडे काम नाहीये.)
पण असे शोज स्क्रिप्ट कसे
पण असे शोज स्क्रिप्ट कसे करणार?
खूपच अवघड् वाटते ते काम.
स्क्रिप्टड नसतात. असते तर
सस्मित - रियालिटी शो असतात स्क्रिप्टड पण बिग बॉस स्क्रिप्टड नसत. असते तर प्रत्येकाने काळजी घेतली असती इमेज ची.
अवघड काय त्यात? हा काही
अवघड काय त्यात? हा काही डोळ्यासमोर होणारा क्रिकेटचा सामना नाही किंवा जादूचे प्रयोग नाहीत. तुम्हाला कॅमेरा आय ने पडद्यावर दिसते तेच. पडद्यामागचे कसे दाखवतील. कॅमेरा चुकून चालू राहिला वगैरे बहाणे करतही बरेचदा बरेच काही सत्य दाखवल्यासारखे दाखवले जाते.
साधा हिशोब आहे, उद्या काही हॅपनिंग घडलेच नाही तर कोण बघणार तो कार्यक्रम. तो काही गाण्याच वा नृत्याचा कार्यक्रम देखील नाही जिथे स्पर्धकांची कलाकारी बघून तुम्ही खुश व्हाल..
असते तर प्रत्येकाने काळजी
असते तर प्रत्येकाने काळजी घेतली असती इमेज ची.
>>>>
उलट स्क्रिप्टेड नसते तर प्रत्येकाने ईमेज जपली असती. पण स्क्रिप्टच अशी असते की ईमेज गेली तेल लावत.. आणि ते स्विकारावेच लागते. कारण त्याचेच पैसे मोजले असतात
इथे किती निरागस लोक आहेत याचे
इथे किती निरागस लोक आहेत याचे आश्चर्य वाटते आहे
रिएलिटी शोज फुल्ल मॅनेज केलेले असतात. वर्ड टु वर्ड स्क्रिप्ट करायची गरज नसते पण काय करायचेय ते ठरले की इम्प्रोवाइज करणे अवघड नसावे. शिवाय एडिटिंग करून हवा तो इफेक्ट साधता येतोच. उदा. हिमेश सारख्या जजेस चे भांडणे, कुणाचे तरी स्टेज सोडून जाणे, पुन्हा येणे.
बहुतेक शोज मधे १-२ पार्टिस्पन्टस् ची रडकी कहाणी, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ऊठसूठ डोळ्यातून पाणी काढणे - ऑल स्क्रिप्टेड.
सारेगमप वगैरे ठीक आहे हो..
सारेगमप वगैरे ठीक आहे हो.. इथे बिग बॉस चा विषय चालू आहे. मागच्या बिग बॉस मध्ये स्वामी ओम ने जे प्रकार केले स्क्रिप्टड नक्कीच नव्हते.
मागच्या बिग बॉस मध्ये स्वामी
मागच्या बिग बॉस मध्ये स्वामी ओम ने जे प्रकार केले स्क्रिप्टड नक्कीच नव्हते.
>>>>
ऐसा क्या किया स्वामी ओमने, जरा हमे भी तो बताओ..
वैसे ये स्वामी ओम किस चिडीया का नाम है?
मै+१
मै+१
एका रिअॅलिटी शोला (मला वाटत सारेगम२००५ ला) सलमान जज आला होता तेव्हा त्याने सगळ्या मेन्टर्स ला विचारले होते की हे लोक पब्लिकला वोट मागतात ते ठीक आहे पण तुम्ही आधिच इन्डट्रित आहात तुम्ही काय केलेय याच्यासाठी? सगळ्यानी थातुर-मातुर उत्तर दिली होती.
अहो त्यांना तेच दाखवायचं आहे.
अहो त्यांना तेच दाखवायचं आहे. टीआरपी साठी. कसली इमेज बिमेज जपायची नाहीये.
गाण्यांचे नाचाचे शो असो की बिग बॉस ऑल स्क्रिप्टेड.
असो. जाउद्या झालं.
उषा नाडकर्णी झळकणार बिग बॉस
उषा नाडकर्णी झळकणार बिग बॉस मराठीमध्ये
http://cnxmasti.lokmat.com/television/news/usha-nadkarni-in-bigg-boss-ma...
'हा' रेडिज स्पर्धक दिसणार मराठी बिग बॉसमध्ये
http://cnxmasti.lokmat.com/television/news/this-rodies-contestant-will-s...
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच मिनिटेही न बघितलेल्यांच्या यादीत मी आहे.. अजून कोणी आहे का?
मराठीत आला तरी बघण्याचे चान्सेस कमीच.. त्यात महेश मांजरेकर म्हणजे डोक्याला शॉट !>> +१०००००
अतिशय फाल्तू शो आणि फाल्तू होस्ट.. २ मिनिटे पण पाहवणार नाही हा कार्यक्रम...
रच्याकने वर कोणीतरी मुक्ता बर्वेला फ्लॅाप म्हटलंय, तिच्यासारखी चतुरस्त्र अ अभिनेत्री नाही सध्या मराठीत, कोणत्या अँगलने फ्लॉप वाटते ती??
तिच्यासारखी चतुरस्त्र
तिच्यासारखी चतुरस्त्र अभिनेत्री
>>> लोल.
कोणत्याही चित्रपटात तेच सेम सेम एक्सप्रेशन् देते, एका चित्रपटातून उचला, दुसऱ्यात टाका.. काही फरक पडत नाही. बोलण्याची स्टाईल, बेरिंग सगळे सेम.
उषा नादकर्णी म्हणजे राडाच आता
उषा नादकर्णी म्हणजे राडाच आता बिग बॉस मध्ये.
कोणत्याही चित्रपटात तेच सेम
कोणत्याही चित्रपटात तेच सेम सेम एक्सप्रेशन् देते, एका चित्रपटातून उचला, दुसऱ्यात टाका.. काही फरक पडत नाही. बोलण्याची स्टाईल, बेरिंग सगळे सेम.>>> च्रप्स, तुम्ही तिचा जोगवा बघितला?
उषा नाडकर्णी झळकणार बिग बॉस मराठीमध्ये >>> अरे देवा!!!!
उषा नाडकर्णी यांना आता
उषा नाडकर्णी यांना आता जास्तीचा राडा करायला लावतील तिथे
हो जोगवा पाहिलाय.. काही अपवाद
हो जोगवा पाहिलाय.. काही अपवाद असतातच .. शाखा ने पण स्वदेस आणि चकदे दिलायच की बाकी पाट्या टाकत असला तरी.. मुक्ता मेजोरीटी चित्रपटात तेच तेच एक्सप्रेशन्स, सेम डायलॉग डिलिव्हरी... तुम्हीच विचार करून बघा.
च्रप्स, म्हणजे स्वप्निल जसा
च्रप्स, म्हणजे स्वप्निल जसा मराठी चित्रपटसृष्टीचा शाहरूख आहे तसे मुक्ता लेडी शाहरूख आहे का? आणि मुंबई पुणे मुंबई या दोन शाखांची जुगलबंदी होती का?
शाखा, स्वप्नील आणि मुक्ता..
शाखा, स्वप्नील आणि मुक्ता.. तिघे पाट्या टाकतात.. कसली जुगलबंदी कसले काय.
च्रप्स मधेच मुक्ता बर्वेला का
च्रप्स मधेच मुक्ता बर्वेला का टाकतात अशा लिस्ट मधे ? गोंधळ तर होत नाहीये ना मुक्ता बर्वे नक्की कोण बाबत ??
Pages