मंदिर वही बनायेंगे..
पर तारीख नही बतायेंगे..
म्हटलं तर वर्षानुवर्षे राममंदिराचे घोंगडे भिजत पडलेय. मोदी सरकार आले आणि आशा निर्माण झाली. तरी गेले तीनेक वर्षे टोलवाटोलवीच चालू होती. पण आता गेल्या काही काळात घडामोडींनी वेग पकडल्याचे दिसत आहे. २०१९ निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नोटाबंदी आणि जीएसटीने उद्भवलेल्या लोकक्षोभावर उतारा म्हणून सरकारला या एका वचनपूर्तींची नितांत गरजही आहेच. त्यामुळे सरकारतर्फे यंदा ठोस प्रयत्न होण्याची शक्यता आहे. केस कोर्टात आहे. तिथून निकाल लागायची शक्यता वर्तवली जात आहेच. पण आता कोर्टाच्या बाहेरही सेटलमेंट होण्याची लक्षणे दिसत आहेत.
या संदर्भात नुकतेच मुस्लिम नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
एकूण वातावरण पाहता माझ्या काही हिंदुत्ववादी फेसबूकीय मित्रांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसतेय.
मी स्वत: नास्तिक आहे. त्यामुळे रामंदीराशी तसे मला काही घेणेदेणे नाही.
तसेच मी कुठलाही धर्म मानत नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम वादातही रस नाही.
मात्र एक माणूस, एक भारतीय, आणि मुख्यत्वे एक मुंबईकर म्हणून नक्कीच हा विषय जवळचा आहे.
कारण जेव्हा बाबरी मशीद पडली होती तेव्हा सर्वात पहिले मुंबई पेटली होती. त्यातही आम्ही दक्षिण मुंबईकर असल्याने काकामामांकडून त्या दंगलीच्या बरेच कटू आठवणी ऐकल्या आहेत. तोडफोड, जाळपोळ, लूटमार, आपले काहीही व्यक्तीगत वैर नसताना एकमेकांच्या धर्माची माणसे मारणे, माणसं वेडी झाली होती... हे ऐकताना असे वाटायचे की तो काळ वेगळाच होता. आता मुंबईत असले काही घडणार नाही. पण मध्यंतरी झालेल्या जातीय तणावानंतर कळून चुकले की राजकीय ईच्छाशक्तीने ठरवले तर काहीही घडू शकते. हे प्रकरण कसेही वळण घेऊ शकते. त्यामुळेच या घडामोडींवर लक्ष ठेवायला हा धागा ..
मंदिर वही बनायेंगे ... घडामोडी वेगात !
Submitted by ऋन्मेऽऽष on 9 February, 2018 - 16:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>अजून सांगू का? की याने
>>अजून सांगू का? की याने "नविन सरकार" बद्दलचे पोट भरेल?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तरी सुद्धा हेच सरकार पायजेल, पायजेल म्हंजे पायजेल, फूल स्टॉप.
हे माझे मत नाही बर का, असे अनेकांना वाटत आहे. त्याला तुम्ही किंवा मी काही करू शकत नाही,
तुम्ही घ्या हो... पण
तुम्ही घ्या हो... पण जबरदस्तीने हेच घ्या असे लादू नका![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
असे अनेकांना वाटत आहे. --
असे अनेकांना वाटत आहे. -- अनेकांची फुकट वकिली करत आहात का?
मंदिर !!!!!!!
मंदिर !!!!!!!
साधना यांचेशी संपूर्ण सहमत.
साधना यांचेशी संपूर्ण सहमत.
किळस हा शब्द परफेक्ट आहे.
>>असे अनेकांना वाटत आहे. --
>>असे अनेकांना वाटत आहे. -- अनेकांची फुकट वकिली करत आहात का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहो असा मी एकटाच नाहीये काही, हे असे फु.व. करणारे पण अनेक आहेत,
येथे जे काही वादविवाद चाललेले दिसतात त्यामधे कोणी तरी कोणाची तरी फु.व. करत असतेच की.
पण आमच्यासारखे (आ.ब.व.) सं.फु.व. करणारे विरळा
>>>>रुन्मेष हा आयडी इरिटेटिंग
>>>>रुन्मेष हा आयडी इरिटेटिंग आहे हे बऱ्याच जणांनी या आधी म्हटलेय. पण मला तो अनेकदा निरुपद्रवी वाटलेला, रिकामटेकड्या माणसाचे उद्योग वाटले.
पण आता लक्षात येतेय की दुसऱ्या आईडीने गुडी गुडी वागणाऱ्या एकाचा हा डुप्लिकेट आयडी त्याची विचित्र गरज आहे. माणसे इंटरनेटची गुलाम होतात हे वाचले होते. आज पाहतेय की आपल्या धाग्याला जास्त प्रतिसाद मिळावेत ह्या विकृत इच्छेने हा आयडी सगळे माहीत असूनही असले धागे काढतो.
धागा बघून किळस वाटली ह्या आईडीची.>>>>
असे धागे निघालेच नाही तर चर्चा कशी होणार बरं? त्यानं आधीच मागिल नथूरामवाल्या धाग्यावर त्याची भुमिका स्पष्टपणे मांडलीय.
हे असे वादग्रस्त विषय चर्चेला येणं/आणणं गरजेचं आहेच, ते ऋ करतोय त्याबद्दल त्याचं अभिनंदन आणि धन्यवाद! कारण,
मागचाच नथूरामवाला धागा, डिफरेंट पॉईंट ऑफ व्यूजनं एखाद्या गोष्टीकडं कसं बघावं हे त्या धाग्याच्या निमित्ताने झालेल्या अड्ड्यावरील भरत, सिम्बा, फारएंड, टवणे सर,दत्तू यांच्या दिर्घ चर्चेतून समजलं. खरंतर ती चर्चा संग्राह्य ठेवावी अशी असल्यानं ऋच्या त्या धाग्यावरच व्हायला हवी होती मात्र दुर्दैवाने तसं झालं नाही. कदाचित आपल्याला ही गोष्ट इतकी महत्वाची वाटणार नाही पण आमच्यासारख्या नवागतांसाठी म्हणजेच ज्यांची वादग्रस्त विषयांवरची राजकीय ठाम मतं अजून बनायची आहेत अशांसाठी वादग्रस्त विषयांवरील चर्चा महत्वपूर्ण ठरते. कुणी दुसर्यानं अशा वादग्रस्त विषयांवर धागे काढलेच तर ऋ कशाला काढेल धागा?
बाकी प्रतिसाद वैयक्तिक ठरतो, जो आपल्यासारख्या जेष्ठ सदस्यालाही सखोल विचार केला असता पटणार नाहीच !
गुडीगुडी!!!!
हा लै भारी शब्द आहे.. यावर काही लिहायला हवंच.. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गुडीगुडी कोणी लिहू, वागू, बोलूच नये, असं काही आहे का? मागे माझ्याबाबतीतही असाच गुडीगुडीवाला (गोड गोड) आरोप झालेला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
]
प्रत्येक लिहीणार्याचा त्याच्या स्टाईलवाला एक वाचकवर्ग असतो, जसा आपला आहे. त्याचप्रमाणे गुडीगुडीवाल्यांचाही असतो. किंबहुना सर्वाधिक पंखे त्यांचेच असतात! मराठी भाषा दिन जवळ आलाय, बघा तो गुडीगुडीवाला गुपचूप येईल आणि गुडीगुडी लिहून नेहेमीप्रमाणेच पहीलं बक्षिस सर्वांच्या डोळ्यांदेखत घेऊन जाईल !
[ गुडीगुडी, वी आर वेटींग
ऋ ची किळस यावी असं काय आहे??? उलट सोशल साईट्स वरचा तो एक जंटलमन आहे! आणि माझी खात्री आहे, त्याच्या व्यक्तीगत जिवनातही तो एक चांगला सदगृहस्थ आहे.
बाकी विकृत आणि किळस आणणारे ड्यूज आणि अवतार कुणाला बघायचेच असतील तर 'ते दोन' वाहते पानं नियमितपणे वाचत जावेत.
[ता. क. - फुकट वकीलपत्र घेतलंय म्हणून कुणी आरोप करू नयेच.]
<मागे माझ्याबाबतीतही असाच
<मागे माझ्याबाबतीतही असाच गुडीगुडीवाला (गोड गोड) आरोप झालेला.>
मागे म्हणजे कधी? माझ्याबद्दल म्हणजे कोणाबद्दल?
दुष्ट मेले मायबोलीकर,
दुष्ट मेले मायबोलीकर,
जन्माला येऊन 1 महिना व्हायच्या आत आरोप करून मोकळे होतात.
धर्माचे आधारे आधीच 2 देश
धर्माचे आधारे आधीच 2 देश निर्माण झाले आहेत, त्यामुळे त्या देशात असलेल्या धर्माचे ह्या देशात असलेल्या धार्मिक स्थानांवर कुठलाही नैतिक अधिकार असूच शकत नाही
इस्कटून सांगा.
इस्कटून सांगा.
एकदम बरोबर टोपे भाऊ
एकदम बरोबर टोपे भाऊ
सौदी दुबई मधले मंदिराचे काय करायचे ते पण सांगून टाका
मंदिर हे फक्त वाद घालण्यासाठी
मंदिर हे फक्त वाद घालण्यासाठी आहे, असे वाटायला लागले आता
मंदिर हे फक्त वाद घालण्यासाठी
मंदिर हे फक्त वाद घालण्यासाठी आहे, असे वाटायला लागले आता
कुणाशी?
रेल्वेत लेडीज डबा हा फक्त
रेल्वेत लेडीज डबा हा फक्त लेडीजकरता असतो तिथे पुरुष शिरु शकत नाहीत. पण याचा अर्थ उरलेले डबे हे "फक्त" पुरुषांकरिता राखीव नसतात. त्यातही लेडीज शिरु शकतात.
तरी सुद्धा हेच सरकार पायजेल,
तरी सुद्धा हेच सरकार पायजेल, पायजेल म्हंजे पायजेल, फूल स्टॉप.>>>> हिटलर देखील खुप मते घेउन जिंकुन आला. जर्मनीची वाट लागली तेव्हा त्यांना समजले
हे माझे मत नाही बर का, असे अनेकांना वाटत आहे. त्याला तुम्ही किंवा मी काही करू शकत नाही >>>>>>>>>>> नाहिच करु शकत. जर्मन लोकांना फार उशीर झाला तेव्हा जाग आली. भारतात ते हिउ नये अशी इछा आहे.
भारतात हे होणार नाही. भारत
भारतात हे होणार नाही. भारत म्हणजे जर्मनी नाही. आज दहा बारा टक्क्यांवर उडत आहेत. यांचेच दोर यांच्या पतंगी कापणार आहेत.
>>यांचेच दोर यांच्या पतंगी
>>यांचेच दोर यांच्या पतंगी कापणार आहेत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कुणाशी?
कुणाशी?
नवीन Submitted by Zankar on
>>लोकांचा लोकांशी वाद घालण्याचा मुद्दा आहे.. गेल्या अनेक दिवसापासून मंदिर बनविण्याच्या घोषना करण्यात आल्या पण मंदिर काही बनले नाही. म्हणून वेळ आली की मंदिर हा मुद्दा वाद घालण्यासाठी वापरात आणला जातो
अनामिक. आपणांस हे फारच उशिरा
अनामिक. आपणांस हे फारच उशिरा कळले. राममंदीर हा फक्त एक तयार केलेला भावनिक मुद्दा आहे. हिंदूंच्या सायकॉलॉजीचा फायदा घेण्याचा.
समस्त हिंदुस्थानातल्या हिंदूंसाठी कुठेही गरजेचा नसलेला अयोध्याराममंदीर हा मुद्दा संघ-भाजप ने अस्तित्वात आणला. त्यात कुजबूजफौजेद्वारे आग ओतली. त्याचे राजकीय भांडवल केले. हिंदूंचा अगदी मानबिंदू केला. त्यांच्यावर अन्याय होत आहे ह्या कपोलकल्पित भावनेचे प्रतिक बनवले. भारतभर हजारो देवांची हजारो मंदिरे असतांना. त्यातली कित्येक मस्जिदींना खेटून गुण्यागोविंदाने नांदत असतांना एकाच विशिष्ट मंदिराला हिंदूधर्माचे प्रतिक बनवण्याची गरज नव्हती. पण हे हिंदुत्ववादी ख्रिश्चन/मुस्लिमांच्या धर्तीवर एकाच देवाची पुजा, एकाच ठिकाणाचे धार्मिक महत्त्व ह्या पद्धतीने सर्व हिंदू समाजावर अधिराज्य गाजवण्याची कारस्थानं रचत आहेत. ह्या कारस्थानांसाठीच अयोध्येचे राममंदीर प्रतिष्ठेचे केले. एक हिंदू म्हणून हिंदूंना अशा एकाच मान्यतेखाली झुकवण्याच्या कारस्थानाला की जे हिंदूधर्माच्या संस्कृतीच्या मूळस्वरुपाच्या विपरित आहे त्याला विरोध करत राहीले पाहिजे. ह्या मतलबी हिंदुत्ववाद्यांचा प्लान यशस्वी व्हायलाच नको.
काहीही म्हणा पण
काहीही म्हणा पण धर्मनिरपेक्षतता पूर्ण फसली आहे, त्यापेक्षा एकधर्मी राष्ट्रे जास्त प्रमाणात आहेत जगात.
बरोबर झंकार
बरोबर झंकार
आता काय करायचे, घटना काढून मनुस्मृति लावायची? की अजून काही?
जगातील बहुसंख्य एकधर्मी
जगातील बहुसंख्य एकधर्मी राष्ट्रांच्या कायद्यांत अनुकूल बदल करून त्याचा वापर भारतात करावा
म्हणजे शरियत लागू करावा असे?
म्हणजे शरियत लागू करावा असे?
>>>Submitted by Zankar on 15
>>>Submitted by Zankar on 15 February, 2018 - 10:09
चला, एखादी गोष्ट संख्येने जास्त असेल तर ती चांगली'च' असते असा तुमचा विश्वास आहे तर.
बाकी, आम्ही धर्मनिरपेक्ष नाही असे म्हणणारे किती देश पहिल्या १०-२० प्रगत/प्रगतीशील देशात येतात ते पहायला हवे.
काहीही म्हणा पण
काहीही म्हणा पण धर्मनिरपेक्षतता पूर्ण फसली आहे, त्यापेक्षा एकधर्मी राष्ट्रे जास्त प्रमाणात आहेत जगात.
-- तुमची 'दोन मारा पण फौजदार म्हणा' अशी परिस्थिती झाली आहे का?
आम्ही धर्मनिरपेक्ष नाही असे
आम्ही धर्मनिरपेक्ष नाही असे म्हणणारे किती देश पहिल्या १०-२० प्रगत/प्रगतीशील देशात येतात ते पहायला हवे. >>> हेच लिहीणार होतो. सर्व धर्माधारित राष्ट्रांत काय परिस्थिती आहे ती भारतात हवी आहे का विचार करा.
भारतात कोणी धर्मपालन वगैरे रोखलेले नाही.
आर भावानु पन मोदी ला पर्याय
आर भावानु पन मोदी ला पर्याय हाय कोन?
तायडे, कट्टा नावाचा एक नरक
तायडे, कट्टा नावाचा एक नरक आहे, तिकडचे लोक यावर चर्चासत्र करत आहेत , तू पण सहभागी होऊ शकतेस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोदी सारखा कोणीच नाही. तुघलक
मोदी सारखा कोणीच नाही. तुघलक आणि शेखचिल्लीचे डेडली काँम्बिनेशन आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages