मंदिर वही बनायेंगे ... घडामोडी वेगात !

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 February, 2018 - 16:17

मंदिर वही बनायेंगे..
पर तारीख नही बतायेंगे..
म्हटलं तर वर्षानुवर्षे राममंदिराचे घोंगडे भिजत पडलेय. मोदी सरकार आले आणि आशा निर्माण झाली. तरी गेले तीनेक वर्षे टोलवाटोलवीच चालू होती. पण आता गेल्या काही काळात घडामोडींनी वेग पकडल्याचे दिसत आहे. २०१९ निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नोटाबंदी आणि जीएसटीने उद्भवलेल्या लोकक्षोभावर उतारा म्हणून सरकारला या एका वचनपूर्तींची नितांत गरजही आहेच. त्यामुळे सरकारतर्फे यंदा ठोस प्रयत्न होण्याची शक्यता आहे. केस कोर्टात आहे. तिथून निकाल लागायची शक्यता वर्तवली जात आहेच. पण आता कोर्टाच्या बाहेरही सेटलमेंट होण्याची लक्षणे दिसत आहेत.
या संदर्भात नुकतेच मुस्लिम नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
एकूण वातावरण पाहता माझ्या काही हिंदुत्ववादी फेसबूकीय मित्रांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसतेय.
मी स्वत: नास्तिक आहे. त्यामुळे रामंदीराशी तसे मला काही घेणेदेणे नाही.
तसेच मी कुठलाही धर्म मानत नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम वादातही रस नाही.
मात्र एक माणूस, एक भारतीय, आणि मुख्यत्वे एक मुंबईकर म्हणून नक्कीच हा विषय जवळचा आहे.
कारण जेव्हा बाबरी मशीद पडली होती तेव्हा सर्वात पहिले मुंबई पेटली होती. त्यातही आम्ही दक्षिण मुंबईकर असल्याने काकामामांकडून त्या दंगलीच्या बरेच कटू आठवणी ऐकल्या आहेत. तोडफोड, जाळपोळ, लूटमार, आपले काहीही व्यक्तीगत वैर नसताना एकमेकांच्या धर्माची माणसे मारणे, माणसं वेडी झाली होती... हे ऐकताना असे वाटायचे की तो काळ वेगळाच होता. आता मुंबईत असले काही घडणार नाही. पण मध्यंतरी झालेल्या जातीय तणावानंतर कळून चुकले की राजकीय ईच्छाशक्तीने ठरवले तर काहीही घडू शकते. हे प्रकरण कसेही वळण घेऊ शकते. त्यामुळेच या घडामोडींवर लक्ष ठेवायला हा धागा ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिखांचा खलिस्तान देखील हवा ना एक तरी
लगे हाथ एक जैनिस्तान झाला तर सगळ्या शाकाहारी लोकांना तिथे हाकलुन लावता येईल

धर्मनिरपेक्षतता हेच खरे दिवास्वप्न होतं/आहे
अत्यंत अवास्तव आदर्श स्थिती आहे जी कधीच वास्तवात येणार नाही

संघी लोकांनी अपशकुन केला नसता तर 1948 लाच नक्की वास्तवात आले असते ते स्वप्न,
अगदी काही वर्ष मागे परीस्थिती अगदी हाताबाहेर गेलीये असे वाटत नव्हते,पण परत एकदा संघी लोक ती उत्तरोत्तर बिघडेल अशी व्यवस्था मन लावून करत आहेत

मी काय म्हणतो याना 8 10 जिल्यांचा संघीस्तान तोडून का देऊ नये? एकदा हे तिकडे गेले म्हणजे बाकीच्या भरतवर्षावर हक्क सांगायला येणार नाहीत ,
काय म्हणता अनिरुद्ध..?

काय हवे ते घोळ घाला तिकडे, बायकांना नखशिखांत गोष्यात ठेवा, गायी घरात बांधून ठेवा, प्रत्येक गल्लीत भव्य मंदिर बनवा, दर वर्षी डेमोनिटीझशन करा...

ह्यांच्या स्वप्नातले हिंदुराष्ट्र ह्यांच्या स्वप्नात राहील. ज्यांना शक्य आहे ते अमेरिकेला भूर उडून जात आहेत. बाकीचे काही जमत नाही म्हणून हिंदुराष्ट्राच्या नावाखाली लाठ्याकाठ्या आपटत बसतात.

१६ ते ४० वयोगटातल्या सर्व भारतीयांनो. जागे रहा. हे सैतान हळूहळू वाढत आहेत. यांना संपवायची वेळ आली आहे. हे संपले नाहीत तर आपला भारत भारत राहणार नाही. सिरिया होईल.

जाती निरपेक्षतता बद्दल हे देखील दिवा स्वप्न असेलच ना. मग प्रत्येक जातीसाठी>>>>>
व्यत्यय आहात कुठे??? आपण जातिनिरपेक्ष जगातच आहोत,
समता आणि समरसता ....विसरलात?
कुठल्या ब्रिटिशकालीन कल्पना कवटाळून बसला आहात?
आमच्या संस्कृतीत अस्पृश्यात नव्हती, आमच्या संघटनेत आज सुद्धा नाहीये
हो की नाही अनिरुद्ध..?

धर्मनिरपेक्षतता हेच खरे दिवास्वप्न होतं/आहे
अत्यंत अवास्तव आदर्श स्थिती आहे जी कधीच वास्तवात येणार नाही
<<

बबडू, शोनू, धर्मनिरपेक्षता ही आदर्श स्थिती आहे हे समजतंय ना? तूच लिहिलं आहेस इथे.

मग डिसेरेब्रेट केल्यासारखी बौद्धिकातली पोपटपंची करून "वास्तवात येणार नाही" हे म्हणणे सोड. अन जरा खाकी चड्डी अन काळी टोपी काढून स्वतःच्या डोक्याने विचार कर. आपल्या डोक्याने विचार करून ही आदर्श स्थिती कशी आणता येईल हे बघ जरा.

आता, ही स्थिती वास्तव की अवास्तव हे पाहू जरा.

धर्माच्या बेसिसवर 'राष्ट्र' हवंय तुला?

राष्ट्र अन धर्म या संकल्पना तरी समजल्या आहेत का बाळ तुला?

तुमचे विचार, अन प्रश्न विचारायची कुवत संपते, अर्थात तुम्ही ती स्वतःच बंद करता, तिथून श्रद्धा नामक बथ्थडपणा सुरू होतो. अन त्या श्रद्धेवरच जगातले सगळे धर्म नावाचे माइंड कंट्रोलिंग अवडंबर उभे आहे. तुझ्या तथाकथीत इश्वर/अल्ला/जीझस/म्हसोबा/अमुकतमुकने तुला मेंदू अन विचारशक्ती का दिली? इतका सोपा विचार डोक्यात येत नाही का कधी?

तुझा धर्म नक्की काय आहे ते तरी समजलं आहे का तुला?

हा तथाकथित महान धर्म तू बाय चॉईस स्वीकारला आहेस का? सगळे प्रोज अन कॉन्स समजून उमजून?

लहानपणापासून आईने देवाला नमस्कार करायची सवय लावली म्हणून, अन परिक्षेत पास होण्यासाठी देवाला साकडं घालघालून धार्मिक झालाहेस, की जगात मुसलमानांची ५५ अन ख्रिश्चनांची ४० राष्ट्रे आहेत म्हणून मलाही हिंदूंचे १ हवे, असल्या मद्दड लॉजिकने मेंदू कुजला आहे तुझा?

धर्म म्हणजे नक्की काय ते तरी समजून घे अन मलाही सांग. त्यापुढे हिंदू म्हणजे काय त्याबद्दलही बोलू आपण. इथेच मायबोलीवर पल्लेदार चर्चा आहेत यावर, त्याही तू वाचल्याच आहेत हे मला ठाऊक आहे.

इथे मायबोलीवर तू नवा नाहीस हे मला नीट ठाऊक आहे.

अन आता ते "राष्ट्र!"

चैला, देश अन राष्ट्र असे दोन आहेत आपल्याकडे. भारत देश आहे, अन हिंदूस्थान नावाचे 'राष्ट्र' आहे त्यात! नवा द्विराष्ट्रवाद सुचला मला आत्ताच.

तू आहेस राष्ट्रभक्त अन मी बिचारा पडलो देशभक्त.

हा देश म्हणजे फक्त नकाशावरच्या रेषांनी बंदिस्त केलेला भूप्रदेश नाही, तर देश म्हणजे त्यात राहणारे लोक, ही व्याख्या तुमच्या नव्या आदिशत्रूने (नेहरू- खरा पंडित बरं का. उगंच तू दुसर्‍या आयडिने खुन्याला पंडीत म्हणतो तसा नाही) केलेली आहे. त्यानेच सुरू केलेल्या सरकारी शाळेत ती व्याख्या शिकला असशीलच.

आता तुझी आसिंधूसिंधूअखंडहिंदूराष्ट्राची व्याख्या जरा सांग पाहू इथे?

कशाच्या बेसिसवर तुम्ही संघोटे "अखंड" हिंदूस्थान मागत असता?

अमेरिकेने अन युरोप ऑस्ट्रेलियाने तुझ्या काळ्या चामडीच्या हिंदूंना दुय्यम नागरिक म्हणून वागवायला सुरुवात केली, अन तुझ्यासारख्या मद्दड निओ-नाझींच्या तालावर अमेरिका ख्रिश्चनोंका, हिंदू भागो हिंदूस्थान अशा घोषणा द्यायला सुरुवात केली तर काय होईल? तिथे त्रिशूल अन तलवारी नाही, बंदुका नाचवतात लोकं. Wink

किंवा आखातातून तुमच्यासारखे तमाम छुपे भगवे मुसलमानांनी हाकलून लावले तर काय होईल? तुझ्या हिंदुस्थानाला तेल विकणं या मुसलमानांनी बंद केलं, किंवा तुमच्या तथाकथित हिंदूस्थानातून निर्यात होणारं, त्या वर कुणी म्हटलं तशा अती अहिंसक जातीच्या लोकांच्या मालकीच्या फॅक्ट्र्यांतून उर्फ खाटिकखान्यांतून निघणारं नुसतं बीफ खायचं ख्रिश्चनांनी बंद केलं, तर काय होइल?

अफगाणीस्तानापासून निघून तिकडे म्यानमार कंबोडियाकडे जायची तुमची टिवटिव तिकडे आढळणार्‍या हिंदू संस्कृतीच्या खुणांवरून रीइन्फोर्स होते, पण ते हिंदू होते, हिंदुत्ववादी संघोटे नाही, हे तुमच्या सूक्ष्म मेंदूस उमजत नाही.

असो.

"धर्मनिरपेक्ष" असं म्हटलं रे म्हटलं, की "हिंदू धर्म बुडाला" अशी बोंब "इस्लाम खतरे में" या चालीवर मारायची, हा धंदा तुला शाखेत पढवणारे हिंदू मुल्ले कुठून शिकले असावेत बरं?

जेव्हा धर्म घरात ठेवा असं सांगितलं जातं, तेव्हा देशातल्या प्रत्येक धर्माच्या नागरिकास ते लागू असतं. फक्त हिंदूंना नाही.

मुसलमानांचं लांगुलचालन करतात अशी बांग ठोकताना, त्यांच्या मशिदीतल्या भोंग्याचं, रस्त्यातल्या नमाजचं उदाहरण येतं, पण त्याच वेळी त्याला "उत्तर" म्हणून तुम्ही लावलेल्या तितक्याच भोंग्यांचं काय? रस्त्यांत पडणार्‍या अनेकानेक "मांडवां"चं काय? याबद्दल कुणीच बोलत नाही. त्या मंदिरातल्या भोंग्यांवर काँग्रेसने कारवाई केली का? मग मशीदीतल्या भोंग्यावर कारवाई नाही म्हणून कोल्हेकुई कशाला?

घरातला देव काढून रस्त्यावर मांडायचे धंदे करणार्‍या धार्मिकांकडे सरकारात - लोकसभेपासून गल्लीतल्या पोलिसांपर्यंत- बसलेल्या तितक्याच धार्मिक माणसांनी इतकी वर्षे दुर्लक्ष केलं म्हणून तुम्ही हिंदू मुल्ले इतक्या माजोरडेपणाने धर्माच्या नावाखाली नंगा-नाच घालू लागला आहात माझ्या या पवित्र अन मवाळ हिंदू देशात.

अ‍ॅग्रेशन, शेजार्‍याशी त्याच्या धर्मावरून, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरून, त्याच्या कपड्यांवरून, चालीरितींवरून भांडण करणे, अन मीच महान हे सिद्ध करायचा प्रयत्न करणे, हाच तुमचा धर्म आहे का?

सगळे मिळून वर येऊ, एकमेकांना मदत करू, हे तुमच्या "राष्ट्रा"चे ध्येय आहे, की अमुक धर्म, जात, वंश, आडनांव वगैरे असलेल्या लोकांना इथून हाकलून देऊ/गॅस चेंबरमधे मारून टाकू, अन त्यांची जमीन,घरं,धंदे,पैसे बळकावू जेणेकरून "मी व माझी जात्/धर्म" श्रीमंत होईल, हा नाझी विचार तुमच्या डोक्यात आहे? अन "मुल्ले भागो पाकिस्तान"च्या पुढे काय? गोरे घारे लोक वेगळे करून सिलेक्टिव्ह ब्रीडिंग का??

तेव्हा पुन्हा एकदा शोनुड्या,

आदर्श स्थिती कधीच अस्तित्वात येणार नाही, असे पुनःपुन्हा स्वतःलाच सांगू नकोस.

धर्मनिरपेक्षता ही आदर्श स्थिती आहे, तिच्या जवळ जायच्या प्रयत्न तर करून बघ. उगंच नाही युरोप-अमेरिकेचं अ‍ॅट्रेक्शन वाटत रे तुम्हा संघोट्यांना. तिथे ही धर्म/वर्ण/भाषा/लिंग निरपेक्षता आणण्याचा अ‍ॅक्चुअल प्रयत्न होत असतो.

तेव्हा जरा उठा, जागे व्हा.

उत्तिष्ठ. जाग्रत.

अन हा देश, जो तुम्हाला तुमच्या पोराबाळांना देण्यासाठी तुमच्या देखरेखीखाली ठेवायलाच फक्त तात्पुरता मिळालेला आहे, त्या देशाला अधिक मोठा करून, भविष्यात नेऊन, मग मरा. "वर" गेल्यावर तुमचा "देव" जाब मागेलच तुम्हाला. अन तुमच्या या जन्मात तुम्ही चालवलेल्या नीच कर्माची फळं म्हणून ८४ लक्षांपकी पुढची योनी मिळेलच. Wink

धर्मनिरपेक्षतता आणण्यासाठी आजवर भरपूर प्रमाणात प्रयत्न करून झाले, आता धर्माधिष्ठित राष्ट्रासाठी प्रयत्न करायची वेळ आली आहे

धर्मनिरपेक्षतता आणण्यासाठी आजवर भरपूर प्रमाणात प्रयत्न करून झाले, आता धर्माधिष्ठित राष्ट्रासाठी प्रयत्न करायची वेळ आली आहे
<<
Translation from SANGHI to normal marathi : देशाच्या उत्थानाचे आजवर भरपूर प्रमाणात प्रयत्न करून झाले, आता तोंडावर पडायचे/मध्यपूर्वयुगीन अंधार्‍या गाळात नेण्याच प्रयत्न करायची वेळ आली आहे. उज्जवल भूतकाळाकडे, प्रचण्ड वेगाने! Rofl

च्याय्ला. मीपण या ब्रेनवॉश्ड झाँबीला उद्देशून बोलायचा प्रयत्न करत होतो इतकावेळ. मूर्ख! Wink

आरारा, पोट तिडकीने लिहिले आहे >> +१
पलीकडल्या बाजूला प्रकाश पडणार नाहीच, पण कुंपणावरचे बदलावे म्हणून अशा पोस्ट लिहित चला.
अमेरिकेत शाळेत कितीही लहान लहान मुलं गोळीबारात मेली तरीही आपल्या हयातीत गन कंट्रोल लॉ होणे कदापि शक्य नाही या निष्कर्षावर आलोय. भारताबाबत अजून तितकी टोकाची परिस्थिती नाही असं वाटतंय तोवर काही बदलावे.

आपल्या हयातीत गन कंट्रोल लॉ होणे कदापि शक्य नाही या निष्कर्षावर आलोय. >>>किमान इतके होईल आणि झाले पाहीजेच

आता धर्माधिष्ठित राष्ट्रासाठी प्रयत्न करायची वेळ आली आहे

अगदी बरोबर मी तुमच्या बरोबर.. चला तुमचे साथीदारांना गोळा करा, चड्ड्या टोप्या गुंडाळून ट्रंकेत भरा.. तुम्हा सर्वांना अंदमान बेटावर सोडून येतो..
चला पटकन तयारीस लागा

>>>Submitted by आ.रा.रा. on 16 February, 2018 - 08:52

अप्रतिम प्रतिसाद. सलाम तुम्हाला. या लोकांवर इतके कष्ट घेण्याची इच्छा देखील होत नाही आजकाल. साधे शालेय इतिहास भूगोल नागरीकशास्त्रातले धडे आणि संदर्भ लक्षात राहीलेले नाहीत यांच्या आणि चालले राष्ट्रनिर्माण करायला.

तुम्हा सर्वांना अंदमान बेटावर सोडून येतो..
<<
चीनच्या सीमेवर सोडून या हो. तिकडे खरी गरज आहे. अन खाकी चड्डी ट्रंकेत नको. असू देत अंगावरच. गारठतील.

रच्याकने.

Is धर्मनिरपेक्षतता a real word? He has said it TWICE. In Two separate messages. की याला धर्मनिरपेक्षता म्हणायचे आहे?

जाऊद्या हो, त्यांना तो शब्द फारसा ओळखीचा नाही, त्यामुळे चूका होणार

शब्द ओळखीचा नाही मात्र त्यातील फोलपणा मात्र मी ओळखला आहे

सध्याच्या काळातील "धर्मनिरपेक्षता" म्हणजे तथाकथित फुरोगाम्यांचे, वर्तमान सरकार विरोधात कोणत्याही फडतूस कारणावरुन नौटंकी करण्याचे एक साधन आणि हिंदूना शिव्या घालायच्या व एका विशिष्ठ धर्माच्या लोकांच्या दाढ्या कुरवाळायच्या या पेक्षा आजच्या धर्मनिरपेक्षेला फार अर्थ नाही.

Pages