मंदिर वही बनायेंगे..
पर तारीख नही बतायेंगे..
म्हटलं तर वर्षानुवर्षे राममंदिराचे घोंगडे भिजत पडलेय. मोदी सरकार आले आणि आशा निर्माण झाली. तरी गेले तीनेक वर्षे टोलवाटोलवीच चालू होती. पण आता गेल्या काही काळात घडामोडींनी वेग पकडल्याचे दिसत आहे. २०१९ निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नोटाबंदी आणि जीएसटीने उद्भवलेल्या लोकक्षोभावर उतारा म्हणून सरकारला या एका वचनपूर्तींची नितांत गरजही आहेच. त्यामुळे सरकारतर्फे यंदा ठोस प्रयत्न होण्याची शक्यता आहे. केस कोर्टात आहे. तिथून निकाल लागायची शक्यता वर्तवली जात आहेच. पण आता कोर्टाच्या बाहेरही सेटलमेंट होण्याची लक्षणे दिसत आहेत.
या संदर्भात नुकतेच मुस्लिम नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
एकूण वातावरण पाहता माझ्या काही हिंदुत्ववादी फेसबूकीय मित्रांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसतेय.
मी स्वत: नास्तिक आहे. त्यामुळे रामंदीराशी तसे मला काही घेणेदेणे नाही.
तसेच मी कुठलाही धर्म मानत नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम वादातही रस नाही.
मात्र एक माणूस, एक भारतीय, आणि मुख्यत्वे एक मुंबईकर म्हणून नक्कीच हा विषय जवळचा आहे.
कारण जेव्हा बाबरी मशीद पडली होती तेव्हा सर्वात पहिले मुंबई पेटली होती. त्यातही आम्ही दक्षिण मुंबईकर असल्याने काकामामांकडून त्या दंगलीच्या बरेच कटू आठवणी ऐकल्या आहेत. तोडफोड, जाळपोळ, लूटमार, आपले काहीही व्यक्तीगत वैर नसताना एकमेकांच्या धर्माची माणसे मारणे, माणसं वेडी झाली होती... हे ऐकताना असे वाटायचे की तो काळ वेगळाच होता. आता मुंबईत असले काही घडणार नाही. पण मध्यंतरी झालेल्या जातीय तणावानंतर कळून चुकले की राजकीय ईच्छाशक्तीने ठरवले तर काहीही घडू शकते. हे प्रकरण कसेही वळण घेऊ शकते. त्यामुळेच या घडामोडींवर लक्ष ठेवायला हा धागा ..
मंदिर वही बनायेंगे ... घडामोडी वेगात !
Submitted by ऋन्मेऽऽष on 9 February, 2018 - 16:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईथे काहीतरी गोंधळ उडतोय माझा.
ईथे काहीतरी गोंधळ उडतोय माझा. ईथे आयडी उडायला मी वा माझे धागे कारणीभूत ठरताहेत असे म्हणायचे आहे का?
जर माझ्यामुळे जिथे तिथे जहाल भाषेत वाद घालून मायबोलीचे वातावरण दूषित करणारे आयडी उडत असतील तर माझे कौतुक झाले पाहिजे ना? कि लोकांना हे आयडी उडालेले नको आहेत?
असो, मला गोंधळातच राहू दे.
आपण विषयावर बोलूया का?
<<<< हा खटला आम्ही टायटल सूट प्रमाणे चालवणार. >>>>
याप्रमाणे जर निकाल मशीदीच्या बाजूने लागणार असेल तर अवघड होईल सध्याच्या परिस्थितीत.
हा निकाल सामोपचारानेच कोर्टाच्या बाहेरच लागायला हवा. दोन्ही बाजूंना विन विन सिच्युएशन वाटायला हवी. मुळात त्यांच्या नेत्यांनी तसे दर्शवायला हवे. शेवटी अनुयायांच्या डोक्यात तेच शिरते जसे त्यांना दाखवले जाते.
जर माझ्यामुळे जिथे तिथे जहाल
जर माझ्यामुळे जिथे तिथे जहाल भाषेत वाद घालून मायबोलीचे वातावरण दूषित करणारे आयडी उडत असतील तर माझे कौतुक झाले पाहिजे ना?>>>>
दंगे करणारे फासावर जातात. मागे उभे राहुन काडी करुन दंगे घडवुन आणणारे कधी तुरुंगात गेले आहेत ? १९८४ घ्या, १९९२ घ्या, २००२ घ्या. नथुराम फासावर गेला, गोळविळकर थोडेच गेले!
शेवटी अनुयायांच्या डोक्यात तेच शिरते जसे त्यांना दाखवले जाते. >>> देअर यु आर.
" मनातली घाण ओकावी" असे
" मनातली घाण ओकावी" असे लिहिण्याऐवजी ' मन मोकळे करावे' इतकेच पुरेसे झाले असते की. कारण या लेखापुरते पाहिले तर लेखात कुठेही ' घाण ओकलीय' असे वाटत नाही.
जर सौदी मंदिरासाठी जमिन देऊन
जर सौदी मंदिरासाठी जमिन देऊन भव्य मंदिर बनवू शकतात तर आपण पण हि जमिन देऊन त्यावर भव्य मस्जिद बांधून जगापुढे आदर्श ठेवावा.
मोदीला जमेल का हे?
भारतातील काही नालयक व दळभद्री
भारतातील काही नालयक व दळभद्री लोकांमुळे अयोध्येतील राम मंदीर बांधण्यात बर्याच अडचणी येत आहेत. पुढच्या काळात तिथे श्रीरामाचे भव्य मंदीर उभारले जाईल देखील तोपर्यंत संपूर्ण इस्लामी राष्ट्र असलेल्या युएई मधील अबुधाबी येथे श्रीरामाचे भव्य मंदीर बांधण्यात येणार आहे, त्या मंदीराचे भुमीपूजन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
एक वेगळा धागा रूनमेशबद्धल
एक वेगळा धागा रूनमेशबद्धल काढण्यात यावा आणि तिथे त्याबद्धल चर्चा व्हावी. दर धाग्यात ढीगभर अँटी रूनमेश प्रतिसाद .. धाग्याबद्धल काहीच नाही.
काडी बिडी काही वाटत माही
काडी बिडी काही वाटत माही मलाही.
हीरा +१
उगाच ओढुन ताणुन आरोप करायचे म्हणुन.
धागा बघून किळस वाटली ह्या आईडीची. या आईडीच्या धाग्यावर माझा हा शेवटचा प्रतिसाद.>>>>> किळस वाटण्यासारखं काही नाही धाग्यात.
अत्यंत महत्वाचा विषय आही आणि चर्चा झाली तर बरंच आहे. दोन्ही बाजु कळतील.
आणि ज्यांना काडीची गरज असते ते कुठेही सुरु होतातच. त्यासाठी हे असे ज्वलंत विषयच लिहायची गरज नसते.
अॅडमिन, अशा निष्पाप बीबींवर कमेंटींग बंद करायची सोय आणा जशी फेसबुकवर आहे.>>>> हे भारी आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>जर सौदी मंदिरासाठी जमिन
>>जर सौदी मंदिरासाठी जमिन देऊन भव्य मंदिर बनवू शकतात तर आपण पण हि जमिन देऊन त्यावर भव्य मस्जिद बांधून जगापुढे आदर्श ठेवावा.
>>मोदीला जमेल का हे?
होय, वेगळीकडे जमिन देण्याची तयारी ही मोदींच्या आधीपण दाखवलेली होती/आहे असे ऐकिवात आहे.
जर सौदी मंदिरासाठी जमिन देऊन
जर सौदी मंदिरासाठी जमिन देऊन भव्य मंदिर बनवू शकतात तर आपण पण हि जमिन देऊन त्यावर भव्य मस्जिद बांधून जगापुढे आदर्श ठेवावा.
मोदीला जमेल का हे?
मंदिर सौदीमधे नाही, अबु दाबीमधे होत आहे. अबु दाबी सरकार देत असलेल्या जागेवर मंदीर होत आहे. मशिदीसाठी जमिन देण्यास कोणाचीच ना नाही. आधीही दुसरी जमीन सुचवली हो ती. वाद तीच जमीन पाहिजे म्हणून आहे.आणि मोदी पंतप्रधान आहेत. लिहितांना निदान पंतप्रधानपदाचा तरी मान ठेवा.................
होय, वेगळीकडे जमिन देण्याची
होय, वेगळीकडे जमिन देण्याची तयारी ही मोदींच्या आधीपण दाखवलेली होती/आहे असे ऐकिवात आहे. >>>> तुम्हि नीट वाचत नाहि हो.
"ही" जमीन देउन त्यावर भव्य मस्जिद बांधून जगापुढे आदर्श ठेवावा. असे त्यांनी लिहिले आहे. "ही" म्हणजे वादग्रस्त असे त्यांना म्हणायचे आहे असे मला कळते. मोदी करतील का ते ?
मोदीला सांग आधि पंतप्रधान
मोदीला सांग आधि पंतप्रधान पदाचा मान ठेवायला आणि इतरांचा करायला मग बोल..
जोक आॅॅफ द डे
म्हणे मोदीचा मान ठेवा ..
2014 आधी पंतप्रधान पदाचा मान
2014 आधी पंतप्रधान पदाचा मान कसा ठेवावा याचा पायंडा खुद्द मोदी, जेटली, इराणी, स्वराज आणि पोसलेले भक्त यांनी घालून दिला आहे,
त्याला अनुसरूनच मोदी आणि त्यांच्या पदाचा मान राखला जातोय
जो करे दुसरोंका सन्मान
जो करे दुसरोंका सन्मान
उसको उतना सन्मान मिलेगा
>>जो करे दुसरोंका सन्मान
>>जो करे दुसरोंका सन्मान![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>उसको उतना सन्मान मिलेगा
या आधीच्या लोकांनी कोणाचा किती सन्मान केला होता ?
जशी लोकांची कार्ये त्यांचा
जशी लोकांची कार्ये त्यांचा तसाच सन्मान होतो. महेश कितीदा सांगायचे आणि मोदीचा कसला आलाय सन्मान ? कुठल्या गोष्टीवर करायचा? एक अशी गोष्ट सांगा पाहु ज्याने त्याचा सन्मान केला जाउ शकेल?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
या आधीच्या लोकांनी कोणाचा
या आधीच्या लोकांनी कोणाचा किती सन्मान केला होता ? >> या आधीच्या लोकांनी लोकसभेत/राज्यसभेत कोणाचा अपमान केला होता का?
या आधीच्या लोकांनी कोणाचा
या आधीच्या लोकांनी कोणाचा किती सन्मान केला होता ? >>>>>>>> झाले .......... आधी काय केले........... म्हणुन तुम्हिहि तेच करत असाल तर आधीचेच सरकार बरे होते. निदान सिलिंडर, पेट्रोल , स्वस्त मिळत होते., रोजगार मिळत होता, रोजच्या रोज जवान शहिद होत नव्हते.
कुठेतरी वाचलेलं एक छान वाक्य
कुठेतरी वाचलेलं एक छान वाक्य : काँग्रेसने जे जे शेण खाल्ल त्या त्या शेणाची चव भाजपने घेऊन पाहिलीच पाहिजे असे आहे का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(भाजप आणखी आणखी नव्या नव्या प्रकारचं शेण खातंय. पुढच्या सरकारांना ही परंपरा टिकवणं कठीण जाईल)
>>निदान सिलिंडर, पेट्रोल ,
>>निदान सिलिंडर, पेट्रोल , स्वस्त मिळत होते., रोजगार मिळत होता, रोजच्या रोज जवान शहिद होत नव्हते.
अॅट व्हॉट कॉस्ट ?? कित्त्येक घोटाळे, भ्रष्टाचार, इ. इ. ??
५०
५०
>>काँग्रेसने जे जे शेण खाल्ल
>>काँग्रेसने जे जे शेण खाल्ल त्या त्या शेणाची चव भाजपने घेऊन पाहिलीच पाहिजे असे आहे का?
चालेल, आधीच्यांनी जर काही टन खाल्ले असेल आणि यांनी काही किलो खाल्ले तरी चालेल, पण बदल पाहिजे असे अनेकांना वाटत होते/आहे.
व्हॉट कॉस्ट ?? कित्त्येक
व्हॉट कॉस्ट ?? कित्त्येक घोटाळे, भ्रष्टाचार, इ. इ. ??
कोर्टाने किती आरोपींना शिक्षा केली?
>>कोर्टाने किती आरोपींना
>>कोर्टाने किती आरोपींना शिक्षा केली?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
महेश
महेश
कुठला, कसला, कोणता घोटाळा? उगाच खोटे बोलू नका.
कोण टनभर खातय कोन किलोभर हे
कोण टनभर खातय कोन किलोभर हे तुमचं तुम्ही ठरवायचं का? ऑन व्हॉट बेसिस?
शवपेटी, शस्त्रागार घोटाळा,
शवपेटी, शस्त्रागार घोटाळा, युरीया घोटाळा, पेट्रोल पंप घोटाळा ज्यामुळे राम नाईकला घरी बसावे लागले आणि सर्वात महत्वपूर्ण की अतिरेकी सोडून देणे
हे भाजपाचे कृष्णकृत्ये कांग्रेस पेक्षा जास्त आहे
>>कुठला, कसला, कोणता घोटाळा?
>>कुठला, कसला, कोणता घोटाळा? उगाच खोटे बोलू नका.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>कोण टनभर खातय कोन किलोभर हे तुमचं तुम्ही ठरवायचं का? ऑन व्हॉट बेसिस?
मागील अनेक वर्षात झालेले घोटाळे आणि भ्रष्टाचार याची तुलना करून पहा नविन सरकारच्या काळाशी
>>हे भाजपाचे कृष्णकृत्ये
>>हे भाजपाचे कृष्णकृत्ये कांग्रेस पेक्षा जास्त आहे
असेल बुवा, आपला काही अभ्यास नाही तुमच्याएवढा,
पण आधीचे घोटाळे आणि हे तुम्ही सांगता ते, त्याचा एक तुलनात्मक तक्ता करून बघा (तुमचा तुम्हीच)
नविन सरकार? राफेल घोटाळा,
नविन सरकार? राफेल घोटाळा, तांदूळ घोटाळा, व्यापम, चिक्की घोटाळा, इव्हीएम, पुस्तके खरेदी घोटाळा, जज लोया
अजून सांगू का? की याने "नविन सरकार" बद्दलचे पोट भरेल?
वाजपेयी ने 4 वर्षात इतके केले
वाजपेयी ने 4 वर्षात इतके केले आता 12 वर्ष आणि अवघे 4 वर्ष यात सरासरी काढून तुमचे तुम्हीच बघा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages