मंदिर वही बनायेंगे ... घडामोडी वेगात !

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 February, 2018 - 16:17

मंदिर वही बनायेंगे..
पर तारीख नही बतायेंगे..
म्हटलं तर वर्षानुवर्षे राममंदिराचे घोंगडे भिजत पडलेय. मोदी सरकार आले आणि आशा निर्माण झाली. तरी गेले तीनेक वर्षे टोलवाटोलवीच चालू होती. पण आता गेल्या काही काळात घडामोडींनी वेग पकडल्याचे दिसत आहे. २०१९ निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नोटाबंदी आणि जीएसटीने उद्भवलेल्या लोकक्षोभावर उतारा म्हणून सरकारला या एका वचनपूर्तींची नितांत गरजही आहेच. त्यामुळे सरकारतर्फे यंदा ठोस प्रयत्न होण्याची शक्यता आहे. केस कोर्टात आहे. तिथून निकाल लागायची शक्यता वर्तवली जात आहेच. पण आता कोर्टाच्या बाहेरही सेटलमेंट होण्याची लक्षणे दिसत आहेत.
या संदर्भात नुकतेच मुस्लिम नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
एकूण वातावरण पाहता माझ्या काही हिंदुत्ववादी फेसबूकीय मित्रांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसतेय.
मी स्वत: नास्तिक आहे. त्यामुळे रामंदीराशी तसे मला काही घेणेदेणे नाही.
तसेच मी कुठलाही धर्म मानत नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम वादातही रस नाही.
मात्र एक माणूस, एक भारतीय, आणि मुख्यत्वे एक मुंबईकर म्हणून नक्कीच हा विषय जवळचा आहे.
कारण जेव्हा बाबरी मशीद पडली होती तेव्हा सर्वात पहिले मुंबई पेटली होती. त्यातही आम्ही दक्षिण मुंबईकर असल्याने काकामामांकडून त्या दंगलीच्या बरेच कटू आठवणी ऐकल्या आहेत. तोडफोड, जाळपोळ, लूटमार, आपले काहीही व्यक्तीगत वैर नसताना एकमेकांच्या धर्माची माणसे मारणे, माणसं वेडी झाली होती... हे ऐकताना असे वाटायचे की तो काळ वेगळाच होता. आता मुंबईत असले काही घडणार नाही. पण मध्यंतरी झालेल्या जातीय तणावानंतर कळून चुकले की राजकीय ईच्छाशक्तीने ठरवले तर काहीही घडू शकते. हे प्रकरण कसेही वळण घेऊ शकते. त्यामुळेच या घडामोडींवर लक्ष ठेवायला हा धागा ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची 'दोन मारा पण फौजदार म्हणा' अशी परिस्थिती झाली आहे का?

नवीन Submitted by वंदन
तुमची डोळे बंद करून बसल्याने मांजर खाणार नाही असे समजणाऱ्या कबूतरा सारखी स्थिती झाली आहे

Submitted by Zankar on 16 February, 2018 - 00:54
-- चांगले आहे. मग चालुद्या द्वेषपेरणी. होउ द्यात दंगे. मरु द्या सामान्य आणि निरपराध. गृहयुद्धच हवे आहेना?

चांगले आहे. मग चालुद्या द्वेषपेरणी. होउ द्यात दंगे. मरु द्या सामान्य आणि निरपराध. गृहयुद्धच हवे आहेना?

कुणाला वेगळा देश हवा होता/हवा आहे ह्याचा जरा शोध घ्या, म्हणजे कोण दंगल गृह युद्ध ला उत्सुक आहे हे कळेल, ज्या भोळ्या भाबड्या लोकांना असे वाटत होते की एकदा फाळणी झाली की मग शांतपणे राहता येईल त्यांचा अपेक्षा भंग झाला आहे की नाही?

कुणाला वेगळा देश हवा होता/हवा आहे ह्याचा जरा शोध घ्या>>>
सावरकर.. त्यांनीच द्विराष्ट्राची संकल्पना सर्वप्रथम मांडली

धर्माचे आधारे आधीच 2 देश निर्माण झाले आहेत, त्यामुळे त्या देशात असलेल्या धर्माचे ह्या देशात असलेल्या धार्मिक स्थानांवर कुठलाही नैतिक अधिकार असूच शकत नाही

सावरकर.. त्यांनीच द्विराष्ट्राची संकल्पना सर्वप्रथम मांडली>>>>
कृपया संदर्भ दिल्यास फार बरे होईल!!!

कृपया संदर्भ दिल्यास फार बरे होईल!!!
Submitted by विक्षिप्त_मुलगा on 16 February, 2018 - 12:32

<<

संदर्भ कश्याशी खातात, ते यांच्या सारख्यांना कळले तरी पुरे.

संदर्भ कश्याशी खातात, ते यांच्या सारख्यांना कळले तरी पुरे.
Submitted by अनिरुध्द.. on 16 February, 2018 - 13:10

अहो, संदर्भाचे सोडून द्या, आधी प्रतिक्रियेतील मग्रुरी तर पहा!!!

@ admin, वेमा - अशा मुजोर प्रतिक्रिया देणाऱ्या आयडींची नोंद घेण्यात यावी.

चल रे निघ .. तुझ्या सारख्यांना उत्तर देत नाही. फुट इथुन
माझी मर्जी ..टिनपाटांना उत्तरे देत नाही. पुन्हा प्रश्न विचारुन स्वतःचा अपमान करुन घ्यावा.

द्विराष्ट्राची संकल्पना सावरकर यंची होती आणि कायम राहिल

कृपया संदर्भ दिल्यास फार बरे होईल!!! >>>>>>>> आधी अनेक प्रश्न विचारले गेले आहेत त्यांची उत्तरे द्या आणी संदर्भ द्या.

राहुल कुठल्या टिनपाटाला उत्तरे देत आहे? मला तर कोणीच दिसत नाही. जे स्वतःच्या पोस्टीवर ठाम नसतात अश्या पळपुट्यांकडे दुर्लक्ष करावे Wink

चल रे निघ .. तुझ्या सारख्यांना उत्तर देत नाही. फुट इथुन
माझी मर्जी ..टिनपाटांना उत्तरे देत नाही. पुन्हा प्रश्न विचारुन स्वतःचा अपमान करुन घ्यावा.>>>
.
.
ठीक आहे, पुन्हा विचारतो, वाट्टेल तितका अपमान करा! माझी काहीही हरकत नाही!
सावरकरांनी द्विराष्ट्राची संकल्पना मांडली याचा संदर्भ काय?

ओ. टाकाकी गुगलवर
नवीन Submitted by वंदन on 16 February, 2018 - 14:19>>>

नंतर पुन्हा तुम्हीच म्हणाल, गुगल वरील माहिती विश्वासार्ह नसते म्हणून
(रच्याक मला इतकी सोज्वळ प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती, अपमानकारक प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत!)

अरेच्चा. गुगल नको? मग संदर्भ म्हणून बेसिक इतिहास वाचायला सांगितला आहे ते कधी करणार? ते तुमचं तुम्ही करायला लागणार आहे.

धर्माचे आधारे आधीच 2 देश निर्माण झाले आहेत, त्यामुळे त्या देशात असलेल्या धर्माचे ह्या देशात असलेल्या धार्मिक स्थानांवर कुठलाही नैतिक अधिकार असूच शकत नाही
<<
नैतिक वगैरे कशाशी खातात ते भाजपवाल्यांनी शिकवायचा प्रयत्न करू नये.
फाळणीच्या वेळी जसे खूप भारतीय मुसलमान इकडेच राहिले तसेच अनेक हिंदूही पाकिस्तानात आहेत.

प्लस नैतिक आधार ही काय भानगड आहे? नीतीबीतीचा काही संबंधच नाही. इथे अयोध्येच्या तलाठ्याद्वारे जमीनीची मालकी ठरवण्याचा वाद सुरू आहे. बेसिक अन सिंपल. उद्या उठून, तुम्ही भाजपेयी आहात, म्हणून तुमचा जगण्यावर नैतिक अधिकार नाही, असे डिक्लेअर करून तुमचा जीव घ्यायचा मोगलाई कायदा आणलेला चालेल का?

फाळणीच्या वेळी जसे खूप भारतीय मुसलमान इकडेच राहिले तसेच अनेक हिंदूही पाकिस्तानात आहेत.
<<

@ आ.रा.रा.
फाळणीनंतर आजपर्यंत हिंदूस्थानात राहाणार्‍या मुसलमान जनतेची टक्केवारी किती आहे व फाळणी नंतर पाकिस्तानात राहाणार्‍या हिंदू जनतेची टक्केवारी किती आहे आहे, हे जरा सांगता का ?

त्याचा इथे काय संबंध? तुमच्यापाशी दुसरं काही नसलं, तरी गूगल आहे ना? वापरून तुम्हीच सांगा बरं टक्केवारी.

मुद्दा हिंदू किती तो नाही, नैतिकतेचा आहे, जी भाजपेयी़ंकडे औषधालाही नाही.

>>धर्माचे आधारे आधीच 2 देश निर्माण झाले आहेत, त्यामुळे त्या देशात असलेल्या धर्माचे ह्या देशात असलेल्या धार्मिक स्थानांवर कुठलाही नैतिक अधिकार असूच शकत नाही>>
अतिशय बेजबाबदार आणि द्वेष पसरवणारे विधान! ब्रिटिश इंडियाची फाळणी झाल्यावर पाकिस्तान हे जरी मुस्लिम राष्ट्र झाले तरी भारत देश हाधर्म निरपेक्ष प्रजासत्ताक आहे भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरीकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि धार्मिक स्थानांवर अधिकार वगैरे ठरवायला कायद्यची चौकट आणि न्यायालय आहे. किती टक्के लोकं कुठल्या धर्माचे याचा प्रश्नच येत नाही, संविधान महत्वाचे!

धन्यवाद. पण हिंदुराष्ट्राचे विखारी बाळकडू पाजल्यामुळे मतिभ्रष्ट झालेले झोंबी काही समजण्याच्या पलिकडे गेले आहेत.

फाळणीनंतर आजपर्यंत हिंदूस्थानात राहाणार्‍या मुसलमान जनतेची टक्केवारी किती आहे व फाळणी नंतर पाकिस्तानात राहाणार्‍या हिंदू जनतेची टक्केवारी किती आहे आहे, हे जरा सांगता का ? >>
भारताचा हिंदू पाकिस्तान झाला नाही याबद्दल खेद ????

जसा पाकिस्तान झाला तसा हिंदुस्तान झालाच पाहिजे
मुस्लिम53 राष्ट्रे आहेत हिंदू ना 1 ही का नको?

Pages