मंदिर वही बनायेंगे..
पर तारीख नही बतायेंगे..
म्हटलं तर वर्षानुवर्षे राममंदिराचे घोंगडे भिजत पडलेय. मोदी सरकार आले आणि आशा निर्माण झाली. तरी गेले तीनेक वर्षे टोलवाटोलवीच चालू होती. पण आता गेल्या काही काळात घडामोडींनी वेग पकडल्याचे दिसत आहे. २०१९ निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नोटाबंदी आणि जीएसटीने उद्भवलेल्या लोकक्षोभावर उतारा म्हणून सरकारला या एका वचनपूर्तींची नितांत गरजही आहेच. त्यामुळे सरकारतर्फे यंदा ठोस प्रयत्न होण्याची शक्यता आहे. केस कोर्टात आहे. तिथून निकाल लागायची शक्यता वर्तवली जात आहेच. पण आता कोर्टाच्या बाहेरही सेटलमेंट होण्याची लक्षणे दिसत आहेत.
या संदर्भात नुकतेच मुस्लिम नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
एकूण वातावरण पाहता माझ्या काही हिंदुत्ववादी फेसबूकीय मित्रांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसतेय.
मी स्वत: नास्तिक आहे. त्यामुळे रामंदीराशी तसे मला काही घेणेदेणे नाही.
तसेच मी कुठलाही धर्म मानत नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम वादातही रस नाही.
मात्र एक माणूस, एक भारतीय, आणि मुख्यत्वे एक मुंबईकर म्हणून नक्कीच हा विषय जवळचा आहे.
कारण जेव्हा बाबरी मशीद पडली होती तेव्हा सर्वात पहिले मुंबई पेटली होती. त्यातही आम्ही दक्षिण मुंबईकर असल्याने काकामामांकडून त्या दंगलीच्या बरेच कटू आठवणी ऐकल्या आहेत. तोडफोड, जाळपोळ, लूटमार, आपले काहीही व्यक्तीगत वैर नसताना एकमेकांच्या धर्माची माणसे मारणे, माणसं वेडी झाली होती... हे ऐकताना असे वाटायचे की तो काळ वेगळाच होता. आता मुंबईत असले काही घडणार नाही. पण मध्यंतरी झालेल्या जातीय तणावानंतर कळून चुकले की राजकीय ईच्छाशक्तीने ठरवले तर काहीही घडू शकते. हे प्रकरण कसेही वळण घेऊ शकते. त्यामुळेच या घडामोडींवर लक्ष ठेवायला हा धागा ..
मंदिर वही बनायेंगे ... घडामोडी वेगात !
Submitted by ऋन्मेऽऽष on 9 February, 2018 - 16:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नथुरामवर २५०+ झालेत......
नथुरामवर २५०+ झालेत......
आता या धाग्याचा उद्देश लवकर साध्य होवो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
sonalisl+999
sonalisl+999
>>मी स्वत: नास्तिक आहे.
>>मी स्वत: नास्तिक आहे. त्यामुळे रामंदीराशी तसे मला काही घेणेदेणे नाही.
तसेच मी कुठलाही धर्म मानत नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम वादातही रस नाही.>> मग इकडे धागा काढायचं प्रयोजन? मायबोलीवर नवीन नाहीस तेव्हा इथे राजकारण धाग्यांवर काय होतं हे माहित असताना मुद्दाम काड्या कशाला? ज्यांना देणंघेणं आहे ते बघून घेतील म्हणून सोडून देता आलं असतंच पण मग तुझ्या नावावरचा एक धागा नक्कीच कमी झाला असता नाही का? ये नॉ चॉलबे.
ऋ चा देवावर विश्वास बसला होता
ऋ चा देवावर विश्वास बसला होता. हा घ्या पुरावा.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
https://www.maayboli.com/node/63229
पुढे काय झाले ते मला माहिती नाही अन तो सांगणार नाही.
बर ते असू द्या. नास्तिक असणे
बर ते असू द्या. नास्तिक असणे हा शाप असतो हे पण त्याला मान्य आहे.
https://www.maayboli.com/node/64019
>> त्यामुळे सरकारतर्फे यंदा
>> त्यामुळे सरकारतर्फे यंदा ठोस प्रयत्न होण्याची शक्यता आहे. केस कोर्टात आहे. तिथून निकाल लागायची शक्यता वर्तवली जात आहेच. पण आता कोर्टाच्या बाहेरही सेटलमेंट होण्याची लक्षणे दिसत आहेत.
या संदर्भात नुकतेच मुस्लिम नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. <<
एकूण वातावरण पाहता माझ्या काही हिंदुत्ववादी फेसबूकीय मित्रांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसतेय. << याला म्हणतात खरा हिंदुत्ववादी सपोर्टर.
मग पुढे नेहेमीच्या टेम्प्लेट मधली संतुलितपणासाठीची मी यांव आहे आणि त्याव नाही ही सेल्फ प्रोक्लेम्ड फोडणी.
या धागाकर्त्याचे माबोवारील धागे बघता ते जे स्वतःला संबोधतात त्याच्या अगदी टोकाचं विरुद्ध आचरण आहे हे जगजाहीर आहे, पण रोज म्हणत राहिलं की मी कसा लिबरल, मी कसा ओपन की मांजरीच्या डोळे मिटून दुध पिण्याची गोष्ट वाचतोय असा फील येतो. (आता यावर ही कुठली गोष्ट ते याना माहित नसेल आणि ते विचारलं जाईलच)
आधी जातीत आणि आता धर्मात टोकाचा तणाव निर्माण करण्यासाठी मायबोली व्यासपीठ वापरलं जातंय याचं दुःख वाटतं.
नेट दन्गेखोरान्पासुन सावधान.
नेट दन्गेखोरान्पासुन सावधान.
अत्यन्त स्फोटक असा विषय आहे. स्फोटक धागे काढायचे, आगी लावायच्या आणि मस्तपैकी मजा बघायची किती आय ड्यान्ची आहुती त्यात पडते.
बाकी ऋ च धागा hit करण्याच कसब
बाकी ऋ च धागा hit करण्याच कसब वाखाणण्याजोगे आहे.धागा कसा चर्चेत ठेवावा याचा धागा काढावा ही विनंती
आधी जातीत आणि आता धर्मात
आधी जातीत आणि आता धर्मात टोकाचा तणाव निर्माण करण्यासाठी मायबोली व्यासपीठ वापरलं जातंय याचं दुःख वाटतं.>>>>>>
सहमत. साळसूदपणा दाखवत हे सगळं होतंय.
रुन्मेष हा आयडी इरिटेटिंग आहे हे बऱ्याच जणांनी या आधी म्हटलेय. पण मला तो अनेकदा निरुपद्रवी वाटलेला, रिकामटेकड्या माणसाचे उद्योग वाटले.
पण आता लक्षात येतेय की दुसऱ्या आईडीने गुडी गुडी वागणाऱ्या एकाचा हा डुप्लिकेट आयडी त्याची विचित्र गरज आहे. माणसे इंटरनेटची गुलाम होतात हे वाचले होते. आज पाहतेय की आपल्या धाग्याला जास्त प्रतिसाद मिळावेत ह्या विकृत इच्छेने हा आयडी सगळे माहीत असूनही असले धागे काढतो.
धागा बघून किळस वाटली ह्या आईडीची. या आईडीच्या धाग्यावर माझा हा शेवटचा प्रतिसाद.
अमितव शी सहमत. काडी टाकून आग
अमितव शी सहमत. काडी टाकून आग लावणे , गंमत बघणे हे याधी अनेकदा उघडपणे मान्य केलेही आहे त्याने. डिसगस्टिंग मेन्टॅलिटी आहे. पण कोणाला ना कोणाला पुळका येतो. कोणाला तो हहपुवा विनोदी वाटतो, कोणाला धाग्यातला फक्त वाद घालण्यायोग्य विषय दिसतो. त्यामुळे शे -दोनशे प्रतिसाद येतातच
असेच चालू राहणार म्हणायचं अन इग्नोरायचं झालं. ( मीही इतके होऊन एक प्रतिसाद वाढवलाच
)
वर्षानुवर्षे राममंदिराचे
वर्षानुवर्षे राममंदिराचे घोंगडे भिजत पडलेय. >>>
या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका नेहमीच वादग्रस्त अन संशयास्पद राहिली आहे. कोर्टाने निष्पक्ष पणे समोर उपलब्ध तथ्ये , पुरावे अन घटनांचा आढावा घेवून त्वरित निकाल देणे अपेक्षित असते . गेल्या महिन्यात घडलेल्या जजेस च्या पत्रकार परिषदे सारख्या घटनांमुळे संशयाची सुई कोर्टाकडेच वळत आहे. कोणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठी अथवा अल्पसंख्यांकांच्या हिंसक प्रतिक्रिया येतील या भीतीपोटी अथवा दडपणाखाली सुप्रीम कोर्ट ह्या प्रकरणात चालढकल व वेळकाढूपणा करत आहे . अनेक बिनमहत्त्व्वाच्या बाबींवर रात्री अपरात्री देखील सेशन बोलावून चुटकीसरशी "निकाल" लावणार्या कोर्टाला या बहुसंख्य हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निकाल द्यायला ६०-७० वर्षे पुरत नाहीत याला काय म्हणावे ?
घोर कलयुग !
नथुराम नावाचे वादळ चालु
नथुराम नावाचे फुसके वादळ चालु असतानाच नवीन काडी ... नवीन आग.. लगे रहो ऋन्मेऽऽष !
हिंदुंच्या देशात राममंदीर
हिंदुंच्या देशात राममंदीर झालेच पाहिजे. राज्यघटना, न्यायालये, संसद सर्व नंतर आले आहेत. आधीपासून राम या जनामनात होता, आता अधिक वेळ दवडणे नाहीच. जय श्रीराम.
काडी !
काडी !
काय असते काडी ??
एखाद्या विषयावर माहितीपूर्ण पोस्ट येत आहेत तिथे मध्येच मोदींच्या मुळे असे झाले आणि कॉंग्रेसच्या काळात तसे होते म्हणत राजकारण आणने ही असते काडी. एखादी विषयाशी संबंध नसलेली वा अनावश्यक जातीयवादी पोस्ट टाकणे ही असते काडी.
किंवा एखादा नवीन धागा काढून धाग्याच्या हेडर पोस्ट मध्ये प्रक्षोभक विचार मांडून त्याअनुषंगानेच या विषयावर चर्चा होईल हे बघणे ही असते काडी.
पण एखादा विषयच कसा असू शकतो काडी?
अश्याने तर चालू घडामोडी आणि राजकारण विषयातील एकूण एक धागा ठरेल काडी. कारण सध्या अशी स्थिती आहे की साधे मोदी नाव उच्चारले तरी ती होते काडी. ईथेही तेच झालेय, साधे राम नाम उच्चारले तरी ती ठरतेय काडी.
मागेही मी म्हटलेले, एखाद्या वादग्रस्त विषयावर धागा काढताना "काडी करतो" हा आरोप धागाकर्त्यावर होणारच. पण म्हणून अश्या विषयांवर चर्चा होऊच नये हे चुकीचे आहे. कोणीतरी हा आरोप पचवायची मनाची तयारी करून धागा काढायला हवाच. कारण अश्या चर्चांसाठी मायबोली हे फेसबूक वगैरे पेक्षा योग्य व्यासपीठापेक्षा आहे असे मला वाटते. फेसबूकवर केवळ आपापल्या जातीधर्माचे, आणि राजकीय संघटनांचे प्रचारक वावरत असतात. बॅटींग एके बॅटीग तर बॉलिंग एके बॉलिंग चालू असते. कोण कोणाला जाब द्यायला बांधील नसतो, कोणाला भाषा सांभाळायची सक्ती नसते, कुठल्याही प्रकारचे मॉडरेशन नसते, काय खरे आणि काय खोटे हे समजायला वाव नसतो. पण मायबोलीवर असे नाहीये किंवा प्रमाण कमी आहे आणि दुसरी बाजूही तिथल्या तिथे समजते. त्यामुळे मला फेसबूक व्हॉटसप वगैरे वर ज्या विषयाबद्दल आणखी जाणून घ्यावेसे वाटते तो मी मुद्दाम मायबोलीवर घेऊन येतो. मध्येच चाळीस पन्नास पोस्टींचा धुरळा ईथेही उडतो हे खरेय. पण नेटाने शे दोनशे पोस्टस वाचल्या तर त्यात बरेच संतुलित किंबहुना माहितीपूर्ण आणि योग्य विचारधारा दाखवणार्या पोस्ट असतातच. ईथेही हा धुरळा खाली बसल्यावर त्या येतीलच. त्या वेचायचे काम आपले.
अमितव, माझ्या लेखातील बातमीचा आणि घटनेचा आढावा घेत दिलेली वाक्ये कोट करत मला हिंदुत्ववादी म्हणने हे मजेशीर आहे. त्यापेक्षा जास्त मजेशीर आहे ते आरोप केल्याच्या थाटात म्हणने. कारण पहिले म्हणजे हिंदुत्ववादी असणे काही गैर नाही, ती केवळ एक विचारसरणी आहे. दुसरे म्हणजे आपण हिंदुत्ववादी आहोत हे लपवणारा खरा हिंदुत्ववादी असू शकतो का? आणि तिसरे म्हणजे माझ्या हिंदुत्ववादी असण्याने वा नसण्याने, ना कोर्टाच्या निर्णयावर काही फरक पडणार आहे ना तुमची विचारसरणी बदलणार आहे. मग सोडून द्या ना..
अरे हो, लेखातील काही वाक्ये महाराष्ट्र टाईम्स मधून कॉपीपेस्ट आहेत. तुम्ही त्यातलेही एक बोल्ड केलेय. आज तुमच्यामुळे महाराष्ट्र टाईम्स हिंदुत्ववादी आहे हे समजले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/muslim-team-meets-sri...
एक कल्पना करा वरील ऋ च्या
एक कल्पना करा वरील ऋ च्या प्रतिसादाच्या पहील्या परीच्छेदात "काडी" ऐवजी "मृत्यू" असे वाचा. बाहुबली १ च्या युध्दाची आठवण होईल.
धन्यवाद पाथ, ते त्याच चालीत
धन्यवाद पाथ, ते त्याच चालीत वाचायचे होते. असो, हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. ईथे राम मंदिराबद्दलच चर्चा ठेवणे उत्तम.
काय असते काडी ??
काय असते काडी ??
एखाद्या विषयावर माहितीपूर्ण पोस्ट येत आहेत तिथे मध्येच मोदींच्या मुळे असे झाले आणि कॉंग्रेसच्या काळात तसे होते म्हणत राजकारण आणने ही असते काडी >>>>>
काडी म्हणजे एखादा विषय काढला तर भांडणे होतील हे पुर्णपणे माहित असताना देखील तो विषय काढणे आणी मग लाबुन भांडण पहाण्यात गम्मत घेणे. जरा कुठे शांत होत आहे असे वाटले की परत एखादे वाक्य टाकणे आणी पेटले की परत मागे सरुन गम्मत पहात बसणे.
समजले का काडेश ? ओह- सौरी - ऋन्मेऽऽष
ऋन्मेषशी सहमत .यात मला नाही
ऋन्मेषशी सहमत .यात मला नाही वाटली काडी. जर त्यांनी या संदर्भातली एकच बाजू पुढे करून दुसरी बाजू कशी त्या तोलामोलाची नाही , हे दाखवून वणवा पेटवला असता; तर ती झाली असती काडी. त्यांनी फक्त हा मुद्दा उपस्थित केलाय. याला काडी म्हणणं चुकीचं आहे, असं मला तरी वाटतं. प्रत्येकानं याबाबतची माहिती सांगून इतरांच्या ज्ञानात भर पाडावी, चालू घडामोडी प्रत्येक बाजूने कळाव्यात, हाच या धाग्यामागचा माफच उद्देश आहे, असं मला वाटतं. तरी काय, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी आपलं माझं प्रामाणिक मत मांडलंय.
चर्चा झालीच पाहिजे..
चर्चा झालीच पाहिजे..
हे असं झालंय मला माहित नव्हते
हे असं झालंय मला माहित नव्हते.. रविशंकर आणि मुस्लिम कमिटी डिस्कशन.
चांगला विषय आहे धाग्याचा . मला तरी वाटते हे प्रकरण सामोपचाराने मिटवता येईल पण मग निवडणुकीसाठी एक मुद्दा कमी होईल त्यामुळे नाही मिटणार प्रकरण.
मलाही काडी वगैरे काही जाणवली
मलाही काडी वगैरे काही जाणवली नाही. निरागस मुखड्याने (मला मुखवटा म्हणावेसे वाटत नाही) आणि दुसऱ्यावर बाण मारण्याचा हेतू न ठेवता काही लिहिले तर त्यात हरकत घेण्यासारखे काय आहे?
काढू दे की धागा. तसेही मायबोलीवर नव्या धाग्यांचे प्रमाण पूर्वीच्या मानाने कमी झालेले जाणवतेय. खेचत असेल टीआरपी तर खेचू दे की. जोपर्यंत हा आयडी विषारी शब्द वापरीत नाही, सहसा कुणाचा अपमान करीत नाही, आपल्यावरील टीकेचा सभ्य शब्दांत आणि शांत सुरात ( टोनमध्ये) प्रतिवाद करतोय तोपर्यंत चालतंय की.
हीरा, तुमच्या अख्ख्या
हीरा, तुमच्या अख्ख्या प्रतिसादाशी अगदी सहमतच. इतक्या निरागस लेखकाचं निष्पाप लिखाण नको म्हणणारे एकेक दुष्ट मेले आयडी. हा लेखक कधीच कुणाचा अपमान करत नाही, कुणाला घालून पाडून, वैयक्तिक पातळीवर लिहित नाही. असं असताना त्याला लिहू नको म्हणणं म्हणजे अत्याचार आहे.
आत्तापण त्याने त्याचे विचार मांडलेलेच नाहीत. त्याला पर्सनली काही घेणंदेणं नाहीये. राममंदिर होवो नाहीतर बाबरी मशिद, हू केअर्स? मुंबईत झालेल्या दंगलींच्या गोष्टी त्याने इथून तिथून ऐकलेल्या सुरस रम्य कहाण्या आहेत. पण इकडे दोन पार्टींमध्ये जो भडका उडेल त्यातून फक्त ज्ञानदान करुन घेणं इतकाच हेतू आहे त्याचा.
बरं, तो नथूराम बीबी वाचलात का? तो ही फक्त कलेचा प्रसार करायला काढला होता म्हणे. लोकांनी नेहमीप्रमाणे कारण नसताना गोंधळ केला.
अॅडमिन, अशा निष्पाप बीबींवर कमेंटींग बंद करायची सोय आणा जशी फेसबुकवर आहे.
मलाही काडी वगैरे जाणवली नाही.
मलाही काडी वगैरे जाणवली नाही.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान केलेल्या दोन विधानांमुळे कदाचित सामोपचाराची लगबग सुरु झाली असावी,
१ हा खटला आम्ही टायटल सूट प्रमाणे चालवणार. हाय कोर्टाने २०१० मध्ये दिलेल्या निकालात हा निकष वापरला गेला नव्हता. निव्वळ टायटल सूट प्रमाणे खटला चालवला तर निकाल मुस्लिमांच्य बाजूने जाण्याची ९०% शक्यता आहे. टायटल सूट कागदोपत्री पुरावा, वहिवाट याच आधारावर चालतात. तिथे श्रद्धा वगैरे भानगड नसते. भारतात माझे घर जिथे आहे तिथे तीनशे वर्षापूर्वी एक मशीद्/चर्च्/देऊळ होते असे अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले तरी निव्वळ टायटल सूट प्रमाणे निर्णय झाला तर तो माझ्या बाजूने लागेल.
२ या खटल्यात आम्ही श्रद्धा ( आस्था) याचा विचार करणार नाही :
Submitted by सायो on 10
Submitted by सायो on 10 February, 2018 - 09:57 >>>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>मलाही काडी वगैरे काही
>>मलाही काडी वगैरे काही जाणवली नाही.<< +१
लेट्स रिफ्रेन फ्रॉम शूटिंग दि मेसेंजर...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हिकडं समदे मॅसेंजरच हायती
हिकडं समदे मॅसेंजरच हायती
हो ना. तो लाख केळीच्या साली
हो ना. तो लाख केळीच्या साली टाकत असेल वाटेवर. पण त्यावर पाय द्यायची काही गरज आहे का? मग पड्ले की आयडी उडतात. फेसबुक व इतरत्र दोन्ही बाजूचे लोक क्लेम करतात की "आमच्या विचारांना मायबोलीवर थारा नाही"![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यात माझे मित्रही आहे बरेच. त्या सर्वांना हे आवाहन- एक आयडी घ्या. माबो च्या नियमांत बसेल असेच वाद घाला. बघा तुमचा आयडी उडतो का. तरीही उडला तर जरूर लिहा. माझ्या आठवणीत (सुमारे १०-१२ वर्षे) माबोच्या नियमांत लिहीणार्या कोणाचाही आयडी त्यातील मतांमुळे/विचारांमुळे उडालेला नाही. एकही.
त्याचे काय आहे, आपण समाजात एक
त्याचे काय आहे, आपण समाजात एक वेगळाच मुखवटा घेऊन असतो. अनेक विषयांवर खरे तर आपले विचार अत्यंत जहाल, अत्यंत उलट सुलट असतात, ते उघडपणे सांगता येत नाहीत. पण त्यामुळे मनाचा कोंडमारा होतो. इन्टरनेट हे चांगले माध्यम आहे - इथे खरे नाव न सांगता लिहिता येते, मग मनमोकळेपणे मनातली सगळी घाण इथे ओकावी. लोक आय डी ला शिव्या देतील. मग जास्त झाले तर दुसर्या आय डी ने परत यायचे. काही पण लिहून बघावे - लोक चुका काढायला तत्पर असतातच.
<<<आयडी त्यातील मतांमुळे
<<<आयडी त्यातील मतांमुळे/विचारांमुळे उडालेला नाही. एकही.>>>
मग बरेच आय डी कशामुळे उडले? मते पटली नाहीत म्हणून की मते व्यक्त करायची भाषा आवडली नाही म्हणून?
तो लाख केळीच्या साली टाकत
तो लाख केळीच्या साली टाकत असेल वाटेवर. पण त्यावर पाय द्यायची काही गरज आहे का? >>>> लाखो केळिच्या साली टाकल्या वाटेवर तर त्यावर पाय न टाकता चालुन दाखवा तुम्हि .!
Pages