लहानपणापासुन नारायण उर्फ नारुला साप या प्राण्याबद्दल खुप प्रेम. त्याला डिस्कवरी चैनेल वरील साप पाळावेसे वाटत. मात्र जसजस त्याच वय वाढु लागल. आणि प्रत्यक्ष आयुष्यात सापांशी संपर्क येऊ लागला तसे कळुन चुकले साप हा काही मांजरासारखा पाळीव प्राणी नाही. आणि योगायोग म्हणा किंवा आणखी काही त्याला सारखे साप दिसत. इतके कि त्याच्या प्रेमाची जागा भीतीने घेतली. त्याच्या गावात जर कोणी गुरुवारी मांसाहार केला तर त्याला सापाचे दर्शन होते. अशी बऱ्याचजणांनी अनुभवलेली अंधश्रद्धा होती. या भीतीने गावातील कोणीही या दिवशी मांसाहार करत नव्हते. आणि जरी केलेच तरी त्याला दुसऱ्या दिवशी हमखास सापाचे दर्शन व्हायचेच्. या सापाला त्याने चेष्टेत खबऱ्या असे नाव दिले होते. हा आयुष्यात नारुने मांसाहार न करताही पहिल्यांदा अगदी जवळुन पाहिलेला साप.
तो दहावीत असतानाची गोष्ट एकदा झाडे लावायची म्हणुन त्याने दहा बारा रोपे गोळा केली. त्यासाठी माती हवी म्हणुन एका शेतात गेला. शेतातुन दोन पोती माती गोळा केली. त्यादिवशी खुप श्रमदान झाले त्यामुळे ती आणलेली दोन पोती तशीच दोन दिवस पडुन राहिली. तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याने ती पोती जमिनीवर रिकामी केली. तेव्हा त्यात चार लहान साप मेलेल्या अवस्थेत सापडले. बालमनाच्या नारुला या गोष्टीचे खुप वाईट वाटले. आपल्याकडुन सापाची चार पिल्ले नकळत मेली याचे त्याला खुप दु:ख झाले त्यावेळी त्याने मनाशी पक्के केले की कधीही साप मारायचा नाही. बरं नारु जर बाहेरगावी गेला तर तिथेही त्याचा साप त्याची पाठ सोडत नसत. नारु एकदा सुट्टिसाठी बहिणीच्या गावी राहायला गेला. तिच्या घरी गेल्यावर बॅग ठेवली हातपाय धुण्यासाठी म्हणुन बाथरुम मध्ये गेला. अचानक बहिणिचा साप साप असा ओरडण्याचा आवाज आला. नारु पटकन बाहेर आला. बहिणीचा पाय सापावर पडला होता.
"नशिब सापाने दंश केला नाही." इति बहीण
"हो ना वाचला बिचारा" इति त्याचे भाऊजी (हळु आवाजात) त्यानंतर दोघांनीही मोर्चा नारुकडे वळवला.
"अरे वा मित्र पण आणलेत बरोबर" इति दोघेही
त्याच्या भाऊजींचे एक मित्र साप पकडत. एक दिवस सापांवरच बोलता बोलता अचानक त्यांनी त्याच्या हातात एक कापडात बांधलेली प्लास्टिक बरणी दिली. बोलण्याच्या नादात त्यात काय आहे हे त्याने विचारलही नाही. तेवढ्यात त्या मित्राला एके ठिकाणी साप पकडण्यासाठी फोन आला. नारुला आज प्रत्यक्षात साप पकडताना पाहायला मिळणार म्हणुन आनंद वाटत होता.यांच्याबरोबर आपणही साप पकडायला शिकायचे असे त्याने मनाशी ठरवले. एका बाईकवर पुढे तो मित्र त्यांनंतर नारु त्याच्या हातात बरणी आणि मागे अजुन एक मित्र असे तिघेजण बसलेले. अचानक बाईक एका शेताजवळ थांबवली आणि मागच्या मित्राने बसल्याबसल्या नारुच्या हातातील बरणी घेतली व ती बरणी उलटी केली. बरणीत साप आहे हे नारुला कळायला उशीर लागला नाही.आपण इतकावेळ एका सापाला उराशी कवटाळुन बसलेलो या विचाराने नारुला हसावे कि रडावे कळेना. त्या सापाला बरणीतुन बाहेर यायचे नव्हते बहुतेक कारण तो ती बरणी सोडायला तयार नव्हता. अचानक त्या सापाची पकड निसटली आणी तो अर्ध्यापर्यंत बाहेर आला. लोंबकळत असताना एकदा नारुच्या पायावर उतरण्याचा ही प्रयत्न केला नारु बिचारा थरथर कापत जितक अंग चोरता येईल तितक चोरण्याचा प्रयत्न करत होता. एकदाचा साप खाली पडला व शेतात दिसेनासा झाला. नारुला हायसे वाटले. पण जिथे साप पकडायला जाणार होता तिथे काही साप मिळाला नाही. त्यामुळे नारुला खुप बरे वाटले. पण पुन्हा कधी नारु त्यांच्याबरोबर साप पकडायला गेला नाही. पुढे जेव्हा नारु नोकरीला लागला. तेव्हा नारुचा नारायण साहेब झाला. तिथेही नारु आणि सापाची दृढ मैत्री जशीच्या तशी टिकुन राहीली. कंपनीने जेथे प्रोजेक्ट चालु केला होता. त्या प्रोजेक्ट साठी कंपनीने सापांची अनेक वारुळे उध्वस्त् केली असावीत बहुतेक काऱण रोज किमान तीन साप तरी त्याला दिसायचेच. कंपनीचे इतर कर्मचारी साईट वर असत आणि ओफिसात नारु आणि सिक्युरीटी गार्ड असे दोघेच असत. रोज ऒफिसमध्ये पाऊल ठेवले की नारु सिक्युरिटी गार्ड ची काठी घ्यायचा. आणि अख्ख्या ऒफिसभर काठी वाजवत फिरायचा. समजा जर साप असेल तर तो साळसुदपणे कधी मुख्य दरवाज्यातुन किंवा मागील दरवाज्यातुन बाहेर जायचा. एकदा महत्वाचे काम होते म्हणुन काहिही न पाहता खुर्चीवर जाऊन बसला टेबलाच्या ड्रॊवरचा दरवाजा थोडा उघडा होता. त्यातील एक फाईल काढण्यासाठी म्हणुन तो पुर्ण उघडला. सवयीने आत साप आहे का ते पाहीले. आणि आत बसलेला साप हि सवय झाल्यासारखे नारुकडे पाहत होता. नारुने झटकन दोन्ही हातानी खुर्चीला मागे ढकलले. साप ड्रॊवर मधुन अतिशय शांतपणे बाहेर आला. त्याने सिक्युरीटी गार्ड ला हाक मारली. गार्ड ने तो साप पाहिला. त्याच्या हातात काठी होती. ती काठी त्याने डाव्या हातातुन उजव्या हातात घेतली. मग काखेत कोंबली. मग डावा आणि उजवा दोन्ही हात जोडुन त्या सापासमोर नतमस्तक झाला.. तो सापही आशिर्वाद दिल्यासारखा पाहुन निघुन गेला. नारु हे सर्व पाहतच बसला.
मोबाईलवर एकदा असाच फोन वर बोलत तो ऒफिसच्या मागे गेला. एका कंपाउंड ला टेकुन उभारला. अचानक आपल्या बाजुला काहीतरी असल्याचे जाणवले. वळुन पाहिले तर एक चार फुटाचा साप त्याचे फोन वरील बोलणे लक्ष देऊन ऐकत होता. त्याने फोन कट केला आणि लगेच सावध झाला. आता साप आणि नारु एक सापाचा आणि एक त्याचा असे दोन हाताच्या अंतरावर उभे होते. इकडे नारुने एका हाताची मुठ वळली कारण दुसर्या हातात मोबाईल होता त्यामुळे ती वळता आली नाही.. तिकडे सापानेही आपला फणा अजुन उंच केला.सापाने नारुकडे रोखुन पाहिले. नारुने सापाकडे रोखुन पाहीले. आणि क्षणार्धात त्याने तिकडे व नारुने इकडे उडी मारली व एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पळु लागले. नारुने लगेच गार्ड ला हाक मारली. गार्ड काय डोक्याला ताप आहे असा चेहरा करुन आला त्यालाही सापाबद्दल सांगितले तर तो वैतागुन म्हणाला जवळजवळ ओरडला "साहेब, तुम्हाला भास झाला आसल." कारण गार्ड येईपर्यंत तो साप पसार झाला होता. तरीही गार्ड ला थोडी काळजी वाटली म्हणुन त्याने एका दर्ग्याचा अंगारा.म्हसोबाचा अंगारा,आणि एका दर्ग्याची वाळु तीनही एकत्र करुन ऒफिसच्या भिंतिच्या कडेकडेने अगदी व्यवस्थित पसरवली. आता पुन्हा कधीच साप येणार नाही हे त्याने ठासुन सांगितले. आणि ते पुढचे आठवडाभर खरेही ठरले. नारु ऒफिसमधे आता निर्धास्तपणे बसत होता. असाच एक दिवस ऒफिसात कॊम्प्युटर मधे डोक खुपसुन बसला असताना आपल्या डोक्याच्या वरच्या बाजुला काहीतरी सरकत असल्यासारखे वाटले. वर पाहिले. तर आठवड्याभरापुर्वीचा चार फुटी साप देवालाही फसवुन ऒफिसच्या ऍंगल वरुन लोंबकळत स्वत:ला नारुच्या डोक्यावर पडण्यापासुन वाचवत होता. नारु सावकाश तेथुन बाजुला झाला. गार्ड ला बोलावले. गार्ड् पुन्हा काय वैताग आहे. असा चेहरा करुन आला. पण जेव्हा त्याने त्या सापाला लोंबकळताना पाहिले तेव्हा तो ही प्रचंड घाबरला. पुन्हा त्याने हातातली काठी डाव्या हातातुन उजव्या हातात घेतली. मात्र यावेळी त्याने काठी काखेत न कोंबता दरवाज्याला टेकवुन ठेवली. आणि मागच्यावेळेपेक्षा जास्त् भक्तिभावाने हात जोडले. आणि म्हणाला"देवा, सायबांच काय चुकल आसल तर् माफ करा पण पुन्हा यु नकासा". तो सापही मागच्यावेळेसारखाच आशिर्वाद दिल्यासारखाच चेहरा करुन निघुन गेला.
जिथे नारु तिथे साप हे आता जवळजवळ समीकरणच झाले होते. सापांच्या भीतीने नारु सतत काळजीत राहु लागला. पायात एखादी दोरी जरी वळवळली तरी साप म्हणुन दचकायचा. ऒफिसात असताना तो नेहमी खुर्चीवर मांडी घालुन बसलेला असे. एखादा साप बुटात जाऊन बसेल म्हणुन तो बुटही टेबलावर ठेवी. त्याची ही अवस्था पाहुन घरच्यांना काळजी वाटली. घरच्यांनी बळजबरीने नारुला नोकरी सोडायला लावली. नारुनेही जान सलामत तो नोकरी पचास असा विचार करुन नोकरीचा राजीनामा दिला. लगेच त्याला दुसरी चांगली नोकरीही मिळाली. नारुचे नवीन ऒफिस एका बड्या शहरात एका सातमजली इमारतीत सातव्या मजल्यावर होते. आजुबाजुला एकही झाड नव्हते. ऒफिस इतके स्वच्छ् आणि उंचावर होते. की साप यायची आजिबात शक्यता नव्हती. आता आपली सापांपासुन सुटका झाली असे नारुला मनापासुन वाटु लागले.
साधारण एक महिन्यानंतरची गोष्ट. नारु आपल्या नवीन ऒफिसात आनंदात होता. सापांची भीती आता तो पुर्णपणे विसरला होता. ऒफिसातील कर्मचाऱ्यांना आपले सापाबद्दलचे किस्से आभिमानाने सांगत होता. अश्याच एका दुपारी नारु लंच ब्रेकनंतर आपल्या केबीन मध्ये गेला. त्याने बसण्यासाठी आपली खुर्ची आपल्याकडे वळवली. आणि खुर्चीवर वेटोळे घालुन बसलेला साप पाहुन तो झटकन मागे सरकला. मात्र यावेळी तो घाबरला नाही. त्याने बेल मारली व ऒफिसच्या शिपायाला सर्पमित्रांना बोलावुन सापाला पकडण्यास सांगितले. साप अजुनही तेथेच होता. नारुने आपला मोबाईल काढला. सापाबरोबर एक सेल्फी काढला. आणि 'फ्रेंडस फॊरएवर' या हॅशटॅग खाली फेसबुक वर टाकुन दिला.
...समाप्त
फ्रेंडस फॊरएवर
Submitted by Nikhil. on 8 December, 2017 - 22:42
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
#छान कथा
#छान कथा
क्युट आहे गोष्ट.
क्युट आहे गोष्ट.
अरे वा पंडीतजी...कथाही लिहता
अरे वा पंडीतजी...कथाही लिहता तुम्ही...
खुप छान....
छाने गोष्ट. वाचताना मजा आली
छाने गोष्ट. वाचताना मजा आली
पंडितजी रॉक्स
पंडितजी रॉक्स
माझं साप माझा बाळ - नारू
माझा साप माझं बाळ
- नारू
छान जमलीय कथा.
छान जमलीय कथा.
आज मला पण दिसला, घरात येत होता. आमच्या बोक्याने दरवाज्यातून त्याला बाहेर काढताना माझं लक्ष गेलं, मग मी त्या खिडकीतून व्हिडिओ शूट केला नाग होता तो. बोक्यानेही त्याला काही इजा न करता फक्त बाहेर काढला. थोड्या वेळाने गोंधळ ऐकू आला तोच साप काही बायकांनी आणि लहान मुलांना दिसला होता अन् सगळ्यांनी रडायचा गोंधळ घातला.
छान...
छान...
अक्षय,mi anu,अजयजी, पियु
अक्षय,mi anu,अजयजी, पियु,च्रप्स्, ऋन्मेष्,परी,सायुरी सर्वांचे मनापासुन आभार
@अजयजी पहिलाच प्रयत्न् आहे.
वाह पंडितजी खुप मस्त कथा
वाह पंडितजी खुप मस्त कथा
(No subject)
अंबज्ञ, पराग खुप धन्यवाद
अंबज्ञ, पराग खुप धन्यवाद
अरे वा, सुंदर प्रयत्न.
अरे वा, सुंदर प्रयत्न.
पुलेशु!
खुप छान
खुप छान
@नानाकळा, निर्झरा खुप धन्यवाद
@नानाकळा, निर्झरा खुप धन्यवाद
मस्त कथा आज वाचली
मस्त कथा
आज वाचली
छान आहे.
छान आहे.
(No subject)
खुप छान
पुलेशु