Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02
कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल कोणकोणती गाणी झाली ?
काल कोणकोणती गाणी झाली ?
भावे - पाहिले न मी तुला,
भावे - पाहिले न मी तुला, निहीरा - तु ही रे, जुईली - चुपके से लग जा गले, दुबईचा मुलगा - दिल क्या करे जब किसीसे, अनिरुध्द जोशी - मितवा, कहे धडकने तुझसे क्या. इतकी मला माहीत असलेली आणि मधुरा आणि कोल्हापुरचा गझल गाणारा मुलगा, या दोघांची ही गाणी नवीन होती. आठवत नाहीत.
निहीरा नंतर महेश काळ्यांनी तु
निहीरा नंतर महेश काळ्यांनी तु ही रे च्या दोन ओळी म्हटल्या त्या तर...... आहाहा.............
व्वा, आज संध्याकाळी भाग
व्वा, आज संध्याकाळी कालचा भाग अपलोड झाला की बघायला मजा येईल.
निहीरा नंतर महेश काळ्यांनी तु
निहीरा नंतर महेश काळ्यांनी तु ही रे च्या दोन ओळी म्हटल्या त्या तर...... आहाहा.............>>> +१२३
हिंदी गाणी कशी काय?
हिंदी गाणी कशी काय?
मधुरा कुंभार - अधीर् मन झाले
मधुरा कुंभार - अधीर् मन झाले
कोल्हापुरचा गझल गाणारा मुलगा (जाधव) - जीव पिसाटला
अधीर् मन झाले मूळचे श्रेया
अधीर् मन झाले मूळचे श्रेया घोशाल ने अप्रतिम गायले आहे. मधुराचे खूप फिके होते तरी सुद्धा तिला जीनियस मार्क्स कसे?
https://www.youtube.com/watch?v=JLf2YK4Z_oc
काळे जरा जास्तच फिदा आहेत का
काळे जरा जास्तच फिदा आहेत का जोगळेकर बाई वर? गाण्यापेक्षा तिच्या दिसण्यावर, ठेवण, हसण्यावर जरा जास्तच कॉमेंट्स. मागच्या 2 आठवड्यात जरा जास्तच झाल. खूप खटकत ते. जोगळेकर बाई आल्या की महेशच स्माइल पण जरा जास्त खुलत
मोसा, सहमत.
मोसा, सहमत.
काल निहिरा कितीतरी पटींनी उजवी वाटली जुईली पेक्षा, स्तुति जास्तं जुइलीची झाली.
काल अवधूत म्हणे अत्ता पर्यंतचा सर्व स्पर्धकांमधला , सर्वात बेस्ट ! अजिबात नाही वाटलं तसं
त्यातून ‘चुपकेसे ‘ हिंदी गाणं. तेही रेहमानचं, अत्ता पर्यंत किती वेळा किती गायिकांनी गायलेलं ऐकयल, त्यापुढे जुइलीचं फिकं वाटलं.
मला पण जुईली जोगळेकर तितकी
मला पण जुईली जोगळेकर तितकी भारी वाटत नाही जितकी ह्या प्रोग्रॅममध्ये जजेस दाखवतायत. (मला तिला गाताना पाहणे शिक्षा वाटाते. किती तो त्रास पडतो तिला गाताना) महेश काळेने ५ दिले म्हणजे टू मचच !
बाकी, आत्तापर्यंतचा बेस्ट पर्फॉर्मन्स दोनच. शरयू दातेचे अवघा रंग आणि कोसंबीचा पोवाडा.
कोसंबीचा पोवाडा द बेस्ट !
कोसंबीचा पोवाडा द बेस्ट !
<<<मला तिला गाताना पाहणे
<<<मला तिला गाताना पाहणे शिक्षा वाटाते. किती तो त्रास पडतो तिला गाताना
अगदी! मलाच डोळे मिटावेसे वाटतात, तिचं गाणं चालू असताना ती सारेगमप विनर होती म्हणे
माझ्यासाठी अजूनतरी पोवाडाच बेस्ट! मितवा, पाहिले न मी तुला वरच्या कमेंट्स अगदीच माझ्या मनातल्या होत्या
अनिरूद्धने मितवाचे अगदीच
अनिरूद्धने मितवाचे अगदीच शास्त्रीय संगीत करून टाकले. बायदवे, हिंदी सारेगमपमध्ये शफाकत अमानत अलीनेच गायले होते ना मितवा? फार सुंदर होते ते!! मी ते शोधायचा प्रयत्न केला युट्युबवर, अतिशय वाईट क्वालिटीचे व्हिडिओ आले. २००७-८ ला नुसते मराठी कानावर पडले तरी चालेल, समोर पिक्सलाईझ्ड व्हिडिओ आला तरी भक्तीभावाने बघायचे वाट्टं! आता बघवेना..
https://youtu.be/v5DmuW6G7jE
https://youtu.be/v5DmuW6G7jE
हा व्हिडिओ का? शफक़त अमानत अलीची गाणी गाणे सोपे नाहीये. एस्पेशिअली ऊर्दू उच्चार योग्य नसतील तर अगदीच मिळमिळीत होते गाणे! मात्र काहीवेळा शफकत लाईव्ह छान गात नाही.
सॉरी मी शफकत चुकून लिहिलं. मी
सॉरी मी शफकत चुकून लिहिलं. मी म्हणतेय तो नुसता अमानत अली. हा व्हिडिओ. https://youtu.be/DkQ3QK6kcj4
हो, तो आठवतोय
हो, तो आठवतोय
काल मायबोलीच्या वैभव चा पण
काल मायबोलीच्या वैभव चा पण उल्लेख केला अवधूत ने. अभिनंदन.
सूर नवा बघायला मस्त मजा येते आहे पण. काहीही म्हणा साने कलर्स वर गेले आणि एकदम सोन केले.
सीरियल्स पण छान आहेत - घाडगे (आपल्याला असे सासर मिळाले नाही म्हणून आनंद घेत बघायची सीरियल) आणि राधा . झी अगदीच रटाळ झाले आहे, काहीच बघण्यासारखे नाही आता...
घाडगे नाही आवडली मला पण राधा
घाडगे नाही आवडली मला पण राधा प्रेम बरी वाटतेय पण स्लो आहे. सचित आणि वीणा काम आवडलं मला.
इथे वाचून निहिरा गाणे आणि कोसंबी पोवाडा voot वर जाऊन बघावा असं वाटतंय.
संपदा, बस्के,
संपदा, बस्के,
अगदी !
हिंदी गाणी आली कि निहिरा वैशाली इ. हिंदीमधे नाव मिळवणारया स्पर्धकांची सोडून इतरांची लिमिटेशन्स दिसतात.
चुपकेसे, मितवाची खूप सुंदर व्हर्जन्स ऐकली आहेत हिंदी सारेगमप मधे.
मागचा एपिसोड कसा झकास होता, मराठी लोकगीत, एकदम होमपिच वर सगळ्यांचा कॉन्फिडन्स हिता... मिट्टी कि खुशबु वाला.
मलाही जुईलीचं गाणं जितकं ते
मलाही जुईलीचं गाणं जितकं ते म्हणत होते तितकं खास वाटलं नाही. महेशकडून ५ म्हणजे जरा अतिच वाटलं. निहिरा 'तू ही रे' मस्तच गायली. सोलफुल होतं एकदम. मधुराचं 'अधीर मन झाले' सुद्धा काही खास वाटलं नाही. सोमवारच्या बर्याच गाण्यांमध्ये 'टेक्निकल काहीतरी करायला गेले आणि मनीचा भाव फारसा दाखवला नाही' असं वाटलं. अनिरुद्ध किंवा जाधवचं गाणं अगदी 'हे असं म्हणायला सांगितलं म्हणून मी तसं म्हणालो' असं करून गायल्यासारखं वाटलं. मंगळवारचा अजून बघायचा आहे.
ह्या शोमधल्या मुली एकंदरीत सध्या जास्त टॅलेंटेड वाटतायत. एक प्रसेनजीत सोडल्यास आणि काही प्रमाणात अनिरूद्ध सोडल्यास कोणा मुलाचं काही फार लक्षात राहिलं नाही.
काल कट्यार कोणाला दिली म्हणे?
काल कट्यार कोणाला दिली म्हणे?
जजेसचे मार्क्स काही बरोबर
जजेसचे मार्क्स काही बरोबर वाटत नाहीत !
वैशाली इतकी सुंदर गायली, तिच्या पेक्षा पद्मनाभला जास्तं मार्क्स
वैशालीकडून जास्तं अपेक्षा म्हणून तिला वेगळ्या लेव्हलला जज करतात, इतरांना वेगळ्या , त्या पेक्षा घ्यायचं नाही वेगवेगळ्या कुवतीच्या गायकांना एकाच शो मधे !
महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या
महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.>>> अरे वाह दोघांचही अभिनंदन. मी बघत नाही हा कार्यक्रम पण आता बघेन कधीतरी. जुईलीच्या एकवीरेच्या गाण्याबदल प्रतिसाद वाचले ते मात्र वूट वर बघून आले, ते गाणं मी काही वर्षापूर्वी ऐकलेल छान आहे.
शरयु दाते जुइली पेक्षा
शरयु दाते जुइली पेक्षा चांगली गायली होती शेवटच्या पर्फोर्मन्स मध्ये. माउलीचे उगाचच कौतुक करतो अवधुत. अवधुत फार पार्शल आहे असे वाटते. वैशालीला नावे ठेवली पण माउलीचे कौतुक केले.
मी पण पाहिला आज रिसायक्ल्ड
मी पण पाहिला आज रिसायक्ल्ड स्पर्धकांचा कार्यक्रम. तेच ते असले तरी गाणी ऐकायला छान वाटतं.
जुईली जोगळेकरला जास्त डोक्यावर घेतात ह्याला अनुमोदन. सारेगमपमधेही तेच व्हायचं. शेवटी शरयू दातेचं गाणं जास्त भारी होतं खरतर.
त्या श्रीरंग भावेला काढण्याइतकं त्याचं गाणं वाईट नव्हतं. त्यापेक्षा माऊली आणि अनिरुद्ध जोशी जास्त फ्लॅट गायले होते. वैशाली मधेच एके ठिकाणी गंडली पण तिने आवाज वेगळचा लावला होता तिच्या नेहमीच्या आवाजापेक्षा. एकदम ओरीजनल गाण्यासारखा.
तुही ते मस्त झालं एकदम. नंतर महेश काळेने म्हटलेलं पण भारी होतं. शमिका भिडेपण ठिकठिक गायली.
तेजश्री प्रधान जेव्हा स्क्रिप्डेड न बोलता नॅचरल बोलते तेच छान बोलते. लिहून दिलेली वाक्य एकदम नाटकीपणे बोलते.
बादवे, साने कलर्समध्ये गेले ???
शरयु दाते जुइली पेक्षा चांगली
शरयु दाते जुइली पेक्षा चांगली गायली होती शेवटच्या पर्फोर्मन्स मध्ये. >> अगदी अगदी. हे म्हणजे 'शरुबाळा दिली ना तुला दोन वेळा कट्यार आता थोडावेळ तिला दे' असं वाटल.
त्या पेक्षा घ्यायचं नाही वेगवेगळ्या कुवतीच्या गायकांना एकाच शो मधे ! >> हेच मी आधी पण लिहील आहे. सगळ्यांना एकाच फ्रेम मधे बसवायचच कशाला?
शरयु दाते जुइली पेक्षा चांगली
शरयु दाते जुइली पेक्षा चांगली गायली होती शेवटच्या पर्फोर्मन्स मध्ये. >> अगदी अगदी. हे म्हणजे 'शरुबाळा दिली ना तुला दोन वेळा कट्यार आता थोडावेळ तिला दे' असं वाटल.
<<
+१
कितीतरी उजवी होती शरयु जुइल्या पेक्षा आणि मुळात निहिरा असायला हवी होती बेस्ट परफॉर्मर , तिची आणि शरयुची जुगलबन्दी चांगली वाटली असती !
जितेन्द्र तुपे पण मस्त गातो.
जितेन्द्र तुपे पण मस्त गातो.
मुळात निहिरा असायला हवी होती
मुळात निहिरा असायला हवी होती बेस्ट परफॉर्मर , तिची आणि शरयुची जुगलबन्दी चांगली वाटली असती ! >> १११
Pages