सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

फुहार शब्द आहे का तो, मी पुहार समजत होते, अगदी लहानपणापासून. थँक यु भरत. अर्थ पण माहीती असेल तर सांगा. आता मी नीट ऐकेन.

हो भरत, मलाही !! पुहारच म्हणत होती ती. जजेसनी तिला ह्याबद्दल काहीच कसं सांगितलं नाही ह्याचं आश्चर्य वाटलं.

>>झी मराठीवरील सारेगमपा मधल्या रोहित राऊत पेक्षा कितीतरी चांगलं निवेदन करते. Happy

अगदी अगदी!
मला कधी नव्हे ते झीपेक्षा कलर्सचा दर्जा (प्रामुख्याने निर्मितीमुल्य) चांगला वाटतोय
अगदी बेला आणि स्वानंद असूनसुद्धा तिकडे मजा येत नाहीये!

कलर्सचे सेट + टेक्निकल साइड, इ. बरेच उंचावलेत.
प्रसेनजीतच्या गाण्यात इतकं काय वाईट होतं? वेगळ्या आवाजात गायलं नाही म्हणून? त्याच्या मेंटॉरने त्याला त्याबाबत आधी काही सांगितलं नाही का?
जुइलीच्या गाण्यातले शब्द ऐकूच येत नव्हते.
या चिमण्यांनो सुंदर झालं. पर्दा है देखील. वैशालीने आणखी भारी गाणं निवडायला हवं होतं.
अलबेला साजन सुपर.
ड्रामा करायला सुरुवात झालीय. कोणाला कमी मार्क मिळाले की आधी सगळ्यात कमी गुण मिळालेल्या गझलगायकाचा क्लोज अप दाखवायचे.

या आठवड्यात वैशाली नव्हती का? ...>> नव्हती....ती आजारी आहे,
तिच्यावर अचानक एक छोटी सर्जरी करावी लागली असं सांगितलं...

काल निहिरा खुप सुरेख गायली..."चांदण्यात फिरताना .." आणि शमिका सुद्धा..."कजरा मुहोब्बत वाला.." दोन वेगळे आवाज काढुन गायली....कट्यार देताना खरच जजेसचं कन्फ्युजन झालं असणार..
सूर नवा ध्यास नवा अशी थीम म्हणुन शमिकाला मिळाली कट्यार...पण मला मनापासुन निहिरालाच परत मिळायला हवी होती असं वाटलं...

वैशालीची सर्जरी झाली, हॉस्पिटलाइझ्ड हिती म्हणून परफॉर्म केलं नाही .
अशा केस मधे तिला ठेवणार कि डिसक्वालिफाय ?
असो, हा आठवडा फार ग्रेट गाणी नाही झाली.
अनिरुद्ध , शामिका , निहिरा चांगले गायले.
कट्यार निहिरालाच द्यायला हवी होती, शमिका ‘खेळ मांडीयला‘ छान गायली पण जुगलबदीला ‘कजरा मोहब्बत्वाला‘ दोन आवाजात गाणं अगदीच ऑर्केस्ट्रॉ टाइप वाटलं, निहिराच्या गाण्यापुढे स्पर्धेच्या पॉइंट ऑफ व्ह्युने फिकं वाटलं.
पद्मनाभ कधीचा अ‍ॅव्हरेज गात होता, गेला एकदाचा पण एलिमिनेशन खूप पॉझिटिवली आणि मॅच्युअर्ली घेतलं त्यानी.
मुळात त्याचा आवाज फुटायच्या स्टेज मधे आहे, अत्ता त्याला घ्यायला नको होतं, राहुल सक्सेना सारखा एखादा टफ फाइट देणारा मेल व्हॉइस हवा होता स्पर्धेत , अत्ता फक्तं मुली डॉमिनेट करतायेत .

काल अनिरुद्ध छान गायला. शमिका दोन्ही गाणी मस्त गायली पण मलाही वाटलं की कट्यार निहिरालाच द्यायला हवी होती. फारच भारी गायली ती !! तिचं मागच्या आठवड्यातलं ह्या चिमण्यान्नो पण क्लास होतं !! संदीप खरे कसे सरतील सये विचित्र गायला काहितरी.. मधे मधे आचके देत होता. मला वाटलं ह्याचा श्वास पुरत वगैरे नाहीये की काय !

राहूल सक्सेनाला नाही आणला ते बरं केलं.

संदीप खरे कसे सरतील सये विचित्र गायला काहितरी.. मधे मधे आचके देत होता. मला वाटलं ह्याचा श्वास पुरत वगैरे नाहीये की काय ! >>
मुळात तो गायक नाहिये...पण तरी त्याचा आवाज काहितरी वेगळाच आहे जो ऐकायला मला आवडतं...त्याची काही सिग्नेचर गाणी मला त्याच्याच आवाजात आवडतात त्यातलच हे एक....

मलाही वाटलं की कट्यार निहिरालाच द्यायला पाहिजे होती. तिचे गाणे अतिशय तरल, भावपूर्ण आणि कर्णमधुर झाले.

परवा तेजश्रीने 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' गाण्याचा उल्लेख करताता सामानाचा उच्चार समान केला होता. कुणी नोटीस केल का?

निहिराचं 'चांदण्यात फिरताना' गाणं क्लासच झालं. अगदी पहिल्या स्वरापासून भाव अगदी दाटून आला होता. शमिकाचं 'कजरा मोहब्बतवाला' गाणं सोलफुल नाही वाटलं तितकं. अनिरुद्धही छानच गायला. प्रसेनजित आणि तो आता जास्त जोमाने गातील, अशी आशा वाटतेय. डिपाडी डिपांग गाणं ऐकून मजा आली, विशेषतः मिथिलेशला त्यांनी समोर आणलं ते आवडलं.

परीक्षकांमध्ये मतभेद झाले असताना उगाच नाटकी आवाज आणि कॅमेरा मूव्हमेंट्स केले. ते दोघेही एकमेकांशी व्यवस्थित बोलत होते. काय मतभेद असतील, तर असू दे की. ते लगेच मारामारीला जुंपल्यासारखे आवाज कशाला काढायचे?! Uhoh

हो ड्रामेबाजीला सुरुवात झालीय. मागच्या आठवड्याबद्दलही मी लिहिलंय. आज एकदम चारपाच पायर्‍या वर.
मला जुईलीचं लंबी जुदाई खूप आवडलं. शमिकाने खेळ मांडियेला स्वतःचं करून गायलं.

शमिकाने खेळ मांडियेला स्वतःचं करून गायलं. >> हो. छानच झालं. एक अर्धी नोट अजून वर लावलं असतं, तर अजून छान झालं असतं असं वाटलं.

जुईलीचे स्वर मध्ये थोडे घसरल्यासारखे वाटले, पण अवधूत का कोण म्हणालं तसं त्या प्रकारची खुली गायकी करताना तसं होऊ शकतं, पण तो आवाज तिने मस्त लावल्यामुळे स्वरांचं एवढं वाटलं नाही.

पण तरी त्याचा आवाज काहितरी वेगळाच आहे जो ऐकायला मला आवडतं...त्याची काही सिग्नेचर गाणी मला त्याच्याच आवाजात आवडतात त्यातलच हे एक.... >>>> मी त्याच्या एकंदरीत गायनाबद्दल म्हणत नाहीये फक्त कालच्या गाण्याबद्दल लिहिलं आहे. मूळ कसे सरतील सये मलाही आवडतच.

ते दोघेही एकमेकांशी व्यवस्थित बोलत होते. काय मतभेद असतील, तर असू दे की. ते लगेच मारामारीला जुंपल्यासारखे आवाज कशाला काढायचे?! >>>>> अगदी !! व्यवस्थित चर्चा सुरू होती खरं. उगीच ते इफेक्ट्स !

मला आठवतय त्याप्रमाणे सारेगमपमध्ये अनिरुद्धने नाट्यसंगित किंवा क्लासिकलच्या थोडसंही जवळपास जाणारी गाणी म्हटली की देवकी पंडीत त्याला शिव्या घालायची, तुझा क्लासिकलचा कसा अभ्यास चांगला नाही वगैरे. पण हल्ली तो तशीच गाणी जास्त छान म्हणतो. देवकीताईंचा फिडबॅक मनावर घेतलेला दिसतो आहे मधल्या वर्षांमध्ये Happy

बादवे, कोणी झीवरचं सारेगमप बघतं का ?
काल फेसबूक फिडमध्ये झलक दिसली ती चांगली वाटली. एखादा भाग बघायला हवा. तिथे सगळे नवे गायक आहेत.

झी सारेगमप बघते अधुन मधुन, बेला ठिक आहे पण स्वानंद किरकिरे आणि रवि जाधव म्युझिकल शो चे जजेस म्हणून नाही पटले , त्यांचं बोलणही नाही आवडत .
गायकांमधे तो योगेश रणमले लक्षात राहिला, बाकी कोणी अजुन तरी खास नाही वाटल पण अजुन जस्ट सुरवात होतीये, पुढे माहित नाही चांगलीही होईल कदाचित स्पर्धा !
होस्ट रोहित राउत फार पकाऊ आहे , विचित्रं कपडे आणि अतिभयंकर बोलणं.
फेस्॑बुक वर कोणी लिहिलं होतं मागे , तो स्पर्धकांची ‘पालकं ‘ आली आहेत असं म्ह्ंटला Proud
ते सगळे स्पर्धक बिचारे अति साधे प्रकारात मोडतात पण जबरदस्तीने त्यांना ‘घे पंगा कर दंगा ‘ म्ह्स्णायला लावतात, सेट पण त्यांनी टिन एज कॉलेज स्पर्धांसारखा केलाय, टपोरी स्लोगन्स वगैरे लिहिलेला, स्पर्धक गातात अभंग-नाट्यगीतं आणि मागे असा सेट , अजिबात शोभत नाही !
Btw तो रोहित राऊत आणि सुर नवा मधली जुइली बहुदा b.f-g.f आहेत, सोशल मिडीया वर टाकतात बरेचदा फोटोज.

माझी आठवण सांगतेय की अनिरुद्ध आधीही नाट्यसंगीत्/शास्त्रीयकलाचंच गायचा. आता हे सारेगममध्ये होतं की त्याही आधी तो सह्याद्रीवरच्या स्पर्धेत आला तिथे ते आठवत नाही. त्या स्पर्धेत प्रसेनजीतचा भाऊही होता.
वैशालीला देवकीने नाट्यसंगीताची अजिबात तयारी नसल्याबद्दल ऐकवलं होतं. की महाराष्ट्रातल्या माणसाला ते माहीत असलंच पाहिजे. त्यावर तिने आपल्या बालपणाबद्दल सांगितल्याचंही आठवतंय.

मंगळवारचा भाग काल पाहिला. अ‍ॅडब्रेकच्या वेळी जास्तच फाफॉ झालं का माहीत नाही. मला एकदम सलिल-संदीप गायला लागलेले दिसले. एलिमिनेशन आणि जुगलबंदी दोन्ही हुकले. आता उद्याचा रिपीट भाग पाहायला लागेल.

पद्मनाभ एलिमिनेट झाल्याचं वाचलं. त्याच्या गाण्यापेक्षा "आनेवाला पल" जास्त बसलेलं, रादर झोपलेलं वाटलं मला.

'चांदण्यात फिरताना माझा धरलास हात' आणि इतर ओळींमध्ये मध्ये शेवटचा 'त' एकदाही ऐकू आला नाही! एकाही जज ने हे पकडले नाही? (सलील सकट). शब्दोच्चारांबद्दल कुणीच कधीच बोलत नाहीत तिथे. (खरे तर सुगम संगीताचा तो एक महत्त्वाचा भाग आहे.)

असो, overall दर्जा साधारण आहे कार्यक्रमाचा, पण कधीतरी कुणीतरी चांगले गाऊन किंवा बोलून जाते, त्यामुळे पहाणेबल आहे! स्लींग टी व्ही मुळे एक एपिसोड १५-२० मिनिटांत बघून होतो. Happy बोअर झाले की फास्ट फार्वर्ड्ची सोय उत्तम आहे!

कालची थीम काय होती ते नीट कळंलंच नाही मला...सगळे धांगडधिंगा वाली गाणी गात होते अचानक..
काल प्रसेनजीत नं "ब्रिंग ईट ऑन " , शरयु दाते नं " हवाहवाई" , जुईली नं "मेरा नाम चिन चिन चु" ही गाणी गायली....अनिरुद्ध ने कोणतं गायलं आठवत नाही पण असंच काहितरी धांगडधिंगा गाणं गायलं...

काल कोणीच बाहेरचे पाहुणे नव्हते...या वेळी एलिमिनेशन नाहिये नवीन वर्षाची भेट म्हणून Happy
काल महेश सगळ्यांना जिनिअस वाटत सुटला होता .....का ते माहित नाही...मागच्या एपिसोड मद्धे महेश चं डीस्टींक्शन म्हणजे जिनिअस असं तेजश्री बाई सतत म्हणत होत्या म्हणून कदाचित तो वैतागला असेल की काय कोण जाणे...
काल मला कोणाचंच गाणं फारसं नाही आवडलं...

मी अजून गेल्या आठवड्यात. आतापर्यंत कट्यार कोणाला द्यायची याचा निर्णय पाहुण्यांतर्फे घोषित केला जायचा ना? गेल्या आठवड्यात शमिकाला कट्यार दिली तेव्हा त्याचं स्पष्टीकरण दिलं गेलं की तिने नवा सूर लावला इ. .

>>https://www.maayboli.com/node/15647?page=2

सूर नवा कार्यक्रमातील वाद्यवृंद व वादक आजवरील सर्वात उत्कृष्ट आहेत. बाकी गायकां बद्दल नमूद करण्या सारखे विशेष काही नाही.
मोजून मापून गुण वाढणारा महेश, मीठ मसाला घालून गुण देणारा अवधूत दादा व दोघांच्या मध्ये काहितरी वेगळेच शोधून काढल्याच्या आवीर्भावात गुण देणारी शाल्मली (ठाइ ठाइ रेशममीया दिसतात!) या तीघा परिक्षकांंमूळे खरे तर अधिक मजा येते.

या विषयावर लिहीण्या सारखे बरेच काही आहे.. पण तूर्तास ईथेच थांबतो. असेही ईथे बरेच 'एक्सपर्ट' अभिप्राय देणारे आहेत. त्यात भर नको. Happy

सारेगमप 'घे पंगा' वर मात्र नविन नविन गायकांना ऐकून बरे वाटले. नचिकेत लेले, योगेश xxx (तोच तो जय अतुल ची गाणी गाणारा) हे पुढे नक्कीच प्रस्थापित होतील असे वाटते.
पण, नवीन गाणी म्हणजे फक्त निव्वळ अजय अतुल हेच समीकरण आहे की काय? बाकी ईतर कुणाची गाणी तितकी हीट नसावीत बहुदा.

सारेगमप 'घे पंगा' वर मात्र नविन नविन गायकांना ऐकून बरे वाटले. >>>>>सारेगमपची ह्या रविवारी फायनल आहे. चला हवा येउ द्या साठी लवकर संपवत आहेत बहुतेक.

Pages