सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

>>सारेगमपची ह्या रविवारी फायनल आहे. चला हवा येउ द्या साठी लवकर संपवत आहेत बहुतेक.
सगळ्यांची दोरी टी आर पी च्या हाती असते.. . :).. आता महेश पण 'जिनीयस' बटण दाबतोय.. ते त्याचमूळे.
सारेगमप चा 'शाळकरी' माहोल परवडला पण ते सूर नवा मध्ये कोण दाढी मिशी वाले पात्र येते ते फारच केविलवाणे आहे.. इतके बिंडोक पात्र आणि त्याची चीप कॉमेडी ही त्या 'मंचाची' गरज का त्या पात्राची व्यावसायिक गरज हे त्यांनाच ठाऊक.

[रच्याकने: महेश च्या संगीत प्रवासाचा बर्यापैकी साक्षिदार आहे.. त्याचे संगीत मित्र म्हणून कौतूक आहे. आणि त्याची कुवत व बैठक याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामूळे त्याच्याकडून भविष्यात निव्वळ 'प्रदर्शना पलिकडे ' सादर केलेले ऐकायला व पहाय्ला मिळावे अशी आशा आहे. वैभव च्या बाबतीत देखिल तेच.. अस्सल प्रतिभावंत कवी ने आपली प्रतिभा अशा फुटकळ कार्यक्रमांच्या लिखाणात खर्ची घालावी हे क्लेशदायक आहे.. त्याच्याकडूनही भविष्यात वेगळ्या अपेक्षा आहेत.]

पण ते सूर नवा मध्ये कोण दाढी मिशी वाले पात्र येते ते फारच केविलवाणे आहे.. इतके बिंडोक पात्र आणि त्याची चीप कॉमेडी ही त्या 'मंचाची' गरज का त्या पात्राची व्यावसायिक गरज हे त्यांनाच ठाऊक>>>>>+१०००० Happy

ह्या आठवड्यातला तेजश्री चा ड्रेस म्हणजे काही बायका घरात परकर वर गाऊन घालतात तसं दिसत होतं. आणि आंबाडा पण घातला होता केसांचा. घरगुती. मला नाही आवडला तिचा गेट अप. छान ऊंच आणि देखणी आहे खरं तर ती.

गाणी ऐकायला मजा आली. अनिरुध्द भारी नाचला Happy
वैशाली इज बॅक. निहिरा दिसली नाही. काय गायली ती ?

पुष्कराज लईईई बोर. माबोकर लेखक आहेत ना.. प्लीज जरा बघा न त्याच्या डायलॉग्जचं काहीतरी.

फुहार म्हणजे फवारा. >> धन्यवाद भरत

सा रे ग म मध्ये संघपाल तायडे नावाचा पाहुणा कलाकार गावून गेला. तो आणि नचिकेत नाव मिळवणार पुढे जाऊन, असे वाटते आहे..

>>या आठवड्यात असे काय साँग सिलेक्शन होते ? एलिमिनेशन नाहीये का ??

नाही... म्हणून पब्लिक मोकाट सुटले होते (अगदीच वाईट्ट गात होते!) आणि परिक्षकही 'जिनीयस' खिरापत वाटत होते. Happy
शेवटी कट्यार मुकाबला मध्ये शमिका व अनिरुध्द दोघे ईतके वाईट गायले की कट्यार कुणाला द्यावी यावर परिक्षकांनी खूप डोकेफोड केली.. आणि शेवटी त्यातल्या त्यात कमी वाईट गायली म्हणून शमिका ला दिली... थोडक्यात काय तर या मौसम मध्ये 'राजगायक' होणे नाहीच. असेही पहिल्याच दिवसापासून ते दिसतच होते. 'ईथल्या' पुरूष गायकांना नेक्स्ट सिझन मध्ये संधी आहे... तेव्हा आत्तापासूनच गळे घासायला घ्या.

वैशालीचं गाणं आवडलं ह्या आठवड्यात. झिंगाट गाण्याचाही माहौलच असा आहे की नाचायलाच लागतं मन, त्यामुळे मजा आली. टाईमपास फार झाला ह्या आठवड्यात. शाल्मलीचा वाढदिवस, एकमेकांवर फिशपाँड टाईप कमेंट्स करण्याचा प्रकार, प्रत्येकासाठीचे व्हिडीओज दाखवणे, पुष्कराज येऊन भविष्य सांगणे, इ. इ. फार झालं. त्याऐवजी वादकांच्या मेळ्याचा एखादा परफॉर्मन्स जरी दाखवला असता, तरी अजून मजा आली असती.

>>त्याऐवजी वादकांच्या मेळ्याचा एखादा परफॉर्मन्स जरी दाखवला असता, तरी अजून मजा आली असती.
+१००
काल सारेगमप मध्ये पंचमदांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या वाद्य चमूतील जुन्या वादक मंडळींनी काही गाणी सादर केली. फारच 'नॉस्टॅलजिक'..!
खरे तर फक्त त्यांचे वादन ऐकावे गायक नकोच असे वाटत होते.
एक मान्य करावे लागेल- सारेगमप चे स्क्रिप्ट सशक्त नसले तरीही रोहीत राऊत ने अतीशय मेहेनतीने व प्रामाणिकपणे सूत्रसंचालन पेलले आहे.. आणि त्यात बेला च्या संयमी व अचूक कॉमेंट्स म्हणजे सोने पे सुहागा.
पुढील खेपेस शाल्मली च्या जागी बेला दिसावी.. Happy
for me, after Shreya Ghoshal, it is Bela Shende.. simply classic!

सोमवारचा भाग पाहतोय.तेजश्रीची सुरुवातीची वाक्य -
या वर्षात घडणारा प्रत्येक चागला क्षण......
.............छोट्याशा कागदाच्या पेपरवर.......

रिटेक चालला असता.

सारेगमप बद्दल लिहायलाच आले होते, काय मस्तं वाटलं ओरिजनल पंचमदांचे साथीदार वादक आणि त्यांचे अनुभव ऐकताना , ते ऐकताना जितके goose bumps आले , तितकीच गायकांनी वाट लावली सोन्या सारख्या गाण्यांची Sad
वरण भात उच्चार , अ‍ॅटीट्युड नसणे वगैरे म्हण्जे काय तर ते सारेगमपचा कालचा एपिसोड.
एक फक्त उज्ज्वल होता ज्यानी गाण्याची निवड योग्य केली आणि छान गायला !

त्या हवा येऊ द्या मुळे सारेगमप गुंडाळतायेत का? ह्या रविवारी दुपारी १२ ते रात्री १० दाखवणार आणि संपवणार अशी add बघितली.

>>ह्या रविवारी दुपारी १२ ते रात्री १० दाखवणार

खूपच छान झाला अंतीम सोहळा.. मी आधी म्हटल्या प्रमाणे नचिकेत लेले 'महागायक' झाला.. संपूर्णपणे फक्त परिक्षकांच्या गुणांवर निकाल अवलंबून असल्याने बाकी ईतर धंदेवाईक जोडतोड नसल्यामूळे हे शक्य झाले.. नाहितर 'ईतर' कुणाला तरी डोक्यावर चढवले गेले असतेच. पण स्वानंद, बेला, आणि रवी जाधव असे सच्चे परिक्षक असल्याने शेवटी खरेच अत्यंत लायक असे तीन निवडून आले. मजा आली.
(अपाल्याला ही संगीतातील थोडे कळते व अचूक अंदाज बांधता येतात हा अनुभव आनंददायी आहे!)
मी आधी उल्लेखलेला योगेश रणमले मात्र आधीच बाद झाला तरिही त्याला रवी ने आगामी चित्रपटात गायन संधी दिलेली आहेच... त्यामूळे अजय अतुल सारख्या गाण्यांसाठी दुसरा तितकाच लायक दर्जेदार व पर्यायी गायक सापडला हे निश्चीत.
काल अंतीम सोहळ्यात बेला ने तिची गाणि सादर केली... आहाहा... क्लास अपार्ट..!
सून ध्यान गुंडाळून काहितरी नविन चालू करा म्हणावे.. त्याच त्याच प्रस्थापित गायकांनी पाट्या टाकणे (एक दोन अपवाद वगळता) आणि त्यावर ऊगाच 'कट्यार' मुकाबला हे लईच बोअर झालय.. जयदीप भाऊंनी किशोरदांच्या गाण्यांची वाट लावू नये अशी कळकळीची विनंती... बाकी कशाचिही वाट लावा... चालेल. Happy
नविन ध्यास हीच जर खरी थिम असेल तर जुईली व मधुरा यांपैकी एकीलाच विजेतेपद मिळावे.. ते नेमकी काय मिळणार आहे हे माहित नाही. सुवर्ण कट्यार? झी चा ईतका भव्य दिव्य व सुसूत्र सोहळा पाहता आता कलर्स वाले काय करतात याची उत्सुकता..
असो.

मी काल उशिरा बघितला. मी सारेगमप, सूर नवा दोन्ही बघत नाही. काल माझ्या भाचेसुनेने आमच्या family grp वर मेसेज टाकला की नचिकेत लेले तिचा भाचा आहे. मग म्हटलं बघूया आपल्या relativeचा relative आहे फायनलला तर. शेवटी तास भर बघितला. आधी eve ला vote पण दिलं नचिकेतला आमच्या नातेवाईकांतल्या बहुतेक जणांनी माझ्यासह. नचिकेत छान गायला. घाणेकरचं पण शेवटचं गाणं आवडलं मला.

वोटिंग पण होतं की.

आज ह्र्दयनाथ मंगेशकर येणार आहेत , बघु कसे होतात या आठवड्याचे एपिसोड्स.
यु.एस मधे नव्हती सारेगमप फिनाले, आज आहे बहुदा.
काल तो डुएट्स चा एपिसोड होता, पहिला गोंधळ आणि शेवटचं यार इलाही फक्तं आवडलं !
यार इलाही चालु असताना गाण्याचे डिस्क्र्पिप्शन चुकीचं, आधीच्या गाण्याचच इथेही चिकटवलं, गदिमा आणि वैशाख वणवा म्हणे Uhoh
सगळ्याच पातळीवर फसलेलं पर्वं !

ह्र्दयनाथ मंगेशकरांची गाणी एकुणच कोणालाहि फारशी झेपली नाहित. आज बघु. निहिरा कदाचित चांगले गायली असावी आज. प्रोमो मध्ये दाखवत होते.

प्रसन्नजित कोसंबीचं इतकं कौतूक नक्की का केलं काही कळलं नाही. त्याचे हातवारे एकदम शाळेत बसवतात तसे वाटत होते अगदी शब्द आहेत तसे हात / हावभाव. उच्चार तर किती सदोष होते. प्रत्येक वेळी "सुर" आम्ही सरदार असं ऐकू येत होतं.

उच्चार तर किती सदोष होते. प्रत्येक वेळी "सुर" आम्ही सरदार असं ऐकू येत होतं.
<
अगदी !!
‘सूर ‘ आम्ही सरदार भातात खडे लागल्या सारखं खटकत होतं Sad
मी वाट बघत होते निदान ह्र्दयनाथ मंगेशकर तरी बोलतील यावर, पण उगीच कौतुक Uhoh
वैशालीकडून आपेक्षा होती ह्र्दयनाथ मंगेशकरांचं जास्तं चॅलेंजिंग गाणं निवडेल म्हणून , ती अजुन अनफिट मोड मधेच आहे !
निहिरा आणि अनिरुद्ध ट्रेलर मधे चांगले वाटले, बघु कसे गातात.
महेश काळेची महफिल सुरेख जमली !

प्रत्येक वेळी "सुर" आम्ही सरदार असं ऐकू येत होतं>> +१
काल हृदयनाथ मंगेशकर बसलेले असल्याने सगळेच दबावाखाली वाटले. परिक्षकांसकट . नक्की आठवत नाही , पण कोणाच्यातरी गाण्याबद्दल बोलताना महेश ने पण एक शब्द चुकीचा वापरला ! अपवाद तेजश्री चा.. ती नेहमीप्रमाणे लिटील चँप मधे अँकरिंग करत असल्यासारखीच होती. Happy

जैत रे जैत म्हणल्या गाण्यात तुपेने जी एकच ओळ म्हणली ती खरच चांगली होती. हृदयनाथ मंगेशकरनी देखील मनापासुन कौतुक केले त्याचे.

काल ह्र्दयनाथ मंगेशकर आले होते म्हणुन अतिशय उत्साहाने कार्यक्रम बघायला बसले.
पण स्पर्धकांनी अतिशयच निराशा केली.
"जांभुळ पिकल्या झाडाखाली" मधे नको तिथे शुद्ध उच्चार करत होती वैशाली....आणि बरीच गडबड केली मूळ चालित..
"सुर आम्ही सरदार", "आईच्या गर्बात उमगली" या गोष्टी कोणाच्याच लक्षात आल्या नाहित हे शक्य नाही...असो. सब टी आर पी का खेल लग रहा है.
ह्र्दयनाथ मंगेशकर आणि ग्रेस या कॉम्बीनेशन ची गाणी गायली जावीत आज न उद्या अशी आशा आहे मनात.
शेवटी ह्र्दयनाथ मंगेशकरांसमोर गायची कोणाही स्पर्धकाची पात्रता न वाटल्याने बहुतेक महेश ला गायला लावलं शेवटी असं वाटलं मला Wink
बहुतेक ह्र्दयनाथ मंगेशकरना आधीच सांगितलं होतं की कोणाला काही वाईट बोलु नका न चुका सांगु नका ...सगळ्याच परीक्षकांना सांगितलय वाटत हे...कोणीच काहीच चुका सांगत नव्हतं जास्त.\
बाकी ईतके दिवसानी ह्र्दयनाथ मंगेशकर ना बघुन बरं वाटलं...भावसरगम ची खुप खुप तीव्रतेने आठवण आली.
आता पुण्यात आला कार्यक्रम की नक्की जाणार

थोडेफार प्रस्थापित असे हे गायक चुकीचे उच्चार करत असतील तर प्रस्थापित होण्यासाठी गाण्याच्या उच्चाराबाबत दक्षता घेण्याची गरज नाही असं म्हणता येईल.

काल तेजश्रीचं निवेदन बघून tv बंद केला. तसही बघत नाही मी पण काल मूड होता जरा. जाऊदे voot वर गाणी बघितलेलीचं बरी इथे वाचून.

आईच्या “गर्बात “ ओरिजनल ह्र्दयनाथ मंगेशकरांच्या गाण्यातही नेहमी खटकतं मला, १:०५ ते १:०८ नीट ऐका , गर्बात च गातात ते पण !
https://youtu.be/k2JRdHKS-Zw

इथे ऐका बरं. शूर आहे की सूर ते?

ते गाणं प्रमाण मराठीत नाही गायलंय.
देस, गर्ब, येडी, अमाला , लडुन , देसापायी, इसरू
प्राणमधला ण हा न आणि ण च्या मधला ऐकू येतोय.

आईच्या “गर्बात “ ओरिजनल ह्र्दयनाथ मंगेशकरांच्या गाण्यातही गर्बात च गातात ते पण ! >> +१ एक गावाकडचा सरदार हे गाण गातोय त्यामुळे त्याच्या तोंडी अगदी शुध्द भाषा असणे अपेक्षीत नाही हे मी माझ्या पुरत ठरवून टाकल आहे त्यामुळे खटकत नाही.

अरे खरच कि, आता भरत यांनी पॉइंट आउट केल्यावर कान देउन ऐकल्यावर खरच साउंड्स लाइक सुर !
प्रसन्नजीत जास्तं स्पष्टपणे ‘सुर ‘ उच्चारत होता म्हणून खटकलं आज पहिल्यांदाच , इतके दिवस नव्हत जाणवलं ह्र्दयनाथ तसच गातात म्हणून.

सगळ्याच गायकांचे भाव कमी पडत आहेत असे मला जाणवते आहे पहिल्या एपिसोड पासुन. काल अजुनच वाटले.

काल निहिरा मस्त गायली....आणि गाणं पण छान निवडलं होतं...."यारा सिली सिली..."
तिचा आवाज अतिशय धारदार , मस्त आहे....शाल्मली म्हणाली तसं...तळपती तलवार...
पंडीतजी पण म्हणाले तिला की कसदार गाणं निवडलस म्हणून....त्यांना पण वाटल असेल सोमवारची गाणी ऐकताना की माझी अनेक सुंदर सुंदर गाणी सोडुन हे लोक काय गात आहेत. Happy
अनिरुद्ध जोशी ने पण सुंदर गाणं गायलं....
बाकी जयदीप आणि तुपे ठीकठाक....
हृदयनाथ आणि ग्रेस या कॉम्बीनेशन चं गाणं बहुतेक कोणीच गाणार नाहिये की काय.... किती सुंदर सुंदर आहेत या जोडीची गाणी....

Pages