Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02
कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला पुर्ण कार्यक्रम बघायची
मला पुर्ण कार्यक्रम बघायची इच्छाच होत नाहीये, इथे कोणी लिहिलं गाणं चांगलं झालं तर ते voot वर जाऊन बघते.
मी पण फॉरवर्ड करत बघते..
मी पण फॉरवर्ड करत बघते..
पूर्ण एपिसोड फक्तं लोकगीतांचा चांगला झाला.
बाकी मोस्ट्ली निहिरा, वैशाली कन्सिस्टंट वाटल्या फक्तं.
मला हा कर्यक्रम अतिशय
>>>मला पुर्ण कार्यक्रम बघायची इच्छाच होत नाहीये, इथे कोणी लिहिलं गाणं चांगलं झालं तर ते voot वर जाऊन बघते.<<<<
+१
मला हा कर्यक्रम अतिशय कंटाळवाणा वाटला. दोन तीनच भाग पाहिले असेल वरती काही वाचले गाणे चांगले असे की). तसेही सूत्रसंचालक तेजश्री हि एकदम चुकीची निवड आहे.
तिचे ते वाटाण्यासारखे डोळे फिरवणे मला( मलाचव?) एकदमच विचित्र वाटते.
काळे साहेब विदेशात भारतीय
काळे साहेब विदेशात भारतीय संगिताचा प्रचार करतो असे सांगत सध्या भारतातच मुक्कामी आलेले दिसत आहेत.
मी अजून मागच्याच आठवडयातले
मी अजून मागच्याच आठवडयातले बघतेय, ते पण येताजाता, कामं करता करता.
काल त्या मधुरा कुंभारचं कौतुक
काल त्या मधुरा कुंभारचं कौतुक बघून काय बोलावं समजेना >>>> + १
जुगलबन्दी मधे महेश काळे
जुगलबन्दी मधे महेश काळे पेक्षा वादक आवडले .
तौफिकजी आणि सॅक्साफोन वरचे सिनियर वादक कम्माल.
तौफिकजी आणि सॅक्साफोन वरचे
तौफिकजी आणि सॅक्साफोन वरचे सिनियर वादक कम्माल.>>
+१११
कालच्या भागात मेहबुबा हे गाणे केवळ वादकांमुळे तरले! पंचमदांची अशी गाणी केवळ तेच गाऊ शकत होते!
पर्दा है पर्दा पण म्हणावे असे झाले नाही! तरी परिक्षांनी दाद दिली ती मला वाटते गायकाचा उत्साह वाढवायला असावी!
तेजश्री प्रधान बघवत नाही आणि ऐकवतही नाही!
प्रसन्नजीत चुकीचे चॉइस करतोय
कालच्या भागात मेहबुबा हे गाणे केवळ वादकांमुळे तरले! पंचमदांची अशी गाणी केवळ तेच गाऊ शकत होते!
<<<<
+१
प्रसन्नजीत चुकीचे चॉइस करतोय गाण्यांचा, एक्स्परीमेन्ट करायच्या नादात.
अता एलिमिनेट होतो कि काय वाटायला लागलय !
शाल्मली खोलगळेला का घेतलय ते
शाल्मली खोलगळेला का घेतलय ते कळले नाही.आंग्लाळलेल्या मराठीतून ती काय बोलत असते ते समजत नाही.
त्यात ती नाकात बोलते
त्यात ती नाकात बोलते
प्रसन्नजीत चुकीचे चॉइस करतोय
प्रसन्नजीत चुकीचे चॉइस करतोय गाण्यांचा, एक्स्परीमेन्ट करायच्या नादात. >>> + १ पण त्याचा आवाज सर्व गाण्यांना सुट होत नाहि
मी सोमवार मंगळवारचे भाग
मी सोमवार मंगळवारचे भाग शनिवार रविवारी पाहतोय, त्यामुळे तुमच्या बराच मागे आहे.
मला जजेस अजिबात खटकत नाहीएत. महेश काळे सुबोध भावेंपेक्षा चांगला अभिनय करू शकेल, त्याचा चेहरा अधिक चांगला बोलतो आणि त्याची समजही जास्त असावी असं माझं मत होऊ लागलं आहे (कट्यारचा नव्या संचातला प्रयोग टीव्हीवर पाहिलेला तेव्हा लक्ष गाण्याकडेच होतं). फक्त त्याने एकदा तो व्यक्ती असं म्हटलं आणि सव्वेदना असं म्हटलं ते खटकलं.
लता-आशाची आपण असंख्य वेळा ऐकलेली गाणी नव्या गायकांकडून ऐकताना लता-आशाच्या जागा अधिक चांगल्या उमजतात, त्यातलं आव्हान लक्षात येतं. शरयूचं श्रावणात घननिळा ऐकताना असंच झालेलं. जुइलीचं हरिणी.. ऐकून तर तिने गायलेलं रोमँटिक गाणं फ्लूक वाटायल लागलं. वैशालीने सुन्या सुन्या निवडलं तेव्हा ही आता काय करते? असं वाटत होतं. पण तिने ते स्वतःच्या पद्धतीने, वेगळ्या जागा घेऊन म्हटलं.
निहिरा कन्सिस्टंट आहे याच्याशी सहमत.
अनेक पुरुष स्पर्धकांना आताच डबल चिन्स दिसताहेत.
>> + १ पण त्याचा आवाज सर्व
>> + १ पण त्याचा आवाज सर्व गाण्यांना सुट होत नाहि
<
होना, ते मेहबूबा अगदीच बिन मसाल्याचं, बिन तिखटामीठाचं वाटलं , त्याचा आवाज अगदीच अळणी सपक वाटला काल.
त्याचा अॅटीट्युड पोवाडा गोंधळ टाइप गाण्यांत दिसतो, मराठी गाणी लोकसंगीताच्या जॉनरला चिकटून रहावं त्यानी !
बाकी आज काय जुएली’ माइया माइया ‘ गाणार का ?
ते गाणं इतक्या रिअॅलिटी शिज मधे इतक्यांनी गायलं पण ते गावं फक्त आणि फक्तं मौली दवे नी
https://youtu.be/40Dfxsz9Iog
पण ते गावं फक्त आणि फक्तं
पण ते गावं फक्त आणि फक्तं मौली दवे नी >>>> अगदी अगदी ! मौली ने गायलेले ते गाणे विसरणे शक्य नाहि. बाकि तो सिझन तुफानच होता. त्यानंतर तसा सीझन झाला नाहि.
आजही फक्तं वैशाली आणि
आजही फक्तं वैशाली आणि निहिराची गाणीच आवडली !
वैशाली कि निहिरा कोण उजवं ठरवणं अवघड झालं मला दोघींची फॅन असल्यामुळे , मस्तं गायल्या !
वैशाली जास्तं कॉन्फिडन्ट वाटते पण दोघीही आवडतात, त्या त्या सिझनला माझ्या फेवरेट होत्या.
अगदी अगदी ! मौली ने गायलेले
अगदी अगदी ! मौली ने गायलेले ते गाणे विसरणे शक्य नाहि. बाकि तो सिझन तुफानच होता. त्यानंतर तसा सीझन झाला नाहि.
<
हो फार मस्तं होता तो सिझन.
राजा हसन, अमानत अली, मुस्सर्रत अब्बास, सुमेधा सगळे मस्तं गायचे.
मौली तिच्या जॉनर मधे बेस्ट होती.
जो जिंकला तो अनिकच काही फार फेवरेट नव्हता.
तो सिझन २००६ चा की २००७ चा
तो सिझन २००६ चा की २००७ चा होता?
शेवटचा कट्टयार भाग पाहायला
शेवटचा कट्टयार भाग पाहायला मिळाला नाही काल. कट्टयार कोणाला मिळाली?
शेवटचा कट्टयार भाग पाहायला
शेवटचा कट्टयार भाग पाहायला मिळाला नाही काल. कट्टयार कोणाला मिळाली?>>>>>निहिरा जोशीला कट्यार मिळाली.
वैशाली आणि निहिरा इतर
वैशाली आणि निहिरा इतर सगळ्यांपेक्षा बेटर आहेत खर्या पण त्या दोघीही त्यांच्या स्वतःच्या पीक पर्फॉर्मन्स (हिंदी सारेगम च्या वेळी) पेक्षा आता उतरल्यासारख्या वाटतात मला. ती लेवल त्यांनाही मॅच करता येत नाही.
निहिराचं ओ सजना, आत्ता
निहिराचं ओ सजना, आत्ता कलर्सच्या फेसबुकवर बघितलं. अप्रतिम झालं. काय गाते ती. मला खूप आवडते. दिसत पण छान होती अर्थात दिसणे हा मुद्दा दुय्यम आहे पण आवाज तिचा जबरदस्त आहे. मला हिंदी सारेगमप पासून आवडते ती.
तो सिझन २००६ चा की २००७ चा
तो सिझन २००६ चा की २००७ चा होता? >> २००७
ह्या आठवड्याची गाणी पाहिली.
ह्या आठवड्याची गाणी पाहिली. निहिरा जोशी आणि वैशाली माडे सोडून सगळे सोसो.
त्या मधुरा कुंभारचं किती ब़ळच कौतूक केलं ! तिचे अर्धे शब्द ऐकूही येत नव्हते.
मला शमिका भिडेचं कांदेपोहेपण आवडलं नाही फार. लिटील चॅम्पमध्ये अवंती पटेलने मस्त म्हटलं होतं एकदम. खरतर ह्या पर्वात अवंती पटेल, शाल्मली सुखटणकरलाही बोलवायला हवं होतं.
जुईली, शमिका, शरयु दाते वगैरे गाणं सोडून परफॉर्म्सन्सवरच जास्त फोकस्ड असतात. गायक तर थोड्याप्रमाणात अनिरुद्ध जोशी सोडला तर बाकी सगळे गंडलेले वाटतात.
मला शमिका भिडेचं कांदेपोहेपण
मला शमिका भिडेचं कांदेपोहेपण आवडलं नाही फार. लिटील चॅम्पमध्ये अवंती पटेलने मस्त म्हटलं होतं एकदम. >>> +१२३
चॅलेंज २००५ निहिरा-हेमाचन्द्र
चॅलेंज २००५ निहिरा-हेमाचन्द्र—हिमानी-देबोजीत चा.
चॅलेंज २००७ राजा अनिक मुस्सर्रत अमानत मौली सुमेधाचा.
अगदी रेग्युलरली नाही पण
अगदी रेग्युलरली नाही पण इंटरनेटवर बर्यापैकी फॉलो करतेय हा कार्यक्रम. मुलांची गाणी का कुणास ठाऊक मला ऐकायला बोअर होत आहेत म्हणून ती मी फॉर्वर्ड करत ऐकते. मुलींची ऐकते आणि अर्थातच महेश काळे ह्यांचे परफॉर्मन्सेस बघते. ह्या आठवड्यात 'संतभार पंढरीत' जेव्हा महेश आणि स्पर्धकाने गायलं तेव्हा कळून आलं की नुसतंच चांगलं गाणं म्हणजे काय आणि ते गाणं श्रोत्यांसाठी एक 'अनुभव' बनवणं म्हणजे काय !
तेजश्री प्रधान सुंदर दिसते, तिचा स्टेजवरचा वावर सिन्सियर असतो, उगीच काहीतरी फालतूपणा करत नाही. मात्र तिच्या आवाजाचा टोन एकसुरी व्हायला लागतो जरावेळ ऐकला की त्यावर तिने काम करावं आणि सारखं 'ना' म्हणत बोलायची सवयही तिने कमी करायला हवी. पण एकंदरीत मला ती खूप काही खटकत नाही; डोक्यात वगैरे तर अजिबात जात नाही. एक साधेपणा, प्रामाणिकपणा आहे तिच्या निवेदनात ज्यामुळे तिच्या बाकीच्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करु शकते.
तेजश्री प्रधान सुंदर दिसते,
तेजश्री प्रधान सुंदर दिसते, तिचा स्टेजवरचा वावर सिन्सियर असतो, उगीच काहीतरी फालतूपणा करत नाही. मात्र तिच्या आवाजाचा टोन एकसुरी व्हायला लागतो जरावेळ ऐकला की त्यावर तिने काम करावं आणि सारखं 'ना' म्हणत बोलायची सवयही तिने कमी करायला हवी. पण एकंदरीत मला ती खूप काही खटकत नाही; डोक्यात वगैरे तर अजिबात जात नाही. एक साधेपणा, प्रामाणिकपणा आहे तिच्या निवेदनात ज्यामुळे तिच्या बाकीच्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करु शकते.>>>>>+१००००
झी मराठीवरील सारेगमपा मधल्या रोहित राऊत पेक्षा कितीतरी चांगलं निवेदन करते.
Ago, anumodan:)
Ago, anumodan:)
ओ सजना गाण्यात मला प्रत्येक
ओ सजना गाण्यात मला प्रत्येक वेळी रस की पुहार असं ऐकू आलं. ते फुहार आहे.
Pages