Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02
कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बुधवार त्या पुष्कराजला दिलाय
बुधवार त्या पुष्कराजला दिलाय म्हणे. प्रचंड बोअर केलं त्याने. +१
सोमवारचा भाग का कोण जाणे
सोमवारचा भाग का कोण जाणे अर्ध्या तासाचाच रेकॉर्ड झाला. पण मला आवडला. महेश काळेंच्या कमेंट्स आवडल्या. स्पर्धकांनी त्या फक्त कॉम्प्लिमेंट्स म्हणून घेतल्यासारख्या वाटल्या. शोमध्ये त्यांनी थँक्यूपेक्षा जास्त काही म्हणणं अपेक्षित नसावं. पण निदान त्या पोचल्याचं तरी दिसायला हवं.
एका गाण्याव शाल्मली आणि महेश यांच्या रेटिंग्जमध्ये मोठा फरक पडला होता. आणि शाल्मलीच्या मराठीच्या ज्ञानाची गंमत केली गेली. हा पॅटर्न ठरेल असं वाटतंय.
शौनक अभिषेकींच्या प्रत्येक स्पर्धकाला आपण याआधी कुठे कुठे भेटलोय हे सांगण्यावरून मला कोणाचीतरी आठवण झाली
आता गाण्यांबद्दल : ओ लाल मेरी सुरुवात जेवढी छान झाली ते शेवटपर्यंत टिकलं नाही (बाय द वे, सूफी गाण्यात पैला नंबर हे कधी, कसं घुसलं असेल? याड लागलं गाणं मस्त वाजवलं. वैशाली अपेक्षेप्रमाणेच. ज्ञानेश्वर स्वतःचेच गाणे म्हणतोय, म्हटल्यावर ते समोर बसून पाहिले नाही. गाण्याच्या मागेपुढे बराच ड्रामा होता.
तेजश्री त्याला किती आठवण करून देत होती, की मी त्या सिनेमात होते. पण त्याला कळलं नाही असंच दिसत होतं.
एकूण सूत्रधार आणि परीक्षक्/कॅप्टन्सनी फार वेळ आणि फूटेज खाल्ले नाहीत हे बरंय.
कालचा भाग पाहिला.
कालचा भाग पाहिला.
शरयू दाते चं 'अवघा रंग एक झाला' अशक्य सुंदर होतं. त्यावरची शौनक अभिषेकींची प्रतिक्रिया पण छान होती .
तब्येत ठीक नसल्याने शमिका भिडेची लावणी फिकी वाटली, त्यापुढे पद्मनाभ गायकवाडचं 'ऐ जिंदगी' नक्कीच उजवं वाटलं. तरी परिक्षकांकडून शमिकाचं जास्त कौतुक, पद्मनाभला कमी गुण देणं हे खटकलं.
पुष्कराज फार कमी वेळ होता, त्यामुळे असेल कदाचित पण बोअर नाही झाला. जान्हवी बाईंना मात्र खरंच आवरायला हवं !
शरयू दाते चं 'अवघा रंग एक
शरयू दाते चं 'अवघा रंग एक झाला' अशक्य सुंदर होतं >>> + १११
कालच्या एपिसोड मधे शरयू दाते
कालच्या एपिसोड मधे शरयू दाते क्लासिक गायली एकदम,, अर्थात तिच्या गुरु आज्जींच गाणं असल्यामुळे ते तिने असंख्य वेळा ऐकलेलं असेल त्याने नक्कीच फरक पडतो..
महेश काळे आणि शाल्मली ह्यांच्या मार्क्स मध्ये फारच तफावत आहे पण.. शाल्मली कमी मार्क्स देईल असे वाटत असताना एकदम पूर्णच मार्क्स देते.. नक्की कोणाचं चुकतय हे काही कळेना..
महेश काळे अशक्य शब्द बंबाळ आणि जड बोलतोय... पूनम वैनी तुम्ही महेश साठी पण लिहीताय का? मराठीचा एकदम ओव्हरडोस होतोय.. स्पर्धकांना तरी तो सांगतो ते सगळं कळतंय की नाही ह्याची शंका आहे मला..
बाकी स्पर्धकांबद्दल काल बळच एलिमिनेशन कॅन्सल केलं.. दीपिका आणि शमिका ह्या दोघी अगदीच अॅव्हरेज गायल्या होत्या त्यांच्यापैकी एक जण कोणीतरी नक्कीच गेलं असतं..
Maहेश काळे अशक्य शब्द बंबाळ
Maहेश काळे अशक्य शब्द बंबाळ आणि जड बोलतोय... मराठीचा एकदम ओव्हरडोस होतोय.. स्पर्धकांना तरी तो सांगतो ते सगळं कळतंय की नाही ह्याची शंका आहे मला..
《《Glad someone said this finally, Totally agree !!
बाकी स्पर्धकांबद्दल काल बळच एलिमिनेशन कॅन्सल केलं.. दीपिका आणि शमिका ह्या दोघी अगदीच अॅव्हरेज गायल्या होत्या त्यांच्यापैकी एक जण कोणीतरी नक्कीच गेलं असतं.
<<<< +111
डायरेक्ट मकालाच सांगायला
डायरेक्ट मकालाच सांगायला पहिजे....
मला खरंतर असं उच्च मराठी अनेक
मला खरंतर असं उच्च मराठी अनेक दिवसांनी ऐकून छान वाटतंय. महेश काळे बोलतो सुद्धा अगदी सिरीयस चेहरा ठेवून म्हणून ते ऑथेंटिक वाटतं.
मला खरंतर असं उच्च मराठी अनेक
मला खरंतर असं उच्च मराठी अनेक दिवसांनी ऐकून छान वाटतंय. +१
झी सारेगम हिंदी,सोनी
झी सारेगम हिंदी,सोनी आइडलमध्ये जसे स्पर्धक येतात तसे मराठीत मिळणे कठीणच आहे. परंतू इकडे स्पर्धकांच्या गुरुंची स्तुती फारच होते. जज दोनच हवेत अवधुत आणि वैशाली सामंत. महेश काळे संधी वाया घालवत आहे.
असं उच्च मराठी अनेक दिवसांनी
असं उच्च मराठी अनेक दिवसांनी ऐकून छान वाटतंय>>> पण हे बोलणं बऱ्याचदा स्पर्धक, त्याचं गाणं, मूळ गाणं/ संगीत इ. विषयानुरूप नसतं..
पूनम वैनी तुम्ही महेश साठी पण
पूनम वैनी तुम्ही महेश साठी पण लिहीताय का? >> "सूर नवा ध्यास नवा" मध्ये तीन परीक्षक आहेत- अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. स्पर्धकांची गाणी ऐकून झाल्यावर हे तिघंही जे काही बोलतात ते त्यांचं स्वतःचं, स्वतंत्र मत असतं. कोणीही त्यात हस्तक्षेप करत नाही.
मला तर महेशच्या कमेंट आवडत.
मला तर महेशच्या कमेंट आवडतात. बाकी दोन जजेस च्या तूलनेस... 'जिंकलास भावा', तोडलंस मित्रा, Mindblasting, ई ई पेक्शा नक्कीच सुसह्य आहे. विषयानुरुप नसेल तरी संगीतास सोडून नाही बोलत तो.
जज दोनच हवेत अवधुत आणि वैशाली
जज दोनच हवेत अवधुत आणि वैशाली सामंत. >>> वैशाली सामंत जज ?
हे काय ऐकतोय मी? हे मका, शाखो
हे काय ऐकतोय मी? हे मका, शाखो वगैरे जे बोलताहेत ते त्यांना दुसरं कुणी तरी लिहून देतंय???
का?? मग काय उस्फुर्तता राहिली त्यात्?देवकी, अवधूत सारेगमप मध्ये बोलायचे ते स्वत:चं त्यांचं आहे हे जाणवायचं..
<"सूर नवा ध्यास नवा" मध्ये
<"सूर नवा ध्यास नवा" मध्ये तीन परीक्षक आहेत- अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. स्पर्धकांची गाणी ऐकून झाल्यावर हे तिघंही जे काही बोलतात ते त्यांचं स्वतःचं, स्वतंत्र मत असतं. कोणीही त्यात हस्तक्षेप करत नाही.>
धन्यवाद क्लॅरीफाय केल्याबद्दल.
आणि अवधूत खुप सुंदर बोलतो. ते त्याचं तोडलंस, फोडलंस एवढं उस्फुर्त असायचं की आवडायचं खूप. उर्मिलाला त्याने दिलेल्या कमेंट्स एवढ्या इंटेन्स असायच्या की खरोखरच या माणसाला ह्या गाण्याने खूप आनंद दिलाय हे जाणवायचं, त्या तुलनेत देवकीतै कितीही विद्वत्तापूर्ण बोलल्या तरी त्यांनी गाणं चीरफाड करण्याकरिताच ऐकलं असं वाटायचं..
जजेससाठी स्क्रीप्ट लिहून
जजेससाठी स्क्रीप्ट लिहून दिले जात नाही.
यात स्पर्धकांपासून
यात स्पर्धकांपासून परीक्षापर्यंत सगळेच हात बांधून का येतायत
चांगलं बोलणारे + संगीताचं
चांगलं बोलणारे + संगीताचं ज्ञान असणारे जजेस प्रत्येक चॅनलना आणायला जमणं अवघडच आहे !
हिंदी सारेगमप मधे शंकर महादेवन, आशा भोसले, हरिहरन, सुरेश वाडकर, जावेद अली हे लोकं होती दोन्ही काँबिनेशन असणारी !
तसच सोनु निगम, शान सारखे संगीतचं ज्ञान असलेले, सुरेख गाणारे + चांगलं बोलु शकणारे होस्ट हिंदी सारेगमपलाही पुन्हा जमलं नाहीये.
मला आवडतोय हा प्रोग्राम.
मला आवडतोय हा प्रोग्राम. बहुतेक मी झी मराठी लिटिल champs सा रे ग म प (मुग्धा वैशंपायन, आर्या आम्बेकर या असतानाचं) बघितलयानंतर आत्ता बघतेय रियालिटी शो म्हणून असेल. सगळे ऑलरेडी चांगल गाणारे आहेत त्यामुळे छान वाटतायत गाणी ऐकायला. परीक्षक, निवेदक पण आवडलेत. मधेच त्या पुष्कराज चिरपुटकर चा टाइमपास पण बरा वाटतोय.
गाणी ऐकायला छान वाटत असली तरी वर कोणीतरी म्हणाल्याप्रमाणे जे प्रोफेशनल गात आहेत त्याना परत स्पर्धेत उतरवण्याचे प्रयोजन नाही कळले.
आणि हो मुद्दाम गेल्या काही वर्षातली नवीन गाणी घेतायत ते ही आवडले.
तेजश्री प्रधान पण चांगली वाततेय....मी 'होणार सून' अर्ध्यात सोडलेल त्यामुळे तिचा अजून कंटाळा नाही आलाय ☺
मायबोलीकर वैभव जोशी आणि पूनम
मायबोलीकर वैभव जोशी आणि पूनम छत्रे तुमचं अभिनंदन !!
बरेच गायक अवधुत गुप्तेच्या
बरेच गायक अवधुत गुप्तेच्या शिफारशीतुन आले आहेत हे स्पष्ट दिसत आहे. याहुन चांगले गायक आणुन चांगला कार्यक्रम झाला असता
मला रिअॅलटी शोची ओडिशन्सच
मला रिअॅलटी शोची ओडिशन्सच अधिक आवडतात. धमाल असते.
पाहिली एकदाची जीनियस लावणी.
पाहिली एकदाची जीनियस लावणी.
"मला तर महेशच्या कमेंट आवडतात
"मला तर महेशच्या कमेंट आवडतात. बाकी दोन जजेस च्या तूलनेस... 'जिंकलास भावा', तोडलंस मित्रा, Mindblasting, ई ई पेक्शा नक्कीच सुसह्य आहे. विषयानुरुप नसेल तरी संगीतास सोडून नाही बोलत तो." +१०००
वैशाली माडेला जज करायला आणि अवधुत महेशच्या मधे बसायला खोलगडे लायक नाही. अर्थात कलर्सनी तिच्याबरोबर ढिनच्यॅक पूजाला आणलं तरी नवल नाही.
बाकि सान्यांनी झी सोडताना तिथली सगळी लोकही पॅक करून घेतली. अवधूत, प्रशांत दामले सारेगम चे गायक....
अर्थात कलर्सनी तिच्याबरोबर
अर्थात कलर्सनी तिच्याबरोबर ढिनच्यॅक पूजाला आणलं तरी नवल नाही.>>> बिग Boss मध्ये आणल तस इथेही आणतील तिला.
इथलं वाचून १८ नोव्हेंबरचा भाग
इथलं वाचून १८ नोव्हेंबरचा भाग थोडा पाहिला. दीपिकाचं गाणं आवडलं. महेश म्हणाला तसं तरंगत होतं. कलर्सचे शो बघायला ऑफिशिअल ऑनलाईन सोर्स आहे का?
धन्यवाद भरत.
धन्यवाद भरत.
प्रसन्नजीत कोसंबीचा पोवाडा
प्रसन्नजीत कोसंबीचा पोवाडा आणि सादरीकरण भारी होतं आज .
मलाही प्रसेनजीतचा पोवाडा
मलाही प्रसेनजीतचा पोवाडा भावला. मस्त होतोय कार्यक्रम एकंदर. तेजश्री प्रधान भयंकर नाटकीपणे बोलते, ते सोडलं तर सरस आहे कार्यक्रम.
Pages