Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे वाचा:
हे वाचा:
http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-serial-actor-actress-rol...
जे नको होतं तेच झालं, फार
जे नको होतं तेच झालं, फार वाईट वाटतंय.......
Oh no....
Oh no....
जे झाले ते झाले पण नवीन
जे झाले ते झाले पण नवीन क्ल्यू मिळालेत आज.
नवीन क्ल्यू मिळालेत आज.>> हो
नवीन क्ल्यू मिळालेत आज.>> हो आणि त्यामुळेच मालिका सुरळीत पणे शेवटाकडे जाईल
shocked..अंदाज आला होता पण
shocked..अंदाज आला होता पण असं व्हावं अशी ईच्छा नव्हती.
मी पूर्ण एपिसोड पाहिला. पण
मी पूर्ण एपिसोड पाहिला. पण मला कसे नवीन कल्यू कळले नाहीत? जगताप आता काही करू शकेल का?
नाही म्हणायला पुढील भागात म्हणून जे दाखवले त्याने जरा दिशा मिळेल असं वाटतंय.
अंदाज आला होता >> मला शेवटपर्यंत वाटत होतं की काहीतरी होईल आणि हे टळेल.
मला ही दिसले नाहीत काही क्लुज
मला ही दिसले नाहीत काही क्लुज.
काय झालं नक्की?? जगताप ठीक
काय झालं नक्की?? धुरत ठीक आहे ना ? अरे देवा आजचा भाग कधी अपलोड होणार???
श्या! लयच बेकार एपिसोड , अस
श्या! लयच बेकार एपिसोड , अस नको होतो व्हायला
काय झालं नक्की?? जगताप ठीक
काय झालं नक्की?? जगताप ठीक आहे ना ? अरे देवा आजचा भाग कधी अपलोड होणार???>>>>जगतापसाठी एवढं कोणी इथे अश्रू ढाळेल कां?
Sorry sorry, गलतीसे मिस्टेक
Sorry sorry, गलतीसे मिस्टेक हो गया, tension में!
अरेरे, बिचाऱ्या धुरतचा गेम
अरेरे, बिचाऱ्या धुरतचा गेम करवला ! जगतापला जबरदस्त अडकवलेय, पुराव्यानिशी !
धुरातचं जाणं हा मोठा शॉक आहे ! वाईट वाटले !
धुरत, वी विल मिस यू !
धुरत व जगतापची कारेक्टर्स चांगली उभा राहिली होती, दोघांचाही अभिनय सुंदर होता !
जगताप आता तसाही गेलाच आहे,
जगताप आता तसाही गेलाच आहे, तरीही कोणी अश्रू ढाळणार नाही.
'पुढच्या भागात' अजून पाहिला नाहीय पण आजचा भाग ज्या नोटवर संपला त्याच्या पुढच्या क्षणाला रागिणीची ट्यूब पेटली तर आजची शेवटची 5 मिनिटे सार्थकी लागली म्हणता येईल.
धुरातचं जाणं हा मोठा शॉक आहे
धुरातचं जाणं हा मोठा शॉक आहे ! वाईट वाटले !
धुरत, वी विल मिस यू !--- yes , we will really miss dhurat.!
धुरत व जगतापची कारेक्टर्स चांगली उभा राहिली होती, दोघांचाही अभिनय सुंदर होता ! ---- अगदी खरं
मला जगतापसाठी पण वाईट वाटतय.
मला जगतापसाठी पण वाईट वाटतय..कसा अडकला ह्यांच्या जाळ्यात..!!
भडक डोक्याच्या माणसांना फसवणं
भडक डोक्याच्या माणसांना फसवणं सोपं असतं ना!! त्यात हे लोक या थराला जातील याचा अंदाज नाही आला.
दोघांनीही खूप सुरेख कामे केली.
जगताप स्मार्ट नाही हे
जगताप स्मार्ट नाही हे सरपोतदारने हेरल त्यामुळे हा प्लॅन केला, एका क्षणी जगतापला यात काळबेर आहे अशी शन्का आली आणि त्याने तस बोलुन पण दाखवल तरी व्हायच तेच झाल.
जगताप आता चांगलाच अडकलाय.
जगताप आता चांगलाच अडकलाय.
रागिणी जुने सगळे डायलॉग रिव्हिजिट करतेय त्यात तिला धुरत चे शब्द आठवतायत की काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. आता रा खरी हिरो... तिची हिरोगिरी फिकी नको पडायला म्हणून धुरत ला मारले असावे.
आयला बाकी सगळ्या शिरेली किती प्रेडिक्टेबल असतात.. ह्या शिरेल चा काही अन्दाज च येत नाही पुढे काय होइल. धुरत मरणार कदाचित हा कयास सर्वान्नी बान्धला होता पण त्याच्यावरच्या प्रेमापोटी सगळे डिनायल मध्ये गेले होते
फारच वाईट यार.... अगदी
फारच वाईट यार.... अगदी घरात्लं कोणीतरी जावं इतकं वाईट वाटतंय मला या क्षणी.... बेक्कार...
त्या सरपोतदाराचे ड्रॅक्युला दात पाडावेसे वाटतायत... :रागः
खरेच।
खरेच।
श्या . मनावर impact ठेऊन
श्या . मनावर impact ठेऊन गेला धुरत.
पण तो हवा होता कि क मरेपर्यंत, इतका प्रामाणिकपणे तपास करून त्याला मेन न कळता गेला. फार वाईट एपिसोड.
संपत आली सिरीयल, नीट उलगडली तर अजून एक आठवडा असेल नाहीतर झटपट ह्या आठवड्यात संपवतील.
नीट उलगडली तर अजून एक आठवडा
नीट उलगडली तर अजून एक आठवडा असेल नाहीतर झटपट ह्या आठवड्यात संपवतील.>> नको नको झटपट कशाला, निट करा उलगडा अर्थात तस आलच आहे शेवटापर्यत,
धुरत म्हटल तर एक व्यक्तिरेखा पण या सिरिजमधे काही काही पात्र इतकी ताकदिची झालियेत की खरीखुरी वाटावी , धुरत ज्या जिद्दिने ह्याचा तपास करतो त्याचा शेवट असा मधेच नको होतो करायला अस राहुन राहुन वाटत राहिले, शेवट रा आणि धुरत मिळुन करतात अस काही अपेक्षित होत.
परदेशीने आधी बंदूक जगतापच्या
परदेशीने आधी बंदूक जगतापच्या हातात दिली आणि मग अशा बेताने पकडली की त्यावरचे जगतापचे फिंगर प्रिंट्स जाऊ नयेत. व्हिडीयो कॅमेरे आणि एवढी तयारी बघून जगतापला काहीच संशय आला नाही आला नाही का. मूर्ख कुणीकडचा पण रागीणि त्याला वाचवेल कारण व्हिडीयो शूटिंगमध्ये हे दिसेल की जगताप धुरतच्या समोर ऊभा आहे आणि गोळा मागून झाडली गेली आहे. धुरतसारखा धट्टाकट्टा माणूस एका गोळीत जातो तेही पाठीवर गोळी लागून. मला शेवटपर्यंत आशा होती की तो वाचेल, निदान त्याला हाॅॅस्पिटलमध्ये नेतील आणि तो मरणार नाही :दु:खी: रागिणी आता अनुराधा आणि सायलीला आपल्या घरी आणेल. अनुराधाने सगळे पैसे दान करून टाकले, मुलीसाठीही काही ठेवले नाही हे पटले नाही. संदीप पाठकचं नक्की काय चाललंय काही कळत नाही. मालिका ईतक्यात नाही संपणार, सगळ्या प्रश्नांची ऊत्तरे देऊनच संपेल. रागिणी एकमेव हिरो आहे आता. राची आई असंच बोलता बोलता राच्या विगबद्दल नर्सला सांगेल पण त्या केसमध्ये आता कोणाला रस नाही. मिठबावकर परत दिसलाच नाही. मिठबावकरच्या लॅपटाॅपमधले डिटेल शोधायला सुहास मदत करेल. रागिणी आता झालगीवर संशय घेईल.
नवीन सिरीयल प्रोमो चालू केले
नवीन सिरीयल प्रोमो चालू केले झी युवा वर पण कधीपासून ते कळत नाहीये पण बहुतेक रुद्रम च्या जागीच असेल नवीन.
सर्व डीटेल्स उलगडा हवा मात्र
सर्व डीटेल्स उलगडा हवा मात्र, त्यासाठी सिरीयल हवी अजून काही दिवस.
धुरत, झोकून देऊन काम करणारा
धुरत, झोकून देऊन काम करणारा इन्स्पेक्टर होता.
धुरत, वी विल मिस यू ! ध्येयाने झपाटलेल्या माणसाला असे मरण येऊ नये.
मधेच असे वाटले जगताप काहीतरी काम काढून फोन करेल आणि धुरत ला सांगेल येऊ नका सर इकडे !
जगताप आणि इतर कोणाला सरपोतदार वर कधीच संशय येऊ नये ?
रुद्रम ला कोणती सीरिअल रिप्लेस करूच शकणार नाही.
रुद्रम संपले कि मन सुन्न होते इतर दुसरी सीरिअल पाहायची इच्छा होत नाही मग मायबोलीच्या रुद्रम धाग्याकडे येते .
अनुराधाने सगळे पैसे दान करून टाकले, मुलीसाठीही काही ठेवले नाही हे पटले नाही.>> अनुराधाला त्या मिळवलेल्या पैशांबद्दल घृणा आहे कारण तिला माहिती आहे नवऱ्याने काळे धंदे करून पैसे कमावले आहेत हे कारण पटण्यासारखे आहे .
रुद्रम ला कोणती सीरिअल
रुद्रम ला कोणती सीरिअल रिप्लेस करूच शकणार नाही. >>> अगदी अगदी.
जे लिहायचे होते ते वर तुम्ही
जे लिहायचे होते ते वर तुम्ही लिहीलेच आहे.
रुद्रम२ लवकर तयार करा म्हणावं
रुद्रम२ लवकर तयार करा म्हणावं.
Pages