"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनिधी, पुढच्या Bभागात कालचेच एक्सटेन्शन होते, पिस्तुल रोखतो पर्यंतच. पुढे काय झाले ते दाखवून हवा काढून थोडेच घेणारेत?

माखिजानेही प्रोपोज करायला बोलावले नसणार, त्याला काहीतरी सांगायचंय, ज्याची तयारी तो गेले 7 दिवस करत होता.

आज, जुना मारेकरी, नवा मारेकरी, माखिजा व त्यांचा एकमेकांशी काही असलाच तर संबंध स्पष्ट होईल.

संदिप पाठक तारणहार ठरला रागिणीचा तर मज्जाच. किरणची फे फे उडेल मग.
ज्याला ज्याला मारायला बघणार तो तो संदिप मुळे वाचेल मग. मज्जाच.

ही एकमेव अशी सिरियल आहे ज्याचा एकही भाग मी आतापर्यंत चुकवला नाहिये. Happy

संदिप पाठक तारणहार ठरला रागिणीचा तर मज्जाच
>>> तो अप्रत्यक्षपणे तारणहार ठरेल असं वाटतंय. तो काल किरणच्या घरात शिरताना तेवढा दाखवला. त्याच्यात आणि किरणमध्ये यापुढे जे जे काही होईल त्याने अंतिमत: रागिणीला मदत होईल (पण ते त्याच्या गावीही नसेल) असं दाखवलेलं मला जास्त आवडेल. त्यानं स्टोरीत जास्त मजा येईल.

अति-उत्कंठेचं दृश्य स्लो-मोशनमध्ये दाखवून त्यातली हवा काढून घेऊ नये म्हणजे मिळवली. त्या मारेकर्‍याने रागिणीवर बंदूक ताणणे, त्यावरची तिची रिअ‍ॅक्शन, माखिजाची रिअ‍ॅक्शन आणि त्या सगळ्याचे पुढचे परिणाम हे सगळं स्विफ्टली दाखवायला हवं, तर त्यात मजा आहे. पण कालच्या टीझरवरून ती शक्यता कमीच वाटतेय Uhoh

संदीपची कालची बॉडी language पाहता तो किरणचा गेम करणार असे वाटतेय Happy Happy

आणि रागिणीला संपवायचा निर्णय किरणने एकट्याने घेतलाय kay?

रागिणीला संपवायचा निर्णय किरणने एकट्याने घेतलाय काय नाही. तिची आॅडर निघाली. किरणभाऊंना फोन आला होता वरून...

सिरीयल संपायला आली असेल तर किरणच्या वर एकच बॉस असेल, अजून वेळ असेल तर त्याच्यावरही कोणीही असू शकतं.

एक अंदाज - की क ने मुद्दाम ऑर्डर काढली, आता तो रा ला वाचवेल आणि तिच्या गुड बुक्स मध्ये जाईल - तसा आहेच आत्ताही. ऑर्डर मारण्याची नसेलच नुसती धमकावण्याची किंवा घाबरवण्याची. तशीही रा फिदा आहेच की क वर.

कारण कोणता मारेकरी असा पिस्तूल रोखेल बराच वेळ, पटकन काम तमाम करून पळून जाईल ना.

ऑर्डर साहेबांनी काढल्यासारखी वाटली नाही मला. आधीच्या दृश्यात किरण पार्लर मध्ये असताना पोलीस खबऱ्याचा फोन संपल्यावर साहेबांचा येतो. त्यांना तो रागिणी व धुरतचे लवकर करायला हवे असे बोलतो. त्याचा बोलण्याचा टोन मवाळ होता. नंतर शोभाशी बोलताना कोणा दुसऱ्याचा फोन येतो ज्याला तो आधी दुसऱ्या कामात आहे म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतो पण समोरचा मूर्ती व फ्लॅश ड्राइव्हची बातमी देतो. तेव्हा किरणभाऊ वैतागतो, हिला आधीच मारायला हवे होते वगैरे म्हणून मी अर्जंटमध्ये काहीतरी बघतो म्हणतो. पुढच्या दृश्यात नवीन मारेकरी. साहेबांवर तो असा वैतागणार व खेकसणार नाही ना? किंवा मग 2 बॉस असतील, एक इमिजीएट, ज्यावर तो वैतागल्यावर खेकसू शकतो व एक माखिजा लेव्हलचा.

@ साधना, मला वाटतं दोन्ही वेळेला बॉसचाच फोन येतो.
पहिल्यांदा किरण सांगतो.. मी शोभा कडे आहे. इकडं सगळं आवरायला सांगू का? डायरी प्रकरणामुळे.
आणि दुसऱ्यांदा पुन्हा फोन येतो तेंव्हा तो खेकसत नाही. नॉर्मल बोलतो. मी कामात आहे नंतर बोलू का... साहेब नसते तर खेकसलाच असता तो दुसऱ्या वर.. Happy

मस्त झाला आजचा भाग, आपल्याला कळलं तरी रा ला सगळं कधी आणि कसं कळतं ते बघणं इंटरेस्टिंग ठरेल.
नवीन Submitted by प्राजक्ता_शिरीन on 18 October, 2017 - 22:20
+999

थाबा! लिहु नका फार , अजुन बघायचाय आम्हाला, राची ऑर्डर फार आधी अपेक्षित होती, अजुन ति सेफ कशी हेच कोड आहे असो! कळेलच सगळे पिसेस जोडले की

हो ना. उद्याच पहावा लागेल बहुतेक. आजकाल एपिसोड ११:१५ नंतर अपलोड होतो. म्हणजे मी त्या नंतर दुसऱ्या दिवशी चेक करते.

Pages