Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
धन्यवाद अन्जू... रमड.. चला
धन्यवाद अन्जू...
रमड.. चला हवा येऊ द्या मधे बाई पत्र वाचून दाखवत होत्या...
http://www.tvforumonline.com/8db0fb6d-918d-4e8f-ada5-49124b143990.aspx?d...
खूप वर्षांनी या मालीकेचे भाग
खूप वर्षांनी या मालीकेचे भाग पाहातो आहे, पण 372 एपिसोड नंतर काही एपिसोड मीसिंग आहेत, तुनळी वर..कोणी सांगू शकेल का, सगळे एपिसोड्स कुठे पाहता येतील?
धन्यवाद
भारतात ozee वर दिसत असावेत
भारतात ozee वर दिसत असावेत बहुतेक सर्व . पण भारताबाहेर असाल तर ozee दिसतं की नाही माहीती नाही.
भारताबाहेर ditto tv अॅप
भारताबाहेर ditto tv अॅप
पैसे भरुन बघावे लागतिल
तसेही 372 एपिसोड नंतर सगळ्या रेशिम गाठी जळुन गेल्याआहेत. बघण्यासारखे काही नाही.
धन्यवाद
धन्यवाद
तसेही 372 एपिसोड नंतर सगळ्या
तसेही 372 एपिसोड नंतर सगळ्या रेशिम गाठी जळुन गेल्याआहेत. >>
त्यापेक्षा इथले त्या धाग्याचे
त्यापेक्षा इथले त्या धाग्याचे सर्व बीबी वाचा, जास्त मनोरंजन होइल
खूप वर्षांनी या मालीकेचे भाग
खूप वर्षांनी या मालीकेचे भाग पाहातो आहे >>>
या धाग्याशी संबंधित नाही,
या धाग्याशी संबंधित नाही, तरीही माझा पण एक प्रश्न आहे. असंभव या मालीकेचेही काहीसे असेच आहे. याचेही संपूर्ण भाग कोठे पाहता येतील? तू नळीवर व डीट्टो वर सर्व भाग नाहीयेत. ओझीवर आहेत का?
असंभवचे ७६० भाग आहेत ओझीवर.
असंभवचे ७६० भाग आहेत ओझीवर. जस्ट चेक्ड.
असंभवचे ७६० भाग आहेत ओझीवर.
असंभवचे ७६० भाग आहेत ओझीवर. जस्ट चेक्ड.>>तूनळीवर पण एवढेच आहेत. मधले काही नसले तरी बिघडले नाही..
आज गंमत म्हणून हा धागा वाचत
आज गंमत म्हणून हा धागा वाचत होते थोडावेळ. खूप मजा आली.
एक गोष्ट इथे आवर्जून लिहावीशी वाटली म्हणून लिहीते आहे. सुकन्याच्या सदोष उच्चारांबद्दल इथे अनेकजणांनी लिहीलं आहे, टर उडवली आहे. पण नुकतीच माझ्या ऐकण्यात सुकन्याची एक मुलाखत आली. त्यात तिने सांगितलं की तिला एक जबरदस्त अॅक्सिडेंट झाला होता एका सेटवर. त्यामुळे तिची काही काळ वाचा गेली होती, शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला होता, पॅरालेटिक कंडिशन झाली होती वगैरे. यातून बाहेर पडायला तिला काही वर्षं लागली. तिच्या उच्चारांमधला दोष हा याचाच परिणाम आहे. आणि तिचं वाढलेलं वजनही. याआधी झालेल्या एका अॅक्सिडेंटनंतर तिचं अरंगेत्रम करणं पूर्ण बंद झालं होतं. पण तिने जिद्दीने या सगळ्यावर मात केली. पुन्हा बोलता कसं येईल यावर तिने मेहनत घेतली, कामं करू लागली आणि सरतेशेवटी पुन्हा अरंगेत्रम प्रॅक्टिस करायला लागली. आणि वयाच्या ५० व्या वर्षी तिने अरंगेत्रम शो केला.
हे सगळं ऐकल्यावर तिच्या उच्चारांना मी माफ केलंच पण टवाळी केल्याबद्दल मला मनोमन वाईटही वाटलं.
असो.
आता सुकन्या मोनेन्च वजन ही
आता सुकन्या मोनेन्च वजन ही बर्यापैकी आटोक्यात आले आहे... बाकी इथे जज करणारे लोक बरेच असल्याने इथे लिखाण बंद आहे मात्र आज rmd चा प्रतिसाद प्रचंड आवडल्याने कमेंट करायचा मोह आवरला नाही
मी सध्या ही सिरीयल युट्युबवर
मी सध्या ही सिरीयल युट्युबवर बघते आहे. प्राजक्ता माळी आणि ती शर्मिष्ठा राऊत सोडून बाकी सगळे चांगले वाटतायत्.
ओह वॉव! मी सुद्धा आत्ताच ही
ओह वॉव! मी सुद्धा आत्ताच ही YouTube वर चालू केली. मला उदय टिकेकर फार funny वाटला, त्याचे बाबाजी बाबाजी करणे. मावशी चा रोल करणार्या actress आवडल्या. हीरो देखणा आहे पण दात जरा मोठे वाटले प्राजक्त माळी काहीतरी दागिने ब्रँड चालवते त्याचे insta वर फोटो बघून आणि शीर्षक गीत आवडल्यामुळे चालू केली मालिका.
दुसरा सिझन येणार आहे, असं
दुसरा सिझन येणार आहे, असं कुठेतरी वाचलं.
मला माई आणि नाना भयंकर आवडले.
मला माई आणि नाना भयंकर आवडले. त्यांच्या घरातलं वातावरणही.
उदय टिकेकर रंगात येऊन बाबाजी बाबाजी करतो तेव्हा खरंच आहारी गेलेला वाटतो.
The KCraft ने या मालिकेतल्या
The KCraft ने या मालिकेतल्या काही सदस्यांना एकत्र आणून एक गप्पांचा २ भागांचा कार्यक्रम केला आहे. या त्याच्या लिंक्स -
भाग १
https://youtu.be/VUqmGBLuMXY?si=rwlPyhkOCqelktPr
भाग २
https://youtu.be/3yY6KiAGxW0?si=HjVmvyqA6UWqkTM9
मीही पाहतोय ही मालिका.
मीही पाहतोय ही मालिका. शर्मिष्ठा राऊतचं पात्र तसंच रंगवल़य आणि तिने त्याला न्याय दिलाय.
मेघना आकुकाक च्या अरुंधतीसारखी स्वार्थी वाटते आणि तिच्यासारखी उच्छ्वासत बोलते. अर्थात ती २१-२२ ची आहे, त्यामुळे समजण्यासारखं आहे. पण तिचं आय अॅम रअली रअली सॉरी आणि थँक्यू सो मच डोक्यात जायचं. अभिनयातही प्राजक्ता इतरांच्या तुलनेत कमी पडली.
काही अँगलनी ललितची गालफडं दाढदुखीमुळे हिरड्या सुजल्या सारखी वाटतात.
सगळ्यात बेस्ट अभिनय उदय टिकेकर.
संवाद छान आहेत. कधी कधी पुस्तकी होतात. पण तेव्हाही आदर्शवादी , भाषण दिल्यासारखे नसतात.
प्रत्येकच जोडप्यातला नवरा बायकोपेक्षा जास्त शहाणा , समजूतदार दाखवला आहे, हे थोडं खटकलं.
अन्जू, नुकतीच मालिकेला दहा वर्षे झाली तेव्हा ललितने विचारलं की दुसरा सीझन काढायचा का, एवढंच.
अच्छा असं झालं काय. मला
अच्छा असं झालं काय. मला वाटलं येतोय दुसरा सीझन.
>> प्रत्येकच जोडप्यातला नवरा
>> प्रत्येकच जोडप्यातला नवरा बायकोपेक्षा जास्त शहाणा , समजूतदार दाखवला आहे, >> अमित आणि विजया तसे वाटले नाहीत.
प्राजक्ता माळी भविष्यात निरुपा रॉयला रिप्लेस करु शकेल इतकी रडकी दाखवली आहे. फार इरिटेट झाले तिचा रोल बघून.
या मालिकेत ती शेवटपर्यंत तशीच
या मालिकेत ती शेवटपर्यंत तशीच रडकी दाखविली आहे.
मी ललितसाठी ही मालिका पाहिली होती.
अरे देवा!!!
अरे देवा!!!
या मालिकेत ती शेवटपर्यंत तशीच
या मालिकेत ती शेवटपर्यंत तशीच रडकी दाखविली आहे >>> नाही नाही. नंतर नंतर तिचं कॅरॅक्टर जास्त समजूतदार आणि स्ट्राँग होत जातं. सुरुवातीला ती जरा जास्तच रडकी आहे हे मात्र खरं.
प्राजक्ता चा ओथंबलेला आवाज
प्राजक्ता चा ओथंबलेला आवाज ऐकला की नकोच वाटायचं. ती प्राजक्ता दिसायला आवडत होती पण बोलणं डोक्यात जायचं. काम करता करता बघायचे पण रोज.
ओथंबलेला आवाज...!!
ओथंबलेला आवाज...!!
परफेक्ट वर्णन.
ललितसाठी बघावीशी वाटायची
ललितसाठी बघावीशी वाटायची मालिका पण प्राजक्ताने मला बघायला मिळू नये ही योजना केलेली, अत्यंत सुमार होती ती.
टायटल सॉन्ग जाम आवडायचं.
ओथंबलेला आवाज>> अगदी बरोबर.
ओथंबलेला आवाज>> अगदी बरोबर. मला तर शब्दच सापडत नव्हता. त्यामुळे ती रडकी वाटते.
नाही नाही. नंतर नंतर तिचं कॅरॅक्टर जास्त समजूतदार आणि स्ट्राँग होत जातं.>>> हे वाचून मी २००वा भाग लावला तर त्यात रडतच असते आणि तो तिला रडूबाई बोलतो.
<ओथंबलेला आवाज >+१.
<ओथंबलेला आवाज >+१.
आदित्यच्या तोंडी तिच्या रडण्यावर बरेच जोक्स आहेत. परीक्षेच्या टेन्शनने रडणं, माईच्या मांडीवर डोकं ठेवून लोळणं तर अगदीच अ आणि अ होतं.
तिचा तो आदु सुद्धा डोक्यात जायचा. फीचर्स खूप शार्प , मोठे डोळे. जुन्या संगीत नाटकातल्या नटासारखा लुक आणि अभिनय. कलासक्त, स्वच्छंदी माणसाचं जे चित्र डोळ्यांसमोर येतं त्यात तो बसत नाही. माझा पूर्वग्रह असेल. आणि त्यांचा कॉमन मित्र किरण. हिचं लग्न झालंय हे माहीत असूनही हिला त्याच्याकडे ढकलत होता.
सगळाच बावळटपणा. ह्या शेंबड्या
सगळाच बावळटपणा. ह्या शेंबड्या प्राजक्ताचं रडणं कमी होतं म्हणून की काय ती रडकी चित्रा आणली आहे. ह्यांना ही अशी रडी कॅरेक्टर्स लिहून काय दाखवायचं असतं?
Pages