"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंदू व मुक्ताची पहिली भेट कशी केव्हा व कुठे झाली?
>>> अरूनफिरून हरदासाची कथा या मूळपदावर पयेते >>>>>>>

ह्याचा शोध लावण्यासाठी मी त्यांच्या पहिल्या भेटीचा भाग परत ओझीवर पाहिला. तो बघितल्यावर कळले की हे दोघे गेल्या जन्मापासून एकमेकांना ओळखत होते. या जन्मात भेट झाल्यावर एका कटाक्षात त्यांनी एकमेकांना नुसते ओळखलेच नाही तर या जन्मात आधी काय केलेय हेही न बोलता ओळखले.

तेव्हा सदा फोन स्पीकरवर ठेवायला का सांगत नाही? हो मलाही ते खटकलं.. त्याला एकायच असतं ना मिठबावकर काय बोलतो ते..

होपफुली रा-चंदू ओळख पुढे कुठेतरी कळेल कथेच्या ओघात>> सगळे अस का करतायत? सगळ दाखवुन झालय की आधिच! मधले भाग मिसले असतिल तर बघा

कस असत ना एखाद चान्गल प्रॉडक्ट हाती आल की ते अजुन कस पर्फेक्ट होइल यावर सगळेच विचार करायला लागतात , नाहितर आपण इथे कितिही काथ्याकुट केला तरी लेखकाच सगळ लिहुन आणी बरच्स फिल्मुनही झालेल आहे.

अगं वर लिहिलय ना कोणीतरी बाबूची बायको मारली जाते तेव्हा रा घरापाशी येते तर चंदूदादा तिला म्हणतात हे सगळ तुझ्या मुळे होतय रागिणी, त्याआधी कुठेही ते ओळखतात असा संदर्भ नव्हता, म्हणून म्हंटलं की कदाचित कळेल पुढे कशी ओळख झाली ते Happy

हल्ली मुक्ता ने रेकॉर्डिंग करणं बंद केलं आहे.रा आईला सगळ्या कारवायांमधलं थोड खरं थोड खोटं सांगताना दाखवल्ये >> रागीणीच्या आइला केस संदर्भात सगळे लक्षात राहते. म्हणजे ती रागीणीचे नावहि विसरताना दाखवली परवाच्या एपिसोडमध्ये आणी कालच्या एपिसोडमध्ये मिठबावकारचे नाव आणी ते रागीणीने का सांगीतले ते सर्व तीच्या लक्षात आहे. मुद्दाम संशय निर्माण करत आहेत का तीचा खरोखर सहभाग आहे हे नंतरच कळेल

तेव्हा सदा फोन स्पीकरवर ठेवायला का सांगत नाही? हो मलाही ते खटकलं.. त्याला एकायच असतं ना मिठबावकर काय बोलतो ते.. >> हो त्याने एकले असे दाखवायला हवे होते. पण आपल्या अपेक्षा वाढल्या आहेत हेच दिसते यातुन Happy

काहीही झाले तरी रागिणी शेवटी सुटणार हे नक्की >>> मलाही तसाच वाटतंय म्हणून तर तिच्या आईचा विसराळू पणा जास्त ठसठशीत करताहेत. म्हणजे कोर्टात साक्ष देताना तिला काहीच आठवणार नाही आणि रागिणीला त्याचा फायदा मिळेल

रा चा नविन मेकओवर काही फार वेगळा नाहीये..धुरत तिला सहज ओळखु शकतो. ओळखायला पाहिजे म्हणजे +११
पण कदाचित तो जवळून तिला बघणार नाही . लांबून कोण तरी लांब वेणी वाली साडी नेसलेली बाई एवढच कळेल

जर तिला सदानी ओळखले तर ती सांगेल मी मिठबावकारची बातमी मिळवण्यासाथी मेकओवर करुन गेले होते.

रिलॅक्स लोकहो.

पान २७ वर साधनांचा प्रतिसाद कॉपी करतेय Happy

जुना एपिसोड परत पाहिला. रागिणी चांदुदादांचा पत्ता मिळवून घरी येते नेमका तेव्हाच छायाचा मृत्यू झालेला व पोलीस जबानी घेत असतात. रागिणी खिडकीतून बघत असते इतर क्रावूड बरोबर. पोलीस बाहेर आल्यावर चंदूदादा बाहेर येऊन तिला हे सगळे तुझ्यामुळे झाले म्हणतात,व तीही मान्य करते. बहुतेक छायाने त्यांना सांगितले असणार की ती रागिणीला भेटली व तिथून सगळे सुरू झाले.
Submitted by साधना on 20 September, 2017 - 19:45

कोणाला आठवतय का सगळ्यात पहिल्यांदा अभय ला किडनॅप करून पोलिस येतात, मग कानातलं शोधायला रा येते, सदा तिला म्हणतो - तुम्हाला बातमी आमच्या पैकीच कोणीतरी देत असणार.

तो हवालदार तेचं काम करतो आहे पैसे घेऊन रा ला बातमी पुरवण्याचं. ही मिठबावकर ची बातमी - त्याच्याकडे पैसे आहेत हे त्या हवालदारानेच रा ला सांगितलयं. सदा तसा संशय बोलूनही दाखवतो.

रागिणी चंदूकाकांना म्हणते तुम्हाला तुमच्या जीवाची एवढी का पडलीये. एकतर ते तीला मदत करतात त्यांचा तिच्याशी काहीही संबंध नसताना, मग हे बोलणं आगाऊपणाचं नाही वाटत का. मिठबावकरचा दुसरा नंबर अनुराधाकडे कसा आला, आवाज वेगळा का वाटतोय, आधीच सगळं ठरलेलं असताना परत का फोन केला हे काहीही प्रश्न मिठाला पडत नाहीत. कोणाकडे तरी पैसे सोपवून टाकायचे असं वाटतंय का त्याला.

जुना एपिसोड परत पाहिला. रागिणी चांदुदादांचा पत्ता मिळवून घरी येते नेमका तेव्हाच छायाचा मृत्यू झालेला व पोलीस जबानी घेत असतात. रागिणी खिडकीतून बघत असते इतर क्रावूड बरोबर. पोलीस बाहेर आल्यावर चंदूदादा बाहेर येऊन तिला हे सगळे तुझ्यामुळे झाले म्हणतात,व तीही मान्य करते. बहुतेक छायाने त्यांना सांगितले असणार की ती रागिणीला भेटली व तिथून सगळे सुरू झाले. >>>>> ओह्ह हे नव्हतं आठवत. धन्यवाद संपदा Happy

एकतर ते तीला मदत करतात त्यांचा तिच्याशी काहीही संबंध नसताना, मग हे बोलणं आगाऊपणाचं नाही वाटत का. >> बोलणं आगाऊ पणाच आहे . पण त्यांचा काही संबंध नाही असं वाटत नाही . कारण रागिणीच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट्स बाबू ने घडवून आणलाय . बाबू ची बायको छाया ला तो ( बाबू ) माझं जर काही बर वाईट झालं तर चांदुदादांकडे जा असं सुचवतो त्या नुसार छाया चंदू दादांकडे राहायला येते. त्याच वेळी या केस मध्ये चंदू दादा ओढला जातो . बाबूचा माणूस म्हणून . ज्या बाबूने रागिणीच्या नवऱ्याचा अक्सिटेन्ट घडवला आहे . त्यामुळे रागिणीला मदत करण हे आपलं काम आहे असं त्यांना मनातून वाटत असावं . आणि रागिणीच्या नवऱ्याचा ज्यांनी कोणी ऍक्सीडेन्ट घडवून आणला आहे त्यांना शिक्षा व्हावी असं त्यांनाही वाटत असेल.

मिठबावकरचा दुसरा नंबर अनुराधाकडे कसा आला, आवाज वेगळा का वाटतोय, आधीच सगळं ठरलेलं असताना परत का फोन केला हे काहीही प्रश्न मिठाला पडत नाहीत. कोणाकडे तरी पैसे सोपवून टाकायचे असं वाटतंय का त्याला.>>>>>

तो मोबाईल बँकिंग चालवतोय असे सदा म्हणतो. याचा अर्थ त्याच्याकडे जो नंबर रेजिस्टरड आहे त्यावरून फोन आला तर तो पैसे देणार. रागिणीने आधीच मला त्या नंबर वरून फोन करता येणार नाही, भेटता येणार नाही, पोलीस लक्ष ठेऊन आहेय, भाऊ प्रामाणिक पोलीस आहे वगैरे सीनरी तयार करून ठेवलीय. त्यामुळे तो जास्त खोलात जात नसावा.

पण सातवकडे आधीच त्याचा जो नंबर आहे तो फक्त पाच जणांकडे आहे आणि तो नंबर आता फक्त रागिणीला माहिती आहे. जाऊदेे, फारच गुंतागुंतीचं आहे.

ज्यांनी कोणी ऍक्सीडेन्ट घडवून आणला आहे त्यांना शिक्षा व्हावी असं त्यांनाही वाटत असेल रागिणी पण विचारते त्यांना तुम्ही का मदत करताय मला.. माझ्या सारखंच गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असे तुम्हाला पण वाटतं म्हणून. त्या वर चंदुदादा हो म्हणतात बहुतेक.

पण सातवकडे आधीच त्याचा जो नंबर आहे तो फक्त पाच जणांकडे आहे आणि तो नंबर आता फक्त रागिणीला माहिती आहे.>> त्याच्याकडे त्याचे बरेच नंबर आहेत. पण प्रत्येक नंबर लिमिटेड लोकांकडेच आहे. म्हणजे एक नंबर पाच जणांकडे दुसरा चौघांकडेच.. असं.
सदाचा खबरी त्याचे एक-दोन नंबर मिळवून सदाला देतो. रागिणीने ऐनवेळी प्लॅन बदलला तरच तिला पैसे मिळतील बहुतेक.

खुप दिवसानी एक छान मालिका पहायला मिळते आहे.
मधेच काही गोष्टींचा उलगडा होत नाहिये पण.
काल एका शॉट मधे रा मिठबा.ला सांगते maazaa माणुस तुझ्या माणसाला गाडिची किल्ली देइल. नंतर च्या शॉट मधे अनुराधा ला तो सांगतो किल्ली असल्याचे.....मधे कधी कसा जुगाड करून किल्ली पोचवली देव जाणे...तो मिठबावकर आणि त्याची maanase इतकी easily accessible असतात?
की माझेच काही miss zaale

किल्ली असल्याचे.....मधे कधी कसा जुगाड करून किल्ली पोचवली देव जाणे.>>> exactly हे मला पण नाही कळलं कि सकाळी रा ने फोन केला आणि संध्याकाळी अनुराधा ने फोन करेपर्यंत कार चा नंबर मिठबा ला कसा कळला .
पण मी असा समज करून घेतला कि मिठबा चा माणूस रा च्या माणसाला गाडी देणार असेल (and not vice versa) किंवा मी पण काही मिसल बहुतेक

आजचा भाग नक्कीच interesting असणार (पाणी घालून दाखवला नाही तर )

अरे सगळंच कसं दाखवत बसणार???
लिमिटेड एपिसोड आहेत म्हणजे काही गोष्टी कॅरेक्टर्सच्या बोलण्यातून त्या झाल्यात हे दाखवून देतात. आपण संवाद नीट लक्ष देऊन ऐकायचे नि ते घडलंय हे समजून घ्यायचं. Happy

नेहमीच्या डेली सोप पाहून आपल्याला सर्व काही दाखवलंच पाहिजे, असा समज निर्माण झालाय. प्रत्येक घटना घडतानाच दाखवली पाहिजे असं नाहीये. जे दाखवलंच पाहिजे तेवढंच या सिरियल मध्ये दाखवतायत.. बाकी संवादातून सांगून मोकळे होतायत. आपण ते समजून घ्यायला हवं. Happy

हो हो मी अर्थातच हा विचार पण मी केलाच कि रा च्या माणसांनी दिली असेल चावी अस समजून घ्यायचं आहे .. आत्ता ते महत्वाचं नाहीये कोणी कोणाला चावी कधी आणि कशी दिली तर तो plan कसा यशस्वी किंवा अयशस्वी होतोय ते बघायचं

पण अश्या सिरीयल मध्ये असे बरेच बारकावे असतात जे आपल्या साठी फालतू पण कथानकासाठी महत्वाचे असू शकतात

हो. आणि चंदूदादा नि रागिणीची ओळख कशी काय?? चंदूदादा डायरेक्ट रागिणीला "हे सर्व तुझ्यामुळे होतंय" असं कसं काय म्हणाले?? हे मी तो भाग झाल्यावर लगेच इथे लिहिलं होतं.. तेव्हा मला, बहुतेक छायाने सगळंच चंदूदादांना सांगितलं असेल नि दादा मेकअपमन असल्याने नि रागिणी आधी स्ट्रगलर आर्टीस्ट असल्याने त्यांची ओळख असू शकते. असं उत्तर इथेच मिळालं होतं. Happy

anjali_kool, बरोब्बर. Happy

@ निधी.. बरोबर. टिपीकल मालिकांसारख सगळचं दाखवत नाहीत आणि वेगाने पुढे चाललीये हेच खूप आहे.

Pages