Submitted by पुरंदरे शशांक on 6 September, 2017 - 00:44
सत्यासत्य
लटिका संसार । गुंतवितो फार । सावलीचा भार । तैसे होय ।।
मृगजळी पूर । भय ते जीवास । साच अविनाश । दिसेचिना ।।
कृपाळुवा तुम्ही । सर्व संत जन । दाखवी निधान । सत्य थोर ।।
दूर होता जाण । दुःस्वप्न भीषण । शांति समाधान । लाभे जीवा ।।
घेता अनुभूती । सत्याचीच सदा । गोंधळूक कदा । होईचिना ।।
निवांत निश्चल । होवोनिया मन । श्रीहरी चरण । चिंतीतसे ।।
ॐ तत् सत् ।।
निधान = ठेवा, खजिना
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर ! पण
सुंदर ! पण
दूर होता जाण । दुःस्वप्न भीषण । शांति समाधान । लाभे जीवा ।।
शांती समाधान ऐवजी " ना शांती समाधान " म्हणावयाचे आहे काय ?
सुंदर! दूर होता जाण ।
सुंदर!
दूर होता जाण । दुःस्वप्न भीषण । शांति समाधान । लाभे जीवा ।।
शांती समाधान ऐवजी " ना शांती समाधान " म्हणावयाचे आहे काय ? >>>
सर, भीषण दु:स्वप्न दुर झाल्यावर शांती समाधान जीवाला लाभेल आणि तू ते अनुभवशील, असं अभिप्रेत असाव.
आपण लिहीलं त्याप्रमाणे ही अर्थपुर्ण रचना बनतेच.
"मृगजळी पूर" । "सावलीचा भार"
"मृगजळी पूर" । "सावलीचा भार" । मायेचे सुन्दर । वर्णन हे !!
राहुल, बरोबर आहे तुमचे...
राहुल, बरोबर आहे तुमचे...
सर्वांचे मनःपूर्वक आभार...
अ यात्री, विशेष धन्यवाद ___/\___
सुंदर!
सुंदर!
सुंदर
सुंदर