"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माखिजा बिबट्या ची गोष्ट सांगताना काय जबरदस्त अभिनय.. पण का कुणास ठाऊक ती खरी वाटली नाही.. रागिणी तयार झाली पण पुन्हा जॉईन व्हायला.. ते पण स्वतःच्या टम्सवर..
मला वाटतं रावसर किंवा माखिजा सगळ्यात वरचा बॉस असू शकतात.
विवेकचं नाव यात मुद्दाम समोर येऊ दिलं मे बी दिशाभूल करण्यासाठी. तो ह्यात नसावाच..
हवालदार रागिणीला काय इन्फॉर्मेशन देतो काय माहित.. सोमवार पर्यंत वाट पहावी लागेल.. Happy

हवालदाराने स्केच पाहिलंय, तो रागिणीला ओळखायची शक्यता आहे.

पुढच्या भागात रागिणी विवेकवर अप्रत्यक्ष आरोप करताना दाखवलीय. सिरीयल संपवायची तिला इतकी का घाई?

तिने विग वगैरे हलवले बहुतेक. आई शोधतेय पण सापडत नाही.

तो मारेकरी सगळ्यांना फटाफट मारतोय तर त्या मुलींपैकी एक हसते म्हणुन त्याला त्यांना 'मारावेसे वाटत नाही' हे जरा विचित्र, न पटण्यासारखे वाटले. करमरकरांनी बिबट्याची कथा मात सांगितली.

मला वाटत त्या मारेकार्याला genuinely दया आली त्या मुलींची. ह्याआधीचे मारलेले लोक त्याला घाबरत असणार, ह्या मुलींना ड्रग च्या अंमलामुळे पुढे काय वाढून ठेवलंय ह्याची कल्पनांचं नाहीये त्यामुळे ही तो अस्वस्थ झाला असेल.

कथानकाची गरज हे कारण आहेच म्हणा.

मला तरी लगेच कळले म्हणजे सांगता आले बहुतेक दिग्दर्शकाला. तो त्या मुलीकडे वळून ज्या नजरेने बघतो व बोलतो त्यावरून लक्षात येते

नाव नसलेले कॅरेक्टर आहे संदीप पाठकचे.

संदीप पाठक भारी काम करतोय. त्याचं कॅरेक्टर पण मस्त उभं केलंय. परवाच्या भागात पण पोलिस व्हॅनच्या ड्रायव्हरला गोळी मारतो आणि नंतर गाडीत चढताना त्याच्या बाॅडीला पाय लागतो म्हणून साॅरी बोलतो. किती विरोधाभास.

सुहासच्या बाबान्च अल्कोहोलिक असण मला वाटत एक उपकथानक लागत मुख्य कथा पुढे न्यायला फिलर टाइप, याचा कथानकाशी सबध नसावा काही. >> मागच्या एपिसोडमध्ये त्यांचे आणी सुहासच्या बोलण्यात ते अल्कोहोलिक का झाले त्याचे उत्तर येता येता राहुन गेले. कोणी नोटिस केले का ? त्यांचा आणी अनुराधा बारचा संबध असावा वा काहितरी त्यांच्याकडुन करवुन घेतले असावे त्यानंतर ते अल्कोहोलिक झाले असतील.
किरण करमरकर भारी!
चहाचा (का कौफी ? ) प्रसंग . तो तीला ग्रुहित घरतो ( white/black) ती धरुन देत नाहि. फोनवर और्डर घेणारा माणुस कन्फर्म करतो परत ' दोन का' म्हणुन ! म्हणजे किका कोणालाच चहा/कौफी कधीच औफर करत नाहि.
प्रत्येक डायलौग विचार करुन लिहिला आहे.

संदीप पाठक भारी काम करतोय. त्याचं कॅरेक्टर पण मस्त उभं केलंय. परवाच्या भागात पण पोलिस व्हॅनच्या ड्रायव्हरला गोळी मारतो आणि नंतर गाडीत चढताना त्याच्या बाॅडीला पाय लागतो म्हणून साॅरी बोलतो. किती विरोधाभास. >> तो सायकिकच उभा केलाय.

किरण करमरकर लॅपटॉपवर टाईप करताना त्याचं एक नख गोल्डन आहे असं वाटलं.>> बापरे कस काय दिसलं बुवा? कित्ती बारीक लक्ष . ग्रेट. विवेक / शोभाताई /किरण करमरकर सगळे दिसताहेत रॅकेट मध्ये . पण संदीप पाठक ला आज अचानक उपरती कशी झाली ? अशाने तो काही काळाने रागिणी ला साथ देईल बहुतेक . त्याची साथ मिळाली तर सगळं सोप्प जाईल किरण करमरकर पण जी काही गोष्ट वगैरे सांगतो ती जास्त क्लिक च नाही झाली. तो वाघ कसा थंड डोक्याने फिरत असतो तशीच तू पण आहेस . कोणाचंच ऐकणार नाहीस असं रागिणीला म्हणतो खर पण त्या गोष्टीचा संदर्भच जास्त काही लागला नाही . रागिणीला तरी अर्थ कळला कि नाही देवच जाणे Happy

आणि एक तो संदीप पाठकशी बोलणारा किरण कोण आहे ? . तो ज्या ऑफिस मध्ये बसलेला दाखवलाय तिथे पाठीमागे बिल्डिंग ची पोस्टर लावली होती . तो बिल्डर आहे का ?

किरण करमरकर पण जी काही गोष्ट वगैरे सांगतो ती जास्त क्लिक च नाही झाली. तो वाघ कसा थंड डोक्याने फिरत असतो तशीच तू पण आहेस . कोणाचंच ऐकणार नाहीस असं रागिणीला म्हणतो खर पण त्या गोष्टीचा संदर्भच जास्त काही लागला नाही >> सागर तळाशीकरला मारणार्या रागिणीची तुलना त्याने त्याच्या भावाला मारणार्या वाघाशी केली. याचा अर्थ रागिणीने सागर ला मारले आहे हे त्याला माहित असावे अथवा त्याने अंदाज बांधला असावा!

कालच्या सीनवरुन मखिजा मेन बॉस वाटला. पण शेवटीच कळेल. प्रेक्षकांना कदाचित धक्का पण देऊ शकतात शेवटी. कारण रुद्रम आहे ही.

तो वीग घालून ती आईसमोर येते. रागिणीच्या एवढे मागे का लागलेत नोकरी कर म्हणून. सचे मध्ये ती समाजसेवा करायला जाते पण एखाद्या पोलीसासारखी आल्यापासून चौकशा करतेय आणि विवेकवर संशय घेतेय. तो आणि राव हे कसं खपवून घेतात.

रॅकेट मध्ये खूप जण आहे पण सध्या जे दिसताहेत त्यापैकी कोणीही प्रमुख असे म्हणता येणार नाही असे मला वाटते. जे कोणी आहेत त्यांनी पोलीस पण मॅनेज केलेत. म्हणजेच ह्यात जो पैसा आहे तो फार वरपर्यंत पोचलेला आहे.

सरेपोतदारच्या लेव्हलचे ऑफिसर फक्त पैशासाठी लाचारी नाही पत्करत, भराभर पदोन्नती, चांगल्या खाबूगिरी करायला मिळतील अशा पोस्टिंगस ह्यासुद्धा मागण्या असतात आणि ह्या फक्त राजकारणी पुरवू शकतात. इथे मारेकरीसुदधा पोलीस जीप मधून येतो इतके मॅनेज केले गेलेय सगळे. काय लेव्हलची माणसे असतील यात..

सागर तळाशीकरला मारणार्या रागिणीची तुलना त्याने त्याच्या भावाला मारणार्या वाघाशी केली. याचा अर्थ रागिणीने सागर ला मारले आहे हे त्याला माहित असावे अथवा त्याने अंदाज बांधला असावा! >> ओह बरोबर बरोबर
आता असं वाटतंय. माखिजा चा बिल्डिंगी बांधण्याचा पण व्यवसाय असावा . त्यामुळेच अनुराधा बार च्या खाली तळघरात ज्या काही खोल्याचा पत्ता इन्स्पेक्टर घुरत ना लागला होता ते सगळं अवैध बांधकाम पण किक ( माखिजाने ) केलं असावं

रुद्रम च संवाद लेखन हे गिरीश जोशी यांचं आहे . हा एक अतिशय हुशार लेखक आहे . रसिका ओक चा नवरा . त्याच आणि मुक्ता बर्वे च "फायनल ड्राफट" हे नाटक काही वर्षांपूर्वी बघितल्याचं आठवतंय . तो आणि मुक्ता बर्वे असे दोनच कलाकार नाटकात होते . त्या नाटकाचं लेखन आणि डिरेक्शन गिरीश जोशींनी केलं होत . नाटक खूपच छान होत असं आठवतंय Happy

टायटल साँग मधे दाखवलेले सगळे आले स्क्रीन वर. आता कोणी यायचं बाकी नाही राहीलं. मिन्स ह्या लोकांपैकीच असणार कोणीतरी.

नाव नसलेले कॅरेक्टर आहे संदीप पाठकचे... +१. त्याचं नाव विवेक असेल का? पण मग मुलींनी त्याला ओळखलं असतं व त्याला पाहुन घाबरर्ल्या असत्या काल.

विवेकचं नाव मुद्दामच समोर आणलय बहुतेक.. तो नसावा यात.. मारेकर्याचा अभिनय मस्त आहे. पहिले बरेचदा त्याला विनोदी भूमिका मध्ये पाहिलयं.
टायटल साँग मधे दाखवलेले सगळे आले स्क्रीन वर. आता कोणी यायचं बाकी नाही राहीलं. मिन्स ह्या लोकांपैकीच असणार कोणीतरी. + 1

टायटल साँग मधे दाखवलेले सगळे आले स्क्रीन वर. आता कोणी यायचं बाकी नाही राहीलं. मिन्स ह्या लोकांपैकीच असणार कोणीतरी >> काय माहिती! शोभाताइ नाहि आहेत टायटल मध्ये. राव सर पण नाहि आहेत बहुतेक!
मोहन आगाशेना नक्किच मोठे काम असेल असे वाटते.

टायटल साँग मधे दाखवलेले सगळे आले स्क्रीन वर. आता कोणी यायचं बाकी नाही राहीलं. मिन्स ह्या लोकांपैकीच असणार कोणीतरी.
नाव नसलेले कॅरेक्टर आहे संदीप पाठकचे... +१. त्याचं नाव विवेक असेल का? पण मग मुलींनी त्याला ओळखलं असतं व त्याला पाहुन घाबरर्ल्या असत्या काल.
Submitted by Chaitrali on 16 September, 2017 - 14:30

मला वाटते खरा बाॅस वेगळा आहे जो टायटल साँग मधे नाही.
धक्कातंत्र

शेवटी धक्कातंत्र असणार असं मलाही वाटतंय. मला सुहासचे बाबा मेन असतील काय, असंही वाटतंय. ते नाटक करतायेत सर्वच असंही वाटतंय.

Pages