Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा ! मस्त! धन्यवाद योकु. (
वा ! मस्त! धन्यवाद योकु. ( स्माईली काम करत नाहीयेत) आता उकड पण करुन बघते. ज्वारी पचायला हलकी असल्याने रात्री पण हलका आहार म्हणून चालेल की. पिठले पहिल्यांदाच ऐकले. ते ही करता येईल. नेटवरच कुणीतरी ज्वारीच्या डोश्याबद्दल लिहीले होते, पण आता नेमके प्रमाण पण आठवत नाही. ज्वारीच्या पीठाचे धपाटे पण करुन झालेत.
धिरडी- ज्वारी पीठ आणि बेसन,
धिरडी- ज्वारी पीठ आणि बेसन, ताक , मिरची, कोथींबीर
कांद्याच्या चटणीची रेसिपी
कांद्याच्या चटणीची रेसिपी वेगळा धागा काढून लिहा.चटकन शोधायला बरी पडेल
ज्वारीच्या पीठाच्या चकल्या
ज्वारीच्या पीठाच्या चकल्या अतिशय छान होतात.
डोसा माहित नाही पण आजी श्रावणात बीडाच्या तव्यावर भरपुर कोथिंबीर घालून आंबोळ्या करायची. ज्वारीच पीठ, पाणि किंवा ताक, भरपुर कोथिंबीर, मिरच्या,जीरे आणि थोडा जास्त हिंग. एकदम छान होतात या आंबोळ्या. कोथिंबीर पाहिजेच खरं.
योकु मस्त रेसिपी सांगितलीयेस
योकु मस्त रेसिपी सांगितलीयेस अगदी. करुन पाहिन आता.
ज्वारी पीठ : कणीक : बेसन - ३
ज्वारी पीठ : कणीक : बेसन - ३:२:१ , यात हळद, तिखट,मीठ्,साखर्,ओवा,कोथिंबीर,लसुण अशी धिरडी मस्त लागतात..
ज्वारीच्या पीठाच्या चकल्या
ज्वारीच्या पीठाच्या चकल्या अतिशय छान होतात. >>> बायडीबरूबर सासूबै नेहेमी पाठवतात नागपूर हून. एकदम भारी टेस्टी असतात. तीळ वगैरे घालून केलेल्या असतात. बारीक वळीच्या.
ज्वारीच्या पीठाच्या चकल्या
ज्वारीच्या पीठाच्या चकल्या अतिशय छान होतात...... +१.अगदी भाजणीच्या चकलीसार्ख्या खमंग लागतात.
ज्वारीच्या पिठाचे सांडगे करतात.
मी केल्यात ज्वारीच्या पीठाच्य
मी केल्यात ज्वारीच्या पीठाच्य चकली.
>>भोपळ्याची थालीपीठ<<<<
टाकते रेसीपी लवकरच....
देवाची भांडी स्वच्छ कशी
देवाची भांडी स्वच्छ कशी करावीत? चिकट झालेली?
कोणत्या धातूची आहेत? चिकट
कोणत्या धातूची आहेत? चिकट म्हणजे तेलामुळे झाली असतील तर रांगोळी ने घासून बघ.
पितळ, तांबे असेल तर गरम पाणी
पितळ, तांबे असेल तर गरम पाणी टाकुन लगेच चिंचेने घासा
तेलकटपणापण जातो अन चमकतात सुद्धा
धन्यवाद!
धन्यवाद!
तेलाचाच आहे चिकट पणा. स्टील आणि चांदी, दोन्ही आहेत.
रांगोळी ने घासून बघ. >>
रांगोळी ने घासून बघ. >> रांगोळीने चरे पडणार नाहीत का ?
ग्राहक पेठेत मिळणारी पीतांबरी पावडर असेल तर त्याने पण पितळी समयांचा चिकटपणा जातो. चांदीच्या सामानासाठी टूथपेस्ट ट्राय करु शकता
टूथपेस्ट वापरून चांगली निघतात
टूथपेस्ट वापरून चांगली निघतात. पितांबरी पण हिट आहे !
तेलाचा राप बसला असेल तर
तेलाचा राप बसला असेल तर रॉकेलने पुसल्यास जातो - मग साबण/गरम पाण्याने धुवून घेता येईल.
(बोट बुडवेल इतपत) गरम पाण्यात अॅल्युमिनियम फॉइल + मीठ + वॉटर सॉफ्नर किंवा बेकिंग सोडा मिसळून त्यात चांदीची भांडी बुडवून ठेवली तर स्वच्छ होतात.
तुम्ही अमेरिकेत आहात का? मग बार कीपर्स फ्रेन्ड नावाची पावडर मिळते - स्टीलच्या/लोखंडाच्या/बिडाच्या भांड्यांसाठी बेस्ट!
धन्यवाद मंडळी!
धन्यवाद मंडळी!
आता भांडी स्वच्छ करायला घेते!
स्वाती, मी अमेरिकेतच आहे. बार कीपर्स सुचले नाही खरे..
मी अमेरिकेतच आहे. बार कीपर्स
मी अमेरिकेतच आहे. बार कीपर्स सुचले नाही खरे.. >> अरे मग टार्नेक्स सिल्व्हर पॉलिश / मेटल पॉलिश वापरु शकता. किंवा राइट्स Wright's Silver Cream.
हे नव्हते माहित. थॅन्क्स !
हे नव्हते माहित. थॅन्क्स !
कॉपर छोटा पिन्प आहे देशातुन
कॉपर छोटा पिन्प आहे देशातुन आणलेला सकाळी त्यातले पाणी प्यायलेले चान्गले म्हणून . पण आणल्यपसुन उघडलाच गेला नाही.
कुथले पॉलीश वापारता येइल?
तांब्याची भांडी पीतांबरी
तांब्याची भांडी पीतांबरी पावडर (रेग्युलर) किंवा चिंच + मीठ लावून घासायची. लखलखीत होतात मस्त. धुतल्यावर लगेच पुसून कोरडी करावी नाहीतर पाण्याचे डाग पडतात.
वेगळं असं पॉलीश वापरायची गरज पडायला नको खरंतर
चिंच + मीठ वर्क्ड !
चिंच + मीठ वर्क्ड !
कलोजी चे पाकीट आणले गेले आहे
कलोजी चे पाकीट आणले गेले आहे. कुठे वापरता येइल?
मीरा, या रेसिपीज पहा.
मीरा, या रेसिपीज पहा.
पांच फोरन , पंच फोरन असे शोधलेत तर नेट वर बर्याच रेसिपीज सापडतील . Bong Mom's Cookbook - या साइटवर बर्याच बंगाली रेसिपी आहेत ज्यात कलौंजी आहे.
https://www.maayboli.com/node/59469
https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/132543.html?...
धन्स मेधा. कलोउन्जी कधी
धन्स मेधा. कलोउन्जी कधी बघीतलीच नव्हती आणि पाकीट आणले गेले. पान्च फोडणीच्या रेसिपित वापरुन
टाकिन ! ( वेलान्टीच्या चुका सुढ्ररवाण्याचा प्रयत्न करत आहे.
कलोजी चे पाकीट आणले गेले आहे.
कलोजी चे पाकीट आणले गेले आहे. कुठे वापरता येइल? >>>
तिखटामिठाच्या पुर्या, खारी शंकरपाळी
नेहमीचे मेथी / कोबी / पालक या पराठ्यात - पीठ भिजवताना घालायची. (माझ्याकडे पराठ्यात घालूनच कलौंजी संपते नेहमी.)
वरणफळाची कणीक भिजवताना त्यातही छान लागतात. (तीळ, ओवा, कलौंजी)
कुठे विचारू न कळल्यामुळे इथे
कुठे विचारू न कळल्यामुळे इथे जरा विषयांतरः
माझी लॅप्टॉप ची सॅक खराब झाली आहे. म्हणजे दूध पिशवी त्यातून आणली (नशिबाने त्यात लॅपटॉप नव्हता, पुस्तकं होती) आणि आणताना बहुतेक पेनच्या पोइंटरमुळे असेल पण पिशवी फुटली आणि सॅकमधलं सगळं दुधाने भिजून गेलं. बाकी डॅमेज रिकवरी झाली पण सॅक कडकडीत गरम पाण्यात साबणपूड घालून २-३ तास भिजू देऊ ५-६ वेळा पाण्यात खळबळून धुवूनही वासेरी झाली आहे. दुधाचा वास काही केल्या जात नाहिये. शिवाय मधेच पाऊस आला त्यामुळे अर्धवट वाळलेली पुन्हा ओलसर होऊन आता किंचित कुबट वास येतोय. चांगली होती ती सॅक, हे वास गेले तर अजूनही दणकट आहे. वास घालवायला काय करायला लागेल?
चार पाच टी बॅग्ज आत ठेउन बंद
चार पाच टी बॅग्ज आत ठेउन बंद करुन ठेवा. २ दिवसानी किंवा आठवण येइल तेव्हा काढुन टाका.
कडकडीत उन्हात ठेवून पहा बॅग
कडकडीत उन्हात ठेवून पहा बॅग.
नाहीतर बेकिंग सोडा + अॅक्टिव्हेटेड चारकोल ( फिश टॅ़क सप्लायज मधे मिळेल ) . असे एका वाटीत घालून बॅग मधे ठेवून बघ २४-४८ तास
ओके. टीबॅग ट्राय करते. कडकडीत
ओके. टीबॅग ट्राय करते. कडकडीत ऊन नाहिये सध्या त्यामुळे जास्त वास येतोय. सोडा + अॅ चा सुद्धा उपयोगी होईल असं वाटतंय. रोजच्या वापरातली आहे बॅग त्यामुळे अगदीच अडतंय.
Pages