Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला दिसतो पुढचा भाग..आजची
मला दिसतो पुढचा भाग..आजची तारीख आणि..full episode is coming soon .enjoy the preview..असं दिसतं.
ही आज्च्या भागाची लिंक.
http://www.ozee.com/shows/rudram/video/rudram-episode-24-september-7-201...
ओह तसं म्हणताय का, एपिसोडच्या
ओह तसं म्हणताय का, एपिसोडच्या शेवटी नाही दिसलं म्हणून मला वाटलं दाखवत नसतील. बघत जाईन आता पुढच्या भागावर जाऊन
बरोबर. आज जाऊन आजच्या
बरोबर. आज जाऊन आजच्या तारखेचा भाग बघितला तर प्रिव्यु दिसतो.
मलाही ओझीवर "पुढील भागात"
मलाही ओझीवर "पुढील भागात" दिसते हे माहिती आहे. पण मी काल रात्री ११.३० पर्यंत चेक केले तोपर्यंत तरी नव्हता अपलोड झाला हा प्रीव्ह्यू. बहुतेक रात्री १२ नंतर होत असावा.
बाकी काल पहिल्यांदा मी मोहन आगाशेंना रागिणी जे बोलतेय त्याचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करताना बघितले. याआधी असं केल्याचं कोणी नोटीस केलंय का? नसेल तर याच वेळी तसं करण्याचं कारण कळलं नाही.
लप्रि ला अनुमोदन. मिठबावकर अँड कंपनी आणि सातव आणि रॅकेट या वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात असं सध्यातरी वाटतंय. त्यामुळे रागिणीची न्यूज बघून हबकलेला माणूस सातव आणि रॅकेट मधला आहे, मिठबावकरचा नाही.
बाकी रागिणीला मोकळं वाटत असलं तरी उलट आता ती वेगवेगळ्या लोकांच्या रडारवर आलीये. त्यामुळे अजूनच गुंतत जाईल. सदाचा सदाचारीपणा मात्र मनापासून आवडला आहे. इतर एखादा असता तर नक्की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असता. कुठेतरी उगाचंच आशा आहे की रागिणीला त्याची मदत होईल.
बाकी काल पहिल्यांदा मी मोहन
बाकी काल पहिल्यांदा मी मोहन आगाशेंना रागिणी जे बोलतेय त्याचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करताना बघितले. याआधी असं केल्याचं कोणी नोटीस केलंय का? >>>> पहिल्या सेशनपासून करत आहेत ते रेकॉर्ड.
काल रागिणीची आई म्हणते की बाबा असायला हवे होते तर रागिणी म्हणते की दर वेळी तू असं का म्हणतेस, बाबाच का, आशिषही असायला हवा होता जिवंत. संशयाची सुई वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आईवरही वळवलेली आहे ( मधूनच गूढ वागणं, बोलणं, विसरणं, अॅक्सिडेंटच्या दिवशी नेमकं आयत्यावेळी पाय मागे घेणं ) पण मला वाटतं ते जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी केलेलं असावं.
पोलिस इन्स्पेक्टर रागिणीला मदत करेल असं आता वाटतं आहे. सातवच्या मुलीचं काम करणारी लक्षात राहते, समंजस अभिनय !
बाय द वे, रागिणी दर वेळी 'आई, मी गेले गं' असं म्हणते. त्यावर आई 'येते म्हणावं. गेले म्हणू नये' असं म्हणेल असं वाटतं पण तसं होत नाही. हेही मुद्दामच लिहिलेलं असावं.
पहिल्या सेशनपासून करत आहेत ते
पहिल्या सेशनपासून करत आहेत ते रेकॉर्ड... हो नोटीस केलंय
कुठेतरी उगाचच आशा आहे की
कुठेतरी उगाचच आशा आहे की रागिणीला त्याची मदत होईल. >>> काल मलाही तसं वाटलं.
अगो रागिणीच्या आईवर किती संस्कार आहेत त्यावर बारीक लक्ष ठेवून आहे.
काल रागिणीची आई म्हणते की
काल रागिणीची आई म्हणते की बाबा असायला हवे होते तर रागिणी म्हणते की दर वेळी तू असं का म्हणतेस, बाबाच का, आशिषही असायला हवा होता जिवंत. संशयाची सुई वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आईवरही वळवलेली आहे ( मधूनच गूढ वागणं, बोलणं, विसरणं, अॅक्सिडेंटच्या दिवशी नेमकं आयत्यावेळी पाय मागे घेणं ) पण मला वाटतं ते जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी केलेलं असावं.>>हे खटकलेलं खरं कालच्या भागात
हे खटकलेलं खरं कालच्या भागात
हे खटकलेलं खरं कालच्या भागात +१
आजच्या भागात पुन्हा संशयाच्या सुया इकडेतिकडे विखुरल्या. या सुया मोठ्या असतील तर पंखा म्हणून वापरता येतील इतक्या गरागरा फिरताहेत. काही नवीन पात्रांच्या एन्टर्या झाल्या. रात्री रिपीट बघणाऱ्या लोकांचं बघून झालं की बोलूयात.
रात्री रिपीट बघणाऱ्या लोकांचं
रात्री रिपीट बघणाऱ्या लोकांचं बघून झालं की बोलूयात.>> हो. मला पण खर तर पोस्ट करायचं होत पण थांबवून ठेवलाय
छान झाला आजचा भाग.
छान झाला आजचा भाग.
पॉवरफुल माणसे किती पॉवरफुल आहेत त्याचा परत एकदा प्रत्यय तर आलाच पण सत्य माहीत असलेली माणसे तोंड बंद करून आरामात राहतात हेही पाहायला मिळाले. मालिका उत्तरोत्तर इंटेरेस्टींग होत चाललीय.
कितीतरी दिवस मालिका पाहिली
कितीतरी दिवस मालिका पाहिली नाही बाहेर होते म्हणून. पण इथे आल्याशिवाय राहवलं नाही.
वीकांताला पाडायला हवा फडशा.
इन्स्पेक्टर धुरत ऑफ द रेकॉर्ड
इन्स्पेक्टर धुरत ऑफ द रेकॉर्ड शोधायचा प्रयत्न करेल असं वाटतंय, मुक्ताला मदतंच करेल. नाहीतर स्टोरी पुढे जाणार कशी.
उत्कंठा वाढवणारा भाग. विवेक
उत्कंठा वाढवणारा भाग. विवेक लागूंचा आवाज फार छान वाटतो मला, गूढ आणि गहिरा. नारद आणि सई असे पाहुण्यांसमोर भांडतात किंवा त्यांच्यातले मतभेद लपून रहात नाहीत याचं कारण कदाचित नारदाचं तिच्यावर प्रेम असेल पण सई नेहेमी आषिशबरोबर असायची हे त्याला आवडत नसावं. पोलीस काही तपास करतील ही आशा मावळली आणि सगळंं आता रागिणिवर अवलंबून आहे.
आजच्या भागात:
आजच्या भागात:
१. रागिणीचा त्या अनाथांच्या संस्थेच्या प्रोग्रॅमला जायचा डिसीजन. तिथे मानसी म्हणजे सई रानडे (ही बरीच श्रुती मराठेसारखी दिसते नै) आणि विवेक लागुन्ची एंट्री. सईकडे नक्की आशिषच्या प्रोजेक्टविषयी थोडे तरी डिटेल्स मिळू शकतात. आणि विवेक लागू पण गुन्ह्यात इन्व्हॉल्व्ह असावेत असं वाटायला स्कोप आहे. तिथे तो नारद का कोण मुलगा सध्या तरी हार्मलेस वाटतोय. पण मानसीला आशिषवरून चिडवायची संधी तो (अजूनही.. म्हणजे आता आशिष जाऊन 2 वर्ष झाली तरी) सोडत नाहीये.
२. सातवचा मेव्हणा अर्थात धुरत याला रागिणीकडे नक्की काहीतरी जास्तीची इन्फॉर्मेशन आहे याचा अंदाज आलाय. 'पुढील भागात' मध्ये तो रागिणीच्या घरी पोचणार असं दाखवलंय. बाकी, फुली मारलेली सर्व माणसं मेलेली किंवा खून झालेली आहेत आणि हे मोठं मॅटर आहे याचा त्याला अंदाज आलाय. पण तो त्याच्या वरिष्ठांना हे सांगायला जातो तेव्हा ते त्याला उडवून लावतात (अर्थातच त्यांना सत्य माहीत असणार आहे). कदाचित केस मधून त्याची उचलबांगडी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे तो ही केस ऑफ द रेकॉर्ड सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आणि यात त्याला आणि रागिणीला एकमेकांची मदत होणार हे नक्की.
बाकी आज लक्षात ठेवण्यासारखं फार काही घडलं नाही. सुहासच्या घरी रागिणी (बहुतेक त्याची माफी मागायला) जाते तेव्हा त्याचे वडील तिच्याकडून गोड बोलून 500 रु घेऊन स्वतःच्याच घरातून पसार होतात. पण यात रागिणीचीच चूक होती हे स्पष्ट आहे. याव्यतिरिक्त काही मिस केलं असेल तर सांगा. आणि हो.. आजही रागिणीशी संस्थेतले सगळे बोलत असताना आई संस्थेचा परिसर बघण्यासाठी गायब होती. पण मला वंदना गुप्तेवर संशय येत नाही. हा सगळा योगायोग असू शकतो.
आजच्या एपिसोडचा शेवट खतरनाक
आजच्या एपिसोडचा शेवट खतरनाक आहे. संशयाची सुई शिफ्ट्स अगेन. लागूंचा पण हात असावा या सगळ्यात असं त्यांच्या त्या वाक्यावरून वाटलं.
तो जय मल्हार मध्ये नारदमुनी
तो जय मल्हार मध्ये नारदमुनी होता. मालिकेतलं किंवा खरं नाव आठवत नाही. रागिणीची वेगवेगळी रूपं थक्क करतात. आज ती अगदी भोळेपणाने पाचशे रूपये देते आणि पत्रकार परिषदेत ती अगदीच काहीतरी वेगळी वाटली. हे फक्त मुक्ताच करू जाणे.
तो नारद असा डोळ्यात काजळ
तो नारद असा डोळ्यात काजळ घातलेला व जरा बायकी आविर्भाव असलेला आहे (थोडक्यात विचीत्र) म्हणून तो पण कुठेतरी गुंतलाय की काय असे वाटले.
मजा येतेय मालिका पाहायला.
मजा येतेय मालिका पाहायला.
सुहासचे वडील यांचे अनुराधा बार मध्ये येणे जाणे असावे. त्यांनी पण बातमी पहिली होती . कदाचित ते मुक्ताविरुद्ध बातमी पुरवू शकतात पॉवरफुल लोकांना अशी शक्यता.
विवेक लागुना गैर प्रकार होतात
विवेक लागुना गैर प्रकार होतात हे माहिती आहे, सातव खूप लहान आहे, त्यापेक्षा मोठी माणसे यात आहेत हे माहीत आहे एवढे नक्की. आशिषला शेपटावर पाय दिला याची शिक्षा मिळाली हे त्यांना माहीत आहे पण ते सातवच्या शेपटावर नाही तर अजून कोणा मोठ्या माणसाच्या हे माहीत आहे म्हणून आता असे म्हणूया हे ते म्हणाले असे मला वाटते. डीएसपीनि ज्या तडफेने फाईल उडवून लावली त्यावरून कळतेय प्रकरण किती खोल आहे. खबरे अगदी इन्स्पेक्टरच्या रुपात पण आहेत. तो इन्स्पेक्टर उगीच बघत नव्हता खिडकीतून. आता सदा धुरत काय करणार हे पाहणे इंटरेस्टिंग होईल. तो रागिणीच्या घरी येऊन धडकेल. त्या आधी त्याने डोके चालवून आपण पुढे तपास करून आधी रागिनीचा व नंतर आपला जीव धोक्यात घालतोय हे समजून घेतले तर बरे होईल.
येस, पुढील भागात धुरत घरी आलेले दाखवलेत. रागिणी तेव्हा चांदूदादांकडे आहे. नशीब यांची परत एन्ट्री दाखवली ते. त्यांच्या लक्षात येईल किती मोठा धोका आहे या सगळ्यात ते.
रागिणीचे डॉक्टरांशी चाललेले सेशन काय नोटवर संपले ते दाखवले का?
आई प्रोग्रॅम नंतर अल्पोपहार न घेता संस्थेचा परिसर पाहत राहिली याचे थोडे आश्चर्य वाटले. रागिणी कधीही इमोशनल होऊ शकते माहीत आहे तिला. तिच्यासोबत राहायला हवे होते.
मानसीला काहीतरी माहीत असावे. त्यामुळे ती अधून मधून अस्वस्थ दाखवलीय. विशेषतः आशिषच्या अपघाताबद्दल चर्चा सुरू असताना.
सदाभाऊ खरच प्रामाणिक पणे
सदाभाऊ खरच प्रामाणिक पणे चौकशी करताोय. पण वरिष्ठांनी 'मुर्ख' म्हणुन त्याला निकालात काढलं म्हणजे त्यांंना ह्यात कोण सामील आहे याची कल्पना आहे. अनाथआश्रमातली बाई मला पण श्रुती मराठेच वाटली. नाहीये का ती? काल तिचं नाव वेगळं दाखवलं, नाहीतर तिच शोभाताई निघायची नंतर.
तो लाल शर्टवाला ऊगाच तिरसट दाखवला असेल, तिला सारखं कुचकं बोलणारा. ऊगाच आपला संशय वाढवायला हा सामिल असेल का म्हणुन? तो निरुपद्रवी निःघेल.
आई अचानक गायब दाखवल्यावर मला पण तिच्यावर संशय यायलाय परत.
विवेक लागू रागिणीच्या आईला
विवेक लागू रागिणीच्या आईला किडनॅप करतील असं उगाच वाटतयं. त्यांना सगळं माहीत असणार.
ती सई रानडे आहे, ती त्या एका मालिकेत होती बेस्ट सुनेचा किताब मिळणार असतो त्या - सुचित्रा बांदेकर पण होती त्यात.
'वहिनीसाहेब' मध्ये होती सई
'वहिनीसाहेब' मध्ये होती सई रानडे..
मला उगाचंच आशिष आणि तिचं affair होतं की काय अशी पण शंका येत्ये.
नारद अनाथ मुलांच्या पुनर्वसनाचं काम बघतोय. त्याबद्दलची स्टोरी बनवतानाच आशिषला सगळं खरं कळतं ना.. (आठवा: कीर्तिकर सरांचा फ्लॅशबॅक)
कदाचित नारदला त्या बार मॅनेजर सारखं ठेवलंय.. किती जबाबदारी देतोय असं सांगून मूर्ख बनवायचं..
विवेक लागू one of the मोठे लोक आहेत हे नक्की..
नारद कोण ? तो लाल शर्ट वाला
नारद कोण ? तो लाल शर्ट वाला का ?
तो इन्स्पेक्टर उगीच बघत
तो इन्स्पेक्टर उगीच बघत नव्हता खिडकीतून.
>> हे मीपण नोटीस केलं. पण म्हटलं उगाच वेड लागल्यासारखं सगळ्यांवर संशय व्यक्त करत बसायचा. म्हणून गप्प बसले.
नारद कोण ? तो लाल शर्ट वाला
नारद कोण ? तो लाल शर्ट वाला का ?>> हो तोच
कालचा भाग छान झाला. उगीचच
कालचा भाग छान झाला. उगीचच प्रोग्रामचे डिटेल्स दाखवत बसले नाहीत. डायरेक्ट अल्पोपहार.. ह्या संस्थेशी किंवा इथल्या लोकांशी काहीतरी कनेक्शन आहे ह्या सर्व मॅटरचा एवढं नक्की.. बहुतेक विवेक लागूंचाच.. कारण ते डोळ्यांनी खुणावतात मानसीला जेव्हा तो विवेक अपघाताचं सविस्तर विचारतो रागिणीला.. आणि पुढे असही म्हणतात.. हा विषय काढायची ही वेळ नाही..
पुढील भागात तो पोलीस रागिणी च्या घरी पोहोचणार.. तिने तो विग, बंदुक आणि फोन पहिलेच टाकून द्यायला हवे होते...
कुणीतरी सांगा.. शेवट कशावर केला.. मी मिस केलं.
आशिषचा मृत्यू का झाला याचा
आशिषचा मृत्यू का झाला याचा उलगडा झाला असे रागिणी म्हणते त्यावर लागू म्हणतात की हो, आता असेच म्हणायचे. बोलल्यावर त्यांच्या लक्षात येते चूक केली ते, पण रागिणी गोंधळते, तुम्ही असे म्हणता म्हणजे मी समजते तसे नाहीय, अजून काही वेगळे आहे का हे विचारते. ते गडबडतात. ओझीवर तरी इतकेच दाखवले.
आजच्या भागात रागिणी चंदूदादांच्या घरी व तिच्या घरी धुरत. आईला ती त्याला कशाला हात लावायला देऊ नकोस व प्रश्नांची उत्तरे देऊ नकोस, मी येते म्हणून सांगते.
धन्यवाद साधना.
धन्यवाद साधना.
सई रानडे तर एकदम राधा बावरी
सई रानडे तर एकदम राधा बावरी सारखीच दिसते. एवढी डिट्टो.
Pages