मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dilipp: बर्तनच्या मक्का सफरीबद्दल वाचले आहे कुठल्या ना कुठल्या पुस्तकात. त्याने लिहिलेली पुस्तके पण वाचायला हवीत.

Gang leader for a day: by Sudhir Venkatesh
वेगळ्याच विषयावरचे पुस्तक आहे. म्हणजे विषय अनेक पुस्तकातून येतो मात्र ज्या पद्धतीने लेखकाने रिसर्च केला आहे ते वेगळे आहे. भारतीय व इतर अविकसित/विकसनशील देशातील गरिबीवर असंख्य पुस्तके आहेत. मात्र विकसित देशातील गरिबीवर फारशी पुस्तके मी तरी वाचलेली नाहीत. त्यातदेखील सोशल सेफ्टी नेट मुळे युरोपातील गरिबी भयाण नाहीये. अमेरिकेतल्या गरिबीचे मात्र किस्से अनेकदा बिट्स अन पिसेस मध्ये वाचायला मिळतात. वैयक्तिक मला तरी इतका श्रीमंत विकसित आणि संसाधनांनी समृद्ध देशात टोकाची गरिबी कशी काय असू शकते हे अजून समजलेले नाही. ट्रम्पच्या विजयानंतर या गरिबीचे पडसाद पहिल्या पानावर उमटू लागले आहेत.
या गरिबीत राहणारा एक मोठा वर्ग आहे आफ्रिकन अमेरिकन वा काळे लोक. त्यातसुद्धा मेजोरीटी गुलाम म्हणून आलेल्या काळ्या लोकांचे वंशज. आता हे गरीब काळे प्रामुख्याने शहरात घेत्तोमध्ये म्हणजे दाट वस्तीच्या भागात राहतात, थोडक्यात झोपडपट्टीसारखाच. क्रॅक कोकेन हा चॉईस ड्रग.
सुधीर वेंकटेश या अमेरिकेत वाढलेल्या इंडियन अमेरिकन समाजशास्त्राच्या उच्च महाविद्यालयीन (पीजी) विद्यार्थ्याने शिकागोच्या अशा एका वस्तीत एका ड्रग विकणाऱ्या गॅंग लिडरशी मैत्री केली वा झाली. जवळ जवळ 6 वर्षे (लेट 80ज टू मिड नायनटीज) तो प्रत्यक्ष तिथे जाऊन, वेगवेगळ्या लोकांशी बोलून त्याने आपला रिसर्च पूर्ण केला. गॅंग लीडर, गॅंग मधले विविध पातळीवरील मेम्बर, अश्या वस्त्यातल्या बायका ज्यात बेबी सिटींग करण्यापासून वेश्याव्यवसाय करणाऱ्या इतक्या मोठ्या रेंजमधले व्यवसाय, भटके/रस्त्यावर राहणारे/आगापिच्छा नसलेले पुरुष, बिल्डिंग कमित्यांचे प्रमुख, पोलीस असे अनेक लोकांना तो भेटत राहिला, नोट्स घेत राहिला.
पुस्तक वाचताना जाणवते की गरिबीची व्याख्या, व्यवच्छेदक लक्षणे व गरिबांची होणारी पिळवणूक/नाडणे हे भारतात व अमेरिकेत (व इतर जगभर) समान सारखे आहे. पुस्तक अधेमध्ये थोडे संथ होते. तसेच त्यात प्रक्षोभक, रोमांचकारी असे काही घडत नाही. मात्र एक वेगळ्या समाजाची स्वतंत्र ओळख हे पुस्तक करून देते.
फ्रिकॉनॉमिक्स मध्ये या पुस्तकाचा उल्लेख अनेकांनी वाचला असेल. स्टीवन लेवित बरोबर सुधीर वेंकतेशने अनेक रिसर्च पेपर पब्लिकेशन केली आहेत जी गॅंगच्या अर्थकारणावर आहेत. त्याबद्दल पुस्तकात काहीही डिटेल्स नाहीयेत. हे पुस्तक प्रामुख्याने लेखकाच्या फिल्ड नोट्सचे पुस्तक रुपांतरण आहे.

टवणेसर ........ilipp: बर्तनच्या मक्का सफरीबद्दल वाचले आहे कुठल्या ना कुठल्या पुस्तकात. त्याने लिहिलेली पुस्तके पण वाचायला हवीत...>>>>>>>>नुसति मक्का सफर नव्हे तर. नाइल च्या उगमाचा शोध हे अतिशय रोमहर्शक पुस्तक आहे...... तसेच सिध प्राता तिल. वेश्या व्यवसायातिल मुलाचा वापर यावर त्याने मौलिक सन्शोधन केले आहे(त्याकाळि सिन्ध मधले प्रतिषटित लोक सम्भोगा साठि मुलान्चा वपर करत असत).....त्याने काम सुत्राचे सर्व प्रथम भाशान्तर हि केले आहे तसेच अरेबियन नाइट्चे हि............कामसुत्राच्या भाषातरा साठि तो बनारस ला जवुन सन्स्क्रुत शिकला... त्याच्या अनेक गर्ल्फ्रेड पैकि एक मराठि होति त्यास मराठि चान्गले येत होते.... जवळ जवळ २५ एक भाषा त्याला येत होत्या..तो एकाच वेळि. समाज सन्शोधक्,साहसि प्रवासि, विश्लेशक इतिहासकार,भाशातज्ञ, योध्दा असे बहुअयामि व्यकतिमत्व होता........................................

देवकि....>>>>>>>>>मि अलन मुरहेड चे पुस्तक वाचलेय.........बाळ सामतच हि वचलय बहुधा....... पण ते डिटेल नाहि मुरहेड चि त्या वर वेगवेगळि पुस्तक आहेत तुम्हाला पाहिजे असल्यास फिनिक्स लायब्ररित आहेत ति....ते कुरिअरने पुस्तक पाठवतात

जयंत नारळीकरांचे आत्मचरित्र 'चार नगरातील माझे विश्व' नुकतेच वाचले. छान आहे आवडले.
प्रामुख्याने बनारस, केंब्रिज, मुंबई, पुणे या नगरातील त्यांच्या वास्तव्यावर त्यांनी यात लिहिले. त्यांच्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता होती ती या पुस्तकामुळे पूर्ण झाली.

चार नगरातले माझे विश्व
जयंत नारळीकर
मौज प्रकाशन
किंमत ५०० रूपये

जयंत नारळीकरांचे आत्मचरित्र 'चार नगरातील माझे विश्व' नुकतेच वाचले. छान आहे आवडले.>>
वाचायच्या यादित आहे, आणून ठेवलय, 'किमयागार' संपलं की हे वाचणार.

सध्या जुने लेखक शेजेने वाचायचे ठरवले आहे...म्हणजे ह.ना आपटे भावे अरविन्द गोखले, पाध्ये,श्रिना पेन्डसे इ इ इ...... पाहुया आणि बरोबरच नेपोलियन चा इतिहास पाहुया.कस जमतय ते

पुलंच अपूर्वाई वाचलं अन् पु ल देशपांडे काय चीज आहेत ते एकदाचं समजलं. पुस्तकात युरोपच वर्णन पुलंनी खास त्यांच्या शैलीत केलंय. वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. शाब्दिक कोट्या तर इतक्या जबरदस्त आहेत की हसून हसून मुरकुंडी वळते. पुलं जरा उशिराच वाचनात आले.

सागरा अगस्ती आला - प्रदीप दळवी
जमल्यास नक्की वाचा ... विचार करायला लावणारे पुस्तक आहे>>>>>>दळवि हे नथुराम वाले का? intersting auther............................................
पुलंच अपूर्वाई वाचलं अन् पु ल देशपांडे काय चीज आहेत ते एकदाचं समजलं>>>>> पुलन्च व्यक्ति आणि वल्लि हे पुस्तक अफलातुन

पुलं जरा उशिराच वाचनात आले.
>>
अरेरे ! इथे एक सर आहेत त्यांच्या फारच लवकर नको त्या वयात च आले. ठीक आहे तुमचं ,देर आये दुरुस्त आये...

'जिम कार्बेट' बस्स नाम ही काफी है।
नुकतंच त्यांचं 'रूद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता' वाचलं. छान आहे. त्यांनी केलेली चित्त्याची, गढवालच्या परीसराची वर्णने डोळ्यासमोर उभी राहतात.

"असुर" पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला,
मेलुहा चे मृत्युंजय, इक्षवाकु च्या प्रकारचे पुस्तक आहे,
अतिशय बोअर पुस्तक आहे,

श्री रानडे यांचे गीता भाग १ आणि भाग २ दोन हवे आहेत आउट ऑफ प्रिन्ट आहे म्हणतात. प्रसाद प्रकाशन . कोठे मिळेल काय?

There are times in people's lives when a significant event occurs and they're not aware of it - the last time you pick up a son before he's too heavy, the final kiss of a marriage gone bad, the view of a beloved landscape you'll never see again. Weeks later, I realized those were dad's last words to me.

Chris Offutt says somewhere near the beginning of the book "My father the pornographer".

"माय फादर द पोर्नोग्राफर" या पुस्तकाचे लेखक ख्रिस ऑफुट यांची मुलाखत दोन वर्षांपुर्वी एन.पी.आर.वर थोडीशीच ऐकायला मिळाली होती. पण पुस्तकाचे नाव व त्याचा विषय याच्या नविन्यामुळे अगदी डोक्यात हे नाव फिट्ट बसले होते. ते पुस्तक आज वाचले. काय नक्की लिहू ते समजत नाहिये. पुस्तक अतिशय प्रवाही (ल्युसिड/फ्लुइड) भाषेत लिहिलेले आहे. ख्रिस ऑफुटचे वडील अँडी ऑफुट केंटकीच्या एका छोट्या गावात राहणारा चक्रम माणूस. केंटकीतला हा भाग तसा गरीब, मागास, धर्माची पकड जनमानसावर असलेला. म्हणजे छत्तीसगढच्या नाहीतर पूर्व उत्तरप्रदेशच्या एखाद्या छोट्या जिल्ह्यातले छोटे खेडे समजा. बापाची दहशत घरात जबरदस्त. चालताना पायांचा आवाज करायचा नाही, बापाच्या 'स्टडी'मध्ये पाऊल टाकायचे नाही, उलटे बोलायचे नाही, दंगा-मस्करी नाही. इतकेच काय एकदा लेखक रात्री उठून शू करताना ती बाहेर उडू नये म्हणून कमोडच्या मधोमध नेम धरून शू करत होता तर बापाने टॉयलेटचे दार उघडून आत डोकावत 'काय मला मुद्दाम त्रास द्यायला अशी शू करतो आहेस का' म्हणून झापले! त्यानंतर लेखक बिचारा रात्री शू लागली तर बाहेर जाऊ लागला. घरात बसून शांत वातावरणात बाप 'पीतपुस्तके' (पोर्नोग्राफिक वा इरॉटिका) खोर्‍याने लिहीत होता. एकूण आयुष्यात त्याच्या ३००पेक्षा जास्त इरॉटिक कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. न प्रकाशित झालेले साहित्यदेखील तितकेच जवळपास. या खेरीज अँड्र्यु ऑफुट हा चक्रम माणूस एक बर्‍यापैकी फॅन फॉलोइंङ असलेला सायन्स फिक्शन लेखकदेखील होता. आणि या प्रचंड साहित्य संभाराचे टायपिंग करण्याचे काम ख्रिसच्या आईने इमाने इतबारे आयुष्यभर केले. त्याच्या जोडीला तिने आपल्या चक्रम नवर्‍याला साथ देत, सहन करत चार मुलेदेखील वाढवली.
अँड्रेयु ऑफुटचे २०१३मध्ये लिवर सोरॅसिस (दारू पिऊन लिवर खराब) होवून निधन झाले. त्यानंतर ख्रिस घरी परतला व त्याने या प्रचंड साहित्य पसार्‍याचे सॉर्टिंग सुरु केले. आपल्या टेबलावर ज्या साहित्याने जेवण आणले त्याचा व त्याच्या कर्त्याचा त्याने शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
प्रत्येक (किंवा बहुसंख्य म्हणू) मुले स्वतःचे वडिल बनण्याचा व न बनण्याचा झगडा आयुष्यभर करत राहतात. अश्या प्रत्येकाला या पुस्तकात काहीतरी स्वतःचे सापडेल. एक सॅडिस्ट सॅडोमॅचिस्ट माणूस वडिल म्हणुन लाभलेल्या ख्रिसची दया येत नाही, पण त्याबद्दल एक आपुलकी निर्माण नक्कीच होते. मात्र त्याच वेळी त्याचे वडिल पूर्ण खलनायक म्हणून देखील उभे राहत नाहीत. ही फाइन लाइन वा फाइन बॅलन्स लेखकाने फार प्रयत्नाने जमवलेला आहे. हे त्याचे स्वतःचे आयुष्य आहे हे लक्षात घेता या बॅलन्सचे अजूनच कौतुक वाटते.
एक आवर्जून वाचावे असे पुस्तक नक्की आहे हे.

एनपीआरवरची लेखकाची मुलाखतः http://www.npr.org/2015/03/02/390160777/chris-offutt-reveals-a-family-se...

न्युयॉर्क टाइम्समधील पुस्तकाचा रिव्यु: https://www.nytimes.com/2016/02/11/books/review-in-my-father-the-pornogr...

सागरा अगस्ती आला - प्रदीप दळवी
जमल्यास नक्की वाचा ... विचार करायला लावणारे पुस्तक आहे>>>>>>दळवि हे नथुराम वाले का?
होय

आत्ताच गोपाळ देवुसकर यान्चे चरित्र वाचले...याच देवुसकरानि बाल गन्धर्व नाट्य ग्रुहा मधिल.....बाल गधर्वा चे चित्र काढलय.... त्यानि साधारण राजे महाराज्यान्चि चित्रे काढलि... राजे लोक त्यानिच आपले पेन्टिग करावे म्हनुन हटून बसत असत.... सन्स्थान काळचे रोचक वर्णन(सन्स्थानातिल भानगडि) यात आहे.....अतिशय मनस्वि माणुस त्याना विशेष brand चि rum लागत असे ति हि रोज (हा एवढा आमच्या दोघातिल समान दुवा...)....अतिशय .शिवराळ भाषा ...टिळक स्मारक मधिल पेन्टिग काढताना जयन्तराव टिळकाना त्यानि जे "आपल्या बोलिभाषेत" जे पत्र लिहिले ते मासलेवाइक....एक वेगळा काटेरि माणुस.....

आज 'राधेय' वाचलं....खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली. आणि शेवटच्या पानावर दोन आसवं ओघळंलीच..

टवणेसर.........दिलीप, गोपाळराव देऊस्काराच्या चरित्राचे नाव, लेखक वगैरे माहिती>>>>>>चित्रकार गोपाळ देऊसकर - कलावंत आणि माणूस
लेखक - सुहास बहुळकर
राजहंस प्रकाशन>>>>>>>>>बरोबर ............वाचायला हवे असे पुस्तक

धन्यवाद दिलीप आणि चिनूक्स. लक्षात आले. मागल्या वर्षीच्या अंतर्नाद दिवाळी अंकात या पुस्तकाची ओळख होती बहुलकरांच्याच अजून दोन पुस्तकासोबत.

रापण नावाच्या पुस्तकात देऊसकरांबद्दल उल्लेख येतात त्यामुळे देखील हे लक्षात राहीले होते

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5108047677484602587?BookNa...

युद्ध जीवांचे (गिरीश कुबेर) वाचलं. जैव-रासायनिक अस्त्रांच्या इतिहासाचं माहिती संकलन म्हणता येईल.
दोन्ही जागतिक महायुद्धांतले काही दाखले, उदाहरणं धक्कादायक आहेत. या अस्त्रांचा इतिहास त्याहूनही मागे जातो.
तरी, कोल्ड-वॉर आणि त्यापश्चातल्या जागतिक उदाहरणांची अधिक चर्चा, ऊहापोह मला अपेक्षित होता. ती अपेक्षा पूर्ण झाली नाही.
काही ठिकाणी वाचताना जरा कंटाळवाणं झालं.

काही दिवसापूर्वी हेनरी शॅरीयर यांची आत्मकथा सुद्धा वाचायला खुप मस्त आहे. कथेपेक्षा लेखनशैली (मराठी अनुवादित ) खुपच आकर्षक आहे. पुस्तकाचे नाव पॅपिलॉन..

Pages