Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ललिता, छान परिचय.
ललिता, छान परिचय.
रॉबिनहूड ही मूळ साईट. त्या
रॉबिनहूड ही मूळ साईट. त्या साईटचा ऍक्सेस बंद झाला. मग अनेक प्रॉक्सीमार्फत त्या साईटला भेट द्यायला सुरुवात झाली. बाळू पॅराजांपे, अअअ, बाबा कामदेव या अनेक प्रोक्सयापैकी काही. या साईटची एक कट्टर प्रतिस्पर्धी साईटपण होती. जणू या(रॉ)हू अन गुगलच. सध्या दोन्ही कंपन्यांचा समभाग कोसळलेला आहे. आता सगळीकडे ट्रम्प नाहीतर किम जोंग ऊन!!
बाळू पॅराजंपे ही प्रॉक्सी
बाळू पॅराजंपे ही प्रॉक्सी साइट त्यांची नव्हती हं बहुतेक.
ळू पॅराजंपे ही प्रॉक्सी साइट
ळू पॅराजंपे ही प्रॉक्सी साइट त्यांची नव्हती हं बहुतेक
?>>>>
दामले मास्तर शिमटी वगैरे कोण लिहायचं?
बाळू जोशी
बाळू जोशी
सुलू, ते आयडीचं नाव आहे
सुलू, ते आयडीचं नाव आहे ज्यांनी प्रश्न विचारलाय .. >>>> ओहो. गलती से मिस्टेक.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
प्रेम आणि खूप खूप नंतर - शाम
प्रेम आणि खूप खूप नंतर - शाम मनोहर
निबंध लेखनात 'थिसिस फर्स्ट' किंवा 'थिसिस लास्ट' वगैरे असते तसे हे 'थिसिस लास्ट' प्रकारचे पुस्तक आहे. मनोहर नेहमीप्रमाणे वाचकाला त्यांच्या खास शैलीमध्ये गरगरत ठेवतात पण या पुस्तकात मात्र पकड ढिली पडत चालली आहे असे पहिल्यांदाच जाणवले. प्रत्येक पुस्तकात मनोहरांचा एक 'टेक अवे पॉईंट' असतोच तसा इथेही आहे पण तो पुरेशा टोकदारपणे येतच नाही. समेवर येण्यासाठी धडपडणार्या बुजूर्ग गायकाचे गाणे ऐकल्यासारखे वाटले.
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/lifestyle/books/barack-obama-books-afr...
आफ्रिकेबद्दल ओबामाने दिलेली पुस्तकांची यादी. नाइस रीडिंग.
भारताच्या पहिल्या निवडणुकांवर नुकतेच एक पुस्तक आले आहे त्याचे नाव कुणाला माहिती आहे का?
भारताच्या पहिल्या निवडणुकांवर
भारताच्या पहिल्या निवडणुकांवर नुकतेच एक पुस्तक आले आहे त्याचे नाव कुणाला माहिती आहे का? >>> ओह मलाही नाव हवे आहे मग. त्या सुकुमार सेन बद्दल गुहांच्या पुस्तकात वाचले होते तेव्हा उत्सुकता निर्माण झाली होती, की १९५२ सालच्या इन्फ्रास्ट्रक्चर मधे देशभर कशी ती प्रोसेस राबवली असेल.
ऑर्नित शानी यांच्या How India
ऑर्नित शानी यांच्या How India Became Democratic: Citizenship and the Making of the Universal Franchise’ या पुस्तकाविषयी आपण बोलत असावात.
धन्यवाद पुंबा.
धन्यवाद पुंबा.
दिलिपपी,रिचर्ड बर्टनवर बाळ
दिलिपपी,रिचर्ड बर्टनवर बाळ सामंतांचे पुस्तक की अनुवाद आहे.
रिचर्ड बर्टनवर बाळ सामंतांचं 'शापीत यक्ष' नांवाचं पुस्तक आहे. जरुर वाचा.
धन्यवाद पुंबा
धन्यवाद पुंबा
रमेश इंगळे उत्रादकर यांची
रमेश इंगळे उत्रादकर यांची निशाणी डावा अंगठा आणि सर्व प्रश्न अनिवार्य ही पुस्तकं वाचली.
निशाणीबद्दल काही लिहीत नाही. ज्यांनी वाचलं नसेल, त्यांनी नक्की वाचावं. हे पुस्तक वाचताना सध्याच्या स्वच्छता अभियानाची चित्र दिसत होतीं.
सर्व प्रश्न अनिवार्य - परीक्षापद्धतीतत शिरलेल्या अपप्रकारांबद्दल नुसतीच माहितीपर लेखमाला लिहिली, तर कंटाळवाणी होईल म्हणून त्याला दोन शिक्षकांमधल्या संवादांचं आणि काही नाट्यमय प्रसंगाचं रूप दिलंय असं वाटलं. पहिल्याच घटनेतल्या निलंबनाच्या प्रकरणाचं काय झालं, ते शेवटी लिहिलेलं नाही, पण त्याची गरजही नसावी.
हे सगळं काल्पनिक वाटावं इतकं भयंकर आहे, अशी एक वीण पुस्तकाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत आहे. मुलांना नीट लिहिता, वाचता न येणं हे प्रत्यक्ष पाहिलं असल्याने त्याचं इतकं नवल वाटलं नाही.
बिहारमधल्या परीक्षा केंद्रांचे फोटो मध्ये चर्चेत होते, तो प्रकार आपल्याकडेही होताच हे जरा धक्कादायक होतं. वडगाव देवीच्या परीक्षा केंद्राचं प्रकरण अगदी भन्नाट जमलंय.
शिवाय या पुस्तकात अनेक ठिकाणी (कोणत्याही/कोणत्यातरी) कथेतल्या पात्रांचा वाचकांशी आणि आपसात संवाद मांडला आहे. त्याचा मूळ कथानकाशी संबंध आणि प्रयोजन कळलं नाही. कथानिर्मितीच्या प्रक्रियेबद्दल ते असेल असं वाटत राहिलं.
दोन्ही पुस्तकांतल्या भाषांबद्दल लिहायलाच हवं. निशाणीत भाषांचे अनेक नमुने वाचायला मि़ळतात.
सर्व प्रश्नचं निवेदन प्रमाण भाषेत असूनही त्यात "केल्या गेले" प्रकारची रचना आहे. निवेदन, प्रसंग, भाषेचा एकंदर डौल हे इतके पकड घेणारे आहेत, की मला ते केल्या गेले प्रकरण खटकले नाही. विदर्भातली अशी वेगळी प्रमाण मराठी रुळू लागलीय , अशी समजूत करून घेतली.
तसंच सध्या जालावर त्र म्हणून ञ वापरलं जातं, त्याचं मूळही आपल्या शिक्षणाच्या खेळखंडोब्यातच आहे, हेही कळलं.
भरत माझ्याकडे आहे निशाणी डावा
भरत माझ्याकडे आहे निशाणी डावा अंगठा. निव्वळ जडशीळ असेल म्हणून अजून वाचायला नाही घेतलं.
एक दोन ओळित सार सांगा ना म्हणजे वाचायला उत्साह येईल.
मी नुकतंच नारायण धारपांचं उत्तररंग नामक पुस्तक वाचलं. रहस्यकथा असेल म्हणून उत्कंठेनं वाचायला घेतलं पण सुखद शेवट असलेली, ज्येष्ठ नागरिकांची प्रेमकथा निघाली. छान आहे पण पुस्तक.
भरत माझ्याकडे आहे निशाणी डावा
भरत माझ्याकडे आहे निशाणी डावा अंगठा. निव्वळ जडशीळ असेल म्हणून अजून वाचायला नाही घेतलं.
एक दोन ओळित सार सांगा ना म्हणजे वाचायला उत्साह येईल. >> दक्षिणा, एवढा अप्रतिम सिनेमाच आहे की त्याच्यावर त्याच नावाने.
सिनेम्यामधे फार कमी लोकांनी
चित्रपटामधे फार कमी लोकांनी वर्हाडी भाषेचा लहेजा पकडला.. उदा. भारत गणेशपूरे, अशोक सराफ, विनय आपटे वगैरे..
दिलीप प्रभावळकरला पन जमल नाही बोलण ते.. असो.. पण पिच्चर छान आहे..
पुस्तक वाचावं लागेल...
रमेश इंगळे उत्रादकर यांची
रमेश इंगळे उत्रादकर यांची निशाणी डावा अंगठा आणि सर्व प्रश्न अनिवार्य ही पुस्तकं वाचली. >>> हो दोन्ही वाचली आहेत. दोन्ही चांगली आहेत. पूर्वी इथे चर्चा झाल्याचे आठवते. सर्व प्रश्न अनिवार्य चा फॉर्म मला जरा ऑड वाटला. नेहमीच्या फ्लो च्या मधे मधे स्वगत सारखे ते लेख आहेत ते झेपले नव्हते हे लक्षात आहे.
दक्षे, ताबडतोब ते पुस्तक
दक्षे, ताबडतोब ते पुस्तक वाचायला घे. भारी आहे एकदम.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिनेमा पाहिला नसशील तर आधी पुस्तकच वाच.
सिनेमा पण झकास आहे. अधूनमधून टीव्हीवर दाखवतात.
तो नंतर बघ
सर्व प्रश्न अनिवार्य पुस्तकाचं तेव्हा २-३ ठिकाणी परीक्षण आलं होतं, 'निशाणी' अधिक उजवं आहे असंच सगळ्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मी वाचलंच नाही.
निशाणी डावा अंगठा - गावातला
निशाणी डावा अंगठा - गावातला एकही प्रौढ निरक्षर साक्षर न होताच साक्षरता अभियान यशस्वी झाल्याचा देखावा कसा केला जातो याचा प्रवास.
त्यानिमित्ताने सरकारी कामकाज कसं चालतं. ग्रामीण लोकांच्या जगण्याचे ताणेबाणे, जातीपातीचे पीळ आणि संबंध, वेगवेगळी इरसाल व्यक्तिमत्त्व,
ऑफिसात स्त्री पुरुषांच्या स्वतंत्र गटांतल्या गप्पा (शाळा हे छोटंसं ऑफिस असलं तरी हे चित्र कमीअधिक प्रमाणात सगळीकडे असावं असंच वाटतं), भ्रष्टाचार, इ.
काही ठिकाणी थोडं प्रीची वाटलंय. विशेषतः एकाच वस्तीत साक्षरता अभियानाला यश मिळणं हा भाग.
काही प्रसंग सिनेमासाठीच लिहिल्यासारखे वाटले. - कुंकू पुसण्याचा.
सर्व प्रश्न' मधला एका ज्येष्ठ शिक्षकाला परीक्षेतले गैरप्रकार पहिल्यांदाच कळणं, त्याचं साने गुरुजी आणि गांधी वाचणं (हा पांढरपेशा मघ्यमवर्गीय पापहीरू आदर्शवादी माणसाचा प्रतिनिधी असल्यासारखा), लहानपणापासून टक्के टोणपे खाऊन मोठा झालेला दुसर्या शिक्षकाने जग अधिक पाहिलेलं असणं आणि त्याला व्यवहारज्ञान अधिक असणं हे थोडं क्लिशेड वाटलं. शेवट करायचा म्हणून केलाय असं वाटलं.
The Calculus Story by David
The Calculus Story by David Acheson
माझ्यासारख्या ढ लोकांनी calculus ना समजावून घेता integration आणि derivative सोडवली असतील त्यांनी नक्की वाचावे असे पुस्तक. लिमिट्स, डिफरीनशीअल, इंटिग्रेशन, इंफायनाईट सिरीज आणि स्लोप/एरिया या सर्व बाबी सोप्या भाषेत मांडल्या आहेत.
सरस्वती ज्याच्या बोटावर नाचायची असा विद्याधर गेल्याचे दुःख झाले. पुन्हा एकदा हाउस फॉर मि बिश्वास वाचायला घेतले. मिग्वेल स्ट्रीट, बेंड इन द रिव्हर आणि त्यांची कडू जहरी कुरकुर करणारी 'मतप्रदर्शन' पुस्तके पुन्हा एकदा सलग वाचायला हवीत. मिस यु विदिया!
https://www.youtube.com
https://www.youtube.com/channel/UCYO_jab_esuFRV4b17AJtAw
कॅल्क्युलस ह्या विडिओ मध्ये सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.
The Calculus Story by David
The Calculus Story by David Acheson जबरदस्तच आहे रे टण्या.
टण्या, मी आणतो आता ते पुस्तक.
टण्या, मी आणतो आता ते पुस्तक. शाळेपासूनचा सस्पेन्स सोडवायचा आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुकतच बिल ब्रायसन च डाऊन
नुकतच बिल ब्रायसन च डाऊन अन्डर वाचलं! खुपच आवडलं, मिश्किल शैलीचं प्रवास वर्णन!
सुमती देवस्थळेंचे,टॉलस्टॉय एक
सुमती देवस्थळेंचे,टॉलस्टॉय एक माणूस वाचले.मस्त आहे.
कुणी सागर अगस्थी आला हे
कुणी सागरा अगस्थी आला हे पुस्तक वाचले आहे का प्रदीप दळवींचे?
हे फेसबुकवर ग्रन्थदिन्डीमधे
हे फेसबुकवर ग्रन्थदिन्डीमधे टाकले होते. इथे डकवतेय.
शिखरावरून ... - सर एडमंड हिलरी
~ अनुवाद श्रीकांत लागू
1953 मध्ये न्यूझीलंडचे एडमंड हिलरी यांनी तेनसिंगला सोबत घेऊन यांनी प्रथमच एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा जो पराक्रम केला त्यातील एव्हरेस्टवीर हिलरीच्या " व्ह्यू फ्रॉम द समीट' या आत्मचरित्राचा हा अनुवाद. हिलरीच्या एव्हरेस्ट आणि इतर साहसी मोहिमांचे रोमहर्षक अनुभव कथन आणि त्यांचे सार्थ व्यक्तिगत जीवन उलगडणारी ही आत्मगाथा!
एव्हरेस्ट व्यतिरिक्त त्यांनी स्नो-केट ट्रेकटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण, उत्तर ध्रुवावर मोहीम, जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीचा माग काढत तिच्या उगमापर्यंत जाण्याचा अचाट उपक्रम केला.
दुदर्म्य इच्छाशक्ती असली की माणूस काय करू शकतो हे त्याचं ज्वलंत उदाहरण!
घरची परिस्थिती जेमतेम, मधुमक्षिकापालनाचा व्यवसाय, कडक शिस्तीचे वडील, पण मूळ साहसी वृत्ती त्यामुळे कमी वयातच गिर्यारोहणाचा छंद जोपासत, महायुद्धाचे वारे वाहत असताना हवाई दलात घेतलेले प्रशिक्षण,त्यात एका बोटीच्या एक्सिडंट मध्ये पाठ संपूर्ण भाजली गेली.. त्यामुळे त्या सेवेतून बाहेर ..अश्या अनेक अवघड परिस्थितीतही गप्प न बसू देणारी धाडशी वृत्ती,याचा परिणाम म्हणून एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होणे.
हिमालयातल्या क्षणोक्षणी बदलणाऱ्या भयावह निसर्गाशी झगडत एका क्षणी ते शिखर कसे सर झाले हे ही या वीराला कळत नाही. दिवस असतो 29 मे 1953 आणि वेळ असते सकाळी 11:30.
हिमप्रपात, हिमनदी यांबरोबरच हिमसाय, हिमफरशी, हिमकुदळ, हिमटिकाव, हिमकुऱ्हाड , हिमसोपान, हिमशिंग, हिमटेंगुळ.. असे कित्येक मजेदार शब्द येतात, तेव्हा गंमत वाटते.
शिखरावर पोहोचल्याचा अत्युच्च क्षण फार सुंदर वर्णन केलाय. पोचल्यावर ते आपल्याजवळच्या कैमेराने तेनसिंगचा फोटो घेतात.. त्याच्या हिमकुऱ्हाडीचा ज्यावर संयुक्त राष्ट्रांचा, भारताचा, नेपाळचा आणि इंग्लंडचा युनियन जॅक असे ध्वज लटकावलेले. तेनसिंगकडे कैमरा नव्हता म्हणून माझा फोटो निघाला नाही असं म्हणतात. आणि विजयाच्या भरात आपला कैमरा त्याच्याकडे देऊन शिखरावर पाय रोवला आहे असा फोटो काढणं सुचलं नाही म्हणतात.
तेनसिंग शिखरावर एक छोटा खड्डा खणून त्यात थोडे चॉकलेट व इतर खाद्यपदार्थ ठेवतात.. एव्हरेस्ट शिखरावर वास करून गेलेल्या देवतांसाठी श्रद्धापूर्वक नैवेद्य! तर हिलरी एका पाद्र्याने पाठवलेला छोटा क्रुस बर्फात गाडतात.
आणि मोहिमेवरून परतल्यावर झालेला जल्लोष, भारतात झालेलं स्वागत,संपूर्ण जगाकडून अभिनंदनाचा वर्षाव, स्वागत समारंभ, जगभर भाषणे, लुईसाची नाजूक भेट, बंकिंगहेम पेलेस मध्ये हर मेजेस्टि द क्वीन राणीसरकरांच्या हस्ते मिळालेली ' सर' ही सर्वोच्च पदवी, नेशनल जिओग्राफीक सोसायटीने दिलेलं सर्वोच्च सन्मान पदक- हुबार्ड हे व्हाइट हाऊस मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांच्या हस्ते, या सगळ्या गोष्टी पुस्तकात येतात.
तेनसिंगलाही ते बरोबरीने वागवतात.. इतकंच नव्हे तर त्यांनाही ' नाइट ' पदवी मिळायला हवी होती ती मिळाली नाही याची खंत व्यक्त करतात. इतर मोहीमांचे वर्णन ही रोमहर्षक आहेच. अनेक जीवघेण्या प्रसंगातून ते वाचतात. पण मला आवडलं ते गंगा नदीच्या उगमापर्यंत प्रवाहाच्या उलट दिशेने जेट बोटीने जायची मोहीम! त्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. वाराणसीत तेव्हच्या राजाच्या राजवाड्यात स्वागत , भोजन हा प्रसंग ही मजेदार झालाय.
त्यांची नंतर न्यूझीलंडचे हाय कमिशनर म्हणून नेमणूक होते. आणि मग अनेक वर्षे भारतात , दिल्लीत वास्तव्य करतात. भारताशी अतूट नातं जोपासणारे हिलरी हिमालयीन लोकांसाठी, शेर्पासाठी अनेक कल्याणकारी कार्य हाती घेतले जे अजुनही सुरू आहे.
भारतातल्या वास्तव्यात अनेक ठिकाणी भेटी देतात.. अगदी अजिंठा वेरूळलाही त्यांनी भेट दिलीय. शेर्पा तेनसिंगच्या आजारपणात ते साथ देतात.. त्यांच्या अंत्यविधीलाही त्या वेळी राजकीय प्रश्नांमुळे अस्थिरता असलेल्या त्या भागात मोठ्या हिमतीने हजर राहतात.
आता थोडं अनुवादकाविषयी: अनुवादक श्रीकांत लागू गिर्यारोहणाची आवड जोपासणारे, अमरनाथ ,कैलास मानसरोवर यात्रा केलेले. अचानक हिलरीच्या या चरित्राविषयी कळतं पण त्या काळात भारतात उपलब्ध नव्हतं. म्हणून ऑस्ट्रेलियातुन ते मागवतात.. वाचतात आणि हे सगळं अफलातून चरित्र मराठी वाचकांपर्यंत पोहचावे म्हणून अनुवाद करतात. पण प्रसिद्ध करण्यापूर्वी बाकी असते मूळ प्रकाशकाची व लेखकाची परवानगी.
ऑकलंडस्थित वडके नावाच्या मित्राकरवी एक पत्र हिलरीकडे पोचत करतात. आणि आश्चर्य म्हणजे वडकेना सरजी घरी चहाकरता आमंत्रण देतात. चक्क ' कसल्याही मोबदल्याशिवाय' असे लिहून झोकदार सही ठोकून परवानगी देणारा मजकूर लिहितात. आणि वर वडके यांच्या हातात परवानगीपत्र देताना हिलरी डोळे मिचकावून म्हणतात," मोबदला नको, पण पिठलं भात खायला आवडेल" ही विनंती ऐकून वडके चाट!
याचा अर्थ हिलरी यांनी भारतात हायकमिशनर म्हणून वास्तव्यास असताना पिठलं भाताची लज्जत चाखली होती आणि ही महाराष्ट्रीयन खासियत त्यांनी चांगलीच स्मरणात ठेवली होती. हे खरोखर सुखावह होतं.
सर्वोच्च शिखर सर केल्यानंतर त्यांनी खाली आल्यावर अत्यानंदाच्या क्षणी पहिलं वाक्य काय उच्चारल असेल तर ते,' जॉर्ज, आम्ही 'त्या' अक्करमाशाला अखेर लोळवलंच"!
('पहाडासारखा बाप' आणि 'नदीला माता' अश्या उपमा देणाऱ्या भारतीय हृदयाला खटकणारी ही एवढीशी गोष्ट सोडल्यास पुस्तक जबरदस्त आहे.)
सध्या अॅगाथा ख्रिस्थी चे द
सध्या अॅगाथा ख्रिस्थी चे द सिक्रेट ऑफ चिमनीज वाचतोय. स्टॅण्ड अलोन आहे, मर्पल आणि पॉय्रो दोघेहि तिचे फेमस डिटेक्टिव्ह नाही आहेत यात. सुन्दर फ्लो आहे नेहमिप्रमाणेच!
ध्रुव भटांचे 'तत्वमसि' बर्
ध्रुव भटांचे 'तत्वमसि' बर्याच रेकमेंडेशन्समुळे विकत घेतले. ते बेहद्द आवडले. हे पेपरबॅक स्वरूपातील पुस्तक आहे. पाहिले तर त्यांचीच अतरापि, अकूपार, तिमीरपंथी व सागरतीरी ही आणखी चार पुस्तके मराठीत ईबूक स्वरूपात उपलब्ध असल्याचं कळलं. ३ गूगल बूक्सवर तर एक किंडलवर घेतले. आता, एकेक करून वाचत आहे. पेपरबॅक पुस्तकांपेक्षा खुप स्वस्तात सौदा झाला. जबरदस्त लेखक आहेत ध्रुव भट.
Pages