Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
India's Wars: A Military
India's Wars: A Military History, 1947-1971 <<< टण्या, मस्त परिचय.
अमा+१
अमा+१
India's Wars: A Military
India's Wars: A Military History, 1947-1971 <<< मस्त परिचय.
India's Wars: A Military
India's Wars: A Military History,
धन्यवाद खुप छान पुस्तक ओळख, नक्किच वाचणार.
अमा+१
अमा+१
टवणे सर,
टवणे सर,
इथल्या परीस्थितीत अजूनही फारसा बदल नाही. आधी मेथ होतेच आता जोडीला ओपियॉईडही आहे. इथे गुडविल मधे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी ५०% असते. ९ ला दुकान उघडणार तर ८:३० पासून रांग सुरु होते. त्या रांगेत उभे राहीले की लोकं कहाण्या सांगतात. कुठल्या ग्रुपसाठी खरेदी करतेय , मदत मिळवायला काय करायचे विचारतात. त्याही परीस्थितीत सध्याच्या प्रशासनाला अजून एक टर्म मिळाली की सगळं आलबेल होईल हे देखील ऐकवतात.
अमा +१
अमा +१
अमा+१.>>>>+१.
अमा+१.>>>>+१.
अमा+१.>>>>+१.
अमा+१.>>>>+१.
टवणे सर, भारी परिचय आणि
टवणे सर, भारी परिचय आणि विस्तृतसुद्धा.
“Why America Stayed a
“Why America Stayed a Backwards Society (and Collapsed), While the World Grew (and Prospered)” @umairh
https://eand.co/why-america-stayed-a-backwards-society-and-collapsed-whi...
हिलबिली एलिजि आणि नंतर कॅनडा व अमेरिकेने मूळ निवासियांना दिलेल्या वागणुकीतला फराज यावर जे थोडेफार प्रतिसाद आले त्यावरून वरील लेखाचा दुवा द्यायचे सुचले. लेखाच्या शीर्षकाशी आणि मुख्य हैपोथॅसिसशी मी सहमत आहे, मात्र लेखातल्या सर्व मुद्यांशी व तर्कांशी आहे असे वाटत नाही कारण माझा एव्हडा अभ्यास नसला तरी काही निष्कर्ष व पुरावे यांचा ओढून ताणून संबंध लावला आहे असे वाटले
विजय तेंडुलकर लिखित 'कोवळी
विजय तेंडुलकर लिखित 'कोवळी उन्हे'चे रसग्रहण मी स्वतंत्र लेखात इथे केले आहे:
https://www.maayboli.com/node/67685
'मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट'
'मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट' निरंजन घाटेंचं पुस्तक वाचतोय. टवणे सर, तुम्हीही असं काही लिहायला हवंय. सिरियसली सांगतोय.
भरत, घाटेंचं पुस्तक कसं वाटलं
भरत, घाटेंचं पुस्तक कसं वाटलं त्याबद्दल नंतर इथे लिहा. (या पुस्तकाच्या संपादनात माझा सक्रीय सहभाग होता.)
हो, तुमचं नाव वाचलं.
हो, तुमचं नाव वाचलं.
Sapiens: A Brief History of
Sapiens: A Brief History of Humankind हे वाचलय का कोणी? कसं आहे?
Mossad: The Greatest Missions
Mossad: The Greatest Missions of the Israeli Secret Service
Book by Michael Bar-Zohar and Nissim Mishal
एक जबरदस्त पुस्तक ... इस्राईल आणि त्यांच्या या सीक्रेट सर्विस बद्दल बरीच नवीन मिळते यातून. आपला सगळं दृष्टिकोनच बदलून जातो ... कुठल्या कठीण परिस्थितून मोसादचे हेर जात असतात आणि तरीही केवळ देश्प्रेमापोटी कोणतेही धाडस करायला तयार असतात. खूप मस्त आहे पुस्तक .. एकदा वाचायला लागलो कि काही ठेवावेसे वाटत नाही
प्रिंस्टन युनिव्हर्सिटीमधले
प्रिंस्टन युनिव्हर्सिटीमधले फिलॉसॉफीचे प्राध्यापक हॅरी फ्रॅंकफर्ट यांनी रॅरिटन क्वार्टरली रिव्ह्यू नावाच्या नियतकालिकात १९८६ साली ऑन बुलशिट नावाचा लेख लिहिला होता. २००५ साली त्या लेखाचे एक पुस्तक प्रिंस्टन युनिव्हर्सिटीने छापले. छोटेखानी पुस्तक आहे , पण बुलशिट आणि लायिंग यातला फरक, बी एस करणार्याची मानसिकता, त्याचे ऐकणार्यावर होणारे परिणाम, आपण बी एस इतक्या सहजी का अॅक्सेप्ट करतो, सर्वसाधारणपणे लायिंग पेक्षा बी एस कसे कमी ऑफेंसिव्ह समजले जाते आणि तरी ते लायिंग पेक्षा कसे जास्त डेंजरस आहे यावर हलक्या फुलक्या भाषेत विवेचन आहे.
न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर लिस्टवर असलेले पुस्तक आहे.
'मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट'
'मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट' निरंजन घाटेंचं पुस्तक वाचतोय. टवणे सर, तुम्हीही असं काही लिहायला हवंय. सिरियसली सांगतोय.
नाही हो. माझ्यापेक्षा विस्तृत आणि विपुल वाचणारे इथे मायबोलीचेच कित्येक सभासद आहेत. सगळे इथे लिहितातच असे नाही इतकेच. मी देखील लिहितोय कारण वाचलेल्या पुस्तकांचे टिपण काढण्याचा मला आळस आहे. किमान इथे लिहिण्याच्या निमित्ताने एक नोंद होते.
>>>
निरंजन घाटेंचे पुस्तक इ-बुक फॉर्मॅट मध्ये नाहिये
विकत घेणे सोपे जाते. तरी प्रयत्न करतो एक गठ्ठा पुस्तके मागवायचा. अजून मराठी पुस्तके सुचवा!
याच विषयावरचे एक नितांत सुंदर पुस्तक वाचले होते ते सतिश काळसेकरांचे वाचणार्याची रोजनिशी.
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4709894918057537399?BookN...
आणि त्याची माहिती दिली होती एका पुस्तक्भक्षकाने 'नंदन' यांनी. ते कुठे गायबलेत कोण जाणे.
पुस्तक्भक्षकाने >>>
पुस्तक्भक्षकाने >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वाचणार्याची रोजनिशी बद्दल
वाचणार्याची रोजनिशी बद्दल ऐकून आहे. पुढलं तेच घेईन. विलास सारंगांचंही वाचनाबद्दल एक पुस्तक आहे. ते समीक्षात्मक आहे का कल्पना नाही.
भरत, वाचणार्याची रोजनिशी एका
भरत, वाचणार्याची रोजनिशी एका बैठकीत वाचून संपवण्याचे पुस्तक नाही. अध्येमध्ये एक एक प्रकरण वाचण्याच्या कॅटेगरीतले पुस्तक आहे
अशी बुक्स ऑन बुक्स प्रकारची
अशी बुक्स ऑन बुक्स प्रकारची बरीच पुस्तके अशात आलीयेत मराठीत. टिकेकरांचे अक्षरनिष्ठांची मांदियाळी, वाचणाऱ्याची रोजनिशी, तळवलकरांचे वाचता वाचता, घाट्यांचे वाचत सुटलो त्याची गोष्ट ही वाचलीयेत. वाचत सुटलो विकत घेतले, तेवढे खास वाटले नाही. कदाचित घाट्यांचा काळ आणि माझा काळ खुप वेगळाय, त्यामुळे त्यांच्या एक्साइटमेंटशी मी रिलेटच करू शकलो नाही.
लिळा पुस्तकांच्या आणि आडवाटेची पुस्तके ही दोन या वर्षात आलेली पुस्तके. कुणी वाचलीयेत का?
वाचत सुटलो त्याची गोष्ट -
वाचत सुटलो त्याची गोष्ट - निरंजन घाटे.
पुस्तक नावाशी चिकटून आहे किंवा नाव अत्यंत समर्पक आहे. वाचलेली पुस्तके कधी, कुठे , कशी मिळाली, त्याचं वर्णन आहे. यात जुन्या पुस्तकांचे विक्रेते, वाचनालये, विशेषतः लहानपणी परिचित/नातलग- सगळे आले. एकापरीने पुस्तकांमुळे जोडले गेलेले बंध. लेखकाच्या एक शतांश प्रमाणात का होईना, पण या सगळ्या गोष्टींची चव चाखल्याने, मला हा भाग हृद्य वाटला (हे- रिलेट करता आलं-असं वाचावं.)
कोणतं पुस्तक कधी, कुठून घेतलं , क्वचित किंमत किती हे उल्लेख वाचून इतकं सगळं कसं लक्षात राहतं? असा प्रश्न पडलेला, पण घेतल्या पुस्तकावर तशी नोंद करायची लेखकाची पद्धत आहे, हा उलगडा पुढे झाला.
रहस्यकथा, टॅबू विषय, विनोदी लेखन, परामानसशास्त्र, विज्ञानकथा आणि विज्ञानसाहित्य, शब्दकोश, चरित्र आत्मचरित्, अचाट महिलांवरची अफाट पुस्तकं अशा साहित्यप्रकारांत आपलं वाचन कसं कसं झालं, ते लिहिलंय. मला यातला विज्ञानसाहित्यावरचा आणि शब्दकोशांवरचा हे दोन भाग जास्त आवडले. चरित्र , आत्मचरित्रांतही बरंच काही वेधक आहे. काही ठिकाणी वाचनकाळाचा संदर्भ लागतो.
अमेरिकेतली जुनी पुस्तकं भारतात कशी येत, तसंच इंग्रजी पुस्तकांच्या भारतीय आवृत्त्या, त्यातले पायरसीचे प्रकार ही माहिती रोचक आहे.
लेखकाने विज्ञानकथांचे अनुवाद केले आणि अनेक नियतकालिकांतून ते प्रकाशित होताना मूळ कृतीचा उल्लेखही गाळला गेला, हे वाचताना प्रताधिकार प्रकरण नक्की कधी सुरू झालं, असा प्रश्न पडला.
विज्ञानविषयक लेखाच्या सुरुवातीचं एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतंय - बर्याच वेळा क्रांतिकारक समजलं गेलेलं संशोधन हे एक तर चुकीच्या गृहीतकावर आधारलेलं असतं किंवा बनावट असतं. म्हणजे निष्कर्ष आधी ठरवून मग पुरावे तयार केलेले असतात. किंवा तसे निष्कर्ष काढण्याइतके पुरावे उपलब्ध नसतानाच ते संशोधन खोट्या पुराव्यांच्या आधारे जाहीर केलेलं असतं.
हॅरी पॉटरच्या धाग्यावर बालसाहित्याबद्दल चर्चा सुरू आहे. गलिव्हर्स ट्रॅव्हल्स आणि अॅलिस इन वंडरलँडसारखी काही पुस्तकं बालसाहित्य म्हणून ओळखली जातात, ती तशी नाहीत. ते समजण्यासाठी लेखक, त्याचं आयुष्य, तत्कालीन स्थानिक परिस्थितीबद्दलची माहिती जाणून घ्यायला हवी.
हॅरी पॉटरवरच्या धाग्यावर वाचण्याआधी काही बालसाहित्याबद्दल -( अॅलिसबद्दल) हे उडत उडत वाचलं होतं. पण इतक्या सविस्तर आणि स्पष्टपणे मी पहिल्यांदाच वाचलं.
रहस्यकथांबद्दलचं लेखन वाचताना कशाला वाचायचं हे सगळं, अशी म्हटलं तर कोल्ह्याला द्राक्षं आंबट टाइप प्रतिक्रिया उमटत होती. तेच अन्य काही भागांत एवढं सगळं कधीतरी वाचता येईल का? असं होत होतं.
एखादं पुस्तक न आवडल्याचं फार क्वचित लिहिलंय. परामानसशास्त्राबद्दल भ्रमनिरास झाल्याचं तेवढं स्पष्टपणे लिहिलंय.
पुस्तकात मराठीतल्या दोन साहित्यकोशांबद्दल माहिती आली आहे. हे पुस्तकही त्या त्या विषयात रस असणार्यांसाठी सजेस्टेड रीडिंग लिस्ट ठरू शकतं.
या आधी दत्तप्रसाद दाभोळकरांचा
या आधी दत्तप्रसाद दाभोळकरांचा "ना डावं ना उजवं" हा लेखसंग्रह वाचला. ना डावं, ना उजवं असं लिहिताना बरेचसे मुद्दे संदिग्धपणे हाताळलेत का असं वाटलं. अर्थात एकेक लेख आधी स्वतंत्रपणे लिहून/प्रकाशित होऊन मग त्याचं संकलन झालं आहे.
१८५७ च्या स्वातंत्रयुद्धाबद्दल ते शिपायांचं बंड होतं, संस्थानिकांचा आणि रयतेचाही त्याला पाठिंबा नव्हता, हे आपल्याला मान्य होंणं शक्य नाही, ही थीम दिसली. सरस्वती नदीच्या संशोधनाबद्दलच्या लेखात माझ्या आधीच्या प्रतिसादातला संशोधनाबद्दलचा मुद्दा आला आहे.
संघाबद्दलचा लेख आता कदाचित डेटेड वाटेल. पण काश्मीरबद्दलचा १९९१ चा लेख आता अधिकच रेलेव्हंट वाटला.
शेतकरी संघटनेबद्दलच्या लेखातून संघटनेच्या भूमिकांबद्द; (मला) काही नवी माहिती मिळाली.
निरंजन घाट्यांची अनेक अमाप
निरंजन घाट्यांची अनेक अमाप पुस्तके इ ८ ते १०वी या काळात वाचली. त्यात डेझर्टर सारखी थरारनाट्ये होती, बरीच विज्ञान विषयक होती. आता पाहता दिसते की त्यांनी इतरही अनेक विषयातील पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. मी मुळातच कधी रहस्यकथा फारश्या वाचल्या नसल्याने रहस्य कथा वाचण्याचे उल्लेख आले की वर भरत यांनी लिहिले आहे तशीच प्रतिक्रिया मनात येते. जी ए वगैरेंच्या पत्रात त्यांच्या रहस्यकथा व इतर अनेक 'फुटकळ' साहित्यप्रेमाबद्दलचे उल्लेख वाचून अरे हे 'हे' का वाचत असत असे वाटले होते.
पण मग लक्षात आले की प्रचंड वाचणार्या आणि वेगाने वाचणार्या लोकांना जे मिळेल ते वाचले तरी फरक पडत नाही. माज्यासारख्या थोडेफार वाचू शकणार्याला आहे त्या वेळात रहस्यकथा कोण वाचणार असे वाटत असावे.
आज एक इंटरेस्टिंग प्रसंग घडला. मी मेक्सिकोत चिहुआहुआ नावाच्या शहरात कामासाठी आलो आहे. टॅक्सी मागवली - उबेर वगैरे नाही, रेग्युलर टॅक्सी कंपनीची टॅक्शी. आत बसलो तर गिअरपाशी एक जाडजूड पुस्तक. काय आहे पाहतो तर स्पॅनिश भाषेत अनुवादीत युवल नोआ हरारीचे सेपिअन्स. त्या टॅक्सीचालकाला (वय साधारण ५०) इंग्रजी येत नव्हते मात्र थोड्याफार जुजबी संवादात हे पुस्तक त्याला फार आवडते आहे असे कळले. अजून काय काय वाचतो असे विचारले तर मार्केझ मुराकामी अन पामुक ही नावे कळली. मी नमस्कार करायचाच बाकी होतो!
अजून बरीच नावे तो घेत होता पण मला नीट कळत नव्हते.
निरंजन घाट्यांची अनेक अमाप
निरंजन घाट्यांची अनेक अमाप पुस्तके इ ८ ते १०वी या काळात वाचली. त्यात डेझर्टर सारखी थरारनाट्ये होती >> डेझर्टर निरंजन घाट्यांचे नव्हते, विजय देवधरांचे होते. तोहि अनुवाद होता.
अरे हो की असामी. माझी जामच
अरे हो की असामी. माझी जामच गल्लत झाली. निरंजन घाटे आणि विजय देवधरमध्ये. विज्ञानविषयक - पाणबुडीचा शोध वगैरेवर कोण लिहायचे? सकाळमध्ये वगैरे विज्ञानावर ?
टवणे सर, मेक्सिकोतला प्रसंग
टवणे सर, मेक्सिकोतला प्रसंग एक नंबर !!
अरे हो की असामी. माझी जामच
अरे हो की असामी. माझी जामच गल्लत झाली. निरंजन घाटे आणि विजय देवधरमध्ये. विज्ञानविषयक - पाणबुडीचा शोध वगैरेवर कोण लिहायचे? सकाळमध्ये वगैरे विज्ञानावर ?>>
सकाळमध्ये लिहिणारे निरंजन घाटेच होते. एक विज्ञानविषयक पुरवणी असायची त्यावेळी (९६-९९ चा काळ असावा).
सध्याचा भयंकर टायपो असणारा सकाळ, टुर्स ट्रॅव्हल्स, बिल्डरांच्या पुरवण्या असलेला सकाळ अरेरे काय करुन टेवलाय..
Pages