Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे आधी लिहिलेली परिक्षणे पण
इथे आधी लिहिलेली परिक्षणे पण जर सविस्तर असतील तर स्वतंत्र धाग्यावर हलवली तर चालेल का? का उगाच भारंभार धागे काढले असे होईल?
असे धागे भारंभार झाले असतील ह्या कल्पनेवरही खूष आहे मी.
ज्यांनी विचार करायला हवा ते करत नाही आणि नको ते, नको तो विचार करताहेत.
मी एक पुस्त्क शोधतेय...साधारण
मी एक पुस्त्क शोधतेय...साधारण थीम अशी होती की एक डॉक्टर कम संशोधक आदिवासींच्या त्वचेवर माशांचे खवले रोपण करतो.
मला आता पुस्तकाचे नाव, लेखक कोणीच आठवत नाहीये. कृपया कोणाला माहित असेल तर सांगावे __/\__
नुकतेच पुण्याचे डॉक्टर अनिल
नुकतेच पुण्याचे डॉक्टर अनिल अवचट यांचे 'कुतुहलापोटी' या नावाचे पुस्तक वाचनात आले. अनिल अवचट म्हणजे व्यसनमुक्तीसाठी 'मुक्तांगण' ही संस्था चालवतात ते.
पुस्तक समकालीन प्रकापु, पुणे यांनी २६ जानेवारी २०१७ रोजी प्रकाशित केले असून किंमत रु. २०० /- आहे. मला १० टक्के डिस्काउंट वर 'अक्षरयात्रा' इथे (आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे) मिळाले.
खूपच सुंदर पुस्तक आहे. अत्यंत क्लिष्ट विषय अत्यंत सोपा करून सांगण्याची कला अनिल अवचट यांना अवगत आहे. फंगस, बॅक्टेरिया पासून ते मनुष्याच्या जन्मरहस्यापर्यंत अनेक विषयांवर अत्यंत रंजक माहिती या पुस्तकात उपलब्ध आहे.
नरसिंहराव यांच्या वरील
नरसिंहराव यांच्या वरील पुस्तकात चंद्रास्वामी विषयावर काही भाष्य आहे का? शेवटी शेवटी ते चंद्रास्वामीच्या खूपच आहारी गेले होते काय.
https://torontosun.com
https://torontosun.com/entertainment/books/unpublished-j-d-salinger-work...
J D Salinger च्या चाहत्यांसाठी खुशखबर
Godman to Tycoon : The Untold
Godman to Tycoon : The Untold Story of Baba Ramdev हे ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी जरूर वाचा
https://www.thequint.com/lifestyle/books/priyanka-pathak-narain-author-o...
https://www.livemint.com/Companies/i8O1sTPYTTj1a4RdpCpX6L/Godman-to-Tyco...
https://www.goodreads.com/book/show/35901024-godman-to-tycoon
जिद्दु , Godman to Tycoon का
जिद्दु , Godman to Tycoon का वाचावं ते ही लिहाल का म्हणजे तुम्हाला काय भावले का आवडले ई.
@हर्पेन मला काही भावलं वगैरे
@हर्पेन मला काही भावलं वगैरे नाही त्यात पण लेखिकेने बरीच मेहनत घेऊन शोधलेली माहिती जी बहुतेकांना माहिती नसणार (मलाही नव्हती ) त्यात वाचायला मिळेल. नॉन-फिक्शन मध्ये काय असतंय भावण्यासारख ? बाकी मला पुस्तक परीक्षण लिहायला जमणार नाही म्हणून मी त्या लिंक्स दिल्यात काय आहे त्याची कल्पना यायला. तुम्ही वाचलंय का ?
नाहीये वाचलेलं
नाहीये वाचलेलं
इंग्रजी वाचनाचा कंटाळाच आहे त्यामुळे लिंकही अजून नाहीयेत वाचल्या. आयते काही मिळतंय का ते पहात होतो.
असो
एका वाक्यात सांगायचं तर
एका वाक्यात सांगायचं तर रामदेवने त्याच साम्राज्य कोणत्या भल्या बुऱ्या मार्गाने उभं केलं आणि कोणाकोणाला तुडवून (लेखिकेच्या मते ) त्याच वर्णन आहे. त्यांच्या गुरूचा मृत्यू आणि राजीव दीक्षित यांचाही हि प्रकरणे वाचण्यासारखी आहेत
कविता महाजनचं 'भिन्न' पूर्वी
कविता महाजनचं 'भिन्न' पूर्वी दोन वेळेस वाचायला घेतलं पण ठराविक पानांच्या पुढे जातच नव्हते. असं माझ्या बाबतीत होणं दुर्मिळ, कारण पुस्तक संपल्याशिवाय खाली ठेवणं मला व्यसन सोडण्याइतक जड जातं.
काल परत एकदा पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केली आणि आज संध्याकाळी पूर्ण संपवून थांबले. बधिर आणि उदास झाले आहे. अशक्य असहनीय वास्तव लिहिलं आहे. वाचून इतका धक्का बसला की संध्याकाळी जिम मध्ये प्रत्येक व्यक्तीकडे बघताना नकळत जास्तच निरीक्षण केलं जात होतं.
शेवटच्या पानावर दिलेले संस्थांचे पत्ते पाहिले, पण कळलं की आपण खूप फट्टू आणि आत्मकेंद्रित आहोत. मन कमकुवत ( OCD) आहे तर कसं इथे काम करणार? की त्यातल्या कुसूम ताईंनी सांगितल्या प्रमाणे फक्त materialistic मदत करून संस्थेच्या ऑफिसमधून उठून जायचं आणि मदतीचं खोटं समाधान मिळवायचं? असंख्य विचार आहेत. आणि आज मेंदू बधिर आणि मन त्रासदायक झालं आहे.
हेरंब कुलकर्णी यांचं
हेरंब कुलकर्णी यांचं दारिद्रयाची शोधयात्रा हे पुस्तक सरकारी आकडेमोडीं आणि योजनांवर विश्वास असणाऱ्या लोकांनी जरूर वाचा. १०० पानांचं पुस्तक आहे पण ती शंभर पण लिहायला त्यांनी बरेच श्रम घेतलेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलं असून त्यावरील त्यांची पुस्तके वाचनीय आहेत. नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात त्यांचं कार्यक्षेत्र असून एका NGO शी संबंधित आहेत
युट्युब मधला पुस्तकावरील व्हिडीओ ....पुस्तक वाचायला जरी नाही जमलं तरी हा व्हिडीओ पाहायचं कृपया चुकवू नका
https://www.youtube.com/watch?time_continue=1&v=8VQdLXPjbak
त्यांच्याच शब्दात पुस्तकाची एक झलक
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2990
मीरा, तू या पुस्तकावर
मीरा, तू या पुस्तकावर स्वतंत्र लेख लिहावा असे वाटते. पुस्तकाचा थोडक्यात परिचय, त्यातला हादरवून टाकणारा भाग कोणता आणि का होता, पुस्तकाने तुला/ तुझ्या दृष्टिकोनाला कसे बदलले वगैरे...
===
हेरंब कुलकर्णीचा अक्षरनामावरचा 'गरीब लोक काय खातात' लेख वाचला आहे.
वृत्तत्पत्रात, दिवाळी अंकांत
वृत्तत्पत्रात, दिवाळी अंकांत हे मंत कुलकर्णींचे लेख वाचलेत. अगदी त्रासदायक असतात.
त्रासदायक असतीलही लेख पण खरा
त्रासदायक असतीलही लेख पण खरा माणूस आहे .. आत बाहेर एक ... मी त्यांना वैयक्तिक ओळखतो
त्रासदायक म्हणजे अस्वस्थ करून
त्रासदायक म्हणजे अस्वस्थ करून सोडणारे.
मी हेरंब कुलकर्णींचे 'माझी
मी हेरंब कुलकर्णींचे 'माझी शिक्षण परिक्रमा" वाचले आहे. गावोगावचया शाळांमधे फिरून वास्तव काय आहे त्याची माहिती घेणे, सरकारातील लोकांशी बोलून त्यांचे याबाबतीत सुरू असलेले/नसलेले प्रयत्न, वेगवेगळ्या सरकारांमधले याबद्दल जाण आणि काही करण्याची इच्छा असलेले मंत्री, ते बदलल्यावर अनेक उपक्रम बंद पडणे, दिल्लीतील वरच्या लेव्हलच्या लोकांमधली उदासीनता - सर्वांचे अगदी डीटेल्ड वर्णन आहे.
त्याचबरोबर हे लिहीताना अत्यंत सोपी शैली, उगाच अतीगंभीर न करता आणि बर्याचसा self-deprecating स्टाइलने लिहीलेले लेख - यामुळे पुस्तक अतिशय वाचनीय आहे.
मीरा, तू या पुस्तकावर
मीरा, तू या पुस्तकावर स्वतंत्र लेख लिहावा असे वाटते. पुस्तकाचा थोडक्यात परिचय >>>> ॲमी, पुस्तक वाचल्यावर खात्री होतीच की मायबोलीवर याची चर्चा नक्कीच झाली असणार. आताच शोधाशोध केल्यावर बी/हर्टचा लेख दिसला, त्यामुळे मी परत लिहीत नाही.
दारिद्र्याची शोधयात्रा घेतले
दारिद्र्याची शोधयात्रा घेतले आहे. हेरंब कुलकर्णींच्या संवेदशील पण ठाम व्यक्तिमत्वाशी परिचय आहे.
हेरंब कुलकर्णी यांचं
हेरंब कुलकर्णी यांचं दारिद्रयाची शोधयात्रा हे पुस्तक >>>
२०१८ साली अनुभव मासिकात हेरंब कुलकर्णींचं 'पापुद्र्याआडचं विश्व' हे सदर प्रकाशित झालं. त्या लेखांचं संकलन करून त्यात आणखी माहितीची भर घालून हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.
या पुस्तकाच्या संपादनकामात माझा सक्रीय सहभाग होता.
जिद्दु, तुमचा प्रतिसाद समकालीन प्रकाशनाच्या मुख्य संपादकांपर्यंत पोहोचवला आहे.
केमाल पाशा - लेखक सदाशिव
केमाल पाशा - लेखक सदाशिव आठवले ,
एका मुस्लीम राष्ट्रात ८० वर्षापुर्वी केलेल्या सुधारणा , हा माणुस काळाच्या पुढे होता हेच दाखवते.
J. R. R. Tolkien चि lord of
J. R. R. Tolkien चि lord of the rings आणि hobbit वाचते. (१९५४ चि आहे)
पण काहितरि खूपच वेगळं आहे यात.
मनला समाधान मिळाल.
आधि movie पाहिला होता.
हेरंब कुलकर्णींचा अजूनेक लेख
हेरंब कुलकर्णींचा अजूनेक लेख
‘दारिद्र्याच्या शोधयात्रे’त मला भेटलेल्या महिला...
https://www.aksharnama.com/client/article_detail/3060
आजच त्यांच्या माझी शिक्षण
आजच त्यांच्या माझी शिक्षण परिक्रमा या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याचं वाचलं पेपरात
द तालिबान क्रिकेट क्लब -
द तालिबान क्रिकेट क्लब - तिमिरी एन मुरारी यांच्या पुस्तकाचा अमृता दुर्वे यांनी केलेला अनुवाद वाचतोय.
रशियाच्या माघारीनं तरच्या तालिबानच्या अधिपत्याखालील अफगाणिस्तानमधल्या एका पत्रकार तरुणीची कहाणी.
विषयच असा आहे की पकड न घेण अशक्य. अनुवादातल्या चुकाही ओलांडून जाता येतंय.
पुस्तक वाचून संपेपर्यंत विसरेन म्हणून आताच लिहितोय - प्रायव्हेट पार्ट्स = खासगी अवयव.
द तालिबान क्रिकेट क्लब.
द तालिबान क्रिकेट क्लब.
अफगाणिस्तानच्या दिल्ली दूतावासातल्या एका अधिकार्याची मुलगी. दिल्लीत पत्रकारितेचं शिक्षण घेतलेलं. तिनेच काय, तिच्या आजी आणि आईनेही कधी बुरखा घातलेला नसतो. रशि याच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य येतं आणि तिचं आयुष्य बदलतं. स्त्रियांनी महरम (पुरुष नातलग) शिवाय बाहेर पडायचं नाही. नोकरी तर करायचीच नाही.
तशात ती एका तालिबानी मंत्र्यांच्या नजरेस पडते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं असतं. त्यासाठी धाकदपटशा.
तालिबान क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचं ठरवतात. त्यासाठी एक स्प र्धा आणि विजेत्या संघाला पाकिस्तानात ट्रेनिंगची संधी.
दिल्लीत असताना खेळलेल्या कॉले ज क्रिकेटच्या जोरावर ती पुरुष वेश घेऊन आपल्या चुलत भावंडांची ए क क्रिकेट टीम तयार करते. स्पर्धा जिंकून पा किस्तानला जायची संधी साधून पुढे अन्यत्र पळायचं असा बेत.
तालिबानच्या राज्यातल्या जगण्याचं वर्णन - लादलेले क ठोर निर्बंध, श्वास कोंडलेल्या अवस्थेतलं जगणं, तरीही बंडखोरी जपणं हे या पुस्तकाचं वेगळेपण. तालिबान येण्यापूर्वीच्या अफगाणिस्तानची झलक हळहळ वाटायला लावते.
क्रिकेटमधल्या बॅट धरणं, बोलिंग अॅक्शन, फील्डिंग यांचं शाब्दिक वर्णन वाचताना गंमत वाटते. ज्यांनी कधी क्रिकेट पाहिलंही नाही, त्यांना शिकवायला लागलं , तर कसं करायचं त्याचा वस्तुपाठ.
पुस्तक त्यावर चित्रपट बनवता येईल अशा विचाराने लिहिल्यासारखं आहे. अनेक ट्विस्ट्स, उत्कंठा वाढवणारे , काळजाला हात घालणारे प्रसंग,त्यात एका लव्ह स्टोरीची जोड . क्रिकेट टुर्नामेंट पासून तर एस्केप टु व्हिक्टरी चं क्रिकेट व्हर्शन वाचतोय, असं वाटतं. .
भाषांतरित पुस्तकांवर वाचकांच्या (की वा चनालयांच्या) उड्या पडतात, म्हणून कोणाकडूनही कसेही अनुवाद करून घ्या, न तपासता ते छापा असा प्रकार चाललाय, हे पुन्हा एकदा जाणवलं.
मी सध्या 'बिकमींग' हे
मी सध्या 'बिकमींग' हे अमेरीकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी लिहीलेलं पुस्तक वाचते आहे.
@ अनया >>कसे आहे ते पुस्तक?
@ अनया >>कसे आहे ते पुस्तक? मला सुद्धा वाचायचे आहे. Add keley list madhe. Vel milala ki vachen.
माझं अजून संपलं नाहीये. भाषा
माझं अजून संपलं नाहीये. भाषा आणि वेग मला आत्तापर्यंत तरी आवडला आहे. तशीही मला क्लासिक्स टाइप पुस्तकं झेपत नाहीत. हे चांगलं वाटतंय. संपल्यावर अजून सांगते.
My brain is open : the
My brain is open : the mathematical journeys of Paul Erdős - लेखक Bruce Schechter.
पॉल एर्डोस या बहुप्रसव गणितीच्या गणिती प्रवासावर आधारीत पुस्तक. फारच मजा आली वाचायला. आता The Man Who Loved Only Numbers हे पुस्तक वाचेन जे त्यांच्या आयुष्यावर जास्त प्रकाश टाकते. माझ्या हंगेरीप्रेमात भर घालणारा हा अजून एक विषय - हंगेरिअन गणिती
The land of naked people : encounters with Stone Age islanders -लेखक Madhusree Mukerjee
अंदमान आणि निकोबार बेटांवरील आदिम जमातींवरचे पुस्तक. नक्कीच वाचण्यासारखे आहे.
Duel in the sun : Alberto Salazar, Dick Beardsley, and America's greatest marathon - लेखक John Brant
अल्बर्टो सालाझार आणी डीक बिअर्ड्सली या दोघांनी १९८२ सालची बोस्टन मॅराथॉन चुरशीने पळत काही सेकंदाच्या फरकाने पार केली. ही आजवरच्या काही अप्रतिम मॅराथॉन स्पर्धांपैकी एक गणली जाते. यानंतर मात्र या दोन्ही अतिशय गुणी धावपटूंच्या आयुष्याचा आलेख फारच वेगळ्या मार्गांनी पुढे सरकला. न उमजणार्या आजाराने सालाझार हैराण झाला तर बिअर्ड्सली पेन-किलरच्या आहारी गेला. दोघांनीही निराशेच्या, व्यसनाच्या गर्तेतून पुन्हा स्वतःला बाहेर काढले. ८२ बोस्टन मॅराथॉनची उत्कंठावर्धक शर्यत आणि या दोघांचे उर्वरित आयुष्य असे एकाड एक चॅप्टर्स पुस्तकात येतात. लेखन नेटके आणि सहज आहे.
Rising out of hatred : the awakening of a former white nationalist लेखक Eli Saslow
या पुस्तकावर एक स्वतंत्र लेख लिहावा असे मनात आहे. पुस्तक मला वैयक्तिक रित्या भावले, भिडले, टोचले.
Pages