मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१० वर्षाच्या मुलासाठी योग्य ' महाभारत ' कोणते?
इंग्लिशमध्ये हवे आहे.
वाचायचा उत्साह प्रचंड आहे. हॅरी पॉटर ७वे पुस्तक एका दिवसात वाचले आहे. तसेच समजही चांगली आहे.
तेव्हा अगदीच लहान मुलांची स्केलेटल पुस्तके नको पण खूप विवेचन असलेलीपण नको.

व्ही एस नायपॉल ह्यांचे अ‍ॅन एरिआ ऑफ डार्कनेस वाचत आहे. भारता बद्दलची निरीक्षणे अचूक आहेत व इंग्रजी एकदम फर्स्ट क्लास. त्यामुळे छान वाट्ते आहे वाचायला. एका पॉड कास्ट मध्ये ह्या पुस्तका बद्दल ऐकले. त्यामाण साने पुस्तकाची फिझिकल रिअ‍ॅक्षन होईल असा इशारा दिला आहे. सो फार मॅनेजिन्ग ओके

बर्‍याच दिवसांपासून यादीत असलेलं 'स्मृतिचित्रे' वाचलं. इंग्रजीचा अजिबात प्रभाव नसलेली भाषा आणि साधी सरळ, आहे हे असं आहे (किंवा होतं हे असं होतं Happy ) छाप वर्णनाची शैली ह्यामुळे आवडलं. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचं एकदम वास्तव चित्रण आहे पण त्यात कुठलीही बाजू न घेतल्याने किंवा आवेश आणून न लिहिल्याने अजून चांगलं वाटतं. 'मांगिण', 'ब्राह्मणीण' असे जातिवाचक शब्द वापरणं तेव्हा एकदम कॉमन असावं. शिवाय स्पृश्यास्पृश्यता असूनही खेडेगावात सलोख्याचं वातावरण असे कारण त्या त्या नियमांमध्ये राहून लोकं अडीअडचणीला एकमेकांना मदत करत, आनंदाचे क्षण साजरे करत हे वाचून आश्चर्य वाटलं. मला वाटलं होतं की गावात अधिक कडक आणि कटटरता असेल.
लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या विचारातं झालेल्या बदलांबद्दल सविस्तर लिहिलं आहे पण मुळात टिळकांनी ख्रिस्ती धर्म का स्विकारला ह्या मागची कारणं सविस्तर येत नाहीत (किंवा मला नीट कळली नसावी). बाकी टिळकांचं असं आवेगपूर्ण आणि धरसोड वागणं बघता त्यांनी संसार कसा केला असेल कोण जाणे. पुस्तक एकदम संपल्यासारखं वाटलं. कदाचित जेव्हडं लिहून तयार होतं तेव्हडं प्रकाशित केलं असं काहितरी असावं.

माबोवर प्रिटीन, टीनेजर मुलांसाठीच्या इंग्रजी पुस्तकांबद्दलचा धागा आहे का? >>>
अ‍ॅमी, वेगळा धागा नाहीये बहुतेक. पण मेधाच्या 'पुनश्च पुस्तके' वर चर्चा आहे बरीच.
https://www.maayboli.com/node/4271

And Then There Were None (अगाथा ख्रिस्ती)
प्रथमच अगाथा ख्रिस्तीचं पुस्तक वाचलं. क्लासिक थ्रिलर म्हणून वाचायला मजा आली. ३०-४० च्या दशकात अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं sensational ठरली असणार यात नवल नाही.

----------

Hello, Bastar (Rahul Pandita)

पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर पहिली प्रतिक्रिया - Mixed feelings!

नक्षलवादी चळवळीबद्दल माझ्यासारख्यांना पेपरमध्ये वगैरे वाचून तेवढं माहिती असतं. हे पुस्तक त्यापलिकडे नेतं. लेखक राहुल पंडिता या पुस्तकाची पूर्वतयारी म्हणून नक्षलवाद्यांच्या दलाबरोबर जंगलात राहिले. त्याशिवाय त्यांनी काही मोठ्या माओवादी नेत्यांच्या मुलाखती घेतल्या.

नक्षलवादी, खरंतर माओवादी चळवळीचा (दोन्हींत नेमका काय फरक आहे ते पुस्तकात सुरुवातीला सांगितलं आहे) इतिहास, कार्यपद्धती, देशाच्या वेगवेगळ्या भागांतला त्यांचा प्रभाव, राजकीय नेत्यांची या प्रश्नावरची भूमिका, त्या चळवळीत वेळोवेळी उदयाला आलेले नेते, शक्य तिथे त्या नेत्यांची पार्श्वभूमी, अशी सगळी माहितीची भरपूर जंत्री पुस्तकात येते. या चळवळीची माहिती देणं हाच पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.
एक-दोन ठिकाणी असा माहितीपर मजकूर जरा कंटाळवाणा झाल्यामुळे पुस्तक मध्येच सोडून द्यावंसंही वाटलं मला; पण नेटाने पूर्ण केलं.

शहरी भागांमध्ये या चळवळीचा अजून म्हणावा तितका जम बसलेला नाही. चळवळीतल्या मोठ्या नेत्यांची ती कायमची इच्छा आहे, त्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकांत म्हटलंय, ती चळवळ पसरू शकेल असं वातावरण आता महानगरी भारतात आढळून येतं. मूठभर लोकांकडे एकवटलेली प्रचंड संपत्ती, महानगरांच्या झोपडपट्ट्यांमध्ये किडा-मुंग्यांसारखे राहणारे कष्टकरी, त्यांच्या कष्टांच्या बदल्यात त्यांना मिळणारा अत्यल्प मोबदला, त्यांचं पराकोटीचं आर्थिक शोषण ... ही दरी आपण कमी करू शकलो नाही तर एक दिवस शहरी नक्षलबारी घडायला वेळ लागणार नाही.

नेटवर याचे अपेक्षेप्रमाणे mixed reviews आहेत. हे पुस्तक वाचलेले आणि त्याबद्दल पॉझिटिव्ह काहीतरी लिहिणारे म्हणजे लगेच प्रो-माओवादी असा सूर त्यात दिसतो. हे एक मला काही झेपत नाही. पण ते असो.

आधुनिक भारताच्या इतिहासाचं एक पान म्हणून मी हे पुस्तक वाचलं.

And Then There Were None (अगाथा ख्रिस्ती)
प्रथमच अगाथा ख्रिस्तीचं पुस्तक वाचलं. क्लासिक थ्रिलर म्हणून वाचायला मजा आली. > अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं The Murder of Roger Ackroyd हे माझं सगळ्यात आवडतं...

मी where the crawdads sing हे फिक्शन वाचून संपवलं काल. वेगळं सेटिंग. अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातल्या मार्शी (दलदलीच्या) प्रदेशात घडणारी ही गोष्ट.
सर्व कुटुंबिय सोडून/टाकून गेलेल्या एका लहान मुलीची ही सर्व्हायवल कथा बरीच वळणं घेत जाते. तिचं आयुष्य उलगडत असताना लेखिका (डेलायला ओवेन) आपल्याला भूतकाळात घेऊन जाते आणि त्याचबरोबर (पॅरालली) तिच्या आयुष्यात आलेल्या एका तरूणाचा संशयास्पद मृत्यूचा शोध ही कथा वर्तमानात घडत असते. ही धाटणी/मांडणी मला खूप आवडली. विशेषतः अखेरीस भूतकाळ वर्तमानाला येऊन मिळतो तेव्हा!
२०१८ साली आलेले हे पुस्तक The New York Times Fiction Best Sellers of 2019 आणि The New York Times Fiction Best Sellers of 2020 असे तब्ब्ल 30 (non-consecutive) आठवडे बेस्ट सेलर लिस्ट वर होतं. गुडरीडस वर देखील एवढे रिव्ह्यूज बघून मी वाचायला घेतले.
कथानक वेगळेपणामुळे, वातावरण निर्मिती मुळे आणि लेखिकेच्या ओघवत्या लिखाणामुळे धरून ठेवतं. मला कथा काही बारकावे/ अपवाद सोडता आवडली. थोडी कथालेखिकेला कथानिर्मितीकरीता लिबर्टी द्यावी लागते Happy शेवटचा ट्विस्ट आवडला...त्याबद्दल गुडरीडस वर मतमतांतर आहेत (असणारच!)

Lockdown book #5
Milk Teeth (Amrita Mahale)

१९९० च्या दशकाच्या अखेरीस कात टाकू पाहणारं मुंबई शहर आणि त्या पार्श्वभूमीवरची माटुंग्यातल्या एका जुन्या इमारतीची कथा - असं साधारण synopsis वाचून हे पुस्तक घ्यावंसं वाटलं.

इमारत खूप जुनी झाली आहे, तिथल्या भाडेकरूंना बाहेर काढून त्याजागी काहीतरी चकाचक टोलेजंग उभं करण्याचा मालकाचा डाव आहे. त्याविरोधात भाडेकरू एकत्र येऊन काही एक धोरण ठरवण्याचं बघतायत. त्यांच्यात मतभेद आहेत, गटबाजी आहे...
इमारतीचं भवितव्य काय असेल या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एक प्रेमकथा, एक प्रेमाचा त्रिकोण, तेव्हाच्या मुंबईतली तरुणाई, त्यांच्या बालपणीच्या आठवणी, जागतिकीकरणाचे छोटे छोटे पैलू, मुंबईसारख्या शहराची त्यामुळे होणारी घुसळण... अशी ही कादंबरी आहे.

बाबरी घटना, जातीय दंगली, बॉम्बस्फोट हे सर्व झेलून जागतिकीकरणाला सामोरी जाणारी मुंबई- मराठी मध्यमवर्गीय नायिकेच्या दृष्टीकोनातून मांडलेली- पुस्तकात छान उतरली आहे. मुंबईवर प्रेम असणार्‍यां वाचकांना ते बारीकसारीक सगळं टिपायला आवडेल.

कथानकात इमारतीचं रूपक माझ्या अपेक्षेपेक्षा अगदीच थोडं वापरलं आहे. प्रेमाच्या त्रिकोणावर जास्त भर आहे. कदाचित लेखिकेला तसंच अभिप्रेत असावं; पण मग synopsis वेगळा असायला हवा होता, असं वाटलं.
प्रेमाच्या त्रिकोणातल्या एका कोनाचं वाचकांपुढे आधी एक आदर्श रूप उभं राहतं, उत्तरार्धात त्याला कलाटणी मिळते. त्याच धाग्याला धरून केलेला कादंबरीचा शेवट मला आवडला. ठामठोक शेवट असणारी पुस्तकं आवडणार्‍या मंडळींना कदाचित तो आवडणार नाही.

पुस्तक गुंतवून ठेवणारं आहे, मात्र काही काही ठिकाणी लांबलेलं वाटलं. पुस्तकाची लांबी कमी करून आणखी crisp केलं असतं तर वाचायला आणखी मजा आली असती.

हे या लेखिकेचं पहिलंच पुस्तक आहे असं नेटवर समजलं.

Lockdown book #6
Vanishing Girls (Lisa Regan)

असं प्रथमच झालं, की unputdownable, heart-stopping thriller म्हणून वाचायला घेतलेलं पुस्तक अखेर जरा सपकच निघालं.
अमेरिकेतल्या एका छोट्याशा गावातली एक तरुण मुलगी बेपत्ता होते, बराच तपास करून पोलिसांना तिच्याबद्दल कोणतेही धागेदोरे सापडत नसतात. आणि मग एक दिवस आणखी मुलगी अचानक सापडते, जी हरवलेली आहे हेच कुणाला माहिती नसतं,
कादंबरीची पोलिस नायिका एका अपघातातून कशीबशी वाचते, त्याच अपघातात तिला त्या गुन्ह्याचा एक धागा गवसतो, (तो धागा अंतिमतः फारच far-fetched वाटला मला.) त्यावेळी ती वेगळ्या कारणाने suspended असते. पण ती स्वतःच स्वतः गुपचूप तपास सुरू करते... मग प्रत्येक महत्त्वाचा धागा तिच्याच हाती लागत जातो... आणि शेवटी वाचकांसमोर आयतं ताट वाढलं जातं.

यातला गुन्हा, गुन्ह्याची पद्धत heart-stopping आहे खरी, पण narration त्या तोडीचं नाही. Plot थरारक आहे, पण गुन्ह्याची उकल करतानाचे निवेदनातले खेळ तसे नाहीत;

फार अपेक्षा ठेवून हे thriller वाचायला घेतलं होतं... पण चालायचंच !

Lockdown book #7

मागच्या काही पानांमध्ये मेधानं Mr. Penumbra’s 24-hour Bookstore (Robin Sloan) या पुस्तकाबद्दल लिहिलं आहे. नुकतंच हे पुस्तक वाचलं.

या पुस्तकाचं एका ओळीत वर्णन करायचं तर ’नव्या युगाचं, नव्या पिढीचं, वेगळंच झकास पुस्तक’ !
पण मग नव्या पिढीच्या या पुस्तकाच्या शीर्षकात एक bookstore कसं काय?

तर, इंटरनेटी तंत्रज्ञान आणि प्राचीन छापिल पुस्तकं यांचे ऐसपैस चौपदरी रस्ते या पुस्तकाच्या चौकात एकत्र येतात. तिथे आपण वाचक उभे असतो, सुरक्षितपणे, traffic island च्या आत... या रस्त्यांवरून आपल्या दिशेनं येतात पुस्तकांच्या जगतात रमलेले, त्यापल्याड पाहू न शकणारे पन्नाशी आणि त्यापुढचे ’अंकल-आँटी-आजोबा’ वयाचे लोक आणि तंत्रज्ञानात मुरलेले, सिलिकॉन व्हॅलीत जमेल त्या प्रकारे घाम गाळणारे, इंटरनेटी जगतात व्यवसायाच्या नवनव्या वाटा शोधणारे तरुण तंत्रज्ञ... ते चौकात वाचकांसमोर ज्या प्रकारे एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या जगतात प्रवेश करतात, आणि मग जी काही मजा घडते, ते म्हणजे हे पुस्तक.

Mr Penumbra च्या या पुस्तकाच्या दुकानाच्या माध्यमातून एका ५०० वर्षं जुन्या कोड्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरू असतो. ते कोडं एका तितक्याच जुन्या पुस्तकात सांकेतिक स्वरूपात लिहिलेलं असतं. ते कोडं सुटण्यासाठी हे पुस्तकांचं दुकान २४ तास चालू ठेवणे आवश्यक असतं.
जागतिक मंदीमुळे सिलिकॉन व्हॅलीतली चांगली नोकरी गमवावी लागलेला नायक या दुकानात रात्रपाळीचा क्लार्क म्हणून कामाला लागतो. त्याला या शोधाबद्दल काहीही कल्पना नसते. मात्र तो ऑनलाइन तंत्रज्ञानात मुरलेला, त्याच मुशीत विचार करणारा, डोक्याला सतत त्याच प्रकारचं खाद्य हवं असणारा... त्या जुन्या, कोंदट, धूळभरल्या आणि वाचता न येणारी पुस्तकं असलेल्या दुकानातही त्याला स्वस्थ बसवत नाही. तो त्या दुकानाकडे एका वेगळ्याच दृष्टीकोनातून बघायला लागतो. त्यातून त्याला जे काय काय कळत जातं आणि मग जी काही मजा घडत जाते, ते म्हणजे हे पुस्तक.
त्यात Aldus Manutius हा प्राचीन इटालियन प्रकाशक आहे; एक काल्पनिक प्राचीन ’टाइप-फाँट’ आहे, तंत्रज्ञानाच्या काळातही टिकलेली त्याची अस्सलता आहे, जुन्या चित्रविचित्र गोष्टी जतन करणारी म्युझियम्स आहेत... book piracy आहे, त्याचं समर्थन करणारी इंटरनेटी तरुणाई आहे.

नायक आणि कथानकात येणारी त्याची तरुण मित्रमंडळी यांची जी जबरदस्त ऊर्जा कादंबरीभर आहे, ती मला फार आवडली. लेखकाची शैलीही त्याच प्रकारची आहे. ते सगळं रसायन फार मजा आणतं. अर्थात, एक मात्र आहे, ही वाचन-मजा पुरेपूर उपभोगण्यासाठी इंटरनेटवर ऐसपैस बागडण्याचा अनुभव हवा; इंटरनेटी संज्ञांचा परिचय हवा; नाहीतर बर्‍याच गोष्टी डोक्यावरून जाऊ शकतात.
(त्याचे काही दाखले https://preetk.wordpress.com/2014/02/12/what-i-learnt-from-mr-penumbras-... या ब्लॉगपोस्टवर आहेत.)

पुस्तक वाचून झाल्यावर मी नेटवर त्याचे काही reviews वाचले, लेखकाचा एक इंटरह्यू वाचला. त्यातून समजलं, की पुस्तक प्रथम बाजारात आलं तेव्हा छापिल प्रतीच्या कव्हरवरची शीर्षकाची अक्षरं अंधारात चमकणारी केली गेली होती. त्याचा संदर्भ बहुदा book-store च्या दर्शनी भागाचं पुस्तकात जे वर्णन येतं त्याच्याशी असावा आणि त्या प्राचीन ’टाइप-फाँट’शीही असावा... ते वाचून वाटलं, की किंडलपेक्षा ते पुस्तक प्रत्यक्षातच हाती लागायला हवं होतं...
कादंबरी हेच सांगणारी आहे - नवनवं तंत्रज्ञान आत्मसात केलं तरी जुनी मूल्यं विसरून चालत नाहीत.
हा सार्वकालिक महत्वाचा विचार मांडण्यासाठी जे जगावेगळं कथानक निवडलं आहे, त्याची मजा म्हणजे हे पुस्तक!

(या पुस्तकाचं prequel ‘Ajax Penumbra’ हे पण विकत घेऊन ठेवलंय.)

छान धागा. सगळ्या पुस्तकप्रेमींनी मिळून ह्याला कायम फुलवत ठेवा.
आता मला आवडलेल्या पुस्तक विषयी. दोन लेखक माझे अत्यंत आवडीचे. प्रथम म्हणजे टेरी प्रॅॅटचेट. Terry Pratchett ह्यांचे Only You Can Save Mankind पुस्तक. ह्या लेखकमहाशयांनी
स्वतःचे नवीन विश्व उभारले.पण त्यांत घुसण्याआधी हे पुस्तक वाचून त्यांची ओळख करून घ्या. पहा तुम्हाला आवडते का त्यांची लिहिण्याची पद्धत. आवडले तर तुम्ही नशीबवान आहात. मग पूर्ण खजिना तुमच्यासाठी खुला आहे.
हे पुस्तक अगदी छोटेखानी आहे. मला तर प्रथम वाटले कि हे लहान मुलांसाठी लिहिले आहे. तेव्हा Terry Pratchett कोण हे सुद्धा मला माहित नव्हते. खर तर एका दहा वर्षाच्या मुलाने हे पुस्तक मला वाचायला दिले. वाचा काका म्हणून. एका रविवारी दुपारी झोप येत असतांना वाचायाचा प्रयत्न केला. थोडे वाचल्यावर झोप उडून गेली. त्यानंतर मागे वळून न बघता Terry Pratchett ची सगळी पुस्तके वाचून संपवली.
आता दुसरे लेखक महाशय! लेमनी स्निकेट. ह्यांचा पहिला पुस्तक संच - A Series of Unfortunate Events, ह्या सेरीज मध्ये तेरा पुस्तके आहेत. प्रत्येक पुस्तकांत तेरा चॅॅप्टर आहेत. तेरा!!! पहा तुम्हाला काय वाटते ते . ह्या लेखकाच्या स्टाईल चा एक नमुना. तेराव्या पुस्तकाच्या कवर लेखक लिहित आहे
Dear Reader,
You are presumably looking at the back of this book, or the end of THE
END. The end of THE END is the best place to begin THE END, because if
you read THE END from the beginning of the beginning of THE END to the
end of the end of THE END, you will arrive at the end of the end of your
rope.
This book is the last in A Series of Unfortunate Events, and even if you
braved the previous twelve volumes, you probably can't stand such
unpleasantries as a fearsome storm, a suspicious beverage, a herd of
wild sheep, an enormous bird cage, and a truly haunting secret about the
Baudelaire parents.
It has been my solemn occupation to complete the history of the
Baudelaire orphans, and at last I am finished. You likely have some
other occupation, so if I were you I would drop this book at once, so THE
END does not finish you.
With all due respect,
Lemony Snicket.
अजून एक
Fate is like a strange, unpopular restaurant, filled with odd waiters who bring you things you never asked for and don't always like.
लेखकाने स्वतः वाचकाला ही वॉर्निंग दिली आहे
If you are interested in stories with happy endings, you would be better off reading some other book. In this book, not only is there no happy ending, there is no happy beginning and very few happy things in the middle. This is because not very many happy things happened in the lives of the three Baudelaire youngsters........
पुस्तकांची किंमत जरा जास्त आहे त्यामानाने पृष्ठ संख्या कमी आहे.. पण काय करणार आपण .
अजून एक भन्नाट सेरीज आहे .
The Three Investigators . कुणी वाचली आहेत ही पुस्तकंं?

https://en.wikipedia.org/wiki/Only_You_Can_Save_Mankind
Only You Can Save Mankind

Mr. Penumbra’s 24-hour Bookstore (Robin Sloan) - ललिता, पुस्तक मस्त वाटतंय. नोंद करून ठेवते. मेधाने लिहीलेलं वाचलं नाहीये. शोधायला हवं..

मी मागे केव्हातरी "गर्ल कोड" Girl Code: Unlocking the Secrets to Success, Sanity, and Happiness for the Female Entrepreneur म्हणून एक पुस्तक ऐकलं. मला लिबीच्या रेकमेंडेशन मध्ये का अव्हेलेबल मध्ये आलं होतं. हे पुस्तक सध्या बॅटल ऑफ बुक्स साठी पण होतं. छान आहे विषय आणि खरी गोष्ट आहे.

हे या लिंकवरुन पेस्ट करतेय म्हणजे कुणाला वाचायच/ऐकायचं का ठरवता येईल.

WHAT PARENTS NEED TO KNOW
Parents need to know that Girl Code is the true story of New York City high school students Andrea "Andy" Gonzales and Sophie Houser, who find themselves paired up at a summer program that uses coding as a way to empower girls. Andy and Sophie decide their final project for the program will take on one of the world's most pervasive taboos: menstruation. The video game they create, Tampon Run, will go viral almost immediately, altering forever how they see themselves and their futures. Andy and Sophie do go into great detail about their coding projects, but everything is presented in such an upbeat, accessible, and friendly way that even the most tech-challenged reader won't be intimidated. While coding is a central theme in the book, the story is just as much about two enormously likable and relatable 16-year-old girls finding their own voices, speaking out, and learning firsthand how to create change.

Lockdown book #8
Grey Sunshine: Stories from Teach For India (Sandeep Rai)

Teach for India बद्दल काही वर्षांपूर्वी एक लेख वाचनात आला होता. भारतातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी चालू असलेली ही एक चळवळ आहे, एवढं आठवत होतं. त्यामुळे किंडल suggestions मध्ये हे पुस्तक दिसल्यावर लगेच विकत घेतलं.

उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी दोन वर्षांसाठी आपलं नेहमीचं काम-नोकरीधंदा बाजूला ठेवून गरीब वस्त्यांमधल्या मुलांच्या प्राथमिक शाळेत शिकवण्याचं काम करायचं, ही Teach for India मागची मूळ कल्पना आहे. त्याची प्रेरणा आहे Teach for America या मोहिमेत.
लेखक संदीप राय या Teach for America मोहिमेत सामिल झालेले; अमेरिकेतल्या गरीब मुलांच्या शाळेत शिकवण्याचा अनुभव असणारे; भारतात शाहीन मिस्त्री यांनी या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली होती, त्याला हातभार लावण्यासाठी, आपल्या अनुभवांचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी म्हणून इथे आले.
त्यानंतरच्या दहा-एक वर्षांच्या वाटचालीवर आधारित हे पुस्तक आहे.
या मोहिमेत सामिल झालेले काही तरुण-तरुणी, गरीब वस्त्यांमधल्या प्राथमिक शाळांत शिकवायला सुरूवात केल्यानंतर त्यांनी खाल्लेले टक्केटोणपे, त्यातून पुढे त्यांची त्या-त्या मुलांशी जमलेली गट्टी ... असं एकूण त्या चळवळीचं चित्र उभं करण्याचा लेखकाचा उद्देश आहे.

मात्र, मला व्यक्तिशः पुस्तक म्हणून हे तितकंसं भावलं नाही. Stories from Teach For India - हे उपशीर्षक वाचून मी ज्या अपेक्षा केल्या होत्या तसं हे पुस्तक निघालं नाही.
एकतर पुस्तकाचं निवेदन खूप तुकड्या-तुकड्यात येतं. शिवाय त्यात मोठमोठे उपदेशपर संवाद सतत येतात, ते वाचायला नंतर नंतर कंटाळा यायला लागतो.

गरीब वस्त्यांमधल्या प्राथमिक शाळा सरकारी पाठबळावर उभ्या असलेल्या. त्याच्या आधाराने Teach for India चे हातही आठव्या इयत्तेतल्या मुलांपर्यंत पोहोचू शकतात. त्यानंतर ती मुलं कुठे जाणार, काय करणार हा मोठा प्रश्न. बहुतांश मुलं आठवीपर्यंत शिकून शाळा सोडतात. हे आजचं वास्तव. यावर TFI च्या काही fellows नी उपाय शोधला, धडपड केली; i-Teach ही एक मोहिम सुरू केली. पदरचे पैसे घालून ९वी-१०वीचे वर्ग सुरू केले. त्यासाठी त्यांना अतोनात अडचणींना तोंड द्यावं लागलं. १-२ प्रतिनिधिक उदाहरणांमधून ते सांगितलं गेलं आहे.
पण ते देखील असंच बहुतांशी preachy पद्धतीने लिहिलेलं आहे. इतके अस्सल अनुभव हाताशी असूनही ते वाया घालवलेत असं राहून राहून वाटतं.
पुस्तकाचं मुखपृष्ठ खणखणीत आहे, content देखील सकस आहेच, मात्र narrative त्या तोडीचं दमदार नाही. त्यामुळे जरा वाईट वाटलं. विरस झाला.
तरीही, Teach for India बद्दल आधी काहीही वाचलेलं नसेल तर हे पुस्तक आवडू शकतं.

मी अ‍ॅगाथा ख्रिस्ती ची जवळ जवळ ३०-३५ पुस्तके डाऊन लोड केली आणि वाचतोय. २०-२५ वाचून झाली. इतर कुठलाही लेखक असो (जेफ्री आर्चर सोडून), ४-५ पुस्तके वाचून झाली की त्यापुढे पुस्तकात किती पानांनंतर काय असेल ते सांगता येते. अ‍ॅगाथाची कुठलीही दोन पुस्तके सारखी आढळली नाहीत. ग्रेट!!

ललिता- प्रिती तुमचे इथले रेक मंडेशन व रिव्ह्यू वाचून पेनंब्रा बुक शॉप लगेच घेतले फारच मस्त वाटते आहे वाचायला धन्यवाद.

राम पटवर्धन ह्यांनी अनुवाद केलेलं 'पाडस' वाचलं. पुस्तकातली 'गोष्ट' खूप सुंदर आहे! ज्योडी, मा, पेनी, बक आणि पाडस सगळी पात्र मस्त रंगवली आहेत. फक्त मला अनुवाद करताना वापरलेली भाषा खूप कृत्रिम वाटली. मुळच्या इंग्रजी भाषेचं मराठीकरण न करता जसंच्या तसं अनुवादित केलेलं आहे. उदा. "अरे ज्योडी, त्या सदगृहस्थाला आत तरी येउ दे" हे अगदी Let the gentleman come in ह्याचं शब्दशः भाषांतर आहे. शिवाय काही काही शब्दांचे अर्थ सुरुवातील न कळाल्याने दृष्य डोळ्यासमोर उभं रहायला अडचण वाटली. उदा. 'तक्तपोशी' हा शब्द मी बहुतेक याआधी ऐकलेला नव्हता. भाषांतर जुनं आहे म्हणायचं तर नुकत्याच वाचलेल्या त्यापूर्वीच्या 'स्मृतीचित्रे' मध्येही अशी भाषा नाहीये. हे मला पहिल्या अर्ध्या भागात जास्त जाणवलं नंतर बहुतेक सवय झाली. इथे मायबोलीवरही 'पाडस' हा मराठीतला सर्वोत्कृष्ठ अनुवाद आहे अश्या कमेंट वाचल्या आहेत. मला तरी तसं वाटलं नाही किंवा मग माबुदो.
आधी म्हटलं तसं गोष्ट मस्त आहे. त्यामुळे पुस्तक आवडलं. मुळ इंग्रजी पुस्तक शोधून वाचेन.

Early Indians: The story of our ancestors and where we came from हे टोनी जोसेफ यांनी लिहिलेलं पुस्तक वाचून झालं.
आपले पूर्वज कोण कोण होते? कुठून कुठून, कशी कशी स्थलांतरं झाली, नंतर आलेल्यांच्या संस्कृतीमुळे आधीपासून इथे असलेल्यांच्या संस्कृतीमध्ये कशी भर पडली, बदल घडले, त्याचबरोबर इथल्यांच्या संस्कृतीचा प्रभाव नंतर आलेल्यांच्या संस्कृतीवरही कसा पडला आणि त्यामुळे एकंदरीतच 'भारतीय संस्कृती' नावाचं एक गुंतागुंतीचं रसायन कसं तयार झालं, याची रोचक कहाणी म्हणजे हे पुस्तक.
सुरुवातीला थोडं क्लिष्ट वाटलं. कारण हजारो वर्षांपूर्वी नेमकं काय ,कसं घडलं असेल याचं शंभर टक्के बरोबर उत्तर कुणाकडेच नाही. त्यामुळे विविध अंदाज मांडले आहेत.
पण त्या काळातल्या मानवी अवशेषांचं डीएनए विश्लेषण करणं आता शक्य झाल्यामुळे नक्कीच अधिकाधिक नेमकी उत्तरं मिळण्याच्या दिशेने शास्त्रज्ञ जात आहेत.
हडप्पा संस्कृतीतली माणसं कोण होती, ही प्रगत शहरी संस्कृती लयाला गेल्यावर ती माणसं कुठे गेली? आर्य कोण होते? ते नेमके कधी भारतात आले? आजच्या भारतीयांमध्ये आधीच्या भारतीयांचे किती आणि कसे अंश आहेत? आपल्यातली विविधता कशामुळे आहे? जातिव्यवस्था कधी निर्माण झाली? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा या पुस्तकात आहे.
एकंदरीत पुस्तक आवडलं!!

२०१० मध्ये अमेरिकन स्टॉक मार्केटमधे आलेला फ्लॅश क्रॅश काहींना आठवत असेल ज्यात मिनिटांत काही ट्रिलियन डॉलर स्वाहा झाले. त्याची खरी कारणे वेगळी असली तरी एकटा बळीचा बकरा मात्र लंडनवासीय नविंदरसिंग सराव याला बनवण्यात आलं आणि अर्थविश्वातील मोठे मासे नेहमीप्रमाणे नामनिराळे राहिले. स्टॉक मार्केटमधे असणाऱ्यांना HFT, Algo trading, quants या गोष्टी माहीत असतीलच. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी गोष्ट आहे ह्या प्रकरणाची. नुकतंच त्याच्यावर Liam Vaughn यांनी Flash Crash: A Trading Savant, a Global Manhunt, and the Most Mysterious Market Crash in History हे पुस्तक लिहिलंय ते वाचण्यात आलं. किंडलवर मिळेल वाचायला. अर्थातच एखाद्या वर्षात आपल्याला त्याच्यावर एखाद्या मोठया बॅनरचा सिनेमा अथवा वेबसिरीज पाहायला मिळेलच. परीक्षण वगैरे लिहिता येत नसल्याने खालील बातम्यांत ते प्रकरण कळेल काय आहे ते -
https://www.livemint.com/Money/TYUUtwYOj0VIPhFFyLICQM/How-flash-crash-tr...
https://www.businessinsider.com/what-actually-caused-2010-flash-crash-20...

फक्त मला अनुवाद करताना वापरलेली भाषा खूप कृत्रिम वाटली. मुळच्या इंग्रजी भाषेचं मराठीकरण न करता जसंच्या तसं अनुवादित केलेलं आहे. >>> हुश्श ! म्हणजे माझ्याशी कोणी तरी सहमत आहे. मी मागे माबोवर अगदी हेच मत व्यक्त केलं होतं, पण तेव्हा बाकी कोणाचंही मत माझ्यासारखं नव्हतं, त्यामुळे माझ्याच भाषेत आणि समजुतीत दोष असावा समजून मी नर्व्हस झाले होते. अतिशय सुंदर पुस्तक, पण कृत्रिम आणि शब्दशः भाषांतर आहे.

चांगला अनुवाद म्हणायचा तर 'काय वाट्टेल ते होईल' आणि 'चौघीजणी' मस्त आहे.बाकी बऱ्याच पुस्तकांचे अनुवाद अगदी प्रसिद्ध लेखकांनी केलेले पण खूप हरवलेले वाटतात.पाश्चात्य संस्कृतीतल्या साहित्याचा आपल्या भाषेत अनुवाद करताना असं होणं फार सोपं असावं.

मी_अनु, यात भा. रा. भागवत यांनी केलेले अनुवाद पण पकड! ज्यूल्स व्हर्नच्या विज्ञान कादंबऱ्या, शेरलॉक होम्स हे अनुवाद वाचले आहेत लहानपणी.

हो हो
भा रा भागवत कसे मिस झाले
त्यांचे तीन शिलेदार, वीस वर्षांनंतर, रॉबिनहूड माझे अत्यंत आवडते अनुवाद.

मला द गुड अर्थचा 'काळी' हा मराठी अनुवाद खूप आवडतो. भारती पांडे.
आणि नॉट विदाऊट माय डॉटर. हाही कृत्रिम वाटत नाही.

भारा भागवत यांनी केलेलं भाषांतर इतकेही चांगले नाहीये
मुळात हरीण बालक हे पुस्तकाचे नावच खटकते
त्यापेक्षा पाडस जास्त अर्थवाही आणि चपखल आहे

चांगला अनुवाद म्हणायचा तर 'चौघीजणी' मस्त आहे....+100 ते मूळ पुस्तक वाटावे इतके सुंदर आहे. मी दोन्ही वाचलीत तर Little Women पेक्षा मला चौघीजणी आवडले. कदाचित सवयीचा भागही असेल.
Autobiography of a Yogi सुद्धा मराठीतून योग्य वाटले नाही मला उगाचच अधिक क्लिष्ट झाले आहे. क्रियापदाच्या जागा बदलल्यासारख्या वाटतात आणि मनावर पकड धरत नाही कारण फ्लो हरवतो.

मला चौघीजणी कंटाळवाणं वाटलं.

पाडस झपाटल्यासारखं वाचलं होतं. त्यातल्या भाषेचा बाज वेगळा आहे. मूळ The Yearling घेऊन ठेवलंय. कधी वाचेन माहीत नाही.

Pages