Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15
ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नंदन - ती प्रक्रियावाली पोस्ट
नंदन - ती प्रक्रियावाली पोस्ट समजली. मला तरीही वाटते की सध्याच्या वातावरणात हे काही काळ स्थगित करता आले असते. कोणी आत्ता काही चुकीचे केले आहे आणि त्यावर लगेच प्रोटेस्ट करायला हवे असे हे नव्हते.
व्हाईट सुप्रिमसिस्ट इथेच आहेत. देशात त्यांचे कॅलिफोर्नियापासून साऊथ कॅरोलायनापर्यंत मोर्चे निघत आहेत. >>> मान्य. मला असे वाटले की तुरळक ठिकाणी विखुरलेले लोक त्यांना अजून समर्थन मिळून यामुळे आणखी एकत्र येतील. ती भीती खोटी असेल तर चांगलेच आहे.
असे वाटले की तुरळक ठिकाणी
असे वाटले की तुरळक ठिकाणी विखुरलेले लोक त्यांना अजून समर्थन मिळून यामुळे आणखी एकत्र येतील>>>>> खोटी नाही आजिबात फा. एकदा सपोर्ट मिळाला की एखाद्या माणसाला हार्ड्कोअर व्हाईट नॅशनलिस्ट असायची गरज नसते. आजू बाजूला सुरु असल्या गोष्टींच्या अनुषंगानी डोक्यात राग असतोच. त्याला वाचा फुटते. जुने आणी नवीन असे दोन्ही धुमाकूळ घालतात.
असे वाटले की तुरळक ठिकाणी
असे वाटले की तुरळक ठिकाणी विखुरलेले लोक त्यांना अजून समर्थन मिळून यामुळे आणखी एकत्र येतील >> मला ही फा सारखंच वाटलं. व्हाईट सुप्रिमसिस्ट, निओ नात्झीज यांना एनि पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी नुसार प्रंचंड पब्लिसिटी मिळाली आहे. जी नुसता मोर्चा काढून नक्कीच मिळाली नसती. जे पब्लिक विशेषतः तरुण मुले डायलेमा मध्ये असतील ती चुकीच्या बाजूला गेली तर त्यांना नवीन रीकृट मिळाले आणि त्यांना फक्त आणि फक्त तेच हवे आहे.
ड्यू प्रोसेस ने त्या सोल्जरचा पुतळा हटवला असता तर ला पाठींबा.
वरच्या अंजलीच्या पोस्टशी ही सहमत. यंग मुलांना भयंकर आतून काही करावसं वाटतं आणि त्यांना यापासून रोखणे प्रचंड कठीण होऊन बसू शकतं.
व्हाईट नॅशनलिस्ट, नियो
व्हाईट नॅशनलिस्ट, नियो नाझ्झींना पब्लिसिटी मिळणार हे ऑब्वियस होतं कारण सध्या ह्या संघटना ट्रंप आल्या पासून डोकं वर काढू पाहत आहेत. त्यात आपोजिशन वाल्यांनी मारामारी करुन आणखिन प्रसिद्धी दिलीच. फक्त ऑब्वियस काय नव्हतं तर ट्रंपनी सरळ सरळ कानाडोळा करणं.
९/११ नंतर जसं अचानक काही लोकं, रस्त्यावर काही लोकं मुसलमान आहेत अशी पुसट शंका असली तरी त्यांना हाणामारी करुन क्रांतीकार्य करु लागले. इथे आता ह्या लोकांनाच नाही तर त्यांच्या विचारांना एकदा फ्री हँड दिला की मग अशा घटना आणखिन घडायला लागतील.
>>पुतळा पाडण्याचं समर्थन
>>पुतळा पाडण्याचं समर्थन कुणीही केलेलं नाही. तेव्हा 'सारखं सारखं त्याच झाडावर' हा मोड आता आवरता घ्यावा.<<
हो बरोबर, पण त्याचा निषेध हि केलेला दिसला नाहि इथे. का? लिबरल्स नी तो पाडला म्हणुन?
तुमचा मुद्दा ट्रंपची मुळ्मुळीत प्रतिक्रिया - त्याने दोन्हि बाजुंना दोषी ठरवलं आहे. आता ते तुमच्या आवडत्या शब्दांत/भाषेत नसेल कदाचित तर तोच मुद्दा (तुमच्या भाषेत झाड) का धरुन बसला आहात...
राज, मुख्य मुद्दा तोच आहे
राज, मुख्य मुद्दा तोच आहे त्यामुळे मी त्याला धरून आहे (झाड ऑर अदरवाईज).
बाकीचे तुमचे मुद्दे Whataboutismच्या वाटेने चालले आहेत.
The tactic is a type of logical fallacy that attempts to discredit the opponent's position by accusing hypocrisy. It functions as a diversionary tactic to distract the opponent from their original criticism.
ट्रम्पचं हे आवडतं टॅक्टिक आहे.
बायदवे कालच्या प्रेस मीट
बायदवे कालच्या प्रेस मीट मध्ये लवकरच 'बॅनन' जाणार असं वाटलं मला. बॅनन कसा गुड मॅन आहे याची नेहेमी सारखी टेप वाजली.
गेला तर बरंच होईल.
फा मी अॅनॅलिसिस बद्दल
फा मी अॅनॅलिसिस बद्दल अशासाठी म्हटले कि हे प्रकार नंदन म्हणतोतसेदोनेश वर्षे सुरू आहेत. अगदी Time नि Forbes मधे त्याच्यावर लेख आलेले वाचले आहेत, तूही जनरल वाचतोस हे माहित आहे तरीही तू विचारलेस म्हणून आश्चर्य वाटले.
जे पब्लिक विशेषतः तरुण मुले डायलेमा मध्ये असतील ती चुकीच्या बाजूला गेली तर त्यांना नवीन रीकृट मिळाले आणि त्यांना फक्त आणि फक्त तेच हवे आहे. >> ह्याबाबतीत काल Washington Post मधे The Greatest Generation च्या एका सैनिकाने लिहिलेला लेख वाचला. त्याच्या म्हणण्यानुसार There are only 2 sides in the play here - people who hate and people who oppose them. दुसर्या महायुद्धामधे नाझी वि. इतर असे दोनच घटक होते नि आजही तेच आहेत, इतक्या लोकांच्या बलिदानानंतर.
"“you also had some very fine people on both sides” ह्या विधानामधील एका साईडला निओ नाझी नि व्हाईट सुप्रमिस्ट आहेत हे लोक वाद घालताना विसरतात का कोण जाणे.
people who hate and people
people who hate and people who oppose them.>>>> खरय एकदम!
मला तर आज प्रकर्षानी जाणवलं की अक्षरशः कंटाळा आहे याहू किंवा इतर लेफ्ट लिनिंग साईट्स आणि त्यावरच्या बातम्या बघताना. पानोनपान फक्त कोबेर नी कश्या ट्रंप च्या चिंध्या केल्या अन कोणत्या सेलेब्रिटीनी कसं ट्रंपला एका ट्विट मध्ये ओन केलं ... बास येवढ्याच बातम्या आहेत. विरोध समजू शकतो पण सतत तेच आणि ते पण चेष्टेचा सूर. कंटाळा आला. हेटर्स तर आहेतच पण हेटर्स ऑफ हेटर्सनी पण उच्छाद मांडला आहे खरं तर.
एखादी जरा कमी बायस्ड असलेली न्युज साईट निवडावी होम पेज म्हणून झालं!
बुवा हेटर्स नि सुरूवात
बुवा, हेटर्सनी सुरूवात केल्यामूळे ह्या प्रकाराला उत आलाय त्यामूळे 'जसे पेराल तसे उगवेल' हे इथेही लागू होणार. माणूस कितीही सहनशील असला तरी त्याच्या सहनशीलतेलाही एक मर्यादा असते.
एखादी जरा कमी बायस्ड असलेली न्युज साईट निवडावी होम पेज म्हणून झालं! >> theweek बघत जा.
ते आर्टिकल वाचले नाहीये. पण
ते आर्टिकल वाचले नाहीये. पण यंग / टीनेजर चे विचार फॉर्म होत असताना त्या दोन साईड पैकी एका साईडला जाणे होत असते. ते काही जेनेटिक किंवा इतर कशाही सारखे जन्मतः ग्रुप सेलेक्ट करत नाहीत ना?
असामी अॅनेलिसीस बद्दल got
असामी अॅनेलिसीस बद्दल got your point. पण मी या गोष्टींबद्दल बेसिक माहितीही वाचलेली नाही असे नाही. या घटनेबद्दल जे वाचले त्यातून मला हे प्रश्न पडले. त्याची उत्तरे नेहमीच्या साइट्स वर दिसली नाहीत.
एखादी जरा कमी बायस्ड असलेली न्युज साईट निवडावी होम पेज म्हणून झालं! >>> बुवा अशी आता कोणती शिल्लक आहे का असाच प्रश्न पडतो. पॉलिटिको त्यातल्या त्यात असेल.
अमित बरोबर आहे पण त्यामूळे
अमित बरोबर आहे पण त्यामूळे त्यांची कृत्ये justified होत नाहित.
मेथड बिहाइंड द मॅडनेस ऑफ
मेथड बिहाइंड द मॅडनेस ऑफ ट्रम्प फटिगः
There are two basic reactions to Trump fatigue.
The first -- and this is common among Trump's supporters but, increasingly, even among those who aren't part of his hardcore base -- is a belief that all of this stuff can't be true. That the dishonest media must be making some or all of it up.
The second is to just turn off the TV, close the computer, take your Twitter app off your phone. To unplug from the constant stream of stories that start "Donald Trump said ..."
Both of those reactions benefit Trump
असामी, बघतो ट्राय करुन.
असामी, बघतो ट्राय करुन.
हो ना फा. ती मध्यंतरी व्हॉट्सअॅप वर छोटं ग्राफिक आलं होतं लेफ्ट लिनिंग वर्सेस राईट लिनिंग, ते बघायला पाहिजे.
Both of those reactions benefit Trump>>>> खरं आहे पण माझ्या वतीने सांगायचं म्हणलं तर मी फक्त बघ्याची भुमिका घेऊ शकतो ह्या सगळ्यात. इथे फक्त चर्चा, वेंटिंग करतो आणि न्युज साईट माहिती मिळते म्हणून वाचतो. कुठलीच प्रिंट किंवा ऑनलाईन फॉर्मची रियॅक्शन खरं काहीच करु नाही शकत ह्या परिस्थितीचं. ऑनलाईन, ट्विटरअर आउटरेज झाला म्हणून फक्त कंपन्या प्रॉडक्ट आणि लोकं बेदखल करतात पण हा खेळ पोलिटिकल आहे. तिथे ग्रास रुट लेवल ला काही केल्याशिवाय काहीच होणार नाही. ग्रास रुट लेवलला काही करायची न मला इच्छा आहे न परवानगी. सो, मी अन माझा वैताग दोघंही सुट्टी घेऊ म्हणतो सगळ्याच बॅलन्स्ड नसलेल्या साईट्स पासून.
दुर्दैवाने असे म्हणावे लागेल
दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की ट्रम्प ने या सगळ्याचा कडक शब्दामध्ये निषेध करावा ही अपेक्षाच हास्यास्पद आहे
अनेक जणांचे अनेक मुद्दे असतात. प्रत्येक मुद्दा प्रत्येकाला पटतोच असे नाही
अशा वेळी सोयीस्कर गोष्टी पाहून त्रासदायक गोष्टी नजरअंदाज करणे ही वृत्ती आढळून येते
ट्रम्प हे ओळखून जुगार खेळला आणि यशस्वी झाला
म्हणून
ट्रम्प ने या सगळ्याचा कडक शब्दामध्ये निषेध करावा ही अपेक्षाच हास्यास्पद आहे
बिझनेस अॅडवायझरी कौन्सिलला
एक एक करून लीडर सोडून गेल्यावर आता बिझनेस अॅडवायझरी कौन्सिलला टाळे लागले.
आजच एनपीआरवर ट्रम्प
आजच एनपीआरवर ट्रम्प पाठीराख्यांच्या काही प्रतिक्रिया ऐकवल्या. सर्वांना ट्रम्प जे बोलला ते आवडले. मला नाही वाटत की त्याच्या पाठीराख्यांना तसेच अगदी फेन्ससिटर्सनासुध्दा त्याच्या वक्तव्यात काही गैर वाटले असेल.
ट्रम्प ने या सगळ्याचा कडक
ट्रम्प ने या सगळ्याचा कडक शब्दामध्ये निषेध करावा ही अपेक्षाच हास्यास्पद आहे >> There is an evil and there is an evil अशी परिस्थिती आहे. इथे black and white असे काहिही नसल्यामूळे काहीही gotcha न टाकता कडक शब्दांमधे निषेध नसला तरी नि:संदिग्ध शब्दांमधे देशाच्या प्रेसीडंटने (ट्रंप ह्या व्यक्तीने नाही) निषेध करणे अपेक्षित होते असे मला वाटते.
>>> त्याच्या पाठीराख्यांना
>>> त्याच्या पाठीराख्यांना तसेच अगदी फेन्ससिटर्सनासुध्दा त्याच्या वक्तव्यात काही गैर वाटले असेल.
--- the banality of evil?
>>राज, मुख्य मुद्दा तोच आहे
>>राज, मुख्य मुद्दा तोच आहे त्यामुळे मी त्याला धरून आहे (झाड ऑर अदरवाईज). बाकीचे तुमचे मुद्दे Whataboutismच्या वाटेने चालले आहेत.<<
बरं. सेलेक्टिव पर्सेप्शन यालाच म्हणत असावेत...
>>> बरं. सेलेक्टिव पर्सेप्शन
>>> बरं. सेलेक्टिव पर्सेप्शन यालाच म्हणत असावेत... Wink
--- सहमत आहे. यालाच नीरक्षीरविवेकही म्हणता येईल. माणसाचा जीव आणि पुतळा यांना एकाच मापात तोलणारी सम्यकदृष्टी नाही, हेच बरं.
--- the banality of evil?
--- the banality of evil?
>>
नाही नंदन. मी जे म्हणतो आहे ते अगदी थॉड्या लोकांशी बोलताना तेसुद्धा इथे आयोवा/मिनेसोटामधल्या व्हाइट एज्युकेटेड (युनिवर्सिटी) मिडल मॅनेजमेंटमधल्या लोकांच्या बोलण्यात जे जाणवले त्यावरून त्यांना कोणाला ट्रम्प जे वागतो आहे त्यात काहीच गैर वावगे वाटत नाहिये. कालच्याच प्रेस ब्रिफिंग बद्दल 'काय चुकीचे बोलला तो, दोन्ही बाजूला अतिरेकी लोक आहेत. मेडिया डाव्या/लिबरल अतिरेक्यांबद्दल काही बोलत नाही. बरे झाले ट्रम्प बोलला' हीच प्रतिक्रिया आज दिसली. हे चार-पाच लोक बर्यापैकी जग हिंडणारे आहेत. बाकी सामान्य ट्रक, बस ड्रायवर, मेंटेनन्स हँडीमॅन यांना ट्रम्प आपला वाटतो ते त्यांच्या गाड्यांवरच्या स्टिकरवरून्च लक्शात येते
<<मला तर आज प्रकर्षानी ......
<<मला तर आज प्रकर्षानी .............निवडावी होम पेज म्हणून झालं!>>
अनुमोदन. ट्रंप नुसता खेळतो आहे लिबरल्स लोकांशी. काहीतरी एक मुद्दाम वेडेवाकडे बोलायचे नि हे यडे लागले त्याचाच मुद्दा घेऊन.
तेव्ह्ढीच त्याचे नाव दुमदुमत रहाते, तेच पाहिजे त्याला.
त्याला इग्नोअर करा - तो गप्प बसेल.
जे काय व्हायचे ते काँग्रेस करेल, त्यांच्या मागे लागा. त्यांच्यावर नजर ठेवा - त्यातल्या वाईट लोकांना हा़कलून द्यायचा प्रयत्न करा!
पण काय करणार? डेमोक्रॅट्स कडे कुणि चांगले नेते आहेत का? हिलरी कंपूला हाकलले तर काही वर येतील.
>>> कालच्याच प्रेस ब्रिफिंग
>>> कालच्याच प्रेस ब्रिफिंग बद्दल 'काय चुकीचे बोलला तो, दोन्ही बाजूला अतिरेकी लोक आहेत. मेडिया डाव्या/लिबरल अतिरेक्यांबद्दल काही बोलत नाही. बरे झाले ट्रम्प बोलला' हीच प्रतिक्रिया आज दिसली.
--- अच्छा, समजलं.
ओबामामाने 'इस्लामिक टेरर' चा
ओबामामाने 'इस्लामिक टेरर' चा नाव घेऊन निषेध केल्याचे कधी ऐकले नाही >> म्हणजे एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारणे समर्थनीय असे म्हणताय का ?
नाही... वासरू मारल्यावर गोंगाट करणारे गाय मरताना चिडीचुप होते, असं म्हणतोय. ट्रम्पने केवळ व्हाईट नॅशनलिस्टचा उल्लेख केला नाही, म्हणजे जणू काही महाभयानक पातक केल्याचा जो कांगावा केला जात आहे, तो मला हास्यास्पद वाटला. अगदी क्षुल्लक गोष्टीवरूनही ट्रम्पवर टिकेची झोड उठवण्याचा लुबरलांचा एककलमी कार्यक्रम मला केविलवाणा वाटतो. आणि हेही लक्षात घ्या की ट्रम्प ओबामा किंवा इतरांसारखा एकेक शब्द तोलून मापून बोलणारा सीझन्ड पॉलिटिशियन नाही, तो 'सुचेल ते' बोलतो. त्याच्याकडे फारशी शब्दसंपत्ती आणि ती वापरण्याची पात्रता दोन्हीही नाही. त्याच्या एका वाक्यावरून इतका गदारोळ उठवणं हे डाव्यांचं फ्रस्ट्रेशन दर्शवतं.
ब्लॅक लाईवज मॅटर चळवळी मध्ये
ब्लॅक लाईवज मॅटर चळवळी मध्ये अतिरेकी डोक्याचे लोकं असतील्/आहेत, मान्य. पण त्यांच्या बेसिक आयडियॉलॉजी आणि मागण्यांमध्ये काय मुख्य मुद्दा आहे? आमचा जीव मॅटर करतो, आम्हाला हाकनाक मारु नका.
व्हाईट नॅशनलिजम च्या बेसिक फंड्यांमध्येच "आमचं वर्चस्व" राहिलं पाहिजे हा मुद्दा आहे. How the hell are people comparing these two causes? Both causes have bad elements in them for sure but there's no way you can compare these two causes at their fundamental levels.
Blame the bad elements in the black lives matter movement, sure! But you can't hold the cause responsible for these elements as its basic tenets don't promote dominance, segregation and bigotry!
Causes like white nationalism absolutely need to be condemned every time! The cause itself is wrong on so many levels. I can't believe I have to write this.
टवणे सर, तुमचे बरेचसे मुद्दे
टवणे सर, तुमचे बरेचसे मुद्दे पटले. परिस्थिती तशीच आहे, आपल्याला आवडत नाही, पण तशीच आहे.
ट्रंप असो किंवा दुसरा कुणि - लोकांना ट्रंपची बरीच मते पटतात त्याला काय करणार? आता जर ट्रंपच्या समर्थकांना वेडे म्हणायचे तर हे राष्ट्र वेड्या लोकांचेच आहे असे म्हणावे लागेल कारण त्यांनी ट्रंपला निवडून दिले. पण सगळेच काही वेडे नाहीयेत, पण तरी त्यांना ट्रंपची बाजू पटते. म्हणजे या देशातील बहुसंख्य लोकांना ती बाजू पटते, नि ते ट्रंपसारख्यांना निवडून देणार.
तर उगाच वादविवाद करून कुणि आपले मत बदलणार आहेत का?
गेली आठ वर्षे वेगळ्या मताच्या माणसाला प्रेसिडेंट केले. पण लोक असमाधानीच राहिले - त्यांना बदल पाहिजे. तो त्यांनी केला.
ट्रम्पने केवळ व्हाईट
ट्रम्पने केवळ व्हाईट नॅशनलिस्टचा उल्लेख केला नाही, म्हणजे जणू काही महाभयानक पातक केल्याचा जो कांगावा केला जात आहे, तो मला हास्यास्पद वाटला. अगदी क्षुल्लक गोष्टीवरूनही ट्रम्पवर टिकेची झोड उठवण्याचा लुबरलांचा एककलमी कार्यक्रम मला केविलवाणा वाटतो.
>> Beg to differ here. व्हाईट नॅशनलिस्टचा उल्लेख देशाच्या प्रेसीडंट्नी न करणे is a big deal considering what they stand for and promote. हि अजिबात क्षुल्लक गोष्ट नाहिये.
आणि हेही लक्षात घ्या की ट्रम्प ओबामा किंवा इतरांसारखा एकेक शब्द तोलून मापून बोलणारा सीझन्ड पॉलिटिशियन नाही, तो 'सुचेल ते' बोलतो. त्याच्याकडे फारशी शब्दसंपत्ती आणि ती वापरण्याची पात्रता दोन्हीही नाही. >> That does not make his words less potent.
वरची बुवांची पोस्ट वाचाच.
राज हा लेख खास तुझ्याकरताच
राज हा लेख खास तुझ्याकरताच लिहिलाय असे वाटले वाचताना
https://www.vox.com/policy-and-politics/2017/8/16/16154738/lee-davis-was...
वर तू तुझ्या गावच्या Confederacy सिंबॉल्स बद्दल एक पोस्ट केलेलेस त्याबद्दल
South Carolina, the first state to secede from the Union, said in its official statement that it saw any attempts to abolish slavery and grant rights to black Americans as “hostile to the South” and “destructive of its beliefs and safety”:
A geographical line has been drawn across the Union, and all the States north of that line have united in the election of a man to the high office of President of the United States, whose opinions and purposes are hostile to slavery. He is to be entrusted with the administration of the common Government, because he has declared that that "Government cannot endure permanently half slave, half free," and that the public mind must rest in the belief that slavery is in the course of ultimate extinction. This sectional combination for the submersion of the Constitution, has been aided in some of the States by elevating to citizenship, persons who, by the supreme law of the land, are incapable of becoming citizens; and their votes have been used to inaugurate a new policy, hostile to the South, and destructive of its beliefs and safety.
In a letter encouraging Texas to secede and join the Confederate States, Louisiana Commissioner George Williamson was even more explicit. He argued that the Confederacy was needed “to preserve the blessings of African slavery” and that the Confederate states “are bound together by the same necessity and determination to preserve African slavery.”
पूर्ण लेख वाचायचा असेल तर
https://www.vox.com/identities/2017/8/16/16151252/confederate-statues-wh...
(फा तुला प्रश्न होता ना ह्याबद्दल, त्याची उत्तरेही इथे सापडतील.)
Pages