अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अमित, बरोबर आहे. मी फक्त जसा ओबामा ह्याच स्टेट्स ह्याच सिस्स्टम मधून दोन वेळा निवडून आला त्यावरुन म्हणत होतो. म्हणजे असं की, मागच्या निवडणूकीत प्रो ट्रंप म्हणून स्विंग स्टेटातून लै व्हाईट अंडरप्रिविलेज्ड लोकं बदाबदा येऊन वोट देऊन गेले त्याला. तितकासा सपोर्ट इतर गटातून, जे प्रो ट्रंप नव्हते, त्यांच्याकडून हिलरीला नाही मिळाला. आता मला असं वाटतं की हा जर ट्रंप चा अजेंडा राहिला तर इतर गट बाकी नाही पण ट्रंप विरोधी म्हणून वोट द्यायला नक्की बाहेर येतील. जेरीमँडरिंगचा मुद्दा बरोबर आहे फक्त मला वाटतं की ज्या स्विंग स्टेट्स मध्ये ओबामाला सपोर्ट मिळाला ते लोकं पुढे सगळे प्रो ट्रंप झाले असं नाही वाटत. तसे बरेच रिंगच्या बाहेर उभे राहिले ह्या इलेक्शनला असं वाटतं.

देजा वू, बरं झालं हा मुद्दा तुम्ही मांडला. ह्या विषयी पण लिहायची खुप इच्छा होती. ह्या वर्जिनियामधल्या घटनेबद्दलच्या प्रतिक्रियांमध्ये ट्रंप आणि काही मिडिया वाल्यांनी जे ट्रिवियलायजेशन सुरु केलं आहे ते बघताना त्यांच्या विचारांमध्ये (?) मेजर मुद्दा मिसिंग आहे असं दिसत राहतं.
ट्रंप आणि इतर लोकं हिंसा दोन्ही बाजूंनी केली आणि त्यामुळे दोन्ही बाजू गिल्टी आहेत असं म्हणत आहेत, जे बरोबर आहे. पण तिथे झालेल्या हिंसेच्या आधी व्हाईट नॅशनल, केकेके, नियो नाझ्झी ह्यांनी मोर्चे काढले ह्या मूळ मुद्द्याबाबत तो काहीच बोलत नाही. आणि बोलत नाही म्हणजे माझं ठाम मत आहे की त्याला त्या मागचं गांभिर्यच कळत नाही. कसं ते पण सांगतो.
मध्यंतरी पॉला डीन वर रेशियल डिस्क्रिमिनेशन आणि हॅरॅसमेंटची केस झाली होती. त्या केसच्या निकालानंतर तिचे बरेच चांगले टिव्ही काँट्रॅक्ट्स गेले होते. तर ह्या केसच्या वेळी तिनी एका डेपोजिशनच्या वेळी एन वर्ड वापरण्यावरुन काई वक्तव्य केले होते. ते वाचताना हे जाणवल्या शिवाय राहत नाही की तिला त्या शब्द का वापरु नये ह्या मागचे कारणच समजलेले नाहीये. ती अगदी सहजपणे , हो मी एन वर्ड वापरला आहे, आजकाल नाही वापरत कारण १९६० सालांनंतर खुप गोष्टी बदलल्या आहेत साउथ मध्ये, असं म्हणाली. त्यात अजून एक स्टेटमेंट होतं ज्यात पॉला डीन म्हणे तिच्या भावाच्या लग्नाच्या तयारीच्या संदर्भात "मला सदर्न प्लँटेशन स्टाईल, ज्यात ब्लॅक पुरुष सर्वर असतील" असं म्हणाली होती. ह्याबाबतीत तिला विचारल्यावर ती म्हणाली ह्यात काय चुकलं? मी प्लँटेशन वर मोठे झाले आणि आमच्या इथे अशाच गोष्टी चालायच्या. इथे परत ती हे वाक्य इतकं सहजतेनी म्हणाली की त्यात कुठेही ती मुद्दाम उद्दामपणा करत आहे असं नाही वाटलं. बेसिकली, पॉला डीनच्या गावचच नव्हतं की नेमकं ती काय चूकीचं करत होती. अशा वागण्यानी, असं बोलण्यानी फक्त लोकं ऑफेंड होत नाहीत तर त्याची इतर सुद्धा पडसाद उमटतात ह्याचा तिला काहीच पत्ता नव्हता. पत्ता नव्हता कारण तिला गरजच नाही पडली कधी हे जाणून घ्यायची की कसा फरक पडतो. So lets look at how it matters. Does she know or understand what the behavior of the owners of the plantation towards the black slaves represent? Does she understand how a fellow human being was not treated like one and was robbed of some really fundamental rights? Slavery represents inhuman treatment of a fellow human being. And when you use words, references that represent the values of that (slavery) era to refer to a fellow human being, you are, in a way demonstrating you still feel that fellow human being is not equal. If more and more people start doing this, it will not be long before there will be demands to actually start treating them unequally as well.

Going back to Trump, he keeps mentioning that both sides resorted to violence and both sides are equally guilty, which is true but that's hardly the point.
The bigger and fundamental point here is, does he understand what the white nationalists, KKK and the neo nazis represent? The air he has in making these statements is more like he is trying to treat everyone equally but does he understand what they are stand for?
Take a look at this link on what is the definition of a typical white nationalist.
https://en.wikipedia.org/wiki/White_nationalism
"White nationalists seek to ensure the survival of the white race, and the cultures of historically white states. They hold that white people should maintain their majority in majority-white countries, maintain their political and economic dominance, and that their cultures should be foremost.[4]"

If you read this, you can pretty much instantly start deducing what it means for people who are non white. They are pretty much asking for segregation based on race and not just that, they also want white nationals to maintain their political and economic dominance. This is where the Paula Deen example and Trump's example converge. They just don't see anything wrong in it. Trump is white and white people have put him in the chair and he doesn't think anything is wrong with it because he doesn't care what the white nationalist cause represents.
For white nationalists to maintain dominance is only possible via encroachment of other peoples, other races rights. He thinks or at least makes it sound like, white nationalists are only standing up for themselves but he either fails to understand or knowingly refuses to acknowledge that their stand requires other people to be treated less equal.

ओबामाने सॅन बर्नाडिनोनंतर साधलेला संवाद इथे आहे. त्यातला काही अंशः

But it is clear that the two of them had gone down the dark path of radicalization, embracing a perverted interpretation of Islam that calls for war against America and the West. They had stockpiled assault weapons, ammunition, and pipe bombs. So this was an act of terrorism, designed to kill innocent people.
...
If we're to succeed in defeating terrorism we must enlist Muslim communities as some of our strongest allies, rather than push them away through suspicion and hate.
That does not mean denying the fact that an extremist ideology has spread within some Muslim communities. This is a real problem that Muslims must confront, without excuse.

डावे लोक डोकेफिरु बनू लागले आहेत. अशा प्रकारे पुतळे तोडणे, फोडणे हे सुसंस्कृत आहे का? त्यांनी ज्या काळ्या लोकांवर अत्याचार झालेत, केवळ त्यांच्या वंशामुळे त्यांना मरावे लागले अशा लोकांची जास्ती मोठी स्मारके बनवावीत. लिन्चिंग व्हिक्टिमचे स्मारक बनवायला कुणाला कुणी थांबवले आहे का? पण नाही. निव्वळ विध्वंस करायचा.

ट्रंपने निषेध केला तर तो आधी का नाही म्हणून बोंब मारायची. नशीब हे कृत्य होण्याआधीच निषेध करायला हवा होता असे म्हणत नाहीत.

ट्रेव्हॉन मार्टिनने अत्यंत हिंसक पद्धतीने जॉर्ज झिमरमनला मारहाण केली होती आणि प्रतिकार म्हणून जॉर्ज झिमरमनने त्याला मारले. फ्लोरिडाच्या ज्युररने झिमरमनला सोडून दिले होते. आता बाकी आयुष्यात जॉर्ज झिमरमन पुरुषोत्तम होता का त्यात काही त्रुटी होत्या ह्याचा ह्या प्रकरणाशी संबंध जोडायचा असेल तर ट्रेव्हॉन मार्टिन काय मोठा महात्मा होता का तेही बघावे लागेल.

ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर वगैरे उघड उघड वंशवादी संघटना श्वेतवर्णीयांना वाट्टेल ते बोलतात, त्यांच्याविरुद्ध प्रचंड हिंसा करतात, दुकाने फोडतात, पेटवतात, लुटतात. ते मात्र पुरोगामी आणि ट्रंपने स्वच्छ निषेध केला तरी तो वर्णद्वेष्टा. धन्य आहे ह्या तर्कदुष्टतेची!

अमेरिकेची स्थापना करणारेही काळ्या लोकांना गुलामीत ठेवत होते. त्यामुळे आता जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन, फ्रँकलिन सगळ्या लोकांची स्मारके आणि पुतळे जाळा, तोडा, फोडा, आणि पुरोगामीपणाची दिवटी मिरवा! धन्य धन्य !

>>डावे लोक डोकेफिरु बनू लागले आहेत. <<

शेंन, तुमचा काहितरी गैरसमज होतोय. पुतळे पाडणारे, गर्दित कार घुसवणारे डावे नाहित, क्रांतीकारी आहेत. आमच्या इथल्या स्टोन माउंटन वरचं कंफेडरेट स्कल्प्चर सॅंडब्लास्ट करतील बहुदा, सरकारला धडा शिकवायला. जाॅर्ज वाॅशिंग्टनकि लेगसी भी खतरेमे है...

>>> डावे लोक डोकेफिरु बनू लागले आहेत.
--- कृपया हे वाचा: " भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे."

>>> अशा प्रकारे पुतळे तोडणे, फोडणे हे सुसंस्कृत आहे का?
--- याचं कुणीही समर्थन केलेलं नाही. लोकशाही, कायदेशीर प्रक्रियेने स्थानिक नगरपालिका हा पुतळा हटवणार होती. त्याच्या विरोधात राज्याबाहेरून निओ-नाझी आले आणि त्यांनी ज्यूद्वेषी घोषणा देत, पलिते घेऊन मोर्चा काढला. त्यामुळे 'निव्वळ विध्वंस' इत्यादी पुढची वाक्यं अस्थानी आहेत. विध्वंस केलाच तर तो ह्या निओनाझींनी - तोही कुणाचा तरी जीव घेऊन.

>>> ट्रंपने निषेध केला तर तो आधी का नाही म्हणून बोंब मारायची. नशीब हे कृत्य होण्याआधीच निषेध करायला हवा होता असे म्हणत नाहीत.
--- शांत व्हा आणि मुद्दा नीट समजून घ्या. ट्रम्पने निषेध करताना 'मेनी साईड्स'ना दोष दिला. कोणत्या मेनी साईड्स? एकतर ओहायोतून आलेला हा निओनाझी. इथे येऊन हाणामारी करतो आणि वर त्यांचा निषेध करायला जमलेल्या लोकांच्या अंगावर गाडी घालून एका व्यक्तीचा जीव घेतो. तो व्हाईट नॅशनलिस्ट आहे, हे त्याला पकडल्यावर लगेच उघड झालं होतं. एरव्ही हायपरअ‍ॅक्टिव्ह असणारा ट्रम्प (मर्कच्या सीईओवर टीका करणारं ट्वीट आलं लगेच चाळीस मिनिटांत!) अशा वेळी कुठे जातो? कॅन्ससमध्ये एका भारतीयाचा जीव घेतला गेला, तेव्हाही साहेब दोन-तीन दिवस गायब होते. बहुतेक गोल्फ खेळायला गेले असतील जन्तेच्या पैशाने!

>>> ट्रेव्हॉन मार्टिनने अत्यंत हिंसक पद्धतीने जॉर्ज झिमरमनला मारहाण केली होती आणि प्रतिकार म्हणून जॉर्ज झिमरमनने त्याला मारले.
--- असो.

>>> ते मात्र पुरोगामी ... धन्य आहे ह्या तर्कदुष्टतेची!
--- पुन्हा एकदा, कुणीही हिंसाचाराचं समर्थन केलेलं नाही. तेव्हा तर्कदुष्टता असलीच तर आधी बाण मारून त्याभवती वर्तुळ काढून आपला मुद्दा सिद्ध झाला, या प्रकारात आहे.

>>> त्यामुळे आता जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन, फ्रँकलिन सगळ्या लोकांची स्मारके आणि पुतळे जाळा, तोडा, फोडा, आणि पुरोगामीपणाची दिवटी मिरवा! धन्य धन्य !
--- वर म्हटले तसेच. कुणीही पुतळे फोडण्याचं समर्थन केलेलं नाही इथे. उगाच सुतावरून नरक गाठू नये.

>>> गर्दित कार घुसवणारे डावे नाहित, क्रांतीकारी आहेत.
--- राज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गर्दीत कार घुसवणारा क्रांतिकारी नाही, राईटविंगर निओनाझी आहे.

वाचा आणि विचार करा:
विचार पटत नसले, तरीही विरोधी बाजूला आपलं म्हणणं मांडता यावं यासाठी ACLUने केलेले प्रयत्न आणि खर्चः

And the (neo-Nazi) gathering likely wouldn’t have taken place at all if it weren’t for the American Civil Liberties Union, which came to the defense of the rally’s organizer, James Kessler, when his permit for the event was initially revoked by the city.

Despite the fact that even Kessler admitted that violence was anticipated at the protest, the ACLU convinced U.S. District Court Judge Glen E. Conrad that the protest should be allowed to continue on the grounds that the city “left in place the permits issued to counter-protestors ... [constituting] a content-based restriction of speech.”
https://www.good.is/articles/aclu-defends-milo-and-neo-nazis

बाकी ट्रम्पने पुन्हा एकदा फ्लिपफ्लॉप केल्याचं दिसतंय.
शब्दशः कालचा गोंधळ बरा होता:

His largely unprovoked presidential rant on Tuesday instantly sparked an even more intense critique, especially from Republicans.

Speaker Paul D. Ryan called white supremacy “repulsive” and said “there can be no moral ambiguity.” Representative Ileana Ros-Lehtinen, Republican of Florida, tweeted: “Blaming ‘both sides’ for #Charlottesville?! No.” Senator Marco Rubio, Republican of Florida, said white nationalists in Charlottesville were “100% to blame” and wagged his finger at the president for suggesting otherwise.

“The #WhiteSupremacy groups will see being assigned only 50% of blame as a win,” Mr. Rubio said on Twitter moments after Mr. Trump’s remarks. “We can not allow this old evil to be resurrected.”

Senator Todd Young of Indiana, a freshman Republican, wrote: “This is simple: we must condemn and marginalize white supremacist groups, not encourage and embolden them.”

Even members of Mr. Trump’s own military appeared to take quick offense to their commander’s words. Hours after the president spoke, the Marine Corps commandant, General Robert B. Neller, wrote in a tweet that there is “no place for racial hatred or extremism in @USMC. Our core values of Honor, Courage, and Commitment frame the way Marines live and act.”

शिवाय, हेही पहा:

A reporter asked if he planned to visit Charlottesville after the tragedy there. Mr. Trump replied by saying he has a house there, and provided an endorsement of the Trump Winery nearby.

राज, त्या बद्दल काही म्हणणे नाहीच आहे. त्या ली चा पुतळा पाडण्यामागचं कारण मला अजून नीट समजलेलं नाही किंवा समजलय पण खुपच बाळबोध आहे असं म्हणता येइल. बिन्डोक आणि त्यामुळे घातक अशी लोकं दोन्ही बाजूला आहेत.
प्रश्न तो नाहीये. ट्रंप कडून आजिबातच व्हाईट नॅशनलिस्टांचा निषेध होत नसल्यामुळे ती लोकं त्याचा वेगळा समज करुन घेणार आहेत. खरं सांगायला गेलं तर मला आपल्या मुलांची काळजी वाटते जे कॉलेज मध्ये, नोकर्या मध्ये असतात ते. त्यांच्या स्किनचा रंग बघून उद्या कोणीही विजिलांटिजम म्हणून आणखिन पुढचं पाऊल उचलेल.

खरं सांगायला गेलं तर मला आपल्या मुलांची काळजी वाटते जे कॉलेज मध्ये, नोकर्या मध्ये असतात ते. त्यांच्या स्किनचा रंग बघून उद्या कोणीही विजिलांटिजम म्हणून आणखिन पुढचं पाऊल उचलेल.>>> +१
त्यात आता ही मुलं/मुली असे प्रोटेस्ट झाले की हिरीरीनं भाग घ्यायला तयार असतात. मैत्रिणीची मुलगी त्या फेज मधे आहे आणि तिची होणारी घालमेल दिसते आहे. आम्ही सुपात आहोत. हिंसेचं कोणतंही समर्थन नाही पण डावे लोक डोकेफिरू होऊ लागले आहेत की कमेंट अनाकालनिय आहे. व्हाईट सुप्रिमिस्टस्टसना ज्यापद्धतीनं प्रोत्साहन मिळतंय ते खरंच चिंताजनक आहे. आमच्याइकडे २५ मैलांवर केकेके चं हेडक्वार्टर आहे. ग्रामिण भागात तर अजूनच तीव्र भावना आहेत. खरंच काळजी वाटते.

शेंडेनक्षत्रांना मी सिरियसली घेत नाही. एखाद्याचा व्युयपॉईंट सपोर्ट करणं अन बावळटासारखं काहीही जनरलायजेशन करुन सरतेशेवटी एखाद्याच्या बाजूनीच सतत निकाल लावणं ह्यात फरक आहे. त्यांचा रियॅलिटीशी टच नाहीये त्यामुळे त्यांच्या पोस्टी आता वाचत पण नाही मी.

व्हाईट सुप्रिमिस्टस्टसना ज्यापद्धतीनं प्रोत्साहन मिळतंय ते खरंच चिंताजनक आहे. >>>> +१ ट्रंप च्या लेवल वरुन थेट सपोर्ट म्हणजे टोटली कोलीत दिल्यासारखं आहे ह्या समाजकंटंकाना. इथे मुद्दा तोच आहे. त्यांच्या विरोधात अ‍ॅन्टिफा किंवा इतर लोकं येऊन ते पण हिंसा करत आहेत हा नंतरचा मुद्दा आहे. कोणी कायदा हातात घेतला तर त्यांना शिक्षा होईलच. सरवात पहिला मुद्दा आहे ह्या व्हाईट नॅशनलिस्ट अजेंड्याचा खुला पुरस्कार. त्यांचा डॉमिनन्स र्पुव करायला त्यांना आणखिन गुन्हे, अत्याचार करायची परवानगी देण्यासारखच आहे ते. व्हाईट नॅशनलिस्ट, केकेके, नियो नाझी काय पिसफूल प्रोटेस्टर आहेत का? त्यांच्या कॉज मध्येच पीस चा लवलेष नाही अन इतर लोकांना दाबणे हा त्यांचा मुख्य अजेंडा असताना त्यांच्याकडून अजून काय वेगळी अपेक्षा ठेवणार?

<<<गर्दीत कार घुसवणारा क्रांतिकारी नाही, राईटविंगर निओनाझी आहे.>>>
तेच ते.
राईटविंगर, निओनाझी, व्हाईट सुप्रिमसिस्ट या लोकांची ती क्रांती च आहे. त्यांच्या मते लिबरल, इतर वर्णाच्या लोकांनी हा देश " बळकावला " आहे. या परकीय सत्तेविरुद्ध क्रांति करून "आपला " देश परत घ्यायला पाहिजे असे त्यांना वाटते. म्हणून क्रांती.
असे आपले त्यांचे मत आहे. कुणाचे काय मत तर कुणाचे काय?
जगाच्या इतिहासात अशी अनेक प्रकरणे झाली आहेत. कुणि क्रांतिकारी म्हणतात तर कुणि बंडखोर. शेवटी इतिहास विजेता लिहितो.

तुमचे राजकीय मत जे काय असेल त्या प्रमाणे तुम्ही त्याचे वर्णन करायचे. त्यामुळे तुम्हाला इतरांचे चूक वाटते. नि त्यांना तुमचे!

जगात सगळेच गांधी थोडेच असतात - वर्षानुवर्षे लाठ्या, गोळ्या खाऊन, कैदेत जाऊन शांततेने, अहिंसेने क्रांती करायला? अजून तेव्हढी यांची संस्कृति सुधारली नाही - अजून जंगलचा कायदाच - हाणा मारी! माझे ते खरे.

बुवा वरची पोस्ट आवडली.

शेंन, तुमचा काहितरी गैरसमज होतोय. पुतळे पाडणारे, गर्दित कार घुसवणारे डावे नाहित, क्रांतीकारी आहेत. आमच्या इथल्या स्टोन माउंटन वरचं कंफेडरेट स्कल्प्चर सॅंडब्लास्ट करतील बहुदा, सरकारला धडा शिकवायला. जाॅर्ज वाॅशिंग्टनकि लेगसी भी खतरेमे है... >> राज हा तीरकसपणा असेल तर तो पूर्णपणे गंडलाय. जाॅर्ज वाॅशिंग्टन ची नि थॉमस जेफरसनची लेगसी स्लेव्हरी नाही नि तो त्यांच्या आयुष्याचा मुख्य भाग नव्हता हा मुद्दा अधोरेखित करतो. त्यामूळे त्यांची लेगसी खतरेमे असण्याचा धोका नाही. आता उरलेल्यांची मुख्यत्वे स्लेव्हरी शी संबंधित लेगसी जपण्याबाबत तुझे काय मत आहे ?

>>
शेंडेनक्षत्रांना मी सिरियसली घेत नाही. एखाद्याचा व्युयपॉईंट सपोर्ट करणं अन बावळटासारखं काहीही जनरलायजेशन करुन सरतेशेवटी एखाद्याच्या बाजूनीच सतत निकाल लावणं ह्यात फरक आहे. त्यांचा रियॅलिटीशी टच नाहीये त्यामुळे त्यांच्या पोस्टी आता वाचत पण नाही मी.
<<
मुद्द्यांना उत्तर देता येत नसेल तर वैयक्तिक हल्ले करुन बावळट, मूर्ख वगैरे शेलकी विशेषणे देणे, सिरियसली न घेणे आणि चर्चेतून पळ काढणे हा शॉर्टकट आवडला!
(अर्थात माझ्या पोस्टी वाचत नसल्यामुळे ही पोचपावती मिळणार नाही. दुर्दैव आमचे. असो.)

ट्रंपने गुलामगिरी वा श्वेतवर्णी वर्णद्वेष्टे ह्यांचे समर्थन केलेले नाही. त्याने निसंदिग्ध शब्दात ह्या घटनेचा आणि ती घटना घडवणार्‍याचा निषेधच केलेला आहे. परंतु कायमस्वरुपी ट्रंपद्वेषाचा चष्मा लावलेल्या लोकांना त्याने कितीही निषेध केला तरी त्यात त्याचे समर्थनच दिसणार.

एकंदर घटनाक्रम पाहिला तर दोन्ही बाजूचे लोक हिंसक बनलेले होते अशाच बातम्या आहेत. अँटिफा नामक फासिस्ट संघटना जी देशभर अत्यंत हिंसक निदर्शने करते (बर्कलीमधे दंगली घडवणारे हेच) ह्यांनी व्हर्जिनियातही तेच केले आणि मग निओनाझी लोकांनी प्रत्युत्तर दिले आणि त्यातील एका डोकेफिरुने कारखाली एका महिलेला चिरडले.

दहशतवादी ज्याप्रमाणे थंड डोक्याने कारस्थान आखून आपली मोहिम पार पाडतात तसे इथे झालेले नाही. निदान आजवरचा पुरावा तरी तसा नाही. त्यामुळे दोन्ही बाजूची चूक आहे हे म्हणणे पूर्ण अस्थानी नाही.

>>बिन्डोक आणि त्यामुळे घातक अशी लोकं दोन्ही बाजूला आहेत.<<
दॅट्स वॉट आय वांटेड टु कंवे बाय टॅगिंग देम "क्रांतिकारी". असो.

वॉशिंग्टन लेगसी - असामी, स्लेवरी आयुष्याचा मुख्य भाग केंव्हा होतो? गुलाम बाळगणे म्हणजे गुलामगिरीला पाठिंबा देणे असा होत नाहि - असं म्हणायचं आहे का तुम्हाला? वॉशिंग्टन्/जेफर्सन्/जॅक्सन आणि ली यांची लाइफस्टाइल सारखीच होती, गुलामांच्या बाब्तीत तरी. मग ली ला दिलेल्या न्यायाने बाकिच्यांची लेगसी खरतेमे का नाहि?

>>आता उरलेल्यांची मुख्यत्वे स्लेव्हरी शी संबंधित लेगसी जपण्याबाबत तुझे काय मत आहे ?<<
माझ तेच मत आहे जे या देशातल्या कायद्याचं आहे. व्हाइट सुप्रमसी वाले स्लेवरी प्रमोट करत असतील तर तुरुंगात जातील. यावर काहि शंका आहे का?

ली आणी वॉशिंग्टन वगैरेंची तुलना अस्थानी वाटते.

भारतातील एखाद्या मुस्लिम धर्मगुरुने बहुपत्नित्वाचा पुरस्कार केला, एकापेक्षा जास्त विवाह केले, व बहुपत्नित्वाच्या हक्कासाठी संघर्ष केला व तीच त्याची ओळख असेल तर आपण त्याचा पुतळा उभारणार नाही. पण म्हणून शिवाजी महाराजांची लीगसी धोक्यात आली असे म्हणणार नही.

vijaykulkarni - मुद्दा हा आहे कि लि चा पुतळा पाडणे योग्य आहे का? असल्यास गुलामगिरीशी संबंधित सगळ्यांचे पुतळे का पाडु नयेत? यात लि आणि वॉशिंग्टनचा परस्परसंबंध (तुलना) केवळ गुलामगिरी मुळे आहे...

राज, पुन्हा एकदा: पुतळा 'पाडला' नाहीये कोणी. स्थानिक नगरपालिकेने लोकशाही मार्गाने तो हलवण्याची प्रक्रिया सुरु केली होती. त्याला विरोध असेल, तर कोर्टात जाऊन स्थगिती आणता आली असती. लोकांचा जीव कसला घेता? आणि देशाचे तुकडे करायला निघालेल्या कॉन्फेडरसीच्या उदात्तीकरणाला होणारा विरोध म्हणजे फक्त गुलामगिरीला विरोध हे सिम्प्लिफिकेशन झालं.

एकदा ट्रंपने जॉर्ज वॉशिंग्टनचं नाव घेऊन चुकीची तुलना केली; म्हणून इतरांनीही तीच रेटण्यात काही अर्थ नाही.

>>> ट्रंपने गुलामगिरी वा श्वेतवर्णी वर्णद्वेष्टे ह्यांचे समर्थन केलेले नाही. त्याने निसंदिग्ध शब्दात ह्या घटनेचा आणि ती घटना घडवणार्‍याचा निषेधच केलेला आहे.
--- नि:संदिग्ध शब्दांत घटनेचा निषेध केलेला नाही, हाच तर प्रश्न आहे. त्याने "मेनी साईड्स"ना दोष दिला. इव्हान्का ट्रम्पपासून इतर अनेक रिपब्लिकनांनी केलेला निषेध हा थेट रेसिझम आणि व्हाईट नॅशनलिस्ट्सचं नाव घेऊन केलेला होता. त्या तुलनेत, ट्रम्पसाहेब आले आणि पहिली आठ-दहा मिनिटं स्वस्तुती करण्यात खर्ची घातली. मग एक गुळमुळीत स्टेटमेंट वाचून दाखवलं ज्यात व्हाईट नॅशनलिस्ट्सचा निषेधही नव्हता आणि काल पुन्हा घूमजाव करून दोन्ही बाजूंना दोषी ठरवलं. अनेक रिपब्लिकनांनीही ह्या 'लॅक ऑफ लीडरशिप'चा निषेध केलेला आहे आणि केकेके, डेव्हिड ड्यूक सारखे लोक प्रेसिडेंटवर भलतेच खूष झालेत.

>>> परंतु कायमस्वरुपी ट्रंपद्वेषाचा चष्मा लावलेल्या लोकांना त्याने कितीही निषेध केला तरी त्यात त्याचे समर्थनच दिसणार.
--- ट्रम्पने समर्थन केल्याचं कुणीच म्हटलेलं नाही. पुन्हा एकदा, ट्रंपद्वेषाचा चष्मा इत्यादी जजमेंटल शब्द टाळावेत.

>>> अँटिफा नामक फासिस्ट संघटना जी देशभर अत्यंत हिंसक निदर्शने करते
--- अच्छा, अँटी-फासिस्ट हेच फासिस्ट आहेत होय! हे म्हणजे अल्टरनेट फॅक्ट्ससारखं झालं किंवा ट्रम्पसमर्थक ब्राईटबार्ट किंवा अ‍ॅलेक्स जोन्स ज्या 'फेक न्यूज' पसरवतात - त्यांना प्रत्युत्तर म्हणून आरोप करणार्‍यांनाच 'फेक न्यूज' म्हणायचं या बालिश ट्रम्पियन टॅक्टिकसारखं! ("यू आर पुटिन्स पपेट" --> "नो, यू आर!").

>>> दहशतवादी ज्याप्रमाणे थंड डोक्याने कारस्थान आखून आपली मोहिम पार पाडतात तसे इथे झालेले नाही. निदान आजवरचा पुरावा तरी तसा नाही. त्यामुळे दोन्ही बाजूची चूक आहे हे म्हणणे पूर्ण अस्थानी नाही.
--- थंड डोक्याने कारस्थान आखलं किंवा नाही, हे तुम्हांला किंवा मला - कुणालाच ठाऊक नाही. पण जेव्हा एक व्हाईट नॅशनलिस्ट एका अमेरिकन नागरिकाचा जीव घेतो; तेव्हा चूक कुठल्या बाजूची आहे, हे उघड असावं.

नंदन, मुद्देसूद माहितीबद्दल धन्यवाद. आता जे काही वाचले आहे त्यावरून जे वाटले त्याबद्दल:

यात ती गाडी घेउन गर्दीत घालणे, लोकांचा जीव घेणे/जखमी करणे वगैरे चा निषेध करायलाच हवा. ते निर्विवाद चुकीचे आहे. पुतळा हलवण्याविरूद्ध कोर्टात जाउ शकले असते ते. यातून उठलेले व्हाइट सुप्रीमसिस्टचे मोहोळ वगैरेतून वाटणारी काळजी वगैरे अंजलीने जे वरती लिहीलेले आहे, ते मीही शेअर करतो. मलाही वाटते.

मात्र जरा खोलात गेलो, तर हे सगळे मोहोळ आत्ता उठवण्याची काय गरज होती? तो पुतळा हलवायला सध्या अनुकूल वातावरण नाही हे स्थानिक जबाबदार लोकांना माहीत नव्हते? अनेक वर्षे असलेला पुतळा हलवायची इतकी काय अर्जन्सी होती?

दुसरे म्हणजे जर दोन बाजू आंदोलन करणार आहेत तर दोन्ही बाजू एकमेकांपासून लांब राहतील हे स्थानिक सरकार करू शकत नाही का?

ट्रम्प निवडून आल्यावर आलेल्या हेट क्राइम वाल्या बातम्यांचा ओघ कमी झाला होता. गेल्या सहा महिन्यांत व्हाइट सुप्रीमसिस्ट वगैरे कोठे दिसले नव्हते. हे उकरून काढून त्यांना आणखी एकत्र आणण्याची जबाबदारी पुतळ्याच्या मागे लागणार्‍यांची ही नाही काय? (नोट - त्या कार वाल्या घटनेची जबाबदारी नव्हे - यातून पुढे ज्या ठिकठिकाणी रॅलीज ठरत आहेत, त्याची)?

मी पूर्ण अ‍ॅनेलिसीस केलेला नाही. काही नजरेतून सुटलेही असेल. पण जेवढे वाचले त्यातून हे प्रश्न पडले.

>>राज, पुन्हा एकदा: पुतळा 'पाडला' नाहीये कोणी<<

प्रक्रिया सुरु झालेली पण ती पुर्ण व्हायच्या आतच पुतळा पाडला - हा लोकशाहि मार्ग आहे का? हा मुद्दा अहे. दुसरा मुद्दा, उद्या स्थानिक नगरपालिका वॉशिंग्टन/जेफर्सन्/जॅक्सन यांचे पुतळे हलवायचे हि प्रक्रिया सुरु करु शकते पण कोण्या माथेफिरुने त्या आधिच ते पाडले तर त्याला संमती द्याल का?

>>> तर हे सगळे मोहोळ आत्ता उठवण्याची काय गरज होती? तो पुतळा हलवायला सध्या अनुकूल वातावरण नाही हे स्थानिक जबाबदार लोकांना माहीत नव्हते?
--- फारएन्ड, ही प्रक्रिया गेली दोन वर्षं सुरु होती. इथे तुलनेने अधिक फ्रिक्वेन्टली होणार्‍या निवडणुका, चर्चा, वाद-प्रतिवाद इत्यादी टप्प्यांतून पार पडून, मे २०१६ मध्ये कौन्सिलने हा निर्णय घेतला. अर्थात, त्याला पर्याय म्हणून - अधिक पुतळे अ‍ॅड करून, या जागेचे एक ऐतिहासिक पार्क बनवावे; अशी कल्पनाही समोर आली. फंडिंग आणि अन्य कारणांमुळे ती बारगळली. कौन्सिलचा सध्याचा निर्णय (पुतळा हटवण्याचा) सध्या कोर्टासमोर आहे.

>>> गेल्या सहा महिन्यांत व्हाइट सुप्रीमसिस्ट वगैरे कोठे दिसले नव्हते. हे उकरून काढून त्यांना आणखी एकत्र आणण्याची जबाबदारी पुतळ्याच्या मागे लागणार्‍यांची ही नाही काय?
--- व्हाईट सुप्रिमसिस्ट इथेच आहेत. देशात त्यांचे कॅलिफोर्नियापासून साऊथ कॅरोलायनापर्यंत मोर्चे निघत आहेत.
उदा. हा मार्चमधला मोर्चा: http://www.mercurynews.com/2017/03/09/police-urge-106-charged-in-clash-a...

दस्तुरखुद्द शार्लट्सव्हिलमध्येही तीन महिन्यांपूर्वी त्यांनी याच ठिकाणी, जळते पलिते घेऊन निओ-नाझी मोर्चा काढला होता. त्यात रशियाच्या समर्थनार्थ (का ते ओळखा पाहू :)) आणि ज्यूविरोधात घोषणा दिल्या गेल्या होत्या.

नि:संदिग्ध शब्दांत घटनेचा निषेध केलेला नाही, हाच तर प्रश्न आहे. त्याने "मेनी साईड्स"ना दोष दिला. इव्हान्का ट्रम्पपासून इतर अनेक रिपब्लिकनांनी केलेला निषेध हा थेट रेसिझम आणि व्हाईट नॅशनलिस्ट्सचं नाव घेऊन केलेला होता. त्या तुलनेत, ट्रम्पसाहेब आले आणि पहिली आठ-दहा मिनिटं स्वस्तुती करण्यात खर्ची घातली.>>>>>>>>>> +१

व्हाईट नॅशनलिस्ट वाल्यांच्या विरुद्ध कडक शब्दात वॉर्निंग देऊन पुढे दोन्ही बाजूंच्या हिंसाचारी घटकांना पण परत तेवढ्याच कडक शब्दात सुनवता आलं असतं. व्हाईट नॅशनलिस्ट वाल्यांची आयडियालॉजीच इतकी घातक असताना त्या बद्दल चकार शब्द नाही, अगदी मुद्दाम डोळेझाक केल्या सारखं केलं आणि नंतर मग बोंब उठल्यावर ४ वाक्य तोंडावर फेकले.

फारएण्डा, कोणीही प्रोटेस्ट करायला गेले नसते, तरीदेखील मशाली हातात घेऊन रॅली काढणार्‍या व्हाईट सुप्रीमसिस्ट्सची बातमी नॅशनल लेव्हलला आलीच असती. टू रेमिनिसंट ऑफ केकेके.

>>> प्रक्रिया सुरु झालेली पण ती पुर्ण व्हायच्या आतच पुतळा पाडला - हा लोकशाहि मार्ग आहे का? हा मुद्दा अहे. दुसरा मुद्दा, उद्या स्थानिक नगरपालिका वॉशिंग्टन/जेफर्सन्/जॅक्सन यांचे पुतळे हलवायचे हि प्रक्रिया सुरु करु शकते पण कोण्या माथेफिरुने त्या आधिच ते पाडले तर त्याला संमती द्याल का?
--- पुन्हा तेच! शार्लट्सव्हिलमधला पुतळा जिथल्या तिथेच आहे. आणि वर लिहिल्याप्रमाणे, कुणीही इथे पुतळे पाडण्याचं समर्थन केलेलं नाही.

>>पुन्हा तेच! शार्लट्सव्हिलमधला पुतळा जिथल्या तिथेच आहे. <<

ऑब्वियस्ली वी आर नॉट ऑन सेम पेज. मी या घटनेचा उल्लेख करत होतो. आता या घटनेचा आणि शार्लट्स्विलच्या घटनेचा काहि संबंध नाहि किंवा पुतळा केवळ एका सोल्जर्चा होता पाडायला हरकत नाहि, असं म्हणु नका...

व्हाइट सुप्रमसी वाले स्लेवरी प्रमोट करत असतील तर तुरुंगात जातील. यावर काहि शंका आहे का? >> फक्त स्लेव्हरी च नाही तर ते जे काही प्रोमोट करताहेत ते तुला धोकादायक वाटते का ? कि कायदेशीररित्या फ्री स्पीच म्हणून योग्य वाटते ? इथे फक्त स्लेव्हरी किंवा पुतळे पाडणे एव्हढ्याच मोजक्या अँगलमधून ह्या घटनांअकडे बघणे मला तरी घातक वाटते.

मी पूर्ण अ‍ॅनेलिसीस केलेला नाही. काही नजरेतून सुटलेही असेल. पण जेवढे वाचले त्यातून हे प्रश्न पडले. >> दस्तरखुद्द प्रेसीडांटसाहेबांनी पण 'काल मी संपूर्ण माहिती मिळेतो प्रतीक्रिया देइतो थांबलो' असे म्हटले नि तुला हे प्रश्न विचारायच्या अगोदर पूर्ण अ‍ॅनेलिसीस करायची गरज वाटली नाही ? Happy

टू रेमिनिसंट ऑफ केकेके. >> Only difference is that they are not even hiding their faces anymore. What a brazen attitude !

>>> ऑब्वियस्ली वी आर नॉट ऑन सेम पेज.
--- अर्थात, प्लीज डू जॉईन द रेस्ट टू बी ऑन सेम पेज! शार्लट्सव्हिलच्या पुतळ्याबाबतीत लोकशाही प्रक्रिया जशी चालायला हवी तशी चालते आहे आणि व्हाईट नॅशनलिस्ट/रेसिस्ट/निओ-नाझी यांनी लोकांना जीवे मारणं हे चुकीचं आहे, यावर तुम्ही सहमत आहात असं धरून चालतो. चर्चेचा मुद्दा हा ट्रम्पच्या मुळमुळीत प्रतिक्रियेविषयी आणि कालच्या घूमजावासंबंधी आहे.

>>> किंवा पुतळा केवळ एका सोल्जर्चा होता पाडायला हरकत नाहि, असं म्हणु नका...
--- मी आतापर्यंत किमान तीन-चारवेळा वर लिहिलं आहे, की पुतळा पाडण्याचं समर्थन कुणीही केलेलं नाही. तेव्हा 'सारखं सारखं त्याच झाडावर' हा मोड आता आवरता घ्यावा.

तुला हे प्रश्न विचारायच्या अगोदर पूर्ण अ‍ॅनेलिसीस करायची गरज वाटली नाही ? >>> सिरीयसली? इथे प्रश्न विचारणे हा ही त्याच अ‍ॅनेलिसीस चाच भाग आहे. सगळे ज्ञान बाहेर मिळवून फक्त फायनल कॉमेण्ट इथे द्यावी असे काही आहे काय?

तुझी स्माइली पाहिली आहे. त्याच लाइट टोन मधेच हे विचारतोय.

Pages