Submitted by फारएण्ड on 4 August, 2017 - 10:51
ऐलान-ए-जंग या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा रिव्यू क्राउडसोर्सिंग सारखा लिहू. म्हणजे सर्वांना त्यात लिहीता येइल. गेल्या २-३ दिवसांत इतर बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.
इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिचरामि>>>
अतिचरामि>>>
तहलका बद्दल मला वाटतं श्रधाने की फारएंड्ने लिहिलंय इथे. बघावं लागेल.
हे घ्या तहलका ची लिंक..
हे घ्या तहलका ची लिंक..
अरे इथे तहलका पण आहे वाटते.
अरे इथे तहलका पण आहे वाटते. हे सगळे धागे एक नंबर स्ट्रेसबस्टर आहेत!!!
"भडक कपडायातील बाई व ग्लास ही
"भडक कपडायातील बाई व ग्लास ही रंगेलपणाची हद्द"हे मटार उसळ व केळ्याची शिकरण म्हणजे चैनीची परमावधी सारखं वाटलं.
फा अतिचरामि ही भयंकर उच्च
फा
अतिचरामि ही भयंकर उच्च दर्जाची कोटी आहे _/\_
निरीक्षणे पुढे चालू
१२) धर्मेंद्राचे वय - फ्लॅशबॅक सुरु होण्याआधी ठकुरायन-धर्मेंद्राचा संवाद चालू आहे. धर्मेंद्राला अचानक वडलांची आठवण येते आणि फ्लॅशबॅक सुरु व्हायला चान्स मिळतो आणि इथे माशी शिंकते. चित्रपटातला काळ ८० च्या दशकातला वाटतो. धर्मेंद्राचा आठवण येण्याचा डायलॉग - "याद हैं माँ जब देश आजाद हुआ था. कितने खुश थे हम लोग...." फ्लॅशबॅक मधला अर्जुन ठाकूर तरी ८-१० वर्षांचा वाटतो म्हणजे काय अर्जुन ठाकूर ५०+ आहे? (म्हणजे तसा तो आहेच) ठकुरायन फ्लॅशबॅकमध्ये तिशीची वाटते म्हणजे काय ती ७०+ आहे? (भय्या वो देखो ना जरा बजेट का. ऐसा कैसा देखो , फार मेकअप लगेगा उसके खरे वय में २० वर्ष अॅड करने को) छोटी जयाप्रदा ५-६ वर्षांची दिसते ती काय चित्रपटात ४५ ची आहे? (हे मात्र अर्जुन ठाकूरलाच ठाऊक)
१३) फ्लॅशबॅक - साधारण १५ मिनिटांचा फ्लॅशबॅक आहे. त्यातली जवळ जवळ २ मिनिटे फॅमिली साँगला आहेत. इथे आपल्याला सुहास जोशी (पुनीत इस्सार आणि जयाप्रदाची आई) दिसते आणि चाचा रामप्रसाद की बेटी गीता जयाप्रदा तसेच अर्जुन ठाकूरचा डाव असल्याचे स्पष्ट होते. (नो जोक्स, धर्मेंद्राचे वडील स्पेसिफिकली लहानपणीच्या त्या दोघांना एकत्र नाचायला लावतात). गाणे रामप्रसादच्या हवेलीत होते आणि ते तिथल्या सर्व लोकांना म्हणता येत असते. सुरुवातीच्या सीनमध्ये सीआरएफ त्या सगळ्यांना लाडू खाता खाता मारतात. थोडक्यात,
हे गाणे लोकांना माहित आहे
हे गाणे माहित आहे -> माहित असलेल्याच्या परिवारातील कोणीतरी स.अ. मुळे मरतो
सो बाय मोडस पोनन्स, स.अ. हा लाशे पुरवण्याच्या धंद्याला प्रचंड गंभीरतेने घेतो या वैश्विक सत्याची दिग्दर्शक सिद्धता देतो. ते काय चालायचंच, फ्लॅशबॅक पुढे नेऊयात.
डाकू दुर्जन नारायण (स.अ.) च्या आतंकपासून गाववाल्यांच्या रक्षणासाठी धरम-पिता शंकर ठाकूर (सुधीर पांडे) ने सरकारला अर्जी देऊन काही हत्यारे मागवलेली असतात (भई आजादी का यही तो आनंद है - शंकर ठाकूर). त्याला धोक्याने स.अ. एकेठिकाणी परिवारासहित (बायको, दोन मुलगे) बोलावून घेतो. इथे स.अ.च्या भूमिकेतील गहराई दिसून येते. प्रथम तो इंट्रोमध्ये अफलातून व्हरायटी देतो - नाग, काऽऽला नाग (इथे सूर बदलला आहे रसिकांनी लक्षात घ्यावे. आधीची वेळ सकाळची होती, या वेळी रात्र असल्याने सूर बदलून स.अ. ने रागदारीची समज दाखवली आहे) ... सारे गांव को डस लेता (दर दर वेळी काय देश) इ. इ. काला नागचा एक एक माणूस बहुधा सौ सौ आदमीओं के बराबर असावा. हाताच्या बोटांवर मोजता येणारे हे लोक दुनळी बंदूकीच्या जोरावर संपूर्ण गावाला डसायला बसलेले असतात. स.अ. ची अत्यंत माफक अपेक्षा असते - सरकारने पाठवलेल्या बंदूका व काडतुसे त्याला द्यावी. पण शंकर ठाकूर त्याला नकार देतो
१३.१) तेलही गेले तूपही गेले रक्षक - शंकर ठाकूर अत्यंत युसलेस रक्षक दाखवला आहे. त्याच्या नकारावर स.अ. मडक्यावर बॅलन्स केलेल्या एका गावकर्याच्या खालचे मडके फोडतो आणि त्याला फास बसू नये म्हणून शंकर ठाकूर मडक्याची जागा घेतो. मग फॅन्सी डायलॉग मारून स.अ. अर्जुनच्या मोठा भावाला, बलरामला (ओरिजिनल स्क्रिप्टमध्ये धर्मेंद्राचे नाव कृष्णा होते काय?) गोळी घालतो. याने बापाचे हृदय हेलावते, काळ वेळाच्या पलीकडे जाऊन आपल्याला लाश आधीच हिंदकळताना दिसते आणि मग शंकर ठाकूर गावकर्याला मरायला सोडून आपल्या मुलाकडे धाव घेतो.
१३.२) चांदी का जूता - स.अ. दुसर्या दिवशी हत्यार घेऊन यायला सांगतो आणि ठकुरायन-अर्जुनला घेऊन निघून जातो. शंकर ठाकूर मग इन्स्पेक्टर डांडू (अजित वच्छानी, याचे नाव नंतर कळते) ला जाऊन यही मौका हैं छाप डायलॉग मारतो. दुसर्या दिवशी स.अ. चे दर्शन घडते आणि त्याची वेडे वाकडे तोंड करण्याची स्टाईल डोळे भरून बघता येते. शंकर त्याला मोठ्या जोशात सांगतो कि पोलिसने तुम्हे घेर लिया है. यावर स.अ. च्या प्रॉम्प्टने डांडू दारू पित पुढे येतो. स.अ. याची किंमत स.अ. चा एक चांदी का जूता असल्याचे सांगतो. आपण मोठ्या उत्सुकतेने चांदी का जूता बघायला मिळेल म्हणून पुढचा सीन बघतो. पण चांदी का जूता काही दिसत नाही.
१३.३) खेळाडू काला नाग - इथून पुढचा बहुतांश सिनेमा काला नागचे खेळ आहेत. शंकर ठाकूर थोडी बाँबफेक करतो पण स.अ. त्याला खूप सहजतेने मारतो (अनदर डे अॅट द ऑफिस फॉर काला नाग, व्हॉट अ प्लेअर). ठकुरायन माँ कसम खाते कि अर्जुन को वो अर्जुन बनाऊंगी जिसका अपना न्याय होगा (अन्यायनिवारणाच्या स्टार्टअपची बीजे). इथे स.अ.च्या आतला मराठी माणूस जागा होतो व तो तिला देशभक्त पती की देशभक्तीण पत्नी असे संबोधतो. काला नागला स्टार्टअप वाल्यांचे दु:ख समजत असल्याने तो तिला काही करणार नसल्याचे सांगतो. त्याला फक्त खेळण्यात रस असतो (मैं तो सिर्फ खेलूंगा - काला नाग). या खेळांतर्गत तो धर्मेंद्रावर स्वतःची मोहर लावतो. त्रिशूळाचे गंध लावणार्या स.अ.ची मोहर मात्र स्वस्तिकाकृति असते. ते ही मोहरेवरचे सुलटे असते म्हणजे लागणारी मोहर उलटे स्वस्तिक, सटल संदेश! ठकुरायन हे बरं केलं, आता त्याला कायमची आठवण मिळाली इ. इ. म्हणते आणि स.अ. च्या डोळ्यात शब्दशः धूळ फेकून पळ काढते. फ्लॅशबॅक संपला.
खेळाडू काला नाग....
खेळाडू काला नाग....
पयस ग्रेट!
<<<<रामप्रसाद की बेटी गीता जयाप्रदा तसेच अर्जुन ठाकूरचा डाव असल्याचे स्पष्ट होते.>> डाव
अनदर डे अॅट द ऑफिस फॉर काला नाग, व्हॉट अ प्लेअर>
त्रिशूळाचे गंध लावणार्या स.अ.ची मोहर मात्र स्वस्तिकाकृति असते. ते ही मोहरेवरचे सुलटे असते म्हणजे लागणारी मोहर उलटे स्वस्तिक, सटल संदेश! >>>>
फारच जबरदस्त. हा बाफ उघडून मी
फारच जबरदस्त. हा बाफ उघडून मी साइडला पिक्चर बघत आहे. पायस, अमेय स्पेशल कौतूक अजून लिहित जावा. श्र फारेंड आपले राहुल सचिन आहेतच.
एरव्ही हा पिक्चर मी दहा
एरव्ही हा पिक्चर मी दहा मिनिटीहे पाहिला नसता, पण हा बाफ वचून यु ट्यूबवर फ्रेम टू फ्रेम बारकाइने पाहिला. आणि एन्जॉय केला .. लैच धमाल. नवीन येणार्या फालतू चित्रपटाचे ' रसग्रहण ' रसप ऐवजी या लोकान्नी लिहिले तर ते धो धो चालतील
कमाल सहनशक्ती आहे तुम्हा
कमाल सहनशक्ती आहे तुम्हा लोकांची असे पिक्चर बघून फ्रेम बाय फ्रेम वर्णन लिहिताय ।।। जबरदस्त करमणूक होतेय।। लिखते रहो।।।
ते ही मोहरेवरचे सुलटे असते
ते ही मोहरेवरचे सुलटे असते म्हणजे लागणारी मोहर उलटे स्वस्तिक, सटल संदेश! >>>
पायस. वीर जितेंद्र
पायस. वीर जितेंद्र
दारासिंग चा रोल म्हणजे त्याला लग्नात "नातिचरामि" म्हणायला सांगितले, पण उसे ना सुनने की आदत नसल्याने नुसतेच "अतिचरामि" ऐकून त्यावर अंमल करतोय तो पिक्चरभर.>>
निरीक्षणे पुढे चालू
निरीक्षणे पुढे चालू
१४) अभूतपूर्व मेला - अमेयने या मेळ्याचा उल्लेख केला आहे. तर होतं असं कि फ्लॅशबॅकमध्ये स.अ. ने खिलाडूवृत्ती दाखवल्याने अर्जुन ठाकूरच्या मनातही खेळण्याची इच्छा निर्माण होते. आता इनिंग्ज ब्रेकमध्ये काहीतरी टाईमपास हवा म्हणून हा मेला घुसडला आहे जो दर बारा वर्षांनी येतो. हे बारा वर्षांचे सांगताना मात्र विजू खोटे शतका सहस्त्रकातून एकदा येत असल्याचा आव आणतो. तो अजित वच्छानीकडे फिल्डिंग लावायला मदत मागतो पण आता कमिशनर झालेला अजित डांडू (फोनवर बोलताना स्क्रीनच्या डाव्या कोपर्यात पाटी मि. अजित डांडू, पोलिस (हे एवढंच नॉन बोल्ड फाँटमध्ये) डॉट कमिशनर) त्याच्यावर विश्वास ठेवत नसल्याने तो स्वतः यायचा निर्णय घेतो. तिथे सर्वजण वेषांतर करून जातात. दाढी लावल्याने किंवा जोकरचे कपडे घातल्याने बेमालूम वेषांतर करता येते या त्रिकालाबाधित सत्याची पुन्हा एकदा सिद्धता मिळते. बाकी या लोकांच्या नृत्यावर मी पामर काय बोलणार? जमुनाला मेळ्यात गाणे सादर करायची जबाबदारी दिली आहे आणि ती पर्म्युटेशन बेस्ड गाणे सादर करते - मेरा नाम हाय बदनाम हो गया - बदनाम हाय मेरा नाम हो गया इ.
१४.१) किंमत(जान) > किंमत(फर्ज) ? - अखेर यायचा तो अर्जुन ठाकूर येतो आणि एका सेकंदात कमिशनरला ओळखतो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर कमिशनरचा ओरिजिनल प्लॅन फेल झालेला बघून विक्रम गोखले पुढे येतो आणि अर्जुनवर पिस्तुल रोखतो. अर्जुन त्याला म्हणतो कि मेरे साथियों के निशानेपर कमिशनर डांडू का सर है. डांडू घाबरतो. त्यावर विक्रम गोखले त्याला मिलियन डॉलर क्वेश्चन विचारतो - इज किंमत(जान) > किंमत(फर्ज)? यावर डांडू त्याच्या हातातले पिस्तुल काढून घेऊन अर्जुनच्या ताब्यात देतो.
१४.२) सेट डिझाईनरला जेव्हा जाग येते - ती माँ की मूर्ती पटकन ओळखू येत नाही पण खालचा जबडा, बारीक डोळे, काला नाग (खरा, स.अ. नव्हे) लिंक लागून आपल्याला लक्षात येते कि सेट डिझाईनरची झोप झाली असून त्याने मंदिर स्वच्छ केले आहे आणि मूर्तीला नव्याने रंगही देण्यात आला आहे. थोडक्यात दर बारा वर्षांनी सेट डिझाईनर उठत असल्याने मेला बारा वर्षांतून एकदा येतो.
१४.३) पुनीत इस्सारचे अक्षर - अखेर त्या रहस्याचा उलगडा होतो कि का पुनीत इस्सारला याच मंदिरात जावसं वाटलं? अखेर काली माता ती टेप धर्मेंद्राच्या हवाली करते. धर्मेंद्र पुनीत इस्सारच्या वाळलेल्या रक्तातून बोट फिरवत ते लीलया वाचतो (अजून चष्मा नाही लागला, आहात कुठे?) - चंदनपुर, सीआरएफ. टेप पाहिल्यावर ठकुरायन किंचाळून सांगते कि दुर्जन नारायणच सीआरएफचा हेड आहे. राजस्थानात एकच चंदनपुर असल्याने धर्मेंद्र लगेच बसची तिकिटे काढतो. त्याचा प्रवास कसा होतो आणि ऑलमोस्ट बस कशी चुकते यावर अमेयची टिप्पणी वाचावी. असो तर दारा सिंगला मागे सोडून, फॅमिली साँग म्हणत धर्मेंद्र चंदनपुरात म्हणजे काला नागच्या अड्ड्याच्या गावात दाखल होतो.
१५) चंदनपुरातील साहस: फॅमिली साँगचा अखेर सदुपयोग
चंदनपुरमध्ये बरीच अॅक्शन आहे पण त्याआधी काही महत्त्वाची कामे दिग्दर्शक उरकतो.
१५.१) जित्याची खोड... - चंदनपुरात पहिला स्टॉप आहे हनिमून मसाज पार्लर (प्रोप्रायटर राजेंद्रनाथ उर्फ रेड कलर सुपरमॅन). आचरट संवादांची देवाणघेवाण होते आणि राजेंद्रनाथ त्याच्या 'मछलियां' दाखवतो. इथे सुधीरने मिळालेल्या अभिनयाच्या संधीचे सोने केले आहे. आता काहीही करा तरी आतला व्हिलनचा आत्मा अमर आहे. गुड्डी मारुतीचा छोटाच पार्ट आहे पण तेवढ्यात दिग्दर्शकाने भविष्य पाहिले आहे. हसीना मान जाएगी मध्ये करिष्मा कपूर फुटबॉल वापरून बास्केटबॉल खेळते ते कन्फ्युजन १० वर्षे आधी बघायला मिळते. सीआरएफची चौकशी केल्यावर राजेंद्रनाथ सीआरएफच्या अन्यायांचे डोळे पाणावणारे वर्णन दाखवतो. वर्णनात बॉब क्रिस्टोला दाखवून डिरेक्टर पॅक्स अॅन इमोशनल पंच! मग राजेंद्रनाथ सीआरएफच्या माहितीसाठी ब्लू लाईट (का नाईट?) क्लब मध्ये जाऊन 'उस हसीनाला' जाऊन भेटण्याचा सल्ला देतो.
१५.२) वो हसीना - ब्लू लाईट क्लबमध्ये लाईट्स मात्र लाल-पिवळ्याच असतात. तिथे अलका याज्ञिकच्या आवाजात 'मेरा नाम रीमा है" म्हणत जयाप्रदा नाचत असते. काहीतरी ब्लू असावे म्हणून धर्मेंद्र व जयाप्रदा निळ्याची भयानक शेड घालून गाणं पूर्ण करतात आणि जयाप्रदाला ट्रंपेटवर फॅमिली साँग वाजवायची हुक्की येते. बचपन की यादे ताजा होतात - इथे धर्मेंद्राचे एक्सप्रेशन बघण्यासारखे आहेत. ते दोघे मग फॅमिली साँगवर बर्फात रोमान्स करतात आणि फॅमिली साँगचे कार्य सिद्धीस जाते. महाभारताप्रमाणेच इथेही गीता अर्जुनाला रस्ता दाखवणार असे ठरते आणि ती त्यांना सीआरएफच्या अड्ड्याकडे घेऊन जायचे मान्य करते.
जित्याची खोड वाला पॉईंट...
जित्याची खोड वाला पॉईंट...
(No subject)
महाभारताप्रमाणेच इथेही गीता
महाभारताप्रमाणेच इथेही गीता अर्जुनाला रस्ता दाखवणार असे ठरते आणि ती त्यांना सीआरएफच्या अड्ड्याकडे घेऊन जायचे मान्य करते.
>>>>>
दंडवत स्वीकारावा पायसप्रभू!
____________/\_____________
जबरदस्त लिहिलंय, नाऊ द ब्रास
जबरदस्त लिहिलंय, नाऊ द ब्रास टॅक्स स्टार्ट. यापुढे एकेक प्रसंग चढत्या भाजणीचा असणारे. जित्याची खोड वाचून जाम हसलो. ज्याप्रदाला वळीकल्यावर आतून एक्सप्रेशन काढत धर्मु,"गीता..", असे हंबरतो ते कधी उदास असलात तर जरूर बघा. ऑल उदासी विल मेल्ट अवे.
पायस हे ही जबरी आहे
पायस हे ही जबरी आहे
व्हिलनचा आत्मा, पर्म्युटेशन बेस्ड गाणे, राजस्थानात एकच चंदनपुर असल्याने - धमाल. अर्जुनाला गीता रस्ता दाखवते हे महा-परफेक्ट निरीक्षण. इथेच हे जाणवते की आपण पिक्चर फार वरवर पाहतो. नीट पाहिले तर असले इस्टर एग मेसेजेस आपोआप सापडतील.
ज्याप्रदाला वळीकल्यावर आतून
ज्याप्रदाला वळीकल्यावर आतून एक्सप्रेशन काढत धर्मु,"गीता..", असे हंबरतो ते कधी उदास असलात तर जरूर बघा. ऑल उदासी विल मेल्ट अवे. >>>
मी आता धर्मेंद्रच्या आईचे
मी आता धर्मेंद्रच्या आईचे कापलेले हात (तळहात टु बी प्रिसाइज) घेऊन स.अ. जो काही अचाटपण करतो त्याच्या प्रतिक्षेत आहे. इफ आय अॅम नॉट राँग त्याच शॉटच्या आसपास धर्मेंद्र आईच्या हातचे खाणे म्हणजे नुसते तिने बन्वलले नाही तर स्वतःच्या हातांनी खाऊ घातलेले वगैरे फ्लॅशबॅकमध्ये रम्य ते बालपण मोडात रमतो (बालपणात पण धर्मेंद्र पन्नाशीचाच बाल असतो)
ज्याप्रदाला वळीकल्यावर आतून
ज्याप्रदाला वळीकल्यावर आतून एक्सप्रेशन काढत धर्मु,"गीता..", असे हंबरतो ते कधी उदास असलात तर जरूर बघा. ऑल उदासी विल मेल्ट अवे.<<<<<<
अमेय, तुम्ही नियमित अ नि अ परीक्षण का लिहीत नाही?
धर्मेंद्रच्या आईचे कापलेले
धर्मेंद्रच्या आईचे कापलेले हात (तळहात टु बी प्रिसाइज) घेऊन स.अ. जो काही अचाटपण करतो त्याच्या प्रतिक्षेत आहे. >> आणि त्यानंतर जे काही चिडवतो - टॉटी, ए टॉटी
ज्याप्रदाला वळीकल्यावर आतून एक्सप्रेशन काढत धर्मु,"गीता..", असे हंबरतो ते कधी उदास असलात तर जरूर बघा. ऑल उदासी विल मेल्ट अवे >>
अमेय, तुम्ही नियमित अ नि अ परीक्षण का लिहीत नाही? >> +१
पायस _/\_
पायस _/\_
दंगा!! पायस. कमाल.
दंगा!! पायस. कमाल.
हंबरणे
बालपणात पण धर्मेंद्र पन्नाशीचाच बाल असतो>>
ज्याप्रदाला वळीकल्यावर आतून
ज्याप्रदाला वळीकल्यावर आतून एक्सप्रेशन काढत धर्मु,"गीता..", असे हंबरतो ते कधी उदास असलात तर जरूर बघा. ऑल उदासी विल मेल्ट अवे.
कितव्या मिंटाला हाय हे ?
विकु सो स्पेसिफिक. कसली उदासी
विकु सो स्पेसिफिक. कसली उदासी मेल्ट करायचा पिलान आहे?

खतरनाक संयुक्त परिक्षण. हे
खतरनाक संयुक्त परिक्षण. हे वाचावे का ते. ह्याला दाद द्यावी का त्याला.
(तळटीपः चित्रपट पहायला मात्र 'पास' )
वळीकल्यावर हे खास सांगली
वळीकल्यावर हे खास सांगली कोहापुरकडचे उद्गार
{{{ गुड्डी मारुतीचा छोटाच
{{{ गुड्डी मारुतीचा छोटाच पार्ट आहे }}}
कोणता?
पायस, मॅनेजमेण्ट चा सर्वात
पायस, मॅनेजमेण्ट चा सर्वात मोठा लेसन असलेला डॉयलॉग विसरला?
"सिर्फ तालियाँ बजानेसे काम नहीं होगा, काम करनेसे काम होगा"
या भाषणातले आवाजाचे चढउतार, समोरच्या आड्यन्स ला जिंकायला वापरलेली वाक्ये थेट गॉर्डन गेको ला फिके पाडतील अशी आहेत. फक्त शेवटी एक "Crime, for the lack of better word, is good" असे तो न म्हंटल्याने एक भाषण अजरामर व्हायचे राहून गेले.
Pages