Submitted by फारएण्ड on 4 August, 2017 - 10:51
ऐलान-ए-जंग या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा रिव्यू क्राउडसोर्सिंग सारखा लिहू. म्हणजे सर्वांना त्यात लिहीता येइल. गेल्या २-३ दिवसांत इतर बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.
इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिरीयसली!
सिरीयसली!
मोटिव्हलेस, बेसलेस, सेन्सलेस आणि सर्वात महत्त्वाची अन्यायलेस >>>
पायस, तुला त्या लोळणाऱ्या
पायस, तुला त्या लोळणाऱ्या सेठचं खरं नाव माहीत आहे, यासाठी तुला दंडवत! >>> +१ सिरिअसली
हो ना. तरीही ते तक्रार करतात की याच्याकडे फारसे काही मिळाले नाही. डॉन सारखी डायरी अपेक्षित होती की काय कोणास ठाउक, इतर सीबीआय वाल्यांची. >>> अरे असं काय करतोस, फा! पुनीत इस्सर फ्लॅश उडवून जातो नाही का? मग कॅसेट शोधत असतील ते
खरंतर त्यांना हे कळलेलं तरी असतं का की इस्सरकाका व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असतात? फोटो काढत असतात असं वाटू शकत नाही का? पण असो! 
अरे, छोट्या छोट्या gems चे
अरे, छोट्या छोट्या gems चे (कॅडबरीवाल्या नोहे!) गोदाम आहे एकेक सीन. लोळणाऱ्या सेठला पायऱ्यांवरून गडबडा लोळत पाठवल्यावर तो ज्या ग्रुपात येऊन पडतो ते सगळे विदेशी जासुस असतात. मग ते कसे बहरूपीए आहेत ते सांगताना धरमपाजी पहिल्या माणसाची खोटी दाढी उपटून काढतात. मग पुढे येऊन दुसऱ्याच्या केसांना हात घालतात तेव्हा आपण 'आता याचा विग उपटणार' या अपेक्षेने पाहतो पण केसांसकट अख्खा माणूस हलतो तेव्हा आपल्याला कळतं की विग नाहीये. कदाचित घाईत लावायचा राहिला असेल पण पाजी आपल्या अभिनयसामर्थ्याने सीन पुढे चालूच ठेवतात.
फारच मस्त! केव्हाही वाचावे व
फारच मस्त! केव्हाही वाचावे व बिघडलेला मूड दुरुस्त करुन घ्यावा.
मला सुद्धा ते हिंदी सिनेमातली रंगरलियांची परमावधी म्हणजे एका हातात दारुचा ग्लास व बाजूला भड क कपड्यांतील दोन तीन बायका व लोळणारा सेठ..... हे समीकरण अगदीच पटले आहे!!
ह्या धाग्यासाठी फारेंएडाचे
ह्या धाग्यासाठी फारेंएडाचे आभार.
जबरदस्त एन्टरटेन्मेन्ट आहे. एकदम स्ट्रेसबस्टर
फारएंड, श्रधा, अमेय, पायस धमाल आहात तुम्ही लोक. लिहा अजुन.
निरीक्षणे पुढे चालू
निरीक्षणे पुढे चालू
८) धर्मेंद्राची वेशभूषा - अर्जुन ठाकूर भलेही ठाकूरों का ठाकूर असला तरी तो ठाकूरांसारखा दिसत नाही. याने दोन गोष्टी साध्य होतात - १) धर्मेंद्राचे वेगळेपण ठसते, २) फाने नमूद केलेल्या राजकुमारच्या कॉपीराईटपासून बचाव होतो (तसला ठाकूर मी नव्हेच!) धर्मेंद्रचा ड्रेस टेक्सास किंवा तत्सम राज्यामधून आला असावा. तिथल्या रेंजर्सप्रमाणेच धर्मेंद्रही पोलिस नसूनही काम पोलिसाचे करताना दाखवला आहे. तसेच रेंजर्सप्रमाणेच तो दोन बेल्ट घालतो - एक गनबेल्ट जो कधीही घसरेल अशी भीति वाटत राहते आणि दुसरा साधा बेल्ट जो "याच्यापेक्षा जास्त पोट मी नाही आवळू शकत" अशी तक्रार करून थकल्यासारखा वाटतो.
बाकी तो लोळणारा सेठ कहर आहे. संधी मिळेल तिथे, अगदी धर्मेंद्राने आपटल्यावर सुद्धा तो कल्पनाशक्तीच्या जोरावर बरोब्बर लोळत राहतो.
९) गाणे - दोस्तोंसे दोस्ती, दुश्मनोंसे दुश्मनी
अशा रिव्हेंज मूव्हीज मध्ये फॅमिलीचे स्वतःचे गाणे असणे खूप फायदेशीर असते. हरवलेली भावंडे, लहानपणीचा(ची) मित्र(मैत्रीण), निरुपा रॉय (अगर तिची सबस्टिट्यूट) हे सर्व शोधायला अशी गाणी उपयोगी पडतात. चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखले असेलच कि इथे धर्मेंद्रला भाऊ-बहीण दिसत नसल्याने आणि ठकुरायन माँ शब्दशः वडाच्या पारावर ठिय्या देऊन बसल्याने या गाण्याचा उपयोग अर्थातच धरम-जयाप्रदा मिलनासाठी होणार आहे. बॉलिवूडवाल्यांचा आवडत्या शब्दालंकारापैकी एक आहे prolixity - ऑब्व्हियस मुद्दा मांडताना गरजेपेक्षा अधिक पाल्हाळ लावणे! धर्मेंद्राचे ब्रीदवाक्य स्पष्ट करणारे हे गाणे याचे उत्तम उदाहरण आहे; दोस्तोंसे दुश्मनी दुश्मनोंसे दोस्ती करणारा कोणी वीर माझ्यातरी पाहण्यात तरी आलेला नाही (मागून धर्मेंद्र कुजबुजतो - वीर जितेंद्र, मी धरम!)
हे गाणे सिनेमाभर सहन करणे भाग आहे, याला इलाज नाही.
१०) धर्मेंद्राचे साथीदार - मुख्य लोक ५- १) दारा सिंग - हा रामायणातला अशोकवनाची नासधूस करण्याचा सीन अर्ध्यात सोडून आल्यासारखा वाटतो. या रोलची जाहिरात "सतत चरणारा माणूस पाहिजे" म्हणून केली असावी. साधारण याच्या चेहर्याकडे बघून अभ्यासू जन सांगू शकतात कि हा शेवटी मरणार! २) अन्नू कपूर - उपरोक्त गाण्यावर ब्रेक डान्स करत एका पातेल्यात न जाणे काय ढवळणारा इसम, ३) लिलिपुट - उपरोक्त गाण्यावर बाँगो वाजवणारा इसम, ४) गुरबचन सिंग आणि सुधीर - ऑल्सो देअर्स. दोघेही एकाएकी स्वभावाने चांगल्या माणसाची भूमिका मिळाल्याने बावचळलेले वाटतात. आणखी पण बरीच टाळकी या टोळक्यात दिसत असल्याने एकंदरीत अर्जुन ठाकूराचा अन्यायनिवारणाचा धंदा जोरात असावा. ओह, आणि सिनेमाभर जय भद्रकाली, जय काली माँ इ. इ. म्हणणारा धर्मेंद्र या गाण्यात एकलिंगजीची पूजा करताना दाखवला आहे.
अर्थातच कस्टमर एंडला यापैकी कोणालाही बसवून चालणार नसल्याने तिथे ठकुरायन माँला बसवले आहे (वाचा: ठकुरायन माँ का दरबार). साधारण धर्मेंद्राची धाकटी बहीण शोभणारी आणि अर्जुन ठाकूरला "बेटे, ये धरती तेरी माँ" आहे असं सांगणारी सुषमा सेठ कोणत्या तरी अनाकलनीय करारानुसार करारी ठकुरायन माँ दाखवली आहे.
११) अन्यायसाठी अन्याय व त्याचे निवारण - अन्यायासाठी अन्याय या तत्त्वांतर्गत होत असलेल्या काही अन्यायांचे निवारण करताना धर्मेंद्र दाखवला आहे.
अ) काही बायकांची छेड काढली जात असताना हे लोक धुळीतून उपटतात व त्यांचा बचाव करतात. मग मागून धर्मेंद्र येऊन त्यापैकी एकीला मिठीत घेतो आणि डोंबार्याचा खेळ बघायला बसल्यासारखे बसलेले लोक टाळ्या वाजवतात.
ब) एका बारमध्ये कलेचे भोक्ते असलेले हे सर्व सोनेरी झगमगीत कपडे परिधान केलेल्या नर्तिकेचे नृत्य बघायला जातात. इतका वेळ स.अ. ची एफिशियंट बिझिनेस मॅनेजमेंट बघितलेला प्रेक्षक या लोकांना (अ) कामगिरीचे पैसे उपरोक्त ललनेवर उधळताना बघून क्षणभर हळहळतो. पण हा सर्व कोणा चोराला पकडण्याचा प्लॅन असल्याचे पाहून ठकुरायन माँ देखील मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये पारंगत असल्याची खात्री पटते. हे सर्व होईपर्यंत धरम बाँगोवर हात साफ करतो तर दारा सिंग चिकनवर.
क) इथे आपल्याला फुल स्टॅक बघायला मिळतो. प्रथम कस्टमर (शोलेमध्ये ये गुडबाय क्या होता है विचारणारा इसम) येऊन बग रिपोर्ट करतो (चौरासिया सेठ अर्थात टिकू तलसानिया). सेल्स मॅनेजर ठकुरायन माँ प्रॉब्लेम आपल्या बिझिनेस अॅनालिस्ट कम टेक्निकल कन्सल्टंट नारायणकडे रिडायरेक्ट करते. नारायण टेस्टिंग डिपार्टमेंटचा अहवाल ऐकून (इतर रडणारे लोक) कामचुकार इंजिनिअरला (पोलिस इन्स्पेक्टर) विजू खोटेला नोटिस देतो. खोटे नोटिस धुडकावून लावण्याचा मूर्खपणा करतो. मग सिस्टिम्स अॅनालिस्ट धरम पाजी येऊन बग एक्स्टर्मिनेट करतात. (चौरासियाची तिजोरी साफ करतात). इथेच तो जागेपणी गिअर बदलत घोरण्याचा अजरामर सीन आहे. तसेच दगडी जिन्यावर पाणी फेकून पोलिसांना घसरून पाडताना आपण श्रीयुत सुधीर यांना बघू शकतो. विक्रम गोखलेंना इन्स्पेक्टर विजय म्हणून बघायला मिळते. यांच्या पॉज घेऊन गोळी झाडण्याच्या सवयीमुळे धरमपाजी वाचतात आणि आपल्याला उर्वरित सिनेमा बघायला मिळतो.
सगळेच
सगळेच
धर्मेंद्रची बस ऑलमोस्ट चुकवतो
श्रद्धा, विग
वीर जितेंद्र, मी धरम! >>>
वीर जितेंद्र, मी धरम! >>>
तो दोन बेल्ट घालतो - एक
तो दोन बेल्ट घालतो - एक गनबेल्ट जो कधीही घसरेल अशी भीति वाटत राहते आणि दुसरा साधा बेल्ट जो "याच्यापेक्षा जास्त पोट मी नाही आवळू शकत"<<<<<<
अरे पायस....
मी कुतूहल म्हणून विकिपीडिया पाहिला तेव्हा कळलं की सुषमाँ सेठ 1 वर्षाने लहान आहे धर्मेंद्रपेक्षा.
पायस.....भारीच.
पायस.....भारीच.
अन्नू कपूर निर्मात्याच्या वशील्याने कास्ट झाला असावा कारण संवाद म्हणावा तर काही नाही पण बहुतांश सीन्समध्ये धरम पाजींच्या दणकट मांडीला मांडी लावून, पावडर तीट लावून फ्रेममध्ये मात्र आहे. शिवाय सीनमध्ये बॉम्ब फुटणे, आग, धूर इत्यादी काही असो, याचा मेकप नेहमी टिपटॉप असतो.
पायस
पायस
अन्यायासाठी अन्याय या
अन्यायासाठी अन्याय या तत्त्वांतर्गत होत असलेल्या काही अन्यायांचे निवारण करताना धर्मेंद्र दाखवला आहे.>>
पायस....
पायस....
रिव्हेंज मूव्हीज मध्ये फॅमिलीचे स्वतःचे गाणे.... ही कंसेप्ट खूपच आवडली आहे...हसता हसता पुरेवाट झाली!
तुम्ही सगळे भयंकर आहात
तुम्ही सगळे भयंकर आहात
पायस, अमेय, श्र, फा कहर चालू
पायस, अमेय, श्र, फा कहर चालू आहे इथे. नागाचा अभिनय, धर्मेंद्रची बस, लाडवांचे गणित, लोळणार सेठ, दोस्तोंसे दुश्मनी आईगं!
बहुतेक राजन हस्कर आहे.
बहुतेक राजन हस्कर आहे.
>>
राजन हक्सर...
पायस
पायस

मोटिव्हलेस, बेसलेस, सेन्सलेस आणि सर्वात महत्त्वाची अन्यायलेस >>
अन्यायासाठी अन्याय या
अन्यायासाठी अन्याय या तत्त्वांतर्गत होत असलेल्या काही अन्यायांचे निवारण करताना धर्मेंद्र दाखवला आहे. >>
सगळी पोस्टच धमाल आहे पायस. रवंथ करत वाचल्याशिवाय सगळे पंचेस लक्षात येत नाहीत. ऑल्सो देअर्स काय, रोल ची "सतत चरत राहणारा माणूस" जाहिरात काय, ते अचानक चांगला रोल वाले व्हिलन्स काय, दोन बेल्ट्स काय, सगळेच महान.
दारासिंग चा रोल म्हणजे त्याला लग्नात "नातिचरामि" म्हणायला सांगितले, पण उसे ना सुनने की आदत नसल्याने नुसतेच "अतिचरामि" ऐकून त्यावर अंमल करतोय तो पिक्चरभर.
दारासिंग चा रोल म्हणजे त्याला
दारासिंग चा रोल म्हणजे त्याला लग्नात "नातिचरामि" म्हणायला सांगितले, पण उसे ना सुनने की आदत नसल्याने नुसतेच "अतिचरामि" ऐकून त्यावर अंमल करतोय तो पिक्चरभर.<<<<<<
_/\_
हे केवळ महान आहे...
पायस, फा >>अतिचरामि
पायस, फा
>>अतिचरामि
की आदत नसल्याने नुसतेच
की आदत नसल्याने नुसतेच "अतिचरामि" ऐकून त्यावर अंमल करतोय तो पिक्चरभर.<<<<< बेस्ट
अतिचरामि चा उगम आणी
अतिचरामि चा उगम आणी व्युत्पत्ती दोन्ही महान आहेत फा!
पायस _/\_
पायस _/\_
अतिचरामि >>>
खरंच आहे. पहिल्या गाण्यातच त्याला ३-४ वेळा बकासूरासारखं खाताना दाखवलंय (अजून पुढच्या पिक्चर पहायचाय
). गाण्यात बाकी सगळे काहीही करत असोत, दारासिंग मात्र फक्त आणि फक्त हादडतानाच दिसतो.
नेक्स्ट सिनेमा देऊन ठेवतो
नेक्स्ट सिनेमा देऊन ठेवतो परिक्षणासाठी. झलझला.
https://youtu.be/J_a1kPZsARw?t=8442
२ तास २० मिनिटावर जाउन पहा, मकाण्णाचे सोने इन हिण्दी
टवणे सर. नका हो इतका छळ करू!
टवणे सर. नका हो इतका छळ करू!
अरे काय एकेक धमाल लिहितायेत
अरे काय एकेक धमाल लिहितायेत
मला असा काही पिक्चर आहे, हे पण माहीती नाहीये. त्यामुळे मी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष केलं होतं. इथे तर धमाल चालू आहे एकदम. भारीच.
फारएण्ड,
फारएण्ड,

ना सुनने की आदत - हा भारी होता !!
धर्मेंद्रच्या तहलकाचं परीक्षण
धर्मेंद्रच्या तहलकाचं परीक्षण कुठे वाचायला मिळेल का? त्यात रोल्सची बरीच उलटापालट आहे. शम्मी कपूर क्रूर खलनायक आहे तर कधी काळी गोंडस दिसणारी पल्लवी जोशी अंडर कव्हर खलनायिका आहे आणि सरप्राईजिंगली गुलशन ग्रोव्हर पॉझिटिव्ह दाखवला आहे. अजुनही बर्याच गमतीजमती आहेत (विशेषतः नसिरच्या - ते जुले जुले म्हणणं इत्यादी).
तहलका चं परिक्षण इथेच आहे.
तहलका चं परिक्षण इथेच आहे.
जरा शोधावं लागेल.
तहालका म्हणजे आपले जनरल डाँग
तहालका म्हणजे आपले जनरल डाँग
Pages