Submitted by फारएण्ड on 4 August, 2017 - 10:51
ऐलान-ए-जंग या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा रिव्यू क्राउडसोर्सिंग सारखा लिहू. म्हणजे सर्वांना त्यात लिहीता येइल. गेल्या २-३ दिवसांत इतर बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.
इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधारण कथा अशी दिसते: सदाशिव
साधारण कथा अशी दिसते: सदाशिव अमरापूरकर (जनरल डीजेएन, उर्फ "नाग हूँ मै नाग, काला नाग") हा कोणत्यातरी गुन्हेगारी साम्राज्याचा मुख्य आहे. त्याने पूर्वी धरम च्या कुटुंबियांची हत्या केली आहे. त्याचा बदला धरमची आई (ठुकरायन) घेणार असते. त्याकरता ती धरम ला तयार करते (अर्जुन ठाकूर). पुनीत इस्सार हा सीबीआय ऑफिसर नाग च्या मागावर असताना मारला जातो. इतपत सुरूवात पाहिली आहे. पुढे कोणकोण चित्रपटात येतात ते पाहू.
एका मोठ्या सिनेमा थिएटर सारख्या ठिकाणी कोब्रा रिबेलियन फोर्सची सभा भरणार असते. तेथे असंख्य बसगाड्या व कार्स मधे भरून लोक येतात. मग सभा सुरू होते. अनाउन्सर "भारतातील सर्व भागातून आलेल्या", पण का कोणास ठाउक फिरंगी दिसणार्या लोकांचे स्वागत करतो, व आपले मालक जनरल डीजेएन आता येत आहेत अशी घोषणा करतो. मग तीन चार बॉडीगार्ड्स येतात आणि स.अ. येतो. तो येणार याची घोषणा झालेली असते, तो कोण आहे यात काहीच गुपित नसते, तरीही तो येताना स्टेजवर अंधार केला जातो. मग "हॉ हॉ हॉ" अशी सुरूवात. मागे भारताच्या नकाशाचा फोटो काढताना चुकून धक्का लागल्याने वरती मंगोलियाचा नकाशा फोटोत आला व तो तसाच ठेवला आहे असे दिसते. स.अ. चा ड्रेस फॅन्सी ड्रेस/हॅलोवीन ला पायरेट व्हायचे होते पण दुकानात जे आयत्या वेळेला मिळेल ते वापरून जमवले आहे असा. गळ्यावर टोपीचे लेबल तसेच राहिले आहे असे काहीतरी डिझाइन दोन्ही बाजूला.
मग सिनेमा हॉल मधे जेथून प्रोजेक्शन होते तेथे एका खिडकी पुनीत इस्सार दिसतो. तो स.अ. च्या थेट समोर आहे. पण त्याला ते जाणवत नाही. तो भाषण सुरू करतो.
"पिछले सात सालोंसे वोह मुल्क हमे करोडों रूपये.." ई.ई. वोह मुल्क म्हणजे पाक असावा. पण अशा गुप्त सभेतही तो थेट नाव घ्यायचे टाळतो. बाकी प्लॅन मात्र पूर्णपणे सांगतो "तबाही" चा. म्हणजे कोणी रेकॉर्डिंग करत असेल तर ते सगळे कळले तरी चालेल पण पैसा कोणता देश देतो हे कळता कामा नये. मग मात्र पॉवर पॉवर असे तो ओरडतो. त्या पॉवर शब्दाचा तानसेन इफेक्ट होउन पुनीत इस्सारच्या हातातल्या कॅमेर्याचा लाइट जास्त पॉवरफुल होतो व त्याचे बिंग फुटते.
मग धावपळ, फायटिंग, चेस. त्यात देवकुमार त्याला दिसतो. त्याला आता वयोमानानुसार फारशा हालचाली जोरात करता येत नसल्याने बॅट्समन लोक वीक फिल्डर ला टार्गेट करतात तसा पुनीत त्यालाच धरून हाणामारी करतो. समोरच्यांच्या हातात बंदुका असताना केवळ मधले दार लावल्याने पळणारा माणूस निसटू शकतो हे अनेकदा सिद्ध झालेले लॉजिक इथेही वापरले आहे.
मात्र इथे सादरीकरणातील डेप्थ आपल्याला दिसते. हा चित्रपट इथपर्यंत निव्वळ करमणूकप्रधान वाटला तरी प्रत्यक्षात अनेक मराठी चित्रपटांच्या तोडीसतोड प्रतीकप्रधान आहे हे इथे लक्षात येइल. तेथून पुनीत इस्सार पळून जाताना त्याचा शर्ट अचानक नाहीसा होतो. His cover is blown! हेच तो शॉट सांगतो. मग ते रेकॉर्डिंग असलेली कॅसेट एका देवळात लपवून तो मरतो.
चित्रपटात सुरूवातीलाच मेल्याने चांगल्या व्यक्तीचा रोल त्याला होता हे नक्की होते. नंतर त्याची झडती घेतली जाउन त्यात त्याचे पाकीट, पैसे, आयकार्ड वगैरे सापडते. तरीही ते व्हिलन लोक निराशपणे "याच्याकडे काही मिळाले नाही. फक्त हे आय कार्ड मिळाले. त्यात त्याचे नाव व तो सीबीआयचा एजण्ट आहे वगैरे माहिती मिळाली" सांगतात. याव्यतिरिक्त त्यांना नक्की काय उपयोगी पडले असते कल्पना नाही.
इथे एक मॅण्डेटरी गाणे आल्याने ब्रेक घेतला आहे.
फा
फा
आता पहायला पाहिजे हा पण![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कॉलिंग श्र, टण्या व इतर गेले
कॉलिंग श्र, टण्या व इतर गेले दोन तीन दिवस याबद्दल लिहीणारे. ते इथेही टाका.
कॉलिंग श्र, टण्या व इतर गेले
कॉलिंग श्र, टण्या व इतर गेले दोन तीन दिवस याबद्दल लिहीणारे.
>>.
आयला म्हणजे आता ऐलाने जंग पुन्हा पाहिला पाहिजे
____/\____
____/\____
खरे तर या सिनेमावर फ्रेम बाय
खरे तर या सिनेमावर फ्रेम बाय फ्रेम लिहिले पाहिजे. पुनीत इस्सर जेव्हा देवळात पोचतो व त्याच्या लक्षात येते की ती विडिओ कॅसेट लपवली पाहिजे तेव्हा तो अंगावरच्या जखमातून वाहणार्या रक्ताने कॅसेटवर काहितरी लिहितो म्हणजे ती कॅसेट सापडेल त्याला कळेल की ही आतली फिल्म बाहेर ओढून या कॅसेटची वाट लावायची नसून ती थेट सीबीआयच्या हातात द्यायची आहे. आता तसे करताना तो एकदम धडधाकट उभा राहून खांद्यावरच्या जखमेतून दौतीत बोरू बुडवून लिहिल्याच्या सहजतेने कॅसेटवर रक्ताने लिहितो. पुढच्याच फ्रेममध्ये मात्र तो थेट जमिनीवर आता कोणत्याही क्षणी मरणार अश्या अवस्थेत आडवा पडलेला दिसतो. म्हणजे फर्ज जिथे येते तिथे सीबीआयचा माणूस मरणप्राय वेदनादेखील विसरून जातो हे दिग्दर्शकाने एक दोन फ्रेममध्ये सुचित केले आहे.
व्यतिरिक्त त्यांना नक्की काय
व्यतिरिक्त त्यांना नक्की काय उपयोगी पडले असते कल्पना नाही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फुडच वाचण्यास उत्सुक
टण्या
टण्या
हो. मग पुढच्या सीन मधे ते व्हिलन लोक तेथे शोधत असताना जेथे कॅसेट असते तेथील पाचोळ्यातून एक नाग फणा काढतो. या नागाचा पुढे काही संदर्भ आहे की नाही माहीत नाही. तो तेथे कसा गेला? या कॅसेट मधे कोब्रा रिबेलियन फोर्स असल्याने आपले जातभाई आहेत म्हणून जाउन बसला असेल.
ठुकरायन<<<<< ठकुरायन हो...
ठुकरायन<<<<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ठकुरायन हो...
भारतातील सर्व भागातून आलेल्या
भारतातील सर्व भागातून आलेल्या", पण का कोणास ठाउक फिरंगी दिसणार्या लोकांचे <<<<<
अरे म्हणजे भारत सरकार, रॉ, मिलिटरी, पोलीस यांना शंका येऊ नये म्हणून हे फिरंगी भारतभरातल्या वेगवेगळ्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरून मग भूमार्गाने मीटिंगचे ठिकाण गाठतात, असा डीप अर्थ आहे.
फा
फा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खरतर पायसला नायगपंचमीच्या मुहुर्तावर हा सिनेमा रेकमंड करण्यासाठी स्पेशल थँक्स द्यायला पाहीजे.
यस यस ठकुरायन
यस यस ठकुरायन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाय द वे ते डीजेएन म्हणजे दुर जन नारायण वरून बनवलेले असावे. दुर्जन नारायण. किंवा ज्याच्यापासून जनलोक दूरच राहतात तो.
अरे कसलं भारी.
अरे कसलं भारी.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढचं लिहा लवकर.
ती कॅसेट सापडेल त्याला कळेल की ही आतली फिल्म बाहेर ओढून या कॅसेटची वाट लावायची नसून>>
लहानपणचे उद्योग आठवले. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
देवकुमार त्याला दिसतो. त्याला आता वयोमानानुसार फारशा हालचाली जोरात करता येत नसल्याने बॅट्समन लोक वीक फिल्डर ला टार्गेट करतात तसा पुनीत त्यालाच धरून हाणामारी करतो. >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पिक्चर बघितला पाहिजे हा आता
पिक्चर बघितला पाहिजे हा आता![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पुढचे वाचायच्या प्रतीक्षेत
पुढचे वाचायच्या प्रतीक्षेत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आता पिक्चर पहाणं आलं
आता पिक्चर पहाणं आलं
श्र, सिनेमाच्या बोली भाषेनुसार तो शब्द ठुकरायनच असावा असंच मलाही वाटतं![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तो नाग कॅसेटच्या शिकुरिटीसाठी
तो नाग कॅसेटच्या शिकुरिटीसाठी असतो देवीच्या पायाजवळ. त्याचा पुढे आहे एक सीन धर्मेंद्रसोबत.
हा पिक्चर रिलेटीव्हीटी कन्सेप्टचेही जोरदार उदाहरण आहे. कोब्राचा अड्डा डोंगराळ बर्फात असतो पण तिथून गोळी लागल्यावर पुढच्या पाचेक मिनिटांत पुनीत इस्सार अनुक्रमे धावत, रांगत आणि लोळत ज्या मंदिरात कॅसेट लपवतो ते मात्र थेट वाळवंटात आहे. पुढे तंदुरुस्त धर्मेंद्र मां का आशीर्वाद घेऊन दुष्मन खात्मा मिशनवर निघतो तेव्हाही त्याला आपल्या गावाहून कोब्रा अड्ड्याच्या जागी जाण्यासाठी ओव्हरनाईट बस घ्यावी लागते, इतके अंतर हाफ डेड पुनीत इस्सारने पाच मिनिटांत कव्हर कसे केले, या प्रश्नाचे उत्तर इतकी वर्षे झाले तरी मिळालेले नाही. त्यामुळे अंतर हे केवळ मनाचा खेळ आहे आणि सच्ची भक्ती असेल तर काळमिती अगदी लोळतही पार करता येते, हा सापेक्षवादी संदेश मी माझ्यापुरता यातून घेतला.
शिवाय जी पी एसच्या किंवा फोटो-व्हिडिओवर को ऑर्डीनेट्स टाकायची सुविधा असण्यापूर्वीच्या त्या काळात केवळ दोन मिनिटांचा व्हिडीओ बघून, कुठल्याही भूगोल तज्ञाला कन्सल्ट केल्याविण किंवा साधा नकाशाही बघितल्याबिगर धर्मेंद्र थेट पिन पॉईंट अक्युरसीने बरोबर गावी जाण्याची बस कशी पकडतो, या वैज्ञानिक सत्याचा परदा फाशही अजून व्हायचा आहे.
लोळ लोळ लिहिलंय.
लोळ लोळ लिहिलंय.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अजुन लिहा सगळ्यांनी.
भयन्कर आहात तुम्ही सगले.
भयन्कर आहात तुम्ही सगले.
ऐलाने जंग खूप लहान्पणी पाहिल्याने लक्षात नाही.
पण हुकुमत लक्षात असल्याने बरंच रिलेट झालं.
धमाल आहे.
मला लहान्पणी 'जी' मासिक कोटक फॅमिली वालं खूप आवडायचं.त्यावेळी आता सारख्या ट्विटर आणि न्युज चॅनेल वर सेकन्द सेकन्दाला बातम्या नव्हत्या.त्या जी मासिकात या ऐलाने जंग च्या एका गाण्याचां शूटिंग(ज्यात जयाप्रदाच्या कपाळावर बेली डान्सर्स किंवा बंजारा स्टाइल टिकल्यान्चा पट्टा होता) चं सखोल वर्णन होतं.
बर्याच हॉलिवूड पिक्चर्स शी ओळख पण जी मधूनच झाली. (पैसे देऊन थेटर मध्ये एकही हॉलीवूड मुव्ही आजवर पाहिली नाहीय.पैसे देऊन पहायचा पिक्चर म्हणजे अडिच तीन तासाचा पैसे वसूल बॉलीवूड!! हे दिड तासी पिक्चर्स चॅनल वर पाहिलेत.)
"हं.हं..हं.........नाग हूं मे
"हं.हं..हं.........नाग हूं मे...... नाग, काला नाग !
सामने आ जाय, तो अपने बाप को भी डसलू, तो ये देश क्या चीज है...हँहँहँ...इस देश के लोग क्या चीज है....टाळ्या......जोरदार...टाळ्या.
----
सदाशीव आमरापुरकर यांचा वरिल डायलॉग ऐकल्यानंतर लगेचच चॅनेल बदलेला, आता इथे वाचल्यानंतर कळले की खूपच करमणुक करणारा सिनेमा होता हा. आता पाहायला हवा.
अशी अर्धवट चिरफाड करून असा
अशी अर्धवट चिरफाड करून असा करमणुकप्रधान चित्रपट पुर्ण पाहण्यासाठी अनेकांना उद्युक्त केल्याबद्दल (आणि धागा कसा चर्चेत राहील याची सोय करून घेतल्याबद्दल
) फारएण्ड यांना खुप खुप धन्यवाद! ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
कहर आहे...
कहर आहे...![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
ते बर्फाळ प्रदेशातून थेट
ते बर्फाळ प्रदेशातून थेट वाळवंट म्हणजे 'आसमान से गिरा खजूर मे अटका' डिटेलमध्ये दाखवले आहे. बर्फाळ प्रदेश - उंचावरचा प्रदेश - आसमान आणि खजूर कुठे असतो? वाळवंटात. हे एकदा लक्षात घेतले की, पुनीत इस्सारचा शर्ट कुठे गेला, या प्रश्नाचेही उत्तर मिळून जाते.
देवळातील सीन हृदयंगम आहे. कॅसेट लपविण्याआधी कॅसेटमध्ये नेमके काय काय रेकॉर्ड केले आहे हे देवीच्या मूर्तीला सांगतो. (स अ चे रेकॉर्डिंग वरच्या बाल्कनीतून समोरून करत होता तेव्हा त्याची शकल रेकॉर्डिंगमध्ये दिसतेय हे ठीक पण बाकीच्या लोकांच्याही शकल्स? जे त्याच्याकडे पाठ करून बसले होते!) खरेतर सांगायची काही गरज नव्हती. प्रेक्षकांना थोडीच ती 'नगीना'ची व्हिडीओ कॅसेट वाटणार आहे? नंतर कॅसेट लपवून कालीमातेच्या हातातला त्रिशूळ काढून घेऊन स्वतःलाच भोसकतो. मला वाटले, मागे लागलेल्या गुंडांना संपवणार असेल. पण त्यांना धरमपाजींसाठी शिल्लक ठेवायचे असावे.
<<<<<<<<<<<देवळातील सीन
<<<<<<<<<<<देवळातील सीन हृदयंगम आहे. कॅसेट लपविण्याआधी कॅसेटमध्ये नेमके काय काय रेकॉर्ड केले आहे हे देवीच्या मूर्तीला सांगतो. (स अ चे रेकॉर्डिंग वरच्या बाल्कनीतून समोरून करत होता तेव्हा त्याची शकल रेकॉर्डिंगमध्ये दिसतेय हे ठीक पण बाकीच्या लोकांच्याही शकल्स? जे त्याच्याकडे पाठ करून बसले होते!) खरेतर सांगायची काही गरज नव्हती. प्रेक्षकांना थोडीच ती 'नगीना'ची व्हिडीओ कॅसेट वाटणार आहे? नंतर कॅसेट लपवून कालीमातेच्या हातातला त्रिशूळ काढून घेऊन स्वतःलाच भोसकतो. >>>>>>>>>>>> का ही ही![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ऐलाने जंग पासुन जंग लागलेल्या
ऐलाने जंग पासुन जंग लागलेल्या धरम्पाजींची सेकंड इनिण्ग सुरु झाली ना?
ईनिसपेक्टर विक्रम गोखले ...
ईनिसपेक्टर विक्रम गोखले ... अगदी यंग वाटतात.
अखेर माबोवर अनिल शर्माच्या
अखेर माबोवर अनिल शर्माच्या ट्रिलॉजीतल्या शेवटच्या (क्रोनोलॉजिकली पहिल्या) चित्रपटाचे निरुपण सुरु झालेले पाहून डोळे पाणावले.
सीन बाय सीन नंतर लिहितो पण डिजएन उर्फ काला नाग साहबच्या एंट्री सीनमधले ईस्टर एग्ज
१) स.अ. च्या कपाळावर त्रिशूळाच्या आकाराचे गंध. नंतर जेव्हा तो दुर्जन नारायण रुपात फ्लॅशबॅकमध्ये एंट्री घेतो तेव्हाही तो तसेच गंध लावतो. इथे कंटिन्युटीचे कौतुक तर आहेच पण काला नाग साहेबांचे संस्कारही दिसून येतात (पाश्चात्य कपडे घातले तरी आतून नारायण अगदी तस्साच!)
२) स.अ. च्या मागचा नकाशा! बारकाईने पाहिले तर यात आपल्याला इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान, थाईलँड, म्यानमार, चीन असे देश ओळखू येतात. यात लक्षवेधी गोष्ट अशी कि पाकिस्तानची सीमा म्यानमारला जोडली आहे. थोडक्यात आशियाच्या नकाशातून भारताला नाहीसे करून जर तो नकाशा खेचून जोडला तर अगदी स.अ. च्या नकाशासारखा दिसतो. स.अ. चे हेतु स्पष्ट करणारे याहून सुयोग्य रुपक ते कोणते!
३) मार्केट मॅनेजमेंट - ७ वर्षात डिजेएनला १४००० कोटी मिळतात. यात मॅक्सिमम रेट २-४ लाख लाशे (बोली सुरु करण्याचा भाव १ लाख रुपये प्रति वर्ष प्रति लाश) ते अॅक्सेप्टेबल रेट १४ लाख लाशे (देने का भाव, साधारण १४२८६ रुपये प्रति वर्ष प्रति लाश) असे डिट्टेलवार निरुपण आहे. बार्गेन, दर निश्चिती, गिर्हाईकाच्या अपेक्षा सर्व सर्व काही विशद केलेले आहे.
४) आणखी एक रुपक. जेव्हा एक चिव्हि (चिल्लर व्हिलन) स.अ. ला विदेशी दोस्त विषयी विचारतो तेव्हा प्रथम स.अ. च्या मागच्या नकाशात पाकिस्तानचा पार्ट, मग एक फ्रेमभर बॉब क्रिस्टोचा अमेरिकन भाऊ वाटणारा चिव्हि (सिनेमा शीतयुद्ध चालू असतानाच्या काळातला आहे) आणि शेवटी स.अ. च्या फू मांचू स्टाईल मिशा फोकसमध्ये आणून कॅमेरामनने अतिशय हुशारीने आपल्याला अनेक गोष्टींची माहिती दिलेली आहे.
तूर्तास इतकेच.
पायस
पायस![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अजून लिही. तो नकाशा बघून मला जुने ते ऑस्ट्रो-हंगेरियन एम्पायर वगैरे दाखवणारे ढोबळ नकाशे असत तसा १००-२०० वर्षांपूर्वीचा त्या भागातला नकाशा वाटला. नाहीतर मग मी लिहीले आहे तसा, फोटो भारताच्या नकाशाचा काढायचा होता. पण ट्रायपॉड वाल्याने आयत्या वेळेला चुकीचे स्क्रूज हलवल्याने जरा वरच्या भागाचा आला.
लाशे व त्यांचा रेट बद्दल टोटल सहमत. मधे लगान मधल्या मॅनेजमेण्ट कन्स्पेप्ट्स बद्दल डीप अॅनेलिसिस करून लोक लेख लिहीत तसे कोणीतरी (म्हणजे तू) लिहायला हवे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पायस
पायस![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages