Submitted by दक्षिणा on 20 July, 2017 - 09:32
सध्या सोनी वरील पेहरेदार पिया ही सिरियल 'आदरवाईज' गाजते आहे. प्रोमो पाहून लक्षात येत होतं की हे काहीतरी 'वेगळं प्रकरण' आहे. आता तर हि सिरियल चक्क सुरू झाली आहे ना?
आजच फेसबूक वर पुणे लेडिज गृप वर एक पोस्ट पाहिली की आपण ही सिरियल बॅन करायला अपिल करू.
इतक्या लहान मुलाचे आई वडील त्याला 'अशी' भुमिका करायला परवानगी कसे देतात? किंवा हा काय विषय आहे का? इ. अनेक मुद्दे घेऊन तिथे चर्चा सुरू होती/आहे.
तुमचे मत काय? मी व्यक्तिशः एकही एपिसोड पाहिला नाहिये. पण इतके सगळीकडून आवाज येतायत की मी माझी उत्सुकता दडपून ठेवू शकत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा शब्द व त्याच्या अर्थाबद्दल बरेच गैरसमज आहेत.
शार्ली हब्दो च्या कार्टूनिस्टांनी पैगंबराचे जे केलं तेही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली माफच आहे असे मला सांगत होते मागे काही लोक. त्याच्यापुढे आरारा यांचे शब्द म्हणजे नाजुक फुलांची बरसातच आहे.
आ.रा.रा. यांनी जिप्सी यांना
आ.रा.रा. यांनी जिप्सी यांना मायबोलीवर पेडोफीलियावरून झाडलं गेल्याचा उल्लेख केलेला वाचला
माझ्या समजुतीनुसार पेडोफीलियावरून झाडलं म्हणजे पेडोफीलियाचा धोका लक्षात न घेता लहान मुलांचे फोटो प्रसिद्ध केल्यामुळे झाडलं.
जिप्सी यांच्यावर पेडोफीलियाचा आरोप केलेली / त्यावरून झाडणारी
तुमची गैरसमजुत झालेली दिसतेय स्वाती. जिप्सी यांच्यावर पेडोफीलियाचा आरोप केला गेला असं आ.रा.रा यांचं म्हणणं नाही तर पेडोफीलियाचा धोका लक्षात न घेता लहान मुलांचे फोटो प्रसिद्ध केल्यामुळे झाडणारी पोस्ट्स होती.
झाडणार्या पोस्ट्सची काही उदाहरणे
मायबोलीला भेट देणारे, हे फोटो बघणारे, त्याचा दुरुपयोग करूच शकणार नाहीत असंही नाही. उघड आणि छुप्या विकृतांची इंटरनेटावर कमी नाही.
इतर कुठल्याही विषयाबद्दल काही प्रॉब्लेम वाटत नाही. पण अजाण मुलांचे फोटो टाकताना थोडा विचार व्हावा.
लहान मुलं विशेषतः इंटरनेटवतील धोक्य ची व्यवस्थित माहिती नसलेल्या मुलामुलीचे फोटो टाकू नयेत असं मी पण म्हणेन.
अनेकदा लहान मुलांच्या फोटोंचा दुरुपयोग चाइल्ड पॉर्नोग्राफीमधे केला जातो, हा मुद्दा विचारात न घेतल्याचा खेद आहे.
व्यत्यय अरारा च्या वतीने का
व्यत्यय अरारा च्या वतीने का बोलत आहेत ते समजले नाही पण आता बोलतच आहेत तर :
वरच्या ठळक केलेल्या परिच्छेदात काही चूक आहे का? असं "झाडायला" नको होतं असं आरारांचं म्हणणं आहे का? अजून लक्षात आलं नसेल तर - आरारा यांच्या प्रतिसादावरून असं ध्वनित होते आहे की कारण नसताना तेव्हा उगीच जिप्सी यांना वेठीला धरले होते. आणि तसे करणारे आता पहरेदार पिया की ला मात्र सपोर्ट करत आहेत. जे स्ट्रॉमॅन अर्ग्युमेन्ट चे उत्तम उदाहरण आहे कारण या वाक्यातले काहीच सत्य नाही !! (आरारांना या असल्या टॅक्टिक्स ची गरज भासते/ भासली ?) एक तर दोन गोष्टींचा काहीही संबंध नाही, दुसरे म्हणजे एका माबोवर घडणार्या गोष्टीला माबोवर प्रोटेस्ट केले म्हणजे जगात सगळीकडे घडणार्या तशा गोष्टींना माबोवरच ठोकले पाहिजे असा निय्म नाही. हे म्हणजे दु:खद घटना बाफावर लिहिले नाही म्हणजे तुम्हाला दु:ख झालेच नाही असा दावा करण्यासारखे आहे ! असो, तरी अजून कुणाला तेव्हा च्या प्रोटेस्ट चे कारण पटले/ समजले नसेल तर वेगळा बाफ काढून चर्चा करू आपण.
आणि मुख्य म्हणजे तेव्हा सो कॉल्ड जिप्सीला "झाडणार्या" लोकांपैकी या बाफवर कोणीच त्या सिरियल ला सपोर्ट केले नाहीये, अॅक्चुअली कुणी ती सिरियल पाहिलेलीच नाहीये. या बाफावर आरारांना त्यांची पोस्ट सुद्धा कुठे दिसली हे मला कळेना? या परिस्थितीत आरारा यांचे पोस्ट नेमके काय सिद्ध करु पहात आहे (की केवळ विशिष्ट आयड्यांना टार्गेट करणे?) हे समजणेही अवघड आहे.
मैत्रेयी +१
मैत्रेयी +१
शिवाय उदाहरणादाखल दिलेल्या पोस्ट्सही केवळ मतप्रदर्शन करणाऱ्याच आहेत, त्यात 'झाडल्याचा' (कानउघाडणी/निर्भत्सना केल्याचा) सूर मलातरी कुठे दिसलेला नाही.
स्वाती, मैत्रेयी, पोस्टींना
स्वाती, मैत्रेयी, पोस्टींना अनुमोदन.
दुसरे म्हणजे एका माबोवर घडणार्या गोष्टीला माबोवर प्रोटेस्ट केले म्हणजे जगात सगळीकडे घडणार्या तशा गोष्टींना माबोवरच ठोकले पाहिजे असा निय्म नाही. हे म्हणजे दु:खद घटना बाफावर लिहिले नाही म्हणजे तुम्हाला दु:ख झालेच नाही असा दावा करण्यासारखे आहे ! >>>>>>>> फार हसायला आलं आहे वाचून.
दुसरे म्हणजे एका माबोवर
दुसरे म्हणजे एका माबोवर घडणार्या गोष्टीला माबोवर प्रोटेस्ट केले म्हणजे जगात सगळीकडे घडणार्या तशा गोष्टींना माबोवरच ठोकले पाहिजे असा निय्म नाही. हे म्हणजे दु:खद घटना बाफावर लिहिले नाही म्हणजे तुम्हाला दु:ख झालेच नाही असा दावा करण्यासारखे आहे ! >>. अनुमोदन मला पण ती पोस्ट उगीचच आक्र स्ताळी वाटली. मी ती सिरीअल पहिल्या दिव्सा पासून पाहिली. ह्या बाफ मुळेच. माझाकडे केबल नाही अॅप वर कधी मधी हिंदी मराठी बघते. इथले अभिप्राय वाचून. सध्या कपिलचा शो पण येत नाहिये. त्यामुळे बघायला शोधावे लागते.
सिरीअल बालविवाहाचे समर्थन करीत नाही तसे त्यांनी डिस्क्लेमर कायम टाकलेले आहे. लुक खरेच खूप छान आहे. व दिया च्या व इतरांच्या लुक दागिने, नेपथ्य ह्यावर खूप मेहनत घेतलेली आहे. तसे दिसते. मुख्य म्हणजे इतके उग्र शब्द वापरण्यासारखे काही नाही आहे. राग वैताग येत असल्यास न बघण्याचा ऑप्शन असतोच.
कथा थोडक्यात अशी आहे. मुलगा आईबाबांना खूपच उशीरा झाला आहे. प्रचंड इस्टेट जी त्याम्च्या माघारी काका ची झाली असती ती आता ह्या औरस वारसाला जाणार् म्हणून मुलाच्या जिवाला धोका आहे हे आईवडिलांना माहीत आहे. ते दिया कडे होळी साठी येतात. दिया फारच छान दिसते व मुलग्याला ती परीसारखी वाटते. पाचवी सहावीतल्या मुलाला वाट्ते इतकेच कुतुहल त्याला वाट्ते आहे. आता मी भाज्या खायला लागलो आहे. व मोठा होईन लवकरच असे भाबडॅ संवाद त्याला दिले आहेत. खूपच लाडावले ला पण मूळ गुड नेचर्ड आहे मुलगा. दिया चे पण लग्न ठरले आहे. पण आई बाबांना अपघात होतो. त्या पूर्वीचा मुलाचा आईबाबांबरोबर शेवटचा संवाद अतिशय ह्र् द्य दाखवला आहे.
मुलाला बघणारे कोणीच नाही म्हणून बाबा शेवटची इच्छा म्हणून दियाच्या बाबांना रिक्वेस्ट करतात लग्नाची. त्यात पेडोफीलीया अग्ली नेस असे काही दाखवलेले नाही. धिस इन अ वीक व्हेअर टू किड्स वेअर अब्युज्ड इन मुम्बई . वन डाइड अँड अनदर इज इन कोमा टू बॉइज बाय सम मेन व्हू आर अॅट लार्ज.
जयपूर राजघराण्याची राजकन्या दिया कुमारी म्हणून त्या नावाला उत्तर भारतात खूप कनेक्ट आहे.
गौरी देशपांडे ह्यांच्या एका पुस्तकात आई मुलाला हक्काची इस्टेट मिळ्वण्यासाठी काय काय करते त्याचे वर्णन आहे. पण मुलगा ड्रगी होतो त्या कथेत. असे प्रॉपर्टीचे लढे ज्यांनी दिले आहेत त्यांना कथेत कनेक्ट जाण्वेल. आंध्रामध्ये पण प्रॉपर्टॅ सा ठी लहान मुलांचे खून पडलेले आहेत. मी बातम्या तिथे असताना फॉलो केल्या आहेत. अगदी वाचवत नाही. पर्सनली सुद्धा मला लहान बापावेगळे मूल मोठे करणे व त्याच्या हक्काअची इस्टेट त्याला मिळवून देणे हे किती अवघड आहे अर्बन सिचुएशन मध्ये त्याचा अनुभव आहे. ह्या मुळे मला थोडा कनेक्ट जाण्वला.
मी आजिबातच बालविवाहाचे समर्थन कधीही करत नाही. पण इथे विवाह हा एकच मार्ग मुलगा मोठा होईपरेन्त त्याला सुरक्षित् ठेवण्याचा मार्ग
आहे असे कथानक दाखवले आहे. इन दॅट काँटेक्स्ट इट वर्क्स.
सिरीअल मध्ये लग्न हा मेन मुद्दा नाही तर मुलग्याचा जीव वाचवणे व त्याला मोठा होउन इस्टेट मिळ्वून देणे हा आहे. बाकीचे काका वगैरे कारस्थानी दाखवले आहेत काकू फार प्रेमाचे नाटक करून त्याला बांधोन ठेवायच्या प्रयत्नात आहे. व ते मुलग्याच्या आईला पसंत नसतए असे दाखवले आहे.
ह्या आठवड्याचे भाग पाहिले नाहीत बघून अपडेट देइन. इतक्या हार्श प्रतिक्रिया का बरे? रिमोट आहेच की.
मुलीचे घरात स्वागत होत नाही.
मुलीचे घरात स्वागत होत नाही. तांदु ळाच्या डब्यापाशी मुलाचा हात पुरत नाही. तो कलशात काहीतरी दुसरे भरून तिला आत घेउन येतो.
तो ही सीन टचिंग आहे. डिपेंड्स ऑन हाउ यू फील अबाउट दिस पण विक्रुत काहीही दाखवलेले नाही.
>>डिपेंड्स ऑन हाउ यू फील
>>डिपेंड्स ऑन हाउ यू फील अबाउट दिस>>
येस आय अग्री... मला बरी वाटली तशी ...छोटा मुलगा फार गोड आहे... फॉर अ चेंज थोडा नवीन आहे कन्सेप्ट माझ्यासाठी कारण मी आधी कुठल्याच वर उलेखलेल्या जुन्या सिरीयल नाही पहिल्या..
सिरीअल मध्ये लग्न हा मेन
सिरीअल मध्ये लग्न हा मेन मुद्दा नाही तर मुलग्याचा जीव वाचवणे व त्याला मोठा होउन इस्टेट मिळ्वून देणे हा आहे.
>>>>
चांगला उद्देश आहे.
अर्थात सिरीअल पाहिली नसल्याने या उद्देशासोबत आणखी वाह्यातपणा दाखवला जात आहे की नाही त्याची कल्पना नाही, त्यामुळे समर्थनाचे वा विरोधाचे नेमके मत नाही मांडू शकत.
पण असे बालविवाह कायद्याने संमत आहे का हा प्रश्न तरीही उरतोच!
म्हणजे कायदा बालविवाहाला मान्यता देत नाही, पण इस्टेटीचा सवाल असेल तेव्हा चालते असे काही आहे का?
अ.रा.रा. ची पोस्ट अगदीच अरारा
अ.रा.रा. ची पोस्ट अगदीच अरारा आहे , उगीच काहीतरी जुने स्कोअर सेट्ल करायला चुकीचे रेफरन्सेस !
बालविवाहाचे या बीबीवर किंवा सिरिरियल मधे कोणी समर्थन केलं नाहीये, मी तरी जो युट्युब व्हिडीओ पाहिला त्यात डिस्क्लेमर येतो सुरवातीला.
प्रश्नं फक्त दुटप्पी धोरणाबद्दल विचारलाय, बेकायदेशीर बालविवाह वगैरे बालिका वधु मधेही दाखवले होते,, त्यावेळी कोणी बॅन करा म्हणून बीबी नाही काढले उलट सिरियलबद्दल चर्चा देखील रंगली.
इथेही जर टिन एज 'राजकुमार 'लहान मुलीशी लग्नं करतो दाखवलं असत् तर परीकथेचा दर्जा नक्कीच मिळाला असता सिरियलला.
सुनेचा छळ वगैरे बेकायदेशीर बिनडोक गोष्टी दाखवणार्या काहे दिया परदेस सारख्या तद्दन फालतु मराठी सिरियल्सची इथेच भाग १ भाग २ करून चर्चा होते,
इथेच केवळ राजकुमारी मोठी आहे म्हणून का ऑब्जेक्शन प्रश्नं विचारला कि पेटलेच सो कॉल्ड सामजसुधारण्याची चिंता आपलीच जवाबदारी मानणारे :).
लोल! टीव्हीला उगाच इडियट
लोल! टीव्हीला उगाच इडियट बॉक्स म्हणत नाहीत हे वारंवार सिद्ध होतंय इथे!
कसला पीडोफेलीया आहे या मलिकेत
कसला पीडोफेलीया आहे या मलिकेत समजले नाही.
मध्यंतरी कुठल्या रानडे नावाच्या समाजसुधार्काची उंच माझा झोका नावाची मालिका लागत होती.त्यात २८वर्षाच्या त्या घोड नवर्याचं लग्न पाच वर्षाच्या मुलीशी लावलेलं दाखवलं होतं.लीहू नये पण प्रस्तुत धाग्याची लेखिका त्यावर काही बोलल्याचं आठवत नाही.पण आज पे पि का मालिकेवर लगेच टिका करायला धागा काढला.
त्या टॅलंट हंट रिॲलीटी शोजमध्ये सात आठवर्षाच्या मुलींना " पल्लू के नीचे दबा के रखा है" असले द्वयार्थी गाणे म्हणायला लावतात ,हा पिडोफीलीया नाही का?
उंच माझा झोका >>> ती एक
उंच माझा झोका >>> ती एक एतीहासिक कथा आहे, सत्यघटना
असो
ईथले सगळे वाचुन मीपण डाऊनलोड केलेत कही एपी, वेळ मिळेल तसे बघेण म्हणते.
पुढील दोन भागांचा अप डेट.
पुढील दोन भागांचा अप डेट. बन्नाच्या काकीसा व काकासा आले. बन्नाचा राज्याभिषेक होउन त्याला लोक ताता हुकूम म्हणायला लागले आहेत. ह्याचा धाकट्या काकासांना फार राग आला आहे व ते तिथून निघून जातात. बरोबर दोन मुलगे पण आहेत पण ते त्यांचे आहेत का इतर कोणी आहेत ते कळले नाही. ह्यात बन्ना अगदी मलूल झाला व शेव्टी त्याला खूपच ताप आला. म्हणून तो पडून आहे व काकीसाची आठवण काढतो आहे. दिया त्याला झोपवायचे प्रयत्न करते. पण तो ऐकत नाही तळमळत पडला आहे.
काकी सा एक दम पाताळयंत्री आहेत. येतात व दियाच्या बहिणीला एक हार गळ्यातून तोडून गिफ्ट देतात मोलकरीण समजून. ती नाही घेत म्हटल्यावर गिफ्ट तिच्या गळ्यातच मारतात. दियाला नवा पोशाक व सासूचे दागिने, किल्ल्या द्यायच्या असतात. तर मथलेली दासी
किल्ल्या दिव्यात ठेवते त्या गरम होतात. एकेक दागिन्या बरोबर दियाला तिच्या भयानक जबाब दार्यांची जाणीव काकीसा क्रूर पणे करून देतत व तू कशी कमी पडणार आहेस ते बॉडी लँग्वेज मधून व्यक्त करतात. किल्ल्या तिच्या कमरेला खोचायच्यावेळी तिला भाजते व ती त्या दूर फेकते तर काय हा अपमान असा सूर काढतात.
दिया व तिची ताई, आई ह्यांना तिची खूप काळजी वाट्ते. आई म्हणते मी मुलीला सासरी धाड णार नाही. पण बाबा म्हनतात कि बन्न्याला तिथली सवय आहे तर तो तिथेच नीट वाढेल. इथे काकीसा तिला त्रास द्यायला तयार बसली आहे. पण तिचा गृहप्रवेश सर्व तयारीनिशी करणार म्हणते. बरोबर एक केस कापलेली व्हिलेन बाई आहे दोघी गाडीत तिचा काटा कसा काढायचा तो प्लॅन रचत आहेत.
दिया बन्नाला काही पुस्तकातून वाचून दाखवत असते. तर काकीसा तिथे येते व मुलाला झोपवून मग दुश्ट पणे ते पुस्तकच फाडते. दियाला आपल्या भवितव्याची कल्पना आता येउ लागली आहे. व ती सतत रडत राहते. इथेच हा प्रकार तर सासरी काय करतील मुलीचे असा प्रश्न दियाची आई नवर्याला विचारते. सर्वांचे कपडे दागिने जबरदस्त. काकीसा चे मोठे पेंडंट जबरी आहे.
एक प्रश्न पडला की जर मुलाची
एक प्रश्न पडला की जर मुलाची ऱक्षाच करायची आहे तर.. एखादा विश्वासातला दुसरा माणुस का नाही..
जर कोणी विश्वासात नसेल तर ठिक
आता ती मुलगी यांनी पेहरेदार म्हणुन सिलेक्ट केली ठिक .. पण मग लग्नच कशाला करायला हवं..
म्हण्जे नॉर्मली येवढा एज डिफरंस बघता कोणी दोघांच्या लग्नाचा का विचार करेल... दुसरी नाती आहेतच .. भाउ म्हणुन पण चाललं असतं...
चर्चा म्हणुन घ्या .. खरच वाटलं म्हणुन विचारलं
Submitted by अमा on 26 July,
Submitted by अमा on 26 July, 2017 - 10:57
पोस्ट वाचुन एकदम वॉव फिलिंग आलं मला. बघायला सुरुवात करावी का?
अमा, का बघता? (खरोखरी
अमा, का बघता? (खरोखरी विचारत्येय!) production चा डोलारा कितीही सुंदर असला तरी ह्या मालिकेत बांधून ठेवेल असे काय आहे? गुंतागुंतीचे कथानक आहे की संवाद सुंदर आहेत की पात्र सशक्त आहेत की कलाकारांच्या अभिनयाची कसोटी लागणारे प्रसंग आहेत? नेहमीच्या दळणापेक्षा वेगळं असं काय आहे?
मला पोस्ट मधे कपड्यांची तारीफ
मला पोस्ट मधे कपड्यांची तारीफ वाचुन निदान कपडे बघावे असं वाटलं
अमा, का बघता?>> मला ते
अमा, का बघता?>> मला ते कॉम्प्लेक्ष वेब ऑफ रिलेशन शिप्स आवडते. दिया आवड्ते.
दुसरा कोणी विश्वासाचा माणूस>> भाउ भाउ पण इस्टेटी साठी एकमेकांचे खून पाडतात.
आणि एका उथळ लेव्हल वर ते कपडे दागिने पण फार आवडतात .
गुंतागुंतीचे कथानक आहे>> हो.
गुंतागुंतीचे कथानक आहे>> हो.
की संवाद सुंदर आहेत>> हो मराठी मालिकांच्या मानाने छानच आहेत. राजस्थानी लहेजा सुरेख आहे.
की पात्र सशक्त आहेत>> दिया इज ऑसम. काकीसाला हात जोडून आभार मानते. काकीसा अब्युसिव असूनही. कारण तिने मदत केली. शी नोज व्हॉट शी इज इन फॉर पण एक इनर सेन्स ऑफ ऑ नेस्टी आहे तिच्यात. त्यांचे कोव्ळे जीवन आता ह्या रिवाज वजायदाद मध्ये कोमेजून जाईल.
की कलाकारांच्या अभिनयाची कसोटी लागणारे प्रसंग आहेत? यस.
नेहमीच्या दळणापेक्षा वेगळं असं काय आहे>> अजून दहा एपिसोड पण नाही झाले. बघु या.
अमानी मालिका बघून
अमानी मालिका बघून मालिकेतल्या कथानकावर चर्चा करण्यासाठी ( किव्वा अपडेट्स देण्याकरता ) आणि वैयक्तिक गोष्टी सांगण्यासाठी / लिहिण्यासाठी शेप्रेट धागे काढले तर बर होईल.
अमा, तुम्ही एडीट केलेला
अमा, तुम्ही एडीट केलेला प्रतीसाद मी वाचला होता, जर एखाद्या मालिकेशी कोणी रिलेट होऊन भावुक झालेतर त्यात मलातरी कही चुकीचे वाटत नाही.
तुमच्या पोष्ट वाचुन मी पाहीले काही ऐपी
ईतके काही वावगे वाटले नाही ऊलट एक काल्पनिक शिरेल समजुन बघीतले तर छानच आहे सध्यातरी
धन्यवाद, अमा.
धन्यवाद, अमा.
आ.रा.रां.नी सीरियल न पाहता, जिप्सीचं नक्की काय झालं होतं हे नीटसं आठवत नसताना दाखवलेला righteousness कौतुकास्पद होता एकूण. त्यानंतर इथे उत्तर द्यायला न येण्याचाही.
एकूण त्यांचे hatchets bury केल्याचे दावे आणि हे असले समाजस्वास्थ्याचे उमाळे दोन्ही तितपतच आणि तात्पुरतेच असतात हे लक्षात आलं. यापुढे स्वच्छ मनाने दुर्लक्ष करता येईल.
दुसरा कोणी विश्वासाचा माणूस>>
दुसरा कोणी विश्वासाचा माणूस>> भाउ भाउ पण इस्टेटी साठी एकमेकांचे खून पाडतात>>>>>>
प्रियकराच्या मार्गातील अडथळा दूर व्हावा म्हणून नवऱ्याचा खून पाडणाऱ्या बायाही याच भारतात होऊन गेलेल्या आहेत. असो. चॅनेलच्या टीमला हाच विषय घेऊन मालिका काढायची असल्यावर आपण तरी काय करणार.. बाकी मालिकांचा इतिहास पाहता गोइंग फॉरवर्ड या दियाच्या आयुष्यात काही एपिसोड्सनंतर कोणी बातीं येईल, मग थोडे एपिसोड दिया बाती की छोटा पती या विवंचनेत जातील, मग परत दिलजमाई व व इत्यादी भरपूर मसाला पाहता येईल. 5 6 वर्षे तरी आरामात जातील यात.
बेबे सेम सेम हेच माझ्या
बेबे सेम सेम हेच माझ्या डोक्यात आलं
दक्षे, या मालिकांनी पार
दक्षे, या मालिकांनी पार वाटोळं केलंय कल्पनाशक्तीचं. काही म्हणजे काही नवीन विचार डोक्यात येत नाही. यांच्याही व प्रेक्षकांच्याही. सारे काही तेच तेच...
मुलाला बघणारे कोणीच नाही
मुलाला बघणारे कोणीच नाही म्हणून बाबा शेवटची इच्छा म्हणून दियाच्या बाबांना रिक्वेस्ट करतात लग्नाची. >>> अहो पण ते त्या मुलाला दत्तक ही देऊ शकत होते ना ? नवरा म्हणुन स्वीकारु शकते तर दत्तक पुत्र म्हणुन का नाही ?
वा! दत्तक पुत्र म्हणुन
वा! दत्तक पुत्र म्हणुन स्विकारल तर ती" कुमारी माता "नाही का ठरणार ? सन्स्कुतीची घागर बुडेल की!
पण पूर्वी अशा वेळेस रीजण्ट
पण पूर्वी अशा वेळेस रीजण्ट नेमायाचा प्रघात होता. पेशवाईत सुद्धा सवाई माधवरावाच्या वेळेस असे काहीतरी केले होते असे वाचल्याचे अंधुक लक्षात आहे.
इथली चर्चा वाचून सिरीयल वर सर्च केले. हे असले प्रकार जाम डोक्यात जातात. मला ती उंच माझा झोका सुद्धा कधी बघावीशी वाटली नव्हती. एक दोन दा समोर चालू असताना जे संवाद दिसले ते बेकार वाटले होते. ते गाणे चांगले होते, पण त्या सिरीयल चे इतके काय कौतुक लोकांना होते मला कधीच कळाले नाही.
बाय द वे ती तेजस्वी चांगली दिसते. तिचे "तेजस्वी प्रकाश" करून पंजाबीकरण का केले माहीत नाही. वायंगणकर आहे ती, असे विकीवरून कळाले.
मालिका बघितली नाही, बघणार
मालिका बघितली नाही, बघणार नाही, वरची चर्चाही संपूर्ण वाचली नाही ( न बघताच पोस्ट लिहिण्याची ही पहिलीच वेळ )
इथे मारे सगळे कीस पाडत आहेत. आत्ता त्यांच्यातले नाते प्लेटॉनिकच असेल ( कधीकधी मानलेले बहीण भाऊ पण नंतर प्रेमात पडतात म्हणे सो बहीण-भावासारखेही असेल )
मग मधूनच एक दिवस घड्याळ एका तपाने पुढे सरकवतील. तो तारुण्यात प्रवेश करता होईल, मग हळूहळू आकर्षण निर्माण होईल. सचिन-अंजली ते फ्रेंच प्रेसिडेंट ( आणि पंचवीस वर्षांनी मोठी असलेली बायको ) अशी मोठी वास्तववादी रेंज उपलब्ध आहे. मग पिडोफिलिया गेला तेल लावत ! कशी छान जगावेगळी मॉडर्न लिंगनिरपेक्ष लव्हस्टोरी म्हणून कौतुकाच्या पोस्ट्स यायला लागतील ह्याच धाग्यावर. :भविष्यवाणी मोड ऑफः
Pages