Submitted by दक्षिणा on 20 July, 2017 - 09:32
सध्या सोनी वरील पेहरेदार पिया ही सिरियल 'आदरवाईज' गाजते आहे. प्रोमो पाहून लक्षात येत होतं की हे काहीतरी 'वेगळं प्रकरण' आहे. आता तर हि सिरियल चक्क सुरू झाली आहे ना?
आजच फेसबूक वर पुणे लेडिज गृप वर एक पोस्ट पाहिली की आपण ही सिरियल बॅन करायला अपिल करू.
इतक्या लहान मुलाचे आई वडील त्याला 'अशी' भुमिका करायला परवानगी कसे देतात? किंवा हा काय विषय आहे का? इ. अनेक मुद्दे घेऊन तिथे चर्चा सुरू होती/आहे.
तुमचे मत काय? मी व्यक्तिशः एकही एपिसोड पाहिला नाहिये. पण इतके सगळीकडून आवाज येतायत की मी माझी उत्सुकता दडपून ठेवू शकत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पूर्ण स्टोरी माहीत नाही पण
पूर्ण स्टोरी माहीत नाही पण प्रोमोवरूनच अशा सीरियल्सवर बंदी असावी असं वाटतयं .
नक्की काय आहे?
नक्की काय आहे?
आम्हाला काहीच माहीत नाही. थोडक्यात सांगा. किंवा सांगण्यासारखे नसेल तर एखादी लिंक द्या
याआधी लहान मुलीचा समवयस्क
याआधी लहान मुलीचा समवयस्क मुलाशी किंवा मोठ्या पुरूषाशी विवाह अशा टाईपच्य बालिका वधू, उंच माझा झोका व इतर अनेक सिरीयल होत्या. त्या सुपरहिट झाल्या होत्या.
यावेळीच इतका विरोध का होतोय? लहान मुलगा व मोठी बायको, ती बायको नवर्याची संरक्षक असणं हे झेपत नाहीये का? आय मिन - लहान मुलगी व मोठा नवरा चालेल पण लहान मुलगा व मोठी बायको चालणार नाही का?
मी सिरीयल बघत नाही व समर्थक नाही पण सिलेक्टिव्ह outrage ची गमन्त वाटली.
सनव+१
सनव+१
बालिका वधू मध्ये बालविवाह
बालिका वधू मध्ये बालविवाह किंवा जरठ-कुमारी विवाहाचं समर्थन केलं नव्हतं.. उलट या प्रथा वाईट आहेत आणि त्या बंद झाल्या पाहिजेत असाच ट्रॅक होता ( किमान सुरुवातीला तरी.. पूर्ण मालिका मी बघितली नव्हती) आणि उंच माझा झोका ही ऐतिहासिक मालिका होती.. स्वातंत्र्यपूर्व काळ.. तेव्हा अन्यायकारक प्रथा सर्रास प्रचलित होत्या.. मालिकेत कुठेही जरठ-कुमारी विवाहाचं समर्थन नव्हतं..
हे झालं या दोन मालिकांबद्दल.. इतर कुठल्या अशा मालिका असतील तर कल्पना नाही..
पहरेदार पिया की ऐतिहासिक मालिका वाटत नाही.. प्रबोधन करणारी तर मुळीच नाही..कुठल्या तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी मालिका वाटतेय.. त्यामुळेच एवढा विरोध होतोय..
अर्थात;स्त्री पहरेदार असणे किंवा पुरुषापेक्षा स्त्रीचे वय जास्त असणे या गोष्टींमुळे कोणी विरोध करत नसेल ही माझी भाबडी अपेक्षा..
मी सिरीयल पाहण्याची शक्यता
मी सिरीयल पाहण्याची शक्यता शून्य आहे पण याबद्दल जे वाचले ते असे - http://www.firstpost.com/entertainment/ki-3739323.html
9 वर्षांचा मुलगा एक स्त्रीशी विवाह करताना दाखवलेय. उंच माझा झोका मधला समाज 150 वर्षे जुना होता त्या काळी जी पद्धत होती ती मालिकेत दाखवली होती. आज ज्या ठिकाणी बालिकावधू टाईप विवाह होताहेत (जे मुळात दोन लहान मुलांमध्ये लावले जातात, बालिकावधूतही नवराबायको लहान दाखवलेले) तिथे लोक विरोध करताहेत, तर आता त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे लहान मुलांचे स्त्रियांशी विवाह करायची नवी पद्धत आलीय का? जी या मालिकेत दाखवणार आहेत?
अंधश्रध्देला आणि चुकीच्या
अंधश्रध्देला आणि चुकीच्या प्रथाना खतपाणी घालणार्या मालिकांवर बंदी आणायची असेल तर ८०-९० टक्के मराठी - हिंदी मालिकांवर बंदी आणावी लागेल ना.
ही एकच का खटकते?
आणि राजस्थान व तत्सम भागात असेही विवाह लावण्याची प्रथा होती/आहे त्यावर ही मालिका असावी असं वाटतय.
सोनी वर आहे ना, मग प्रत्येक
सोनी वर आहे ना, मग प्रत्येक भागाच्या सुरुवातीला आणि शेवटाला अनुप सोनीला दोन मिनिटे प्रेक्षकांचे बौद्धिक घ्यायला सांगायचे, हाफ टाईमला जाहिराती ऐवजी एसीपी प्रद्युम्नचा चेहरा स्क्रीनभरून दाखवायचा, मग मधे काहीही दाखवले तरी काय फरक पडतो. संपला विषय.
आताच त्या सिरीअलची झलक पाहिली
आताच त्या सिरीअलची झलक पाहिली..
त्याखाली स्पष्ट शब्दात लिहिलेले की सिरीअल बालविवाहाचे समर्थन करत नाही..
बाल विवाह ईज एंज्युरीअस टू हेल्थ ..
वैधानिक चेतावणी असेल तर काही हरकत नाही... नसावी..
असे एवढ्या तेवढ्या कारणांनी मालिका बंद पडायला लागल्या तर सरकारचा मनोरंजन कर काय संत तुकाराम मालिकेतून येणार का?
रोखठोक सवाल !
https://arynews.tv/en/15-year
हल्लीच वाचनात आलेली ताज़ी घटना (लग्नाचं कारणही भारीच दिले आहे) -
https://arynews.tv/en/15-year-old-boy-weds-73-year-old-woman-indonesia/
हां निदान 15 वर्षाचा तरी होता पण अश्याही केसेस आहेत की 8 वर्षाच्या मुलाचे सुद्धा वयस्कर स्त्रीयांसोबत लग्न घडलय
शेवटी जे इकडे तिकडे घडते तेच tv cinema मधून आपल्याला निर्माते दिगदर्शक मंडळी दाखवतात न !
दक्षिणा,
दक्षिणा,
फक्त एक वेगळ्या प्रकारची गोष्ट दिसते आहे ती. एक एपिसोड दहा बारा मिनिटे 'पाहिला गेला'. काही विशेष लोड घेण्याइतपत त्यात काही नाही.
लोड घ्यायचेच असेल तर कैक मालिका आहेत ऑलरेडी, विविध वाहिन्यांवर!
@ हायझेनबर्ग - भावना पोचल्या. पण अनूप सोनी फक्त क्राईम पॅट्रोलचे सूत्रसंचालन करतो. तो कार्यक्रम आधीपेक्षा दर्जात घसरला असला तरी अजूनही बराच रिअलिस्टिक आहे, रोचकही आहे. अनूप सोनी बोलतोही छान! ही झाली माझी मते! तुमच्या मतांचा अर्थात आदर आहेच.
बेफि तुमचा आदर स्वीकार करतो,
बेफि तुमचा आदर स्वीकार करतो, पण ह्याबाबतीत माझे काही मत वगैरे नाहीये हो. भारतीय टेलीविजन बद्दल माझे ज्ञान सोनी, क्रापे आणि सीआयडी ह्याच्या पुढे तसूभरही नाही. तसेही एकदा GoT, BrBa, Friends चे रक्तं तोंडाला लागले की बाकी सगळे तूपकट वाटते, त्यामुळे ते बघायच्या फंदात पडत नाही.
विनोदाचा क्षीण प्रयत्न केला होता, बाकी काही नाही.
(No subject)
घरी देशी चॅनल्स नाहीत , या
घरी देशी चॅनल्स नाहीत , या बीबीमुळे अशी काही सिरियल आहे माहित झालं , नावावरून पहारा देणारी इच्छाधारी नागिण वगैरे आहे कि काय आणि अंध्दश्रद्धा पसरू नये म्हणून ऑब्जेक्शन असावं अंदाजानी मुद्दाम युट्युब वर जाऊन बघितला पहिला एपिसोड
असो तर राजस्थान आणि बाल विवाह टाइप बरच काही येउन गेलय , त्यावर कधीच ऑब्जेक्शन नाही आलं.
बालिका वधु आणि पाउणशे वयमान , बालिका वधु आणि चाळीशीचा नवरा असेही अनेक विषय येउन गेलेत त्यामुळे अत्ताच फक्त हिरॉइन मोठी आणि बालक लहान दाखवल्यानी लगेच गदारोळ आहे कि काय असा नवा प्रश्नं पडलाय !
( BTw, राजस्थान- राजेशाही इ. विषय सोयीस्करपणे घेतल्याने सिरियलचा थाटमाट , सेट्स, कपडे काय सॉलिड आहेत, हिंदी मधे हे तरी बरं असतं, मराठीत तेही नाही.)
युट्युबवर एक प्रोमो दिसला, फक्त राजेशाही कपडे आणि दागिन्यांवर फोकस करणारा, सिरियल प्रोमो आहे कि ज्वेलर किंबा कपड्यांची अॅड असं वाटलं , बघा प्रोमो.
http://youtu.be/yarm3YclRr4
ती हिरॉइन फासले मधल्या फराह्सारखी दिसतेय.
परमीत सेठी हँडसम दिसतोय रॉयल गेटप मधे.
बालिका वधू मध्ये बालविवाह
बालिका वधू मध्ये बालविवाह किंवा जरठ-कुमारी विवाहाचं समर्थन केलं नव्हतं.. उलट या प्रथा वाईट आहेत आणि त्या बंद झाल्या पाहिजेत असाच ट्रॅक होता >>तेव्हा बालिका वधू बघून माझी भाची म्हटली होती कि 'मला लग्न करायचे आहे'. मग आम्हाला सोडून तुला दुसर्यांच्या घरी रहायला जावे लागेल असे सांगितल्यावर गप्प बसली.
असो तर राजस्थान आणि बाल विवाह
असो तर राजस्थान आणि बाल विवाह टाइप बरच काही येउन गेलय , त्यावर कधीच ऑब्जेक्शन नाही आलं.
बालिका वधु आणि पाउणशे वयमान , बालिका वधु आणि चाळीशीचा नवरा असेही अनेक विषय येउन गेलेत त्यामुळे अत्ताच फक्त हिरॉइन मोठी आणि बालक लहान दाखवल्यानी लगेच गदारोळ आहे कि काय असा नवा प्रश्नं पडलाय !
+१
संस्कृतीरक्षक जागे झाले स्त्रीला पहरेदारच्या भूमिकेत बघून. एका प्रोमोत ती पिस्तूल हाताळताना दाखवली आहे. उलट आवडलं मला ते.
सनव :).
सनव :).
Btw तो मुलगा किती क्युट आहे, खरच कुंवरसा दिसतोय, पूर्ण स्टारकास्टच काय देखणी आहे.
इतर रजपूत बायका कव्हर्ड , हिरॉइन मात्रं पोटीमा
तेव्हा बालिका वधू बघून माझी
तेव्हा बालिका वधू बघून माझी भाची म्हटली होती कि 'मला लग्न करायचे आहे'
>>>>>
यावरून आठवले,
शाळेत असताना आम्ही राजकपूरच्या तेरे नाम जोकरपासून इन्स्पायर होतो आणि कॉलेजला गेल्यावर शाहरूखच्या मै हू ना पासून ...
चित्रपटमालिकांत जे घडते ते दाखवतात आणि चित्रपट मालिकांत बघून आपणही तेच करायला बघतो. थोडक्यात जे कुठेतरी चार लोकं करत असतात ते चित्रपटामुळे लाखो लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यातले काजी हजार तसे वागू लागतात.
एखादी वाईट गोष्ट करताना आपण चित्रपटांचा आधार घेतो आणि म्हणतो, जगात हे असे चालतं, त्यात काही विशेष नाही.
ती तेजस्वी वायंगणकर आहे, १९९२
ती तेजस्वी वायंगणकर आहे, १९९२ बॉर्न. डोळे छान आहेत, या आधी स्वरागिणीमध्ये होती . छोटी ठकुराईन कोण आहे बघायला हवे.
ओहह... इथे लोक थेट संस्कृती
ओहह... इथे लोक थेट संस्कृती व तिच्या रक्षकांपर्यंत पर्यंत पोचले की... ठीक.
हेडरमधला मजकूर वाचून वाटलं की
हेडरमधला मजकूर वाचून वाटलं की ऋन्मेषनी दक्षिणांचा आयडी हॅक केला की काय?
एखादं पुस्तक न वाचलेले आणि वाचण्याची शक्यता नसलेले, त्यावर बंदी घालायची मागणी करतात. चित्रपटाबाबतही तेच. आता मालिकेबाबतही हे होताना पाहून मजा वाटली.
अगदी अगदी... मलापण आदी वाटलं
अगदी अगदी... मलापण आदी वाटलं की रूनमेशजी चा धागा आहे...
इथे बोलणार्या कितीजणांनी
इथे बोलणार्या कितीजणांनी पहिला एपिसोड पूर्ण पाहिला आहे?
मी पाहिला. इथे स्टोरीलाइनवर आक्षेप का घेताय म्हणून प्रश्न विचारला जात आहे, लहान मुलगी व मोठा वर असे दाखवले वगैरे तेव्हा का नाही आक्षेप घेतलात, अमुक आणी तमूक....
तर माझे म्हणणे असे की पहिल्या एपिसोड मधला कॉक्रोच वाला सीन बघा. तरीही तुम्हाला त्यात काहीच आक्षेपार्ह वाटत नसेल तर भारत फारच सुधारला आहे असे म्हणायला लागेल. आता पुढची स्टेप म्हणजे चाइल्ड पोर्णच! तसंही 'बडे अच्चे लगते हैं' मालिकेत सॉफ्टपोर्णची पातळी गाठलीच होती.
-डिस्क्लेमरः आमच्या घरात टीवी नाही, खास हा धागा निघाला म्हणून या मालिकेचा पहिला एपिसोड युटूब वर पूर्ण बघितला. कोणी काय बघावे वगैरे याबद्दल स्वघोषित रक्षकगिरी करण्यात मला अजिबात इन्टरेस्ट नाही. या मालिकेत ज्या पद्धतीने दोघांचा सीन दाखवलाय तो माझ्यामते आक्षेपार्ह आहे. हे माझे मत आहे, कुणाला पटलेच पाहिजे असे नाही. धन्यवाद!
मालिका बॅन करा म्हटल्याने
मालिका बॅन करा म्हटल्याने मालिकेचा टीआरपी वाढतोय म्हणजे. ज्यांनी ही मालिका बघितली नसती तेही शोधून शोधून बघताहेत.
मी पण सोनीला सबस्क्राइब करू का? सर्फिंग मध्ये उगाच वेळ जाऊ नये म्हणून मोजक्याच १०-१२ चॅनेल्सचं पॅकेज घेतलंय. त्यात हिंदी एंटरटेनमेंटचं एकही चॅनेल नाहीए.
शोधून बघितली म्हणजे कायम
शोधून बघितली म्हणजे कायम बघितलीच जाईल असे नाही. दर्जा असेल तरच कायमस्वरुपी प्रेक्षक मिळेल. वादग्रस्त मालिका शोधून बघणे म्हणजे टीआरपी देणे नव्हे.
>>मनोरंजन कर काय संत तुकाराम
>>मनोरंजन कर काय संत तुकाराम मालिकेतून येणार का?
संत तुकाराम सुद्धा जोरात सुरु आहे.
दर्जा असेल तरच कायमस्वरूपी
दर्जा असेल तरच कायमस्वरूपी बघितली जाते हे मान्य.
पण तो आहे की नाही ते ठरवायला आधी ती लोकांपर्यण्त पोहोचावी लागते ना.
जाहिरात करण्यामागचा मूळ हेतू हाच तर असतो.
जाहिरातीचे एक बजेट असते. अश्या वादग्रस्त गोष्टींमुळे कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यण्त आपले प्रॉडक्ट पोहोचते.
संत तुकाराम सुद्धा जोरात सुरु
संत तुकाराम सुद्धा जोरात सुरु आहे.
>>>
अश्या नावाची मालिका आहे का खरेच? मी असेच उदारणार्थ म्हणून काहीबाही बोललो
हेडरमधला मजकूर वाचून वाटलं की
हेडरमधला मजकूर वाचून वाटलं की ऋन्मेषनी दक्षिणांचा आयडी हॅक केला की काय?
>>>>
धागा माझा नसला तरी विषय माझ्या आवडीचा आहे.
अश्या आशयाचे मी बरेच धागे काढले आहेत आणि वेळोवेळी आवाज उठवला आहे. अजून मी ही मालिका बघितली नसल्याने सविस्तर काही लिहिले नाही ईतकेच.
बाकी मी एआयबी रोस्ट नामक प्रकाराच्या वेळीच सर्वांना सावध केले होते. आधुनिकतेच्या नावाखाली वाह्यात प्रकार चालवून घेऊ नका. पण आश्चर्य म्हणजे मलाच ईथून फार विरोध झालेला. तुम्हाला नाही बघायचे तर तुम्ही बघू नका, जबरदस्ती नाहीये वगैरे टिपिकल मुद्दे. पण जेवढा उशीर कराल तेवढी ही किड फोफावत जाणार. उद्या पोगो चॅनेलवर सविता वहिनींचे कार्टून सुरू झाले आणि आधुनिक विचारांच्या लोकांनी त्याचे लैंगिक शिक्षण सदराखाली स्वागत केले तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
सनव आणि दीपांजली + ११११
सनव आणि दीपांजली + ११११
तसही शाळेतल्या मुलग्यांना त्यांच्या फिमेल टीचर पण आवडत असतातच किव्वा सुप्त आकर्षण असते . हे अस प्रत्यक्ष आयुष्यात घडतच . मालिकेत तर राजस्थानची पार्श्वभूमी आहे . मागे टीव्ही वर एक मालिका झाली होती "अस्तित्व एक प्रेमकहाणी" नावाची . त्यात पण हिरो लहान आणि हिरोईन मोठी ( ८ वर्षाचं अंतर. म्हणजे हिरो जेव्हा दहा वर्षाचा असेल तेव्हा हिरोईन अठरा वर्षाची असेल ) असा काहीतरी विषय होताच आणि ती मालिका भरपूर लोकप्रिय पण होती
Pages