पेहरेदार पिया की - बॅन झाले पाहिजे का?

Submitted by दक्षिणा on 20 July, 2017 - 09:32

सध्या सोनी वरील पेहरेदार पिया ही सिरियल 'आदरवाईज' गाजते आहे. प्रोमो पाहून लक्षात येत होतं की हे काहीतरी 'वेगळं प्रकरण' आहे. आता तर हि सिरियल चक्क सुरू झाली आहे ना? Uhoh
आजच फेसबूक वर पुणे लेडिज गृप वर एक पोस्ट पाहिली की आपण ही सिरियल बॅन करायला अपिल करू.
इतक्या लहान मुलाचे आई वडील त्याला 'अशी' भुमिका करायला परवानगी कसे देतात? किंवा हा काय विषय आहे का? इ. अनेक मुद्दे घेऊन तिथे चर्चा सुरू होती/आहे.
तुमचे मत काय? मी व्यक्तिशः एकही एपिसोड पाहिला नाहिये. पण इतके सगळीकडून आवाज येतायत की मी माझी उत्सुकता दडपून ठेवू शकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरे आहे मी टीव्ही सिरीयल पाहण्यात मागासलेला आहे.
कुठली सिरीयल चांगली असे म्हणताच येत नाही.

उद्या पोगो चॅनेलवर सविता वहिनींचे कार्टून सुरू झाले आणि आधुनिक विचारांच्या लोकांनी त्याचे लैंगिक शिक्षण सदराखाली स्वागत केले तरी मला आश्चर्य वाटणार नाही.>> Lol Rofl

तसही शाळेतल्या मुलग्यांना त्यांच्या फिमेल टीचर पण आवडत असतातच किव्वा सुप्त आकर्षण असते . हे अस प्रत्यक्ष आयुष्यात घडतच

>>> ह्म्म्म्म्म..... प्रत्यक्ष आयुष्यात बरंच काय काय घडतं, ते आता सार्वजनिक मान्यता मिळाल्यासारखं मालिकांमधून दाखवायला हरकत नाही असे वाटते.

अस्तित्व म्हणजे तीच का ज्यात हर्ष छाया आणि ती हिरवीण डाॅक्टर असतात, भैरवी रायचुरा हर्षची बायको दाखवलेली. फार छान होती ती मालिका. रहावलं नाही म्हणून विचारलं. अवांतराबद्दल क्षमस्व.

राजस्थान जुना काळ दाखवला आहे का राजपुताना ?

मी महाराणी गायत्रीदेवी यांचं आत्मचरीत्र वाचलं मधे त्यात त्यांच्या नवऱ्याची पहिली बायको त्यांच्यापेक्षा खूप मोठी होती आणि ते अकरा वर्षाचे असताना तो विवाह ठरवून झालेला होता, राजघराण्यात. तिचीच भाची जी लहान होती, तिच्याशी दुसरा विवाह ठरवून झाला, ते दोघं वयात आल्यानंतर आणि तिसरा विवाह महाराणी गायत्रीदेवी यांच्याशी प्रेमविवाह होता, त्या आठ वर्षांनी लहान होत्या त्यांच्या पतीपेक्षा.

अधिकार, घरातील पूजाकार्य, विशिष्ठ प्रसंगी मिळणारे राणीचे अधिकार हे पहिल्या बायकोला होते, जी खूप मोठी होती राजाजींपेक्षा.

काहीच्या काही उदाहरणं वाचुन ऑ झालं एकदम.
उंच माझा झोका? सिरीयसली? ती ऐतिहासिक मलिका होती आणि तेव्हा जे घड्लं ते त्यांना दाखवायचं होत.
बालिका वधु मधे बालविवाह योग्य नाही हा मेसेज बर्‍यापैकी जात होता. (मग बोंबलली सिरेल)
आणि अस्तित्व ? आठ वर्षानी नायक लहान होता पण आठ वर्षांचा नव्हता.
ही सिरीयल काहीच्या काही आहे. खरंतर हीच नव्हे सगळ्याच सिरीयली बण्द कराव्यात अशा आहेत.

नवीन Submitted by सस्मित on 21 July, 2017 - 13:12

>> अगदी अगदी... काहीच्या काही लिहितात लोक.

पहिले दोन एपिसोड बघितले. जो काय आचरटपणा चालला होता त्यावरून ही मालिका बंदी घालायच्या लायकीची आहे असे माझे मत आहे.
जे लोक जुन्या मालिकांचे दाखले देऊन समर्थन करत आहेत त्याचे आश्चर्य वाटते Sad

उंच माझा झोका ऐतिहासिक मालिका होती, बालिका बधू मधे बालविवाह वाईट हे दाखवलं होतं, अस्तित्व मधे नायक २१ च्या वरती होता.
आणि समजा जरी हे असं नसतं तरी केवळ आधीच्या मालिकांमधे असं होतं म्हणून ही मालिका ओके आहे हे समर्थन पटत नाही.

आणि एक स्त्री पहरेदार दाखवलीये म्हणुन संस्कृतीरक्षक गळे काढताहेत हे लॉजिक तर धन्यच आहे.

हो खरच बंद केली पाहीजे हि मालिका उत्सुकता म्हणून पहिला भाग बघितला अत्यंत भिकार दर्जाची आहे ,९ वर्षाच पोरट चक्क लाईन मारताना दाखवल

९ वर्षाच पोरट चक्क लाईन मारताना दाखवल >> सध्या मारतात. मी मालिकेचं जस्टिफिकेशन करत नाहीये पण वस्तुस्थिती आहे ही.

सध्या मारतात. मी मालिकेचं जस्टिफिकेशन करत नाहीये पण वस्तुस्थिती आहे ही.>>>

हो पण ९ ची पोरं लग्न नाही ना करत

पाहिला पहिला एपिसोड. बोअर आहे.दोन्ही Voice over totally flat.
स्टोरीबद्दल द्विधा.
त्या मुलाला लग्नाचा अर्थ कुठे कळतोय? पण तो त्याच्या आजोबाचाही दाखला देतोय, त्यानेही हेच केलं म्हणून.
झुरळाला घाबरणारी पुढे तलवार घेऊन रक्षक कशी होईल हा प्रश्न पडला. मात्र तेवढ्यासाठी मी ही मालिका पाहणार नाही.

सोनी टीआरपीच्या स्पर्धेत मागे आहे बहुतेक. चर्चा नाही झाली तर ही मालिका आली कधी गेली कधी ते कळणारही नाही.

शाळेत असताना आम्ही राजकपूरच्या तेरे नाम जोकरपासून इन्स्पायर होतो>>>> ऋ, मेरा नाम जोकर नाव आहे पिक्चरचे, तेरे नाम जोकर नव्हे. Lol

संत तुकाराम सुद्धा जोरात सुरु आहे.
>>>
अश्या नावाची मालिका आहे का खरेच? मी असेच उदारणार्थ म्हणून काहीबाही बोललो>>> सन्त तुकाराम च्या चरित्रावर आधारीत तु माझा सान्गाती नावाची मालिका कलर्स मराठी वर लागते चिन्मय मान्डलेकरची.

उद्या पोगो चॅनेलवर सविता वहिनींचे कार्टून सुरू झाले आणि आधुनिक विचारांच्या लोकांनी त्याचे लैंगिक शिक्षण सदराखाली स्वागत केले तरी मला आश्चर्य वाटणार नाही>>>. मी चुकून सविता वाहीनी वाचल, म्हटल हि आणि कुठली वाहीनी. Biggrin

आणि अस्तित्व ? आठ वर्षानी नायक लहान होता>>>> अस्तित्व मालिकेवरुन एक मराठी मालिका आली होती झीमवर, राधा हि बावरी नावाची.

आजच फेसबूक वर पुणे लेडिज गृप वर एक पोस्ट पाहिली की आपण ही सिरियल बॅन करायला अपिल करू.>>>> सगळयात आधी ती माझ्या नवर्याची बायको बॅन करण्यासाठी अपील करा म्हणाव.:राग:

सगळयात आधी ती माझ्या नवर्याची बायको बॅन करण्यासाठी अपील करा म्हणाव.:राग:
>>>>

मी बघत नाही कधी . मागे कोणीतरी शनायाच्या सौण्दर्याचे कौतुक केले म्हणून मध्यण्तरी पाहिलेली, आणि भ्रमनिरास झाल्यावर पुन्हा त्या नादाला लागलो नाही. असो, पण याबाबत नक्की आक्षेप काय आहे?

आणि अस्तित्व ? आठ वर्षानी नायक लहान होता पण आठ वर्षांचा नव्हता. >> मान्य आहे तो चोवीस वर्षाचा आणि ती ३२ वर्षाची दाखवले होते. पण तो नायक जेव्हा दहा वर्षांचा होता तेव्हा ती नायिका १८ वर्षांची होतीच असं मला म्हणायचं आहे. प्रेम जे काय नायकाकडून एकतर्फी दाखवलं होत ते तो चोवीस वर्षांचा असताना एवढच म्हणणं आणि इथे कोणीच जुन्या मालिकांचं समर्थनही करत नाहीये फक्त अशा अशा मालिका आधीच येऊन गेल्या आहेत एवढच म्हणताहेत Happy

पण तो नायक जेव्हा दहा वर्षांचा होता तेव्हा ती नायिका १८ वर्षांची होतीच असं मला म्हणायचं आहे>>

हो पण तेव्हा तो दहा वर्षाचा नायक अठराच्या नायिकेवर प्रेम करत नव्हता आणि त्यांचं लग्नही तेव्हा झालं नव्हतं.

हो पण तेव्हा तो दहा वर्षाचा नायक अठराच्या नायिकेवर प्रेम करत नव्हता आणि त्यांचं लग्नही तेव्हा झालं नव्हतं.> अरे आठ वर्षाचं अंतर दाखवलं होत एवढच सांगायचं आहे. बाकी तो आठ वर्षाचा असताना त्याचा लग्न झालं नव्हतं आणि तो प्रेमही करत नव्हता हे सगळ्यांनाच माहितीये कि . उगीचच काही तरी

अस्तित्व म्हणजे वरुण बडोला आणि निकि अनेजा ना?
ही मी मधूनच पाहायला सुरुवात केलेली. त्यामुळे वय कमीजास्त होतं ते आठवत नाहीए.

सध्या मारतात. मी मालिकेचं जस्टिफिकेशन करत नाहीये पण वस्तुस्थिती आहे ही. >>>>> बाकी पण बरच काही करतात. ह्या वयात ब्रेक अप पण होतात आजकाल. Lol

मान्य आहे तो चोवीस वर्षाचा आणि ती ३२ वर्षाची दाखवले होते. पण तो नायक जेव्हा दहा वर्षांचा होता तेव्हा ती नायिका १८ वर्षांची होतीच असं मला म्हणायचं आहे. प्रेम जे काय नायकाकडून एकतर्फी दाखवलं होत ते तो चोवीस वर्षांचा असताना एवढच म्हणणं
>>
Naahee paTale. Same nahi. Ekada mature zalyavar vegalee case hote.

Acharat panaa vatala he vachun.
Premacha ekach rang mahit ahe kaay lokanna?

सगळयात आधी ती माझ्या नवर्याची बायको बॅन करण्यासाठी अपील करा म्हणाव>> अगदी अगदी. या धाग्यावर जेव्हा २ च प्रतिसाद होते तेव्हा पहिला हाच विचार आला होता कारण या मालिके बद्दल काहीच माहिती नव्हते. नाहीतरी आजकालच्या ८०% मालिका धन्यवाद असतात आणि ५०% मालिका ताबडतोब बंद करण्यात याव्यात अश्या आहेत. कारण या मालिका चुकून जरी लागल्या तर TV फोडावा वाटतो पण TV साठी मोजलेले ४२ हजार आणि २०११ च्या विश्वचषकासाठी घेतला होता हे आठवतं आणि channel change केलं जातं.

अजुनही एक सिरियल होती ज्यात मोठा भाऊ मरतो आणी मग ती हिरोइन छोट्या भावाशी लग्न करते. काही तरी दुष्काळ रीलेटेड स्टोरी होती.

Acharat panaa vatala he vachun. >> नानबा ठीक आहे . हे तुमचं मत आहे . प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे विचार असतात. वेगळी मत असतात .आता धागा कर्तीने ज्या प्रश्नावर धागा सुरु केल्या त्याबद्दल बोलूया का ? Happy

बाय द वे प्रत्येक सिरीयलच्या वेळी खालून जातं, तुम्हाला कंटेट मान्य नसेल, आक्षेप असेल तर इथे इथे कळवा, त्या पत्यावरही कळवू शकतो आपण.

फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशनला फाट्यावर का मारत आहात? हातात रिमोट आहे ना?
मुलं दहा बारा वर्षांची असतानाच बर्याच मोठ्या स्त्रीयांच्या प्रेमात पडतात(स्वानुभव)

Pages