Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15
ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
<<एखाद्या बोटीला चार भोके
<<एखाद्या बोटीला चार भोके पडली असतील तर ती सगळी योग्य त्या पद्धतीने बुजवणे आवश्यक आहे नाहीतर ती बोट बुडेल. एक भोक बुजवायला घेतल्यावर दुसर्याकडे बोट दाखवणे, ते दुरुस्त करायला घेतल्यास तिसर्याकडे बोट दाखवणे, एक भोक बुजवल्याने त्याने आता पाणी आत शिरायचे थांबेल का? >>
------ बोटीला अनेक भोके आहेत, आणि प्रत्येक भोकाचा व्यास वेगळा आहे, त्यातुन आत येणारे पाण्याचा फ्लो रेट वेगळा आहे. प्राधान्य जे भोक सर्वात मोठे आहे त्याला मिळायला हवा. नुसते लहान सहान भेगा बुजवतो आहे असे प्रयत्न करायचे पण सौदी रुपी भले मोठे भगदाड दुर्लक्षीत करायचे. ब्र शब्द काढायचा नाही.... असो.
दुसरा तेव्हढाच महत्वाचा मुद्दा होम ग्रोन दहशतवाद आहे (तो तसा आहे हे येथे काहीन्ना मान्य दिसत नाही). मी सर्व भोक समान आहेत असे मानत नाही. मर्यादित रिसोर्सेस आहेत, आणि दहशतवादाशी सामना करण्यासाठी उपलब्द रिसोर्स अलोकेशन प्राधान्यक्रमाने व्हायला हवे. असो.
जर काही देशांतून येणार्या
जर काही देशांतून येणार्या लोकांना व्हिसे दिले जाणार नसतील तर त्यायोगे त्या देशातील दूतावासातील लोक कमी करता येतील म्हणजे रिसोर्सेस कमी वापरले जातील. आणि बाकी गुप्तचर खाते वगैरे लोक अंतर्गत दहशतवादाकडे लक्ष ठेवणार नाहीत असे नाही. सरकारकडे अनेक खाती असतात आणि ती एकाच वेळी वेगवेगळी कामे करू शकतात.
६ देशांवरील बंदी ह्यामुळे प्रचंड रिसोर्सेस खर्च होतील असे मला वाटत नाही. प्रचंड गदारोळ होतो आहे एवढेच!
गदारोळाच काय घेऊन बसलात...
गदारोळाच काय घेऊन बसलात... फेक मिडिया रक्त येतय फ्रॉम व्हॉटेव्हर म्हटलं की पण घालते. ते सोडा.
सौदी रुपी भले मोठे भगदाड
सौदी रुपी भले मोठे भगदाड दुर्लक्षीत करायचे.
असे काही जणांना वाटते.
अमेरिकेला सध्या असे वाटते की ज्या अर्थी सौदी मधे अराजक नाही, त्या अर्थी तिथून येणार्या लोकांपासून धोका नाही. सौदी लोकच खात्री देतील की अमेरिकेत येणारे लोक दहशतवादी नाहीत.
आता काही सौदी लोकांनीच विमान पळवून शिकॅगो च्या इमारती पाडल्या तरी त्या़कडे दुर्लक्ष करावे. आयसोलेटेड इन्सिडेन्ट!
परंतू ता देशातील एक जण जरी आला तरी तो नुकसान करू शकेल अशी जरतारी भाषा वापरून या बंदीला पाठिंबा देता येतो.
नवीन हेल्थ कायदा -
नवीन हेल्थ कायदा -
नवीन हेल्थ कायद्यान्वये २२ मिलियन लोकांचा इन्श्युरन्स जाईल, लोकांचे प्रिमियम्स वाढतील हे केवळ अंदाज वर्तवले आहेत, जरी सरकारी बजेट ऑफिसने सांगितले तरी ते चूक असू शकतात, कारण इन्श्युरन्स कंपन्या प्रि एक्झिस्टिंग कारणामुळे प्रिमियम्स वाढवतीलच असे नाही,
(त्यांना काय जास्तीत जास्त फायदा करून घेण्याची हौस नाही. शिवाय ते ट्रंप इतके हुषार पण नाहीत की कायद्याचा फायदा घेऊन स्वतःचा फायदा करून घेतील)
एका कंपनीने वाढवले तर तुम्ही दुसर्या कंपनीकडे जा. शिवाय आता कोणत्याहि कंपनीला कुठल्याहि राज्यात धंदा करायला परवानगी आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त चॉईस आहे.
शिवाय समजा प्रिमियम जास्त वाढले तरी इन्श्युरन्स न घेतल्यामुळे ओबामा च्या कायद्यान्वये त्यांना इन्श्युरन्स घ्यावाच लागला असता नाहीतर दंड झाला असता. त्यापेक्षा आता त्यांना इन्श्युरन्स घेतलाच पाहिजे अशी सक्ति नाही, परवडत नाही म्हणून घेतला नाही, स्वेच्छा! हा फायदाच आहे.
बाकी इन्श्युरन्स कंपन्या चालवणारे लोक, डॉक्टर्स इ. सांगतात, खुद्द काही रिपब्लिकन गव्हर्नर्स ना हा कायदा मान्य नाही
त्यांना काय समजते?
असे नुसते मतभेद
पण ट्रंपलाच सगळे समजते. ट्रंप सर्वात जास्त हुषार आहे, असे खुद्द त्यानेच सांगितले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. रायनहि असेच म्हणतो.
हे मत सध्या अमेरिकेत जास्त लोकप्रिय आहे त्यामुळे तेच बरोबर.
>>
>>
अमेरिकेला सध्या असे वाटते की ज्या अर्थी सौदी मधे अराजक नाही, त्या अर्थी तिथून येणार्या लोकांपासून धोका नाही. सौदी लोकच खात्री देतील की अमेरिकेत येणारे लोक दहशतवादी नाहीत.
आता काही सौदी लोकांनीच विमान पळवून शिकॅगो च्या इमारती पाडल्या तरी त्या़कडे दुर्लक्ष करावे. आयसोलेटेड इन्सिडेन्ट!
परंतू ता देशातील एक जण जरी आला तरी तो नुकसान करू शकेल अशी जरतारी भाषा वापरून या बंदीला पाठिंबा देता येतो.
<<
ट्रंपने घातलेली (वा लादलेली म्हणा हवे तर) ही सी आय ए व परराष्ट्र खात्याच्या अहवालावर आधारित आहे. तुम्हा आम्हाला सौदी अरेबियाबद्दल किती तिरस्कार वाटतो त्यावर नाही. मलाही सौदी ह्या देशावर जगाने बहिष्कार घालावा, अमेरिकेने व्हिसा देऊ नये असे वाटतेच. पण नुसते वाटून काय होणार?
९/११ चा हल्ला होऊन आता १६ वर्षे होतील. त्यामागच्या संघटना, त्यांची अर्थव्यवस्था उध्वस्त झालेली आहे. त्या संघटनेचे नेते एक तर मारले गेले, तुरुंगात खितपत आहेत किंवा भूमिगत आहेत. पुन्हा जर ९/११ सारखा प्रकार झाला आणि त्याच्याशी सौदी अरेबियाचा थेट संबंध असेल तर सौदी राजघराणे संपेल ह्याची त्यांना जाणीव आहे त्यामुळे ते असे होणार नाही ह्याची खबरदारी घेतील असे मला वाटते.
परंतु त्या ६-७ देशात जिथे सरकारेच नाहीत किंवा असली तरी त्यांचे बर्याचशा देशावर नियंत्रणच नाही असे असेल तर अशा प्रकारे अंकुश ठेवण्यात ती सरकारे अपयशी ठरणार हे नक्की.
जाता जाता: हे शिकागोतील इमारती पाडण्याचे काय नवीनच खूळ? ९/११ च्या हल्ल्यात शिकागोला धक्का लागल्याचे ऐकले नाही.
बरं, हेल्थकेअर बिल वर तुमची
बरं, हेल्थकेअर बिल वर तुमची काय भूमिका आहे शेंडेनक्षत्र ?
ट्रम्प आणि म्यूलर च्या
ट्रम्प आणि म्यूलर च्या वादावरून हा सीन आठवला. ट्रम्प म्हणे त्याला एक्स्पोज करणार आहे.
अर्रर्र - आता स्पाइसी स्टोरीज
अर्रर्र - आता स्पाइसी स्टोरीज येत राहतील का यापुढे? याने पुस्तक लिहीले पाहिजे. मजा येइल वाचायला.
हो ना स्पायसीने एन्टरटेन खूप
हो ना स्पायसीने एन्टरटेन खूप केलं.
इन जनरल फक्त ३-४ महिन्यात ट्रम्प अॅडमिनिस्ट्रेशन मधले फायरिंग्ज , रेसिग्नेशन्स रेकॉर्ड ब्रेक असावेत.
हो. स्पायसरचं पुस्तक आलं तर
हो. स्पायसरचं पुस्तक आलं तर मजा येईल वाचायला.
नव्या माणसाला म्हणे प्रिबस ते बॅनन हेट करतात.
म्युलर फ़ायनान्शिअल टाईज ट्रेस करणारच आता ट्रंपच्या त्या शेपटीवर पाय पडल्याने तो अगदीच बिथरला आणि काल जेफ सेशन्सला पण कानपिचक्या मिळाल्या.
स्पायसरने मोकळा श्वास घेतला असेल आता... दया यायची त्याची.
प्रेसिडंट पार्डन करायच्या
प्रेसिडंट पार्डन करायच्या नियमांबाबत माहिती घेतायत असं कळल्यावर 'प्रेसिडंट स्वतःलाच पार्डन करू शकतात का?' इतका विचार न्यूज मिडिया करू लागल्येय. काहीही शक्य आहे या माणसाबाबातील http://www.cnn.com/2017/07/21/politics/trump-pardon-authority/index.html
थिएटर ऑफ द अॅब्सर्ड !
थिएटर ऑफ द अॅब्सर्ड ! यापेक्षा धक्कादायक काही घडू शकत नाही असे म्हणून दोन दिवस मनाला शांती द्यावी तर नवा बाँब पडतो !
त्या एका जोक मधे तो ट्रॅफिक
त्या एका जोक मधे तो ट्रॅफिक पोलिस स्पीडिंग करता पकडलेल्याला म्हणतो, माझे आजचे काम झालेले आहे, तू मला काहीही कारण दे तुला सोडून द्यायला, तसे आजकाल रिपब्लिकन बेस वाले करत आहेत ट्रम्प बद्दल. ज्यु. चे ते रशियन लोकांच्या मीटिंग बद्दल बाहेर आले तेव्हा
"पण हिलरी..." - या दोन शब्दांवर अर्धे लोक फ्री पास देउन मो़कळे झाले. यापुढचे शब्द काहीही असोत
"हिलरी, युक्रेन..." इतक्यावर आणखी बरेच गप्प बसले. दोन्हीतील फरक, एक लीगल इन्फोर्मेशन होती वगैरे फालतू डीटेल्स.
उरलेल्या इतरांकरता खालील मात्रा लागू पडल्या
"यात काय इल्लिगल आहे"
"हे कॉल्यूजन होत नाही. झाले तरी इल्लिगल नाही"
"या मीटिंग मधे काही घडलेच नाही"
"फेक मीडियाची बातमी आहे. विश्वास ठेऊ नका"
"हे राजकारण आहे. सगळेच करतात"
आपल्या पार्टीने चूक जरी केली तरी परखड पणे ते बोलण्याऐवजी बहुतेकांचा अॅप्रोच ते रॅशनलाइज करण्याकडेच असतो हे सर्वत्र दिसते. इथे सहा महिने सगळी गँग कोणी रशियन लोकांना भेटलेच नाही हे सांगत होते, ते न्यू यॉर्क टाइम्स ने बाहेर काढले याकडे फॉक्स पासून इतरत्र पूर्ण दुर्लक्ष केले गेले आहे. काही ठिकाणीतर सत्याचा कळवळा येउन ज्यु. ट्रम्प ने ही माहिती स्वत:हून पब्लिश केली असेही लोक समजत आहेत
एकच साइट/पेपर यात स्वतःच्या मूळच्या मतांशी/तत्त्वांशी ठाम राहिलेला दिसतो. ती मते न पटण्यासारखी का असेनात. नॅशनल रिव्यू. ट्रम्प बद्दल आता "संशयाचा फायदा संपला" हे एक परखड मत, आणि "हिलरी ने काय केले हे यापुढे पळवाट म्हणून चालणार नाही" हे दुसरे. तेथे या लेखकांना ताबडतोब डिसओन करण्यात आलेले आहे, पण त्यांनी हे लेख लिहीले हे विशेष.
ट्रंप ज्यु. च्या ऐवजी चेलसी
ट्रंप ज्यु. च्या ऐवजी चेलसी ने 'ती' भेट घेतली असती तर तर रायन, मॅकॅकॉनेल, टेड क्रूझ, हानिटी ह्यांनी काय थैमान घातले असते ह्याचा विचार करून करून मजा वाटते.
टोटली. अनेक गोष्टींबद्दल.
टोटली. अनेक गोष्टींबद्दल. पुतिन बद्दल बोलताना ओबामा जर म्हंटला असता की अमेरिका काय कमी आहे, तर लगेच अनेक रिपब्लिकन्स I WILL NEVER APOLOGIZE FOR AMERICA ओरडत उठले असते
ट्रम्पच्या खोटे बोलायला काहीच
ट्रम्पच्या खोटे बोलायला काहीच मर्यादा नाहीत. सर्व इमेल्स न्युरॉर्क टाईम्स प्रकाशित करणार होते... मग त्याच्या काही तास अगोदरच ट्रम्पबाळाचा विवेक जागृत झाला आणि त्याला अचानक पारदर्षकता आठवली... ट्रम्पबाबा ने ट्रम्पबाळाच्या धाडसाचे आणि पारदर्षकतेचे कोडकौतुक केले. मग मागच्या पाच दिवसात चार वेळा (भेटीचे कारण) स्टोर्या का बदलाव्या लागल्या?
एफबिआय च्या सुरक्षा क्लिअरन्सचे कागदपत्र कुशनरला तिन वेळा बदलावे लागले. किती विस्मरण... ? एव्हढे महत्वाचे कागदपत्रे भरताना किती निष्काळजीपणा दाखवायचा ? पुतिन आणि रशिया यान्च्या मुत्सद्दीसमोर हे खुपच पोरकट वाटतात. आपण कुणासोबत कसली चर्चा करत आहोत याचे तरी यान्ना भान आहे का ?
परवा सेशन्स (त्याच प्रमाणे म्युलर) विरुद्ध बोलला, पण २४ तासाच्या आत व्हाइट हाउसचा सेशन्सवर विश्वास आहे असे प्रसिद्ध झाले. म्युलर आणि चौकशीला मर्यादान्ची जाणिव करुन देतो. सर्व पोरखेळ चालला आहे.
रिपब्लिकन पक्षात फार थोडे लोक
रिपब्लिकन पक्षात फार थोडे लोक ट्रम्पला हटकण्याचे, त्याच्या धोराणान्ना विरोध करण्याचे धाडस दाखवतात. अशा तुरळक लोकात जॉन मॅकेन हे नाव अग्रेसर आहे. प्रकृती कारणास्तव (ब्रेन कॅन्सर) त्यान्च्या विरोधाला पण मर्यादा येणार आहे...
<<<हे शिकागोतील इमारती
<<<हे शिकागोतील इमारती पाडण्याचे काय नवीनच खूळ? ९/११ च्या हल्ल्यात शिकागोला धक्का लागल्याचे ऐकले नाही.>>>
हे कुणालाच माहित नाही कारण फेक मिडियने मुद्दामच ही बातमी दिली नाही. पण लोक असे बोलतात. मला माहित आहे. बाकी सगळे खोटे!
निर्लज्जपणे खोटे बोलण्यात आम्ही कदाचित ट्रंप वाल्यांची बरोबरी करू शकणार नाही, पण प्रयत्न अवश्य करू.
त्याच्या धोराणान्ना विरोध
त्याच्या धोराणान्ना विरोध करण्याचे धाडस दाखवतात.
ट्रंपचे कसले डोंबलाचे धोरण? आज एक तर उद्या दुसरेच बोलणारा माणूस तो.
त्यानेच म्हंटले आहे, की मी पेन हातात घेऊन बसलो आहे, माझ्यापुढे काहीतरी सहीला पाठवा. म्हणजे रिपब्लिकन पक्षाला त्यांच्या मनासारखे राज्य करायला काहीच हरकत नाही. मग ट्रंपच बरा, सही करायला तयार!
पण रिपब्लिकन पक्षातच अजून एकमत होत नाहीये.
आता ते डेमोक्रॅट्स ना शिव्या घालतात की डेमोक्रॅट्स काही मदत करत नाहीत.
मूर्ख!
तुम्ही आमचे घर समूळ खोदून काढायला निघालात नि वर आम्ही मदत करत नाही म्हणून ओरडता? आम्हीहि आमच्या मते देशाचे भलेच करत होतो, तुम्हाला पटले नाही, निवडून आलात, शेखी मिरवलीत की आम्ही आमच्यातच ठरवू काय कायदा करायचा, आम्हाला डेमोक्रॅट्स ची मदत नको. नि आता अंगाशी आल्यावर दोष दुसर्याला!! सगळेच लोक कोल मायनरएव्हढे मूर्ख नाहीत!!
एक मदत नक्की करू एक सणसणित लाथ हाणून हाकलून देऊ. म्हणजे तुम्हाला काही करायला नको.
लोकहो, ट्रंप व त्याचे कुटुंब
लोकहो, ट्रंप व त्याचे कुटुंब निर्दोष आहेत! नॅशनल एन्क्व्यायरर च्या पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहीले आहे की Hilary framed Trump!
याहून जास्त पुरावा कशाला पाहिजे? चक्क वर्तमानपत्रात छापून आले आहे. नॅशनल एन्क्व्यायरर म्हणजे न्यू यॉर्क टाईम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट सारखे फेक न्यूज नाहीत.
मिका ब्रेझिन्स्कीने दुकानातून बीअर विकत घेतली ही गोष्ट फक्त नॅशनल एन्क्व्यायरर नेच छापली.
हे काही साधे सुधे वर्तमानपत्र नव्हे. याच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ची प्रत्यक्ष अमेरिकेच्या अध्यक्षाशी मैत्री आहे.
तेंव्हा आता ट्रंपवर टीका बंद!
मा़ही खात्री आहे, येथील दोघेजण तरी मला पाठिंबा देतील.
प्रेसीडेंशियल पार्डनची गम्मत
प्रेसीडेंशियल पार्डनची गम्मत वाचून आपली कीव करावी कि कॉनाची तेच कळत नाहिये
https://youtu.be/5VDsind39pk
https://youtu.be/5VDsind39pk
Repeal and replace failed in
Repeal and replace failed in Senate.
Sen. John McCain voted NO.
Scaramucci is so vulgar... Sure an entertainment
मर्डॉकआजोबांच्या वॉल स्ट्रीट
मर्डॉकआजोबांच्या वॉल स्ट्रीट जर्नलमधली घरचा-अहेर-प्रतिक्रिया:
3 - Wives
4 - Communications Directors
2 - FBI Directors
2 - Chief of Staffs
2 - National Security Advisors
1 - Lewd Speech to Boy Scouts
42 - Golf Trips
Six months of "winning"
पुढचा नंबर एजी?
पुढचा नंबर एजी?
काय खतरनाक कार्टून आहे न्यू
काय खतरनाक कार्टून आहे न्यू यॉर्कर मधले!
लाल टोपी आल्याआल्या काढून देणे, पाठीत खंजीर.. जबरी!
सेशन्स दुर होणारच आहे, त्यात
सेशन्स दुर होणारच आहे, त्यात शन्का नाहीच केवळ कधी आणि कसा हाच प्रश्न आहे. स्वत: बाहेर पडेल अशी परिस्थिती ट्रम्प निर्माण करतो आहेच, यात यश नाही आले तर मग शेवटचा उपाय म्हणुन त्याला काढुन टाकेल. म्युलर यान्ना हात लावता येत नाही, त्याला दुर करण्याअगोदर सेशन्सला दुर करावे लागेल.
काल सिनेट मधे पराभव झाला, नामुष्की ओढवली या पराभवाच्या चर्चेची जागा व्हाईट हाउस मधल्या सावळ्या गोन्धळाने घेतली आहे. स्कॅरामुची यान्ची भाषा खुप खालच्या दर्जाची आहे...
>
>
----- जॉन मॅकेनचे अभिनन्दन... लोकशाही मार्गाने विरोध होणे आत्यन्तिक गरजेचे होते. ओबामा केअर ला योग्य, मजबुत पर्याय दृष्टीपथातही नाही आणि कसले complete Repeal and replace तर राहुच दे पण स्किनी.... पण शक्य नाही. ट्रम्पच्या मर्यादा स्पष्टपणे दिसतात.
ट्रंपने केंव्हाच सांगून टाकले
ट्रंपने केंव्हाच सांगून टाकले - हेल्थ बिल ही काँग्रेसची जबाबदारी आहे. तेंव्हा त्यांचा पराभव झाला. तो सुद्धा डेमोक्रॅट्स नी मते दिली नाहीत म्हणून.
बाकी ट्रंप अगदीच अमर्याद आहे हो! कुठल्या बाबतीत ते विचारू नका!!
Pages